The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या रशियन स्नायपरने दुसऱ्या महायु*द्धात ना*झी सैन्याच्या नाकीनऊ आणले होते

by द पोस्टमन टीम
21 February 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


यु*द्ध म्हटले की हार-जीत आलीच. यु*द्धातील यशाला आकार देणारा आणि इतर सैनिकांचे प्रेरणास्थान बनणारा एक तरी पराक्रमी वीर असतोच सैन्यात असतोच. असा पराक्रमी यो*द्धा प्रत्येक सैन्यात असतो, ज्याच्या पराक्रमाचा सुगंध नेहमीच दरवळत राहतो.

दुसऱ्या महायु*द्धात हि*टल*रच्या ना*झी सैन्याला धूळ चारणारा असाच एक निधडा सैनिक रशियाच्या सैन्यात होता, ज्याचे नाव होते वसिली जाइटसेव.

हि*टल*रच्या सैन्यात विमाने, टँक, मोठमोठ्या तोफा अशी कितीतरी आधुनिक ह*त्यारे होती. या शस्त्राच्या आणि सैन्याच्या सहाय्याने त्याने युरोपमधील अनेक देश ताब्यात घेतले होते. तरीही त्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा थंड झाली नव्हती.

खरेतर रशियाचा स्टॅलिन आणि जर्मनच्या हि*टल*र यांच्यात दुसऱ्या महायु*द्धाच्या सुरुवातीलाच एकमेकांवर ह*ल्ले न करण्याचा करार झाला होता. पण, इतर देशांवर विजय मिळवल्यानंतरही हि*टल*रची तहान शमली नव्हती. त्याची हाव अजून वाढतच होती. म्हणूनच स्टॅलिन आणि त्याच्यातील कराराला मुठमाती देत त्याने स्टॅलिनचा विश्वासघात केला आणि रशियावर ह*ल्ला चढवला. जर्मन सैन्याने रशियामध्ये मुसंडी मारली होती. सुरुवातीला जर्मन सैन्याच्या माऱ्यापुढे रशियन सेना पिछाडीला पडत होती. जर्मन सैन्याला आता स्टालिनग्राडवर ह*ल्ला करून त्यावर कब्जा मिळवायचा होता. रशियाचा सर्वेसर्वा असणाऱ्या स्टालिनच्या नावानेच या शहराला स्टालिनग्राड हे नाव देण्यात आले होते. म्हणूनच या शहराचा पाडाव करून हि*टल*रला स्टालिनचा अपमान करायचा होता.



जर्मन सैन्य रशियात घुसण्याचा जोरदार प्रयत्न करत होते आणि रशियन सैन्यही त्यांना थोपवण्यासाठी जीवाचे रान करत होते. दोन्ही बाजूला सैनिकांच्या मृतदेहाचे ढीग लागले होते.

रशियाच्या सैन्यात वसिली जाइटसेव नावाचा एक स्नायपर होता. सुरुवातीला एक साधा मेंढपाळ असणाऱ्या वसिलीने रशियन सैन्यात स्वतःचा दबदबा निर्माण केला होता आणि जर्मन सैन्याच्या नाकी नऊ आणले होते.

हि*टल*रच्या सैन्याला वसिलीने कसे पराभूत केले याची कथा फारच रोचक आहे. वसिलीने ज्या हुशारीने आणि प्रसंगावधान राखून या यु*द्धात कामगिरी केली ते पाहून रशियन सैन्यातील इतर सैनिकांचेही मनोबल द्विगुणीत झाले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

दुसऱ्या महायु*द्धाच्या झळांपासून लांब असलेल्या येलेनोवास्क गावात वसिलीचा जन्म झाला. त्याचे वडील शेतकरी होते. शेतीच्या कामासाठी म्हणून त्याच्या आजोबांनी एक बंदूक घेतली होती. लहानपणापासून वेसिली याच बंदुकीने नेम धरण्याचा प्रयत्न करत असे. त्याचे आजोबा त्याला निशाणेबाजीचा धडा देत असत. वयाच्या ५व्या वर्षीच त्याने बर्डायन रायफलच्या सहाय्याने एका लांडग्याची शिकार केली होती. आपल्या मोठ्या भावाकडून त्याने शिकारीसाठी जाळे कसे लावायचे याचाही धडा शिकला होता.

जंगलातून हिंडत फिरत असताना जंगलातील बहुतेक नियम त्याच्या लक्षात आले होते. तेव्हापासूनच तो एखाद्या लष्करी सैनिकाप्रमाणे स्वतःला प्रशिक्षित करत होता. त्याचे बालपण जंगलात गेल्याने शिकार करणे आणि नेम धरण्यात तो पटाईत झाला होता. त्याच्या या बालपणीच्या कौशल्याचा पुढे जाऊन त्याला फायदाच झाला. ‘रेड आर्मी’मध्ये भरती झाल्यावर त्याने बालपणापासून स्वतःला दिलेल्या सैनिकी आणि निशाणेबाजीच्या प्रशिक्षणामुळे सैन्यातील कामगिरी बजावणे त्याला सहज शक्य झाले.

१९४१ साली ना*झी सैन्याने सोव्हिएत संघावर ह*ल्ला केला तेव्हा त्याला प्रत्यक्ष यु*द्धभूमीवर पाठवण्यात आले.

दुसऱ्या महायु*द्धाच्या वेळी स्टॅलिन आणि हि*टल*र यांच्यात झालेल्या करारानुसार त्यांनी दोघांनीही एकमेकांना वचन दिले होते की ते कधीच एकमेकांवर ह*ल्ला करणार नाहीत. पण, हि*टल*रची नियत बदलली आणि त्याने स्टॅलिनशी केलेल्या कराराचा भंग केला. विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेली नाझी सेना स्टालिनग्राडच्या दिशेने कूच करत होती. हि*टल*रला या शहरावर ताबा मिळवून स्टॅलिनची मानहानी करायची होती. परंतु स्टॅलिनने देखील कुठल्याही किमतीवर ना*झी सैन्याला यशाचे तोंड पाहू द्यायचे नाहीच असा दृढनिश्चय केला होता.

विविध प्रकारच्या आधुनिक शस्त्रांसह सज्ज असलेल्या ना*झी सैन्याला भिडायचे म्हणजे मृत्यूला सामोरे जायचे हे रशियन सैन्याला चांगलेच माहिती होते. परंतु यु*द्धभूमीवरून माघारी जायचे म्हटले तरी स्टॅलिनने त्यांना जिवंत सोडले नसते. शेवटी स्टॅलिनपण एक विकृत हुकुमशहाच होता. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा दुहेरी संकटात फसलेल्या सैन्याने शेवटी यु*द्धभूमीवर लढूनच मरण पत्करण्याचा मार्ग स्वीकारला. त्यांच्याकडे फक्त बंदुका आणि रायफल होते. एवढ्याच ह*त्यारानिशी ते ना*झी फौजेचा सामना करण्यास तयार झाले.

या हजारो सैनिकात वसिलीसुद्धा होताच. परंतु हि*टल*रच्या विरोधातील या लढाईत वसिलीने अद्भुत कामगिरी करून दाखवली. त्याने स्वतःच्या साहसातून रशियन सैन्यासमोर पराक्रमाचे आणि धाडसाचे एक उत्तम उदाहरण घालून दिले. संपूर्ण रशियन सेना त्याच्या पराक्रमाने प्रभावित झाली.

शेवटी लढू किंवा मरू अशा निर्धाराने यु*द्धभूमीत उतरलेल्या रशियन सैन्याने ना*झी सैन्याला गुडघे टेकण्यास भाग पाडले. नेहमीच मोठमोठ्या ह*त्यारांच्या साठ्याने यश मिळत नाही, तर सैनिकांच्या प्रसंगावधानाने आणि चिकाटी, साहसी वृत्तीनेच शत्रूवर विजय मिळवता येतो, हे पुन्हा एकदा रशियन सैन्याने दाखवून दिले.

ना*झी सैन्य स्टॅलिनग्राडमध्ये पोहोचताच दोन्ही बाजूचे सैनिक एकेमकांवर तुटून पडले. रेड आर्मीने एका इमारतीचा आधार घेतला होता आणि या इमारतीतून लपून ते ना*झी सैन्याला आपले लक्ष्य बनवत होते.

रेड आर्मीचे प्रयत्न जोरात सुरु होते. पण, ना*झींच्या समोर त्यांचा निभाव लागणे कठीण होते. अशावेळी एक स्नायपर असलाच पाहिजे असे सैनिकांना वाटत होते. म्हणून त्यांनी वसिलीला बोलावून घेतले. वसिलीची निशाणेबाजी अगदी चांगली होती म्हणून त्याच्यावरच ही जबाबदारी सोपवण्यात आली.

जवळून एखादे विमान जात असेल तेव्हाच वसिली आपला नेम धरत असे आणि अचूक लक्ष्य टिपत असे. यामुळे शत्रूलाही गोळी कधी आणि कुठून आली याचा अंदाज लावता येत नसे. एकट्या वसिलीने जर्मनीच्या २४२ सैनिकांना ठार मारले होते.

त्याच्या एका-एका गोळीने एक-एक सैनिक टिपला होता. हळूहळू ना*झी सैन्यात रशियाच्या या स्नायपरबद्दल दह*शत निर्माण झाली. एवढ्या मोठ्या शास्त्रसज्ज ना*झी सैन्याला एकटा वसिली जड झाला होता. वसिलीला उत्तर देण्यासाठी म्हणून ना*झी सैन्याने देखील बर्लिनहून निष्णात स्नायपर मेजर इर्विन कोएनिग याला बोलावून घेले. फक्त वसिली जाइटसेव याला मारण्याची जबाबदारी या स्नायपरवर सोपवण्यात आली होती. यावरून वसिलीचा ना*झी सैन्याने किती धसका घेतला होता, हे दिसते.

वसिली निशाणा कसा लावतो आणि त्यासाठी तो नेमकं कायकाय करतो याची सगळी माहिती कोएनिगने आपल्या सैन्यातील गुप्तहेराकडून घेतली होती. त्याच माहितीच्या आधाराने त्याने वसिलीवर निशाणा लावला. त्यादिवशी पहिल्यांदाच कोएनिग आणि वसिली एकमेकांसमोर येणार होते.

वसिली आणि रशियाची एक महिला स्नायपर ल्युडमिला शिकारीच्या शोधात बसले असतानाच कोएनिगने नेम धरला. या अचानक झालेल्या ह*ल्ल्यात ल्यूडमिला जागीच ठार झाली. वसिलीसाठीही हा धक्काच होता. जर्मन सैन्याकडेही असा एखादा स्नायपर असेल याची त्याला कल्पना नव्हती. आता या नव्या स्नायपरशी लढण्यास तो सज्ज झाला.

कोएनिगच्या गुप्तहेराने दिलेल्या बातमीमुळे कोएनिगला हे माहिती होते की वसिली एका बोगद्यात लपून बसतो आणि तिथून एका तुटक्या पाईपच्या सहाय्याने वर येतो. मग शिकार टप्प्यात येताच ह*ल्ला करतो. ज्या ठिकाणाहून वसिली नेहमी बाहेर येतो कोएनिगने नेमका त्याच ठिकाणावर नेम धरला होता. परंतु त्यादिवशी वसिली दुसऱ्याच रस्त्याने बाहेर आला आणि कोएनिगचा डाव पुरता फसला. वसिली सुदैवाने बचावला होता.

वसिली एका पाणी वाहून नेणाऱ्या पाईपमध्ये लपून बसला. इतक्यात वरून विमानाने ह*ल्ला केला आणि इमारतीला बसवलेल्या काचा फुटून त्याचे तुकडे जमिनीवर विखुरले. वसिलीजवळ पडलेल्या काचेच्या तुकडेत त्याचे प्रतिबिंब दिसत होते. त्यावरून कोएनिगला वसिली नेमका कुठे लपून बसला आहे याचा अंदाज आला होता. त्यात स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात वसिलीच्या हातातून त्याची रायफलही हातातून निसटून पडली होती.

नि:शस्त्र असलेल्या वसिलीवर ह*ल्ला करणे आता तर खूपच सोपे होते. वसिलीने आपल्या एका सहकाऱ्याला खुणेनेच काचेचा एक दुसरा तुकडा आणण्यास सांगितले. त्या सहकाऱ्याने काचेचा तुकडा आणून दिला आणि वसिलीने तो तुकडा सूर्यप्रकाशाच्या दिशेला वळवण्यास सांगितले.

त्या काचेवरून सूर्यप्रकाश परावर्तीत होऊन काचेच्या तुकड्यावर वसिलीचे प्रतिबिंब पडले होते त्यावर हे परावर्तीत किरण पडले. यामुळे ती काच चमकू लागली आणि कोएनिग काही काळ बुचकळ्यात पडला. याच वेळेत वसिलीने आपली रायफल उचलली आणि कोएनिगवर गोळी चालवली.

या गोळीने कोएनिग फक्त जखमी झाला. पण, वसिलीचे प्रसंगावधान आणि हुशारी पाहून त्यालाही वसिलीचे कौतुक वाटल्यावाचून राहिले नाही.

वसिली आणि कोएनिग यांच्यातील अशी चकमक दीर्घकाळ सुरु राहिली. दोघेही एकमेकांना मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या बंदुकीतून सुटलेली गोळी दुसऱ्याच सैनिकाला लागत असे. दोघेही एकमेकांची बंदुकीच्या टप्प्यात येण्याची वाट पाहत आणि दोघेही एकमेकांना फसवून निसटून जात. असे बरेच दिवस चालू राहिले. दोन्ही बाजूला सैनिकांच्या मृतदेहाचे खच पडले.

या दरम्यान कोएनिगच्या हालचालींविषयी गुप्तहेरांकडून वसिलीने बरीच माहिती जमवली होती. जर्मन सैनिक आता समोरासमोर येऊन लढण्यास बिचकत होते म्हणून त्यांनीही एका इमारतीचा आधार घेऊन तिथूनच ह*ल्ले सुरु ठेवले होते. वसिली आपल्या जागेवरून उठून बाहेर येईल आणि मोकळ्या मैदानात आपण त्याला गाठू अशी काहीतरी दिवास्वप्ने कोएनिग पाहत होता. परंतु वसिली काही बाहेर येण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी कोएनिग वैतागला आणि स्वतःच वसिलीला शोधण्यासाठी बाहेर पडला. त्याची ही अतिघाईच नडली आणि कोएनिग स्वतःहून वसिलीच्या जाळ्यात फसला.

कोएनिग आपल्या लपलेल्या ठिकाणाहून बाहेर पडला आणि वसिलीने ही संधी अजबात न दवडता त्याच्यावर नेम धरला. तो तत्काळ कोएनिगच्या समोर आला आणि थेट त्याच्या कनपटीवर रायफल ठेवून गोळी झाडली. एकाच गोळीत जर्मन स्नायपर कोएनिग ठार झाला होता.

आता कोएनिग मारला गेला होता आणि वसिलीच्या जीवावर बेतलेले संकट आता परतले होते. वसिलीसह रशियन सैन्याने आता सुटकेचा नि:श्वास सोडला. शिवाय, रशियन सैन्यालाही आता चेव चढला होता. वसिलीचा पराक्रम पाहून रशियन सैन्य भारावून गेले होते. जर्मन सैन्याचा सामना करताना आता त्यांना अधिकच बळ येत होते. कोएनिगच्या मृत्युनंतरही ही लढाई पुढे बरेच दिवस सुरु राहिली. पण, शेवटी जर्मन सैन्याचा पाडाव झालाच. युरोपातील इतर देशांवर चढाई करून त्यांना नेस्तनाबूत करणाऱ्या नाझी सैन्याला रशियन सैन्याने धूळ चारली होती.

जर्मन सैन्याच्या प्रमुखाला अटक करण्यात रशियन सैन्याला यश मिळाले. सैन्य प्रमुखच शत्रूच्या हाती लागला होता. त्यामुळे जर्मन सैन्याने मघार घेतली आणि आत्मसमर्पण केले.

आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज झालेल्या जर्मन सैन्यावर अगदी तुरळक शस्त्रांसह लढणाऱ्या रशियन सैन्याने विजय मिळवला होता. दुसऱ्या महायु*द्धात जर्मनीने पहिल्यांदाच पराभवाचे तोंड पहिले असेल. यानंतर मात्र हळूहळू जर्मनीची पीछेहाट होऊ लागली. जर्मनीचा अंत हाच दुसऱ्या महायु*द्धाचा अंत ठरला.

रशियन सैन्यात जर वसिलीसारखा निष्णात निशाणेबाज नसता, तर रशियाला हा विजय मिळवता आला असता का? याचे उत्तर कदाचित नाही असेच येईल. वसिलीची हुशारी, त्याचे प्रसंगावधान, त्याचे साहस आणि समोर मृत्यू दिसत असतानाही न डगमगता आपल्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून घेतलेले निर्णय यामुळेच वसिली शत्रू सैन्याच्या स्नायपरला ठार करू शकला. वसिलीच्या या शौर्यामुळे रशियन सैन्यात एक चैतन्य संचारले. यु*द्धभूमीवर जाऊन मरण पत्करलेले बरे अशा पराभूत मानसिकतेतील रशियन सैन्याने विजय मिळवला होता. यामागे एकच कारण होते ते म्हणजे वसिलीने दाखवलेले शौर्य. तीच त्यांची प्रेरणा होती.

एका माणसाच्या पराक्रमापासून कितीतरी लोकांनी सकारात्मक धडा शिकला आणि बलाढ्य जर्मन सैन्याला जेरीस आणले. म्हणूनच ना*झी सैन्याला धुळीस मिळवणाऱ्या वसिलीला आजही एक उत्तम स्नायपर म्हणून ओळखले जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

रेणुका शहाणेच्या ‘सुरभी’ने भारताच्या विविधतेतील एकतेचं दर्शन घडवलं होतं!

Next Post

राईट बंधूंनी तब्बल १४ वर्षं विमान निर्मितीसाठी झोकून दिलं होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

राईट बंधूंनी तब्बल १४ वर्षं विमान निर्मितीसाठी झोकून दिलं होतं

या शास्त्रज्ञाने अवघ्या २५व्या वर्षी नोबेल पारितोषिक पटकावलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.