The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कितीही शीतपेय बाजारात आली तरी ‘रुह अफजाची’ चव कशालाच नाही

by द पोस्टमन टीम
19 April 2025
in मनोरंजन, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सध्या या रणरणत्या उन्हात, प्रत्येकाला गरज असते ती आपल्या शरीराला (आणि आत्म्याला) आल्हाददायक अनुभूती देणाऱ्या पेयाची, एखादं असं पेय जे या उन्हाच्या जाचापासून मुक्त करेल.

उन्हाळ्यात आपण ज्यावेळी कुठे पाहुणे म्हणून जातो किंवा कोणी आपल्याकडे पाहुणे म्हणून येतं, त्यावेळी चहा ऐवजी लिंबू सरबत देण्यात येते. नेहमी नेहमी लिंबू सरबत आणि पन्ह पिऊन कंटाळा येतो.

आधी एक सरबत यायचं. एकदम तजेलदार करणारं. वेगळीच चव होती त्याची. त्या रिफ्रेश करणाऱ्या सरबताचे नाव होतं ‘रुह अफजा’.

परंतु सध्या भारतीय बाजारातून रुह अफजा जणू गायबच झालं आहे, हे तुमच्या लक्षात एव्हाना आलं असेलच. आज जरी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी रुह अफजाची सर दुसऱ्या कशालाच नाही. रुह अफजा असं अचानक गायब होण्यामागे एक मोठा इतिहास आहे.



आपल्या बालपणाच्या अनेक आठवणी रुह अफजाशी जोडल्या गेल्या आहेत. रुह अफजाचे सरबत पिणे हा एक वेगळाच आनंद असायचा. उन्हाळ्यात तर रुह अफजाची मजा विचारूच नका.

रुह अफजा वेगवेगळ्या जडीबुटी, फळं, फुलं यांना एकत्र करून बनवले जाते. खुर्रा सीड, पुदिना, द्राक्षं, गाजर, टरबूज, संत्रा, खसखस, कमळ, लिली, दमास्क, कोथिंबीर, पालक हे सर्व जिन्नस एकत्र करून रुह अफजा बाटलीतून आपल्या घरात पोहचतं.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

१९०७ साली युनानी आरोग्यशास्त्राचा अभ्यासक असलेल्या हकीम अब्दुल माजिद याने रुह अफजाची निर्मिती रुग्णांना त्यांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी केली होती.

जुन्या दिल्लीच्या हमदर्द नावाच्या दुकानात एक औषध म्हणून सुरुवातीला रुह अफजाची विक्री होत असे.

कालांतराने हे औषध दिल्लीतील लोकांच्या घराचा भाग बनलं. या औषधाचे दोन चमचे पाण्यात अथवा दुधात टाक आणि एक स्वर्गीय आनंद मिळवा, अशी बातमी सगळीकडे पसरायला सुरुवात झाली.

रुह अफजाचा लोगो मिर्जा नूर अहमद यांनी तयार केला होता आणि मुंबईचे काही पारसी छापखाने त्याची छपाई करायचे. तब्बल ४० वर्ष हे रुह अफजाने बाजारात आपली पकड कायम ठेवली.

कालांतराने फाळणीचे सावट देशावर पसरले. दिल्लीतील मुस्लिम कुटुंबांनी पाकिस्तानला आपला बस्तान हलवलं आणि पाकिस्तानच्या हिंदूंनी भारतात बस्तान हलवलं. सगळीच उलथापालथ झाली.

रुह अफजाला घेऊन माजिद यांचे कुटुंब पाकिस्तानात गेले.

माजिद यांच्या मृत्युनंतर त्यांचे पुत्र अब्दुल हमिद यांनी १९२२ पासून रुह अफजाचा कारभार हाती घेतला होता. त्यांचे त्यांच्या लहान भावासोबत सईद सोबत भांडण झाले आणि त्यांचे कुटुंब दुभंगले. एक पश्चिम पाकिस्तानात तर एक पूर्व पाकिस्तानात (आत्ताचा बांगलादेश). सईद यांना आपल्या पित्याचा वारसा कायम ठेवायचा होता म्हणून ते पाकिस्तानला आपल्या भावाकडे गेले आणि त्यांनी पुन्हा शून्यातून रुह अफजा निर्माण करायला सुरुवात केली.

भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश ह्या तिन्ही देशात रुह अफजाची निर्मिती करण्यात आली.

१९५३ साली वक्फ नावाच्या एका औषधी कंपनीने हमदर्द लॅबोरेटरीज् हे नाव धारण करून रुह अफजाची बाजारात विक्री करण्यास सुरुवात केली.

ह्या तिन्ही देशातील एकमेकांप्रतीच्या वितुष्टाने रुह अफजाच्या विक्रीवर परिणाम केला. काळ बदलला तसे ज्युसचे प्रकारसुद्धा बदलत गेले. सोडा घातलेले, वेगवेगळ्या फळांचे रस, त्याच्या पावडर, स्क्वाश, मिल्कशेक्स, आईस टी, टेट्रा पॅक, बॉटल ज्यूस. एक ना अनेक प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत.

पण इतक्या सगळ्या प्रकारच्या पेयांमध्ये रुह अफजाने आपली जागा लोकांच्या मनात कायम ठेवली आहे.

रुह अफजा अजूनही त्याच ७०० मिली. च्या काचेच्या बाटलीत मिळतं. त्यावर जसं पूर्वी असायचा तशाच प्रकारचं फळांचं चित्र असणारा कागद चिकटवलेला असतो.

२०१२ साली हमदर्द इंडीया या रुह अफजा बनवणाऱ्या कंपनीने जवळजवळ दोन करोड रुह अफजाच्या बाटल्या विकल्या

रमजान महिन्यात रुह अफजा पिणे ही एक प्रथाच बनली आहे. पण २०१९मध्ये, ही प्रथा जवळजवळ संपुष्टात आली होती.

रुह अफजा बनवण्यासाठी जे जिन्नस लागतात त्याचा तुटवडा झाल्यामुळे जवळपास पाच महिने रुह अफजा बाजारात उपलब्ध नव्हतं. त्याकाळात कौटुंबिक वादामुळे रुह अफजाचे उत्पादन बंद झाले अशा अफवासुद्धा उठवण्यात आल्या.

परंतु, ५ महिन्यांनी रुह अफजा या सगळ्या अफवांना खोटे ठरवत पुन्हा बाजारात उतरलं.

कितीही पेय बाजारात आणा तरी रुह अफजाची चव कोणालाच नाही. असंख्य भारतीयांच्या जिभेवर कायम रेंगाळते आहे आणि ती अशीच कायम राहो!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Rooh Afza
ShareTweet
Previous Post

नानासाहेब पेशव्यांच्या खजिन्याचं नंतर काय झालं..?

Next Post

कर्बलाच्या लढाईत इमाम हुसैन यांच्या बाजूने हे हिंदू सैनिक लढले होते

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
Next Post

कर्बलाच्या लढाईत इमाम हुसैन यांच्या बाजूने हे हिंदू सैनिक लढले होते

जयपाल सिंघ - आदिवासींना हक्क आणि देशाला ऑलम्पिक सुवर्ण मिळवून देणारा नायक

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.