The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रोनाल्डोने कोकची बॉटल बाजूला केली आणि कंपनीचं मार्केट कॅप ४ बिलियन डॉलरने पडलं

by द पोस्टमन टीम
10 June 2025
in क्रीडा, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


UEFA EURO 2020 मध्ये पोर्तुगाल आणि फ्रान्सने जिंकून या चॅम्पियनशिपची सुरुवात केली. पोर्तुगालने हंगेरीला तर फ्रांसने जर्मनीचा फडशा पाडला. पोर्तुगालचा क्रिस्टीयानो रोनाल्डोला कोण नाही ओळखत? या सामन्यात रोनाल्डोने २ गोल करत अजून एक विक्रम स्वतःच्या खात्यावर जमा केलाय.

आता रोनाल्डोच्या नावावर EURO चॅम्पियनशिपमध्ये तब्बल ११ गोल आहेत. फ्रान्सच्या मायकल प्लाटीनिचा ९ गोलचा रेकॉर्ड त्याने हे दोन गोल करत मोडून काढला आहे. रोनाल्डोच्या नावावर या आधी सगळ्यात जास्तं EURO सामने खेळण्याचा रेकॉर्ड होताच. आता सगळ्यात जास्तं गोल पण.

बुडापेस्ट येथे झालेल्या या सामन्यात हंगेरीने पूर्वविजेता पोर्तुगालला तब्बल ८३ मिनिटांपर्यंत एकही गोल करू दिला नाही पण त्यानंतर पुढच्या दहाच मिनिटात पोर्तुगालने तीन गोल करत सामना आपल्या नावावर केला.

आता तुम्ही म्हणाल हे सगळंब ठीक आहे, पण हे आम्हाला का सांगताय! तर रोनाल्डोने हा सगळ्यात जास्तं गोल करण्याचा विक्रम तर केलाच पण याशिवाय त्यानं अजून एक चमत्कार केला. तो म्हणजे कोका-कोला कंपनीचे ४ बिलीयन शेअर्स अर्ध्या तासात पडण्याचा!



हे कसं?

झालं असं की, सामन्याच्या आधी रोनाल्डोची एक पत्रकार परिषद होती. त्यावेळी तिथे टेबलवर दोन कोकाकोलाच्या बाटल्या ठेवल्या. कोकाकोला या स्पर्धेच्या प्रायोजकांपैकी एक असल्याने हे साहजिकच! पण रोनाल्डो तिथे आला, बसला. त्याने त्या दोन्ही बाटल्या उचलल्या आणि बाजूला ठेवल्या. एवढ्यावर तो थांबला नाही, त्याने पाण्याची बाटली उचलली आणि म्हणाला “ऍग्वा” म्हणजे पाणी!

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

आता तुम्हाला हे माहिती नसेल पण रोनाल्डो कोक वगैरे सारख्या कार्बोनेटेड पेयांचा अजिबात शौक नाहीये. शौक काय त्याला हे पेय आवडतच नाही, तो स्वतःच नाही तर आपल्या मुलालासुद्धा हे पिऊ देत नाही. त्या बाटल्या बाजूला करत त्यानं पाण्याची जाहिरात केली, म्हणजे कोकऐवजी पाणी प्या, तेच शरीरासाठी चांगलं असतं असं त्याला सांगायचं होतं.

बास! एवढंच झालं होतं. पण याचा कोकोकोला कंपनीवर मात्र खूप मोठा परिणाम झाला.

दोन बाटल्या उचलून बाजूला ठेवल्याने या कंपनीचे शेअर्स तब्बल ४ बिलीअन डॉलरने पडले. १.६ टक्क्यांनी त्यांच्या किंमती पडून $२४२ बिलीयनवरून किंमत $२३८ बिलीयनवर गेली.

द सन नावाच्या वृत्तसंस्थेनुसार रोनाल्डोच्या या वागण्यानंतर कंपनी, “प्रत्येकाची आवड वेगळी असते. सगळ्यांना एकसारखेच पदार्थ आवडतील असं नाही” असं स्पष्टीकरण दिलं.

सगळ्याच खेळाडूंना पत्रकारपरिषदेत पाणी, कोकाकोला, शुगरफ्री कोका कोला दिलेच जातात. पण एक बाटली उचलून बाजूला ठेवल्याने एखाद्या कंपनीला एवढं मोठं नुकसान सोसावं लागेल याची कोणीही कल्पनाच केली नव्हती!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हा होता हि*टल*रचा एकमेव फेव्हरेट ‘ज्यू’ ज्याला हि*टल*रने अभय दिलं होतं..!

Next Post

जपानमध्ये आजही मियामोटो मुसाशीच्या शौर्याच्या गोष्टी सगळ्यांच्या ओठांवर आहेत

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
Next Post

जपानमध्ये आजही मियामोटो मुसाशीच्या शौर्याच्या गोष्टी सगळ्यांच्या ओठांवर आहेत

पॅराशूटची आयडिया पण 'लिओनार्दो दा विंची'च्या सुपीक डोक्यातून आली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.