The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Explainer: आपल्या हक्काच्या नोकऱ्या रोबॉट्स पळवतायत का..?

by द पोस्टमन टीम
11 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


औद्योगिक क्रांतीनंतर या भौतिक जगात भरपूर बदल झाले. आधी अवघड व अवजड वाटणारी बरीच कामं यंत्रांच्या वापरामुळे सोपी झाली. त्यानंतर कॉम्प्युटर आल्यामुळे तर बऱ्याच गोष्टी अजून सोप्या होत गेल्या. पण आता कॉम्प्युटर्सची जागा घेतली आहे यंत्रमानवाने अर्थातच रोबोट्सने. पण आज अचानक या रोबोट्सची मागणी वाढायचं कारण काय? जर रोबोट्सचा वापर वाढला तर अर्थव्यवस्थेतल्या मनुष्यबळाचं काय होणार असे प्रश्न तुमच्या मनात येतील. या प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेऊ. सो लेट्स गेट स्टारटेड..

या रोबोट्सचा इतिहास काय यांची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेऊयात. असं म्हणतात की, इ.स.पू ३५० च्या काळात ग्रीक गणितज्ज्ञ “अर्चितास” याने वाफेच्या मदतीने उडणारा एक यांत्रिक पक्षी तयार केला. चेक नाट्यलेखक कारेल कपेक (Karel Capek) याने १९२१ साली त्याचा नाटकात पहिल्यांदा “रोबोट” ही संज्ञा वापरली. १९४० च्या दशकात आयसॅक असिमोव याने रोबोटिक्स संदर्भातील तीन नियम तयार केले ज्याच्या आधारे एखाद्या यंत्राला रोबोट म्हणता येईल का नाही हे सिद्ध होत होते.

पुढे याच तीन नियमांचा वापर करून ब्रिस्टॉल येथील बर्डन न्यूरॉलॉगिकल इन्स्टिट्यूटमध्ये विलियम ग्रे वॉल्टर यांनी एलमर आणि एलसी हे दोन स्वायत्त रोबोट्स तयार केले. १९८०च्या दशकात अमेरिकेतील एमआयटी विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी चेंगीज नावाचा रोबोट तयार केला. या रोबोटमध्ये बिहेवरीयल अल्गोरिदम या तंत्रज्ञाना वापर केला होता.

२००० च्या दशकात ह्युमनोईड रोबोट तयार केला गेला हा रोबोट अवकाशात अंतरळवीरांना मदत करण्यासाठी तयार केला गेला होता. असा आहे रोबोट्सचा संक्षिप्त इतिहास.

रोबोट्सविषयी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे अध्ययन करणे याला रोबोटिक्स असे म्हणतात. रोबोटिक्स हे इंजिनिअरिंगचे एक क्षेत्र आहे ज्यात रोबोटची रचना, त्याची निर्मिती, तो कसे कार्य ठरतो इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला जातो. रोबोटिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पुटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बायो टेक्नॉलॉजी यांचाही समावेश असतो. तर, थोडक्यात रोबोट हे एक यंत्र आहे ज्याला कॉम्प्युटर प्रोग्रामिंग करून सूचना दिल्या जातात मग तो आपल्याला हवं तसं कार्य करतो.



जेव्हा एखादा रोबोट तयार केला जातो त्यावेळी त्याच्या संरचनेत विविध प्रकारची यंत्रे भविष्यात लावता येतील किंवा जोडता येतील अशी तरतूद केलेली असते. प्रत्येक रोबोट हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपले कार्य करत असतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे माणसाची विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता एखाद्या यंत्रात सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगद्वारे टाकणे. ज्या प्रकारे माणसाला कार्यरत राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते त्याचप्रकारे रोबोटला देखील ऊर्जेची गरज असते आणि या करता रोबोटमध्ये पॉवर रिसोर्स सेट केलेला असतो.

जसे माणसाच्या शरीरात विविध अवयव असतात तसेच रोबोट्स मध्ये ही काही घटक बसवलेले असतात, जसं की, सेन्सर सिस्टिम, मसल सिस्टीम, पॉवर सोर्स, ब्रेन सिस्टीम, बॉडी स्ट्रकचर. रोबोटमधील पॉवर सोर्स, ब्रेन सिस्टीम महत्वाचे घटक आहेत कारण ते पूर्ण रोबोटला नियंत्रित करतात. रोबोट्समध्ये पिस्टनचा वापर केला जातो त्यामुळे रोबोटला वेगवेगळ्या दिशेला चालण्यासाठी मदत होते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

रोबोट हा प्रोग्रॅमनुसार काम करतो त्यामुळे त्याच्याकडून दुसरं काही काम करून घ्यायचं असेल तर त्यासाठी रोबोटला परत प्रोग्रॅम करावं लागतं. रोबोटमध्ये सेन्सर नसतात. काही विशिष्ट गोष्टी करायचा असतील तरच हे सेन्सर लावले जातात.

२०२० साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगातले सर्व व्यवहार ठप्प झाले. कोरोनावरची लस उपलब्ध होईपर्यंत २०२१ उजाडलं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माणसाच्या आरोग्यासोबत अर्थव्यवस्थेचंही भरपूर नुकसान झालं. मागणी पुरवठ्याचं संतुलन बिघडलं आणि त्याचा सप्लाय चेन मॅनेजमेंट व रोजगारावर परिणाम झाला. मग अशा परिस्थितीत खाजगी कंपन्यांनी बाजारात आपल्या मालाचा पुरवठा चालू रहावा व उत्पादन होत रहावं या साठी रोबोट्सचा वापर सुरू केला.

रोबोट्सचा वापर हा इ-कॉमर्स, फास्ट फूड, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑटोमोबाईल, या क्षेत्रात भरपूर प्रमाणात केला गेला. पण रोबोट्सच्या वापरामुळे त्याचा रोजगारावर काय विपरीत परिणाम होईल ही चर्चा सुरू झाली. लोकांनी हे सत्य समजून घ्यायला हवं की औद्योगिक क्षेत्रातील काही कामं अशी आहेत जिथे अचूकता लागते व अशा ठिकाणी रोबोट्सचा वापर करणे योग्य आहे.

रोबोट्समुळे माणसाचे रोजगार जातील या समस्येवर वैज्ञानिकांनी एक तोडगा काढला आहे. वैज्ञानिकांनी कॉबोट्स नावाचं एक यंत्र शोधून काढलं आहे जे रोबोट्सचं विकसित रूप आहे. कॉबोट्स माणसांच्या बरोबरीने काम करतील. या कॉबोट्सच्या वापरामुळे औद्योगिक क्षेत्र असो की अजून कोणतंही क्षेत्र असो रोजगार व उत्पादन निर्माण करतानाची अचूकता याचा समतोल राहील.

त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रणालीचा वापर करणाऱ्या रोबोट्सचा उपयोग करण्यापेक्षा कॉबोट्चा वापर जास्त प्रमाणात केल्यास माणसाच्या मनात असलेली बेरोजगारीची भीती आणि औद्योगिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होईल. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव असलेल्या या काळात कॉबोट्स हे उद्योग आणि औद्योगिक क्षेत्रासाठी वरदान ठरतील यात काहीच शंका नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जागतिक राजकारणात टिकायचं असेल तर सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीला पर्याय नाही!

Next Post

सगळ्यांचा लाडका फर्निचर ब्रँड आयकिया एकेकाळी रोमानियातील सिक्रेट पोलिसांना फंडिंग करत होता

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

सगळ्यांचा लाडका फर्निचर ब्रँड आयकिया एकेकाळी रोमानियातील सिक्रेट पोलिसांना फंडिंग करत होता

गौतम बुद्धांच्या डोक्यावर दिसणारे कुरळे केस हे केस नसून गोगलगायी आहेत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.