The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपल्या धाडसाच्या बळावर या गुलामाने असंख्य गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केलं होतं

by द पोस्टमन टीम
10 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडून काही तरी भव्यदिव्य करण्याची स्वप्ने ज्यांना पडली आहेत, आजवर त्यांनीच इतिहास रचला आहे.

एकोणिसाव्या शतकापर्यंत अमेरिकेत गुलामगिरीची अमानुष प्रथा सुरुच होती. या प्रथेविरुद्ध लिंकन यांचा लढाही सुरु होता. काही गुलामांना स्वतःहून या गुलामीच्या जोखडातून मुक्त होऊन आपल्या इतर साथीदारांना देखील स्वतंत्र करण्याची त्यांची इच्छा होती. पण, स्वतःहून गुलामीच्या बेड्या तोडून त्यातून सहीसलामत सुटणे ही त्याकाळी वाटते तितकी सोपी गोष्ट निश्चितच नव्हती. पण, रॉबर्ट स्मॉल यांनी हे शक्य करून दाखवले.

गुलाम म्हणून जन्माला आलेले रॉबर्ट स्मॉल हे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी एक कॉंग्रेसमन आणि पराक्रमी यो*द्धा म्हणून ओळखले जात होते. त्यांचा हा संपूर्ण प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे. अगदी दोन दशकापूर्वी एका यु*द्धनौकेवर गुलाम असलेल्या स्मॉल यांना अमेरिकेच्या राजकारणात प्रवेश करण्याची संधी मिळाली, नव्हे त्यांनी ती मिळवली. इतका मोठा बदल त्यांनी कसा घडवून आणला, वाचा या लेखात.

एक गुलाम ते एक नेता होण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात एका घटनेने खूप मोठी कलाटणी दिली. ही घटना होती यु*द्धनौकेचे अपहरण करण्याची.



रॉबर्ट स्मॉल यांनी आपले कुटुंबीय आणि आपले काही गुलाम मित्र यांच्यासह संपूर्ण यु*द्धनौकेचे अपहरण करून स्वतःला आणि इतरांनाही गुलामीच्या दलदलीतून बाहेर काढले.

दक्षिण कॅरोलिना मध्ये १८३९ साली रॉबर्ट स्मॉल यांचा जन्म एका गुलाम कुटुंबात झाला. असे म्हटले जाते की ज्यांनी त्यांना गुलाम म्हणून ठेवून घेतले होते ते मालकच रॉबर्टचे वडील होते. रॉबर्ट बारा वर्षांचे झाल्यावर त्यांच्या या मालकाने त्यांना कामाला जुंपले. शेवटी, पोटासाठी त्यांना काम करणे भागच होते. म्हणून रॉबर्ट मिळेल तिथे काम करू लागले. अगदी हॉटेलपासून ते रस्त्यावरचे दिवे लावण्यापर्यंतची सगळी कामे त्यांनी केली.

रॉबर्ट स्मॉल यांना समुद्राची खूप ओढ होती. समुद्राशी संबंधित काही काम मिळते का याच्या शोधात असतानाच त्यांना चार्ल्सटनच्या गोदीवर आणि त्याच्याच जहाजावर काम मिळाले. रॉबर्ट धाडसी, कष्टाळू आणि उत्तम नावाडी होते. त्यामुळे लवकरच जहाजाचा सुकाणू नियंत्रण करण्याचे कामही त्यांच्याकडेच देण्यात आले. परंतु त्यांना अधिकृतपणे नौदलातील कोणतेही अधिकारपद देण्यात आले नाही, कारण ते गुलाम होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

सीएसएस प्लांटर या यु*द्धनौकेवर असतानाच रॉबर्ट स्मॉल यांनी ते जहाज घेऊन पलायन करायचे ठरवले. त्याआधी संपूर्ण एक वर्ष त्यांनी जहाजावरील सर्व बारीकसारीक गोष्टींचा तपशील मिळवण्यात घालवले. ही सगळी माहिती मिळवू शकले तरच ते पलायन करण्यात यशस्वी होणार होते.

समुद्रावर गस्त घालणे, सैन्यदलाची ने-आण करणे आणि त्यांना रसद पुरवणे ही सगळी कामे सीएसएस प्लांटरकडे देण्यात आली होती. स्मॉलला समुद्रातील मार्ग चांगले ओळखीचे झाले होते. म्हणून जहाजाचे सुकाणू त्याच्याच हाती देण्यात आले होते. यामुळे तर त्याला सर्व बारीकसारीक गोष्टी जाणून घेण्याची आयती संधीच मिळाली.

कधी जहाजावरचे सगळे गोरे अधिकारी गुलामांच्या ताब्यात जहाज देऊन, किनाऱ्यावर जाऊन मस्त आनंद लुटत असत. कधी कधी गुलामांच्या कुटुंबियांना जहाजावर येऊन भेटण्याची परवानगी दिली जात असे. असेच एकदा सगळे गोरे अधिकारी मौजमजेत व्यस्त असताना, स्मॉलचे कुटुंबीय त्यांना भेटायला आले. यावेळी स्मॉल यांनी आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन आपली नेमकी योजना सांगितली. स्मॉल यांची पत्नी तर ही योजना ऐकून बेशुद्धच पडणार होती. कारण, जर सापडले तर काय होईल याचे परिणाम तिला स्पष्ट माहिती होते. शेवटी जे होईल ते होईल असे म्हणत तिने स्मॉल यांच्या या योजनेला होकार दिला.

झाले! स्मॉल यांनी स्वतः कॅप्टनचा गणवेश घातला. जहाजाच्या गुप्त संदेशांचा अर्थ सांगणारे एक पुस्तक सोबत घेतले आणि त्या सीएसएस जहाजावरील सर्व गुलामांना घेऊन आपल्या दुष्ट मालकांच्या तावडीतून सुटण्याच्या दिशेने प्रवास सुरु केला.

हा प्रवास खरे तर वाटतो तेवढा सोपा नव्हता. कारण, वाटेत तब्बल पाच ठिकाणी जहाजांची तपासणी केली जात असे. या दरम्यान एका चेकपॉइंटवर जरी कुणाला शंका आली तर सरळ मृत्यूशीच भेट होणार होती. पण, तरीही स्मॉल आणि जहाजावरील त्यांच्या इतर साथीदारांनी ही जोखीम पत्करली.

जहाज पहिल्या चेकपॉइंटवर पोहोचले. स्मॉलने सगळे सिग्नल दिले. पण त्यांना पुढे जाण्याची अनुमती मिळाली नाही. थोडा वेळ गेल्यानंतर त्यांना पुढे जाण्याचा सिग्नल देण्यात आला.

त्यानंतरच्या तीन चेकपॉइंटवरही त्यांना फारशी अडचण आली नाही. आता पाचवा चेकपॉइंट पार केला की त्यांची मोहीम फत्ते होणार होती. पण, इथे थोडी जरी गफलत झाली तर? शेवटचा चेकपॉइंट असल्याने इथली सुरक्षा व्यवस्थाही तितकीच कडक होती. शिवाय, शत्रूप्रदेशापासून हा चेकपॉइंट अगदी जवळ होता.

सीएसएस जहाजावर प्रकाशझोत टाकण्यात आला आणि त्यांना थांबण्याचा इशारा देण्यात आला. स्मॉल यांनी पुढे जाण्याची परवानगी मिळवण्यासाठी आवश्यक ते सिग्नल्स दिले. त्यांना वाटले आता आपण सहज सुटू. पण, थोडा वेळ त्यांना थांबवून ठेवण्यात आले.

थोड्या वेळाने चेकपॉइंटवरील सुरक्षा रक्षकांनी सिग्नल दिला आणि त्यांना पुढे जाण्याची अनुमती मिळाली. परंतु, धोका तरीही टळला नव्हता.

आता दुसऱ्या किनाऱ्यावर शत्रूचे चेकपॉइंट होते आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांना आपण कोणत्याही वाईट हेतूने आलो नाही हे त्यांना पटवून द्यायचे होते. सीएसएस जहाज टप्प्यात येताच फेडरल नौदलाला शत्रूचे जहाज आपल्या सीमेत आल्याचा सिग्नल मळला. जहाजावर ह*ल्ला करण्यासाठी सैनिक सरसावले इतक्यात त्यांना आनंदाने उड्या मारणारे गुलाम दिसले. ते हात हलवून काही तरी संदेश देत होते. शेवटी किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांची खात्री पटली की या जहाजापासून आपल्याला काहीही धोका नाही.

शेवटी स्वतःसह, आपल्या कुटुंबियांसह इतर गुलामांनाही स्वतंत्र करण्यात स्मॉल यांना यश मिळाले.

अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. शिवाय, त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पंधराशे डॉलरचे बक्षीसही दिले. स्मॉल आफ्रिकन गुलामांना प्रोत्साहित करून त्यांना अमेरिकी सैन्यात भरती होण्याची प्रेरणा देऊ लागले. लिंकन यांना यु*द्धासाठी सैन्य विस्तार करायचा होता तेंव्हा ते स्वतःहून सैन्यात सामील झाले आणि उत्तम कामगिरी केली. ते ४४व्या आणि ४९व्या अमेरिकन कॉंग्रेसचे सदस्य देखील होते.

नंतर ते आपल्या मूळ गावी म्हणजे दक्षिण कॅरोलिनाला परतले. इतकेच नाही तर त्यांनी तिथले स्वतःचे घरही विकत घेतेल. एक गुलाम ते एक स्वतंत्र नागरिक आणि मालक असा त्यांच्या आयुष्याचा यशस्वी प्रवास पूर्ण झाला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भटकंती – निसर्गाचा गूढ आणि अद्भुत चमत्कार ‘बेलम गुहा’

Next Post

पावागढच्या महाकाली मंदिरातील रहस्यमय दगडाचं कोडं अखेर शास्त्रज्ञांना सुटलंय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

पावागढच्या महाकाली मंदिरातील रहस्यमय दगडाचं कोडं अखेर शास्त्रज्ञांना सुटलंय

आपल्या मालकाची दहा वर्षे वाट पाहणारा हा आहे जगातला सगळ्यात इमानदार कुत्रा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.