The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाबरीचा बदला म्हणून पाकिस्तानात कित्येक मंदिरं जमीनदोस्त केली होती

by द पोस्टमन टीम
6 December 2025
in विश्लेषण, इतिहास, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आले असून २५ नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण समारोह संपन्न झाला. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत मंदिराचे भूमिपूजन केले. अयोध्येत विशाल आणि भव्य राम मंदिर उभे करण्याचे स्वप्न आता कुठे पूर्णत्वास आले आहे.

अनेकांनी याकडे अन्यायावर न्यायाचा विजय म्हणूनही पाहिले. यावर पाकिस्तानने भारतातील अल्पसंख्यांक आणि त्यांची धर्मस्थळे धोक्यात असून, भारत आता पूर्वीसारखा धर्मनिरपेक्ष देश राहिला नसून, एक रामनगर बनला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. भारतातील अल्पसंख्य नागरिक विशेषत: मुस्लीम धर्मिय नागरिकांचे अधिकार धोक्यात आल्याची प्रतिक्रियाही पाकिस्तानने दिली.

एक मंदिर बांधल्याने देशातील अल्पसंख्य नागरिकांचे अधिकार धोक्यात आले म्हणणाऱ्या पाकिस्तानने पाकिस्तानातील हिंदू मंदिरावर अक्षरश: बुलडोझर फिरवले होते आणि आजही फिरवत आहेत, पण याचा बहुतेक त्यांना विसर पडला असावा.

सुमारे तीन दशकांपूर्वी जेव्हा भारतात बाबरी मशीद उ*द्ध्वस्त करण्यात आली तेव्हा पाकिस्तानमध्ये यावर तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळाल्या. बाबरी मशिदीच्या वि*ध्वंसाचा परिणाम फक्त भारतातच नाही तर शेजारील राष्ट्रातही पाहायला मिळाला. ६ डिसेंबर १९९२ रोजी उत्तरप्रदेशमधील अयोध्येतील बाबरी मस्जिद पाडली गेली. बाबरी मस्जिद पाडल्याची बातमी शेजारील देशात पोहोचताच तिथे हाहाकार उडाला होता.



बाबरी मशिदीच्या पतनावर पाकिस्तानने अक्षरश: आकांडतांडव करत प्रतिक्रिया दिल्या. पाकिस्तानातील हिंदूंची संख्या तेव्हा फक्त दोन टक्के होती, तरीही हिंदूंविरोधात जि*हाद पुकारण्याच्या वल्गना केल्या गेल्या. पाकिस्तानमध्ये लगेच हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. तिथल्या मंदिरांवर ह*ल्ले सुरु झाले.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्समधून याविषयीच्या बातम्या तेंव्हा प्रकाशित करण्यात आल्या होत्या. या बातमीतून बाबरी मशिदीच्या पतनाने पाकिस्तानमधील वातावरण किती बिघडले आहे, याचे वर्णन करण्यात आले होते.

पाकिस्तानमधील अल्पसंख्य हिंदूंची परिस्थिती आधीच हालाखीची होती. त्यात बाबरी विध्वंसाच्या बातमीने त्यांना लक्ष्य करण्यात आले. आधीच अडचणीत असलेला अल्पसंख्य हिंदू समाज आणखीनच अडचणीत आला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

त्याकाळी विविध वृत्तपत्रांनी पाकिस्तानमधील या अंदाधुंदीच्या बातम्या छापल्या होत्या. पाकिस्तानमध्ये तब्बल तीस मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. या मंदिरांवर ह*ल्ले करून ती उ*ध्वस्त करण्यात आली. उन्मादी झुंडींनी सहा मंदिरांना आग लावली.

पाकिस्तानमधील एअर इंडियाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. प्रकरण इथेच थांबले नाही. ही हिं*सा अधिकाधिक भडकत गेली. बेभान झालेली झुंड “क्रश इंडिया” आणि “डेथ टू हिंदूइजम्” यासारख्या घोषणा देत होती. पाकिस्तानमध्ये सुरु झालेल्या या निदर्शनांमुळे दुकाने आणि व्यवसाय बंद होते. सगळा व्यवहार ठप्प झाला होता.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयात भारतीय राजदुतांना बोलावण्यात आले. पाकिस्तानने याविषयी चिंता व्यक्त केली आणि भारतात लवकरात लवकर नवी मशीद बांधली जावी अशी विनंतीही केली होती. पाकिस्तान सरकार हा मुद्दा युनायटेड नेशन्समध्ये उठवणार असल्याचे सांगण्यात आले. इतर मुस्लीम देशांच्या संघटनांनी देखील भारतीय मुस्लिमांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी भारतावर दबाव टाकावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही म्हटले गेले.

पाकिस्तानातील कायदे आजम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे भारतीय दूतावासासमोर दहन केले. द्वेषाने भडकलेले हे विद्यार्थी – हिंदूंच्या विरोधात जि*हाद पुकारण्याची भाषा करत होते.

पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या तेव्हा तर २ टक्क्याहूनही कमी होती. पाकिस्तानमधील हिंदू समुदाय अक्षरश: भीतीच्या छायेखाली वावरत होता. सर्व देश हिंदूविरोधी आग ओकत असताना तिथल्या अल्पसंख्य हिंदूंची अवस्था कशी झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. पाकिस्तानातील हिंदूंची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.

आजही हिंदूंच्या प्रश्नांवर आवाज उठवणारा एकही मातब्बर हिंदू नेतृत्वाचे अस्तित्व दिसत नाही. इम्रान खानच्या पक्षात आणि मंत्रिमंडळात काही हिंदू मंत्री असले तरी, त्यांचे वर्तुळ उच्चवर्णीय हिंदूंपुरते मर्यादित आहे. पाकिस्तानातील मागासलेले हिंदू तर त्याहून दयनीय अवस्थेत जगतात.

लाहोरमधील पंजाब विद्यापीठाच्या शेजारी एक प्राचीन जैन मंदिर होते. पण, धर्मद्वेषाने पेटलेल्या समूहाने या मंदिरावर बुलडोझर फिरवला. मंदिरावर बुलडोझर फिरवला जात असताना, पोलीस तिथेच होते. पण जणू त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली होती. पोलिसांनी या बेलगाम झुंडींवर कसलीच कारवाई केली नाही.

इतकेच नाही तर एअर इंडियाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. तेव्हाही पोलिसांनी जे काही होईल ते पाहत सोयीस्करपणे मौन स्वीकारले. एअर इंडियाच्या कार्यालयावर दगडफेक केली, कार्यालातील फर्निचर रस्त्यावर आणले, त्याची मोडतोड केली आणि ते पेटवून दिले. इतकी या झुंडीची माथी भडकली होती.

कराचीतील पाच मंदिरांवर ह*ल्ले करण्यात आले. दक्षिण भागातील २५ मंदिरांना आग लावण्यात आली. याच ठिकाणी बहुसंख्य हिंदू वस्ती आहे. आजही याच भागात हिंदूची संख्या सर्वाधिक आहे.

बाबरी वि*ध्वंसाची प्रतिक्रिया फक्त पाकिस्तानमध्येच उमटली असे नाही. तर शेजारच्या बांग्लादेशातही याचे पडसाद उमटले. पाकिस्तान इतक्या तीव्र नसल्या तरी तिथेही हिं*सक आणि आक्र*मक प्रतिक्रिया देण्यात आल्या. बांग्लादेशची राजधानी ढाका येथील एअर इंडियाच्या कार्यालयावर ह*ल्ला करण्यात आला. एअरलाइन्सच्या कार्यालयाला आग लावण्यात आली.

इराणच्या सर्वोच्च नेत्यांनीही बाबरी वि*ध्वंस प्रकरणात आपली जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांची ही प्रतिक्रिया तेहरान रेडीओवरून प्रसारित करण्यात आली. भारतातील मुस्लिमांच्या अधिकारांचे रक्षण करण्याची त्यांनी भारत सरकारला विनंती केली.

बाबरी पतनाच्या घटनेवर जगातील काही धर्मांध इस्लामी देशांमधून अशा कडवट, आक्र*मक, प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. पाकिस्तानमधील हिंदू समुदायाला भयभीत करण्यात आले. आधीच हालअपेष्टा सहन करणारा हा समाज आणखीनच हतबल झाला. पाकिस्तानचा प्रखर हिंदूद्वेष यानिमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

नेहरूंनी डॉ. राजेंद्र प्रसादांना सरदार पटेलांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी मनाई केली होती

Next Post

गांधीजींनी सांगितलं आणि स्वदेशी फाउंटन पेन तयार झाला

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
Next Post

गांधीजींनी सांगितलं आणि स्वदेशी फाउंटन पेन तयार झाला

पॅलेस्टिनी द*हश*तवाद्यांनी म्युनिक ऑलिम्पिकमध्ये ११ इज्रायली खेळाडूंचं ह*त्याकांड केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.