The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतातला असह्य उन्हाळा थंडगार रसनाच्या दोन घोटांनी सुसह्य होतो

by द पोस्टमन टीम
30 May 2024
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


साधारणपणे १९९७-९८चा काळ असेल. भारताने अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली पोखरणला यशस्वी अणुचाचणी केली. अमेरिकेचे उपग्रह अवकाशात फिरत असताना त्यांच्या नाकाखाली, कोणालाही कानोकान खबर लागू न देता आपण ही अणुचाचणी केली होती. याचा अमेरिकेला राग आला आणि त्यांनी भारतावर अनेक आर्थिक निर्बंध लादले.

अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी तेंव्हा आपल्या देशी कंपन्यांचा आणि त्यांच्या उत्पादनांचा मोठा प्रचार आणि प्रसार आपल्याकडे सुरु झाला होता. अनेक वेळा वर्तमानपत्रात तेंव्हा देशी कंपन्या आणि विदेशी कंपन्या त्यांची उत्पादने यांची वर्गवारी येत असे. बेव्हरेज आणि सॉफ्ट ड्रिंक्समध्ये देशी कंपनीच्या यादीत अहमदाबाद स्थित “रसना” कंपनीचे नाव तेंव्हा अग्रेसर होते.

रसना हे पूर्णपणे स्वदेशी ड्रिंक आहे हे अजून एक कारण रसना प्रेमी लोकांना त्या काळात मिळालेले होते.

कडक उन्हाळा. मार्च महिन्यात होणाऱ्या वार्षिक परीक्षा, शेवटचा असणारा चित्रकलेचा पेपर, पेपर सोडवून झाल्यावर वर्गाबाहेर पडताना पुढे एप्रिल आणि मे या दोन महिन्याच्या सुट्टीचा आनंद आणि उड्या मारत घरी आल्यावर आईला थंडगार रसनाची केलेली फर्माईश हे ९०च्या दशकातले प्रत्येक घरातले चित्र होते.

९०च्या दशकातील अनेक शाळकरी मुलांच्या आठवणीतला उन्हाळा आणि उन्हाळ्याची सुट्टी ज्याची आठवण काढल्याशिवाय पूर्ण होत नाही त्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे रसना.



“आय लव्ह यु रसना” म्हणत टीव्हीवर फेब्रुवारी अखेर सुरु होणारी रसनाची जाहिरात आणि साधारणपणे उन्हाळा सुरु व्हायला लागला की बहुसंख्य लोकांच्या फ्रीजमध्ये विराजमान होणाऱ्या रसनाच्या बाटल्या याचे नाते अतूट होते.

रसना ज्या कंपनीने सुरु केला त्या कंपनीचे नाव आहे पायोमा इंडस्ट्रीज. अहमदाबाद येथे या कंपनीचा कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक बनवण्याचा उद्योग होता. आजही आहे. या कंपनीने साधारणपणे १९८०च्या दशकात रसना नावाने कॉन्सट्रेटेड ड्रिंकचे उत्पादन सुरु केले.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

कॉन्सट्रेटेड ड्रिंक म्हणजे पावडर फॉर्ममध्ये रुपांतरीत केलेले फळांचे आणि इतर खाण्यायोग्य रसायनांचे मिश्रण. रसनाच्या एका पॅकमध्ये जितकी कॉन्सट्रेटेड पावडर असे ती ३ ते ४ लिटर पाण्यात मिसळून तिचे साधारणपणे ३२ ग्लास पिण्यायोग्य सरबत तयार होत असे.

रसनाची जाहिरात भारतीय जाहिरात विश्वातील तशी जुन्या जमान्यापासून चालत येणारी जाहिरात. १९८० सालापासून रसनाच्या जाहिराती टीव्हीवर झळकण्यास सुरुवात झाली होती. रसनाचे टार्गेट प्रामुख्याने कुटुंब असल्यामुळे रसनाच्या जाहिरातीमध्ये देखील निखळ कौटुंबिक वातावरण पाहायला मिळते.

रसनाने आपल्या जाहिरातीत १९८० पासून फार काही बदल केले नाही किंवा आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी ठरकी जाहिराती बनवण्याचा प्रयत्नही केला नाही. पहिल्यापासून रसनाला रीप्रेझेंट करणारी मॉडेल म्हणजे एक लहान मुलगी.

साधारणपणे रसनाच्या पॅकवर आणि जाहिरातीमध्ये सुरुवाती सुरुवातीला एक ४ वर्षांची गोड मुलगी झळकायची.

आज जर तुम्ही रसनाची सगळ्यात जुनी जाहिरात जर सर्च केली तर तुम्हाला त्यात कुठली थीम वगैरे दिसणार नाही.

पहिल्या जाहिरातीत अंकिता जव्हेरी नावाची एक लहान मुलगी प्रेक्षकांना तिच्या वाढदिवसाला ती काय काय करणार याविषयी सांगतेय. ती तिच्या वाढदिवसाला तिच्या मित्र मैत्रीणींना बोलावणार आणि त्यानंतर तिची आई सगळ्यांना रसना करून देणार या वाक्यावर ती जाहिरात संपायची.

शेवटी रसनाचा ग्लास गालाजवळ ठेऊन ती छोटी मुलगी आय लव्ह यु रसना म्हटलेली गोड फ्रेम प्रेक्षकांच्या लक्षात राहायची.

रसनाच्या जाहिरातीमधली दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच सुमारास धारा तेलाची जाहिरात फार प्रसिद्ध झाली होती. त्या जाहिरातीत परझान दस्तूर नावाचा एक गोंडस मुलगा घेतलेला होता. हा ट्रेंड कसा पडला माहित नाही पण त्यावेळी जाहिरातीत अवखळ, खेळकर आणि खोडकर दिसणारी मुले घेण्याचा प्रघात नकळतपणे पडून गेलेला होता.

याला तडा देत रसनाने आपल्या जाहिरातीत एका लहान मुलीला घेतले होते. त्या काळात जाहिरातीत झळकणारी रसना गर्ल ही एकमेव होती. त्यानंतर मुलींना घेऊन जाहिराती यायला सुरुवात झाली पण याचा पायंडा देखील रसनाने पाडला हे विशेष.

जाहिरातीत झळकणारा मुलीचा गोंडस चेहरा, एका मोठ्या काचेच्या जार मध्ये भरलेला फ्रेश नारिंगी रंगाचा रसना ज्यूस, त्याला नक्षीदार काचेच्या ग्लासमध्ये ओतून पिणारी लहान मुलगी हे कॉम्बिनेशन अनेक पालकांना आपल्या घरात लहान मुलांच्या सांगण्यावरून रसना ड्रिंक घेण्यास भाग पाडायचे.

आज रसनाचे प्रोडक्शन युनिट गुजरात, हिमाचलप्रदेश, पंजाब या राज्यात तर आहेच आहेत पण देशाबाहेरसुद्धा रसनाने बांगलादेश, दुबई, सौदी अरेबिया आणि इजिप्त या ठिकाणी देखील आपले प्लांट सुरु करण्याचा विक्रम केला आहे.

रसना ही एकमेव भारतीय कंपनी आहे जिने कार्बोनेटेड स्वीट ड्रिंक्समध्ये स्वत:ची मक्तेदारी स्थापन केलेली आहे.

भले तिला अनादी काळापासून कोकाकोला, पेप्सी, मिरिंडा अशा अतिबलाढ्य अमेरिकन कंपन्यांचा सामना करावा लागला पण रसनाने आपला सेगमेंट सोडून कधीही सोडा युक्त कार्बन ड्रिंक्स बनवण्याचा प्रयत्न केला नाही ना दुसऱ्या कुठल्या कंपनीला आपले मार्केट खाऊ दिले.

रसनाच्या जाहिराती देखील वर सांगितल्याप्रमाणे फार नाविन्यपूर्ण होत्या अशातला भाग नाही. रसनाची दुसरी जाहिरात झळकली ती साधारण पहिल्या जाहिरातीला ३–४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर. या जाहिरातीमध्ये देखील रसना गर्ल अंकिता जव्हेरीनेच काम केलेले होते.

रसना गर्लचे वडील कामावरून थकून घरी येतात आणि तिची आई तिच्या वडिलांना चहा, कॉफी विचारते. दमून भागून आलेले वडील या दोन्हींना नकार देतात. हे पाहून रसना गर्ल हळूच आईच्या मागे जाऊन आईचा पदर पकडते. तिच्या हातात रसनाचे पाकीट देते. शेवटी रसनाचा ज्यूस पिऊन वडील ताजेतवाने होतात.

अशी एकदम सिम्पल थीम असलेली ही दुसरी जाहिरात होती. ही देखील जाहिरात डोमेस्टिक मार्केटमध्ये भरपूर चालली.

त्यानंतर रसनाच्या जाहिराती येत गेल्या पण त्यांचा ढाचा कायम राहिला. कायम पार्टीचा माहोल, खेळणारी मुले, त्यांची रसना पिण्यासाठी घरातल्या आईकडे होणारी मागणी आणि अलिशान मोठ्या काचेच्या जार मधून भरून आणलेला रसना मुलांना काचेच्या ग्लासातून सर्व्ह करणारी आई हे चित्र रसनाच्या जाहिरातीत कायम दिसत आलेले आहे.

१९८५ साली रसनाच्या जाहिरातीत पहिल्यांदा झळकलेली अंकिता जव्हेरी आज दाक्षिणात्य सिनेमातील सुप्रसिद्ध नाव आहे. त्यानंतर देखील अनेक नवीन चेहरे रसनाने आपल्या जाहिरातीत आणले.

अगदी लेटेस्ट रसना कंपनीचे मालक जे खंबाटा कुटुंबीय आहेत त्यांच्या नात्यातला अवन खंबाटा नावाचा लहान मुलगा रसनाची जाहिरात करतो.

आज रसनाचा डोमेस्टिक मार्केट शेअर जवळपास ९३% इतका आहे. कंपनीचा टर्नओव्हर गेल्या काही वर्षापासून सतत ४० करोडच्या घरात जात आहे. रसनाला टक्कर देण्यासाठी २००१ मध्ये क्राफ्ट्स फूड या कंपनीने टँग नावाचे ड्रिंक बाजारात आणले होते परंतु रसनाची मक्तेदारी ते मोडीत काढू शकले नाही.

शेवटी हैद्राबादला सुरु केलेला टँगचा प्लांट बंद करावा लागला तो नंतर २०११ साली कॅडबरी कंपनीने विकत घेतला. यानंतर कोकाकोला कंपनीने देखील रसनाला टक्कर देण्यासाठी स्वत:चा रसना सारखा सनफील नावाचा ब्रँड बाजारात आणला मात्र याला देखील रसनाशी मुकाबला करणे जमले नाही.

आपल्या नाजूक गालाला रसनाचा ग्लास लाऊन आय लव्ह यु रसना म्हणणाऱ्या मुलीची मक्तेदारी आज कुठलाही परदेशी ब्रँड मोडू शकला नाही. यातच रसना गर्लचे आणि रसना नावाच्या सुपर पण देशी ब्रँडचे यश सामावलेले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नेटक : ऑनलाईन नाटक मराठी रंगभूमीवरील एक अभिनव प्रयोग

Next Post

कॉम्रेड ज्योती बसू कम्युनिस्टांमुळेच पंतप्रधानपदाला मुकले होते

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

कॉम्रेड ज्योती बसू कम्युनिस्टांमुळेच पंतप्रधानपदाला मुकले होते

विंटेज फॅमिली स्कूटर लँब्रेटा पुन्हा रस्त्यावर धावणार आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.