The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘रेअर अर्थ एलिमेंट्स’वरची चीनची मक्तेदारी जगासाठी डोकेदुखी ठरत आहे.

by Heramb
19 December 2021
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कोरोना महामारीमुळे नाही म्हटलं तरी सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाले. भारतात आर्थिक मंदी आली नसली तरी सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या वाढीवर (जीडीपी ग्रोथ रेट) लॉकडाऊन आणि कोरोना साथीचा प्रचंड नकारात्मक प्रभाव पडला. परिणामी महागाई वाढू लागली आणि विशेषतः इंधनाचे दर गगनाला भिडले.

यावेळी इंधन दरवाढीवर मात करण्यासाठी देशासमोर एक सर्वोत्तम पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे इलेक्ट्रिक वाहने. सामान्य गाड्यांच्याच किमतीने मिळणाऱ्या ‘इव्ही’ज् सामान्य माणसांच्या खिशाला परवडणाऱ्या आहेत. पेट्रोल-डिझेल किंवा सीएनजीपेक्षा कमी खर्चिक असलेल्या या गाड्या शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी ‘परफेक्ट’ आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

बाजारामध्ये दिवसेंदिवस इव्हीजची संख्या वाढत आहे. स्थानिक, राज्य आणि केंद्र सरकारेदेखील आपापल्या पातळीवर विद्युत उर्जेवर चालणारी वाहने खरेदी करून सार्वजनिक वाहतुकीसाठी त्याचा वापर करीत आहेत. पण इव्हीज किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेटसाठी ज्या सेमीकंडक्टर चिप्स आवश्यक असतात त्या तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये रेअर अर्थ एलिमेंट्सचा प्रामुख्याने वापर केला जातो.

सेमीकंडक्टर मटेरियल्स तयार करणे हे अतिशय जोखमीचं आणि महागडं काम आहे. सेमीकंडक्टरचा एक प्लांट उभारण्यासाठी कमीतकमी ०.५ बिलियन डॉलर्स अर्थात ३ हजार २५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची आवश्यकता असते. सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सतत पीपीई किट्स सारखे कपडे घालून काम वावरावं लागतं, कारण धुळीचा एक कणसुद्धा करोडोंचं नुकसान करू शकतो. आजवर भारतात एकही सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगचा प्लांट नव्हता पण १६ डिसेंबरपासून भारतात तैवानच्या मदतीने सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी चर्चा सुरु झाल्या आहेत.



सेमीकंडक्टर चिप्स तयार करण्यामध्ये ‘डोपिंग’च्या प्रक्रियेत ‘टर्बियम’ नावाच्या रेअर अर्थ एलिमेंटचा वापर होतो. त्याशिवाय ‘लॅंथानम’ नावाच्या रेअर अर्थ एलिमेंटचा वापर कोणत्याही डिजिटल उपकरणांची ‘स्क्रीन’ तयार करण्यात केला जातो. रेअर अर्थ एलिमेंट्स अगदी स्मार्टफोन पासून ते अत्याधुनिक फायटर जेट्स तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. यामध्ये इव्ही अर्थात विद्युत उर्जेवर चालणाऱ्या वाहनांचा देखील समावेश आहे. आजच्या उपलब्ध ज्ञानानुसार, पृथ्वीवर सुमारे १७ प्रकारचे रेअर अर्थ एलिमेंट्स उपलब्ध आहेत.

पण सर्वांच्याच दुर्दैवाने ‘रेअर अर्थ एलिमेंट्स’चा सर्वांत मोठा साठा चीनच्या भूभागावर असून रेअर अर्थ एलिमेंट्सच्या बाबतीत चीन मक्तेदार होत आहे. रेअर अर्थ एलिमेंट्सचे ९७ टक्के साठे चीनमध्ये आहेत. यापूर्वीच्याही लेखांमध्ये आपण हायब्रीड वॉरफेअरचा अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे. समोरासमोर सैन्याने लढाई न लढता  समोरच्या देशावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणे याला आपण हायब्रीड वॉरफेअर म्हणू शकतो. चीनचे खरे शस्त्र आहे त्यांची शक्तिशाली अर्थव्यवस्था.

आपल्या अर्थ-बलाने चीनने श्रीलंकेच्या हंबणथोटा बंदरावर वर्चस्व मिळवून ते जवळ जवळ आपल्या ताब्यात घेतल्याचे आपल्याला माहितीच आहे. गेले काही दिवस पाकिस्तानमधील बलोचिस्तानच्या भागातील लोक लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून चीन आणि पाकिस्तान सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत आहेत. त्याचं कारण म्हणजे इतकी वर्षे चीनकडून घेतलेले पैसे पाकिस्तानला फेडता न आल्याने आता पाकिस्तानी ‘ग्वादर पोर्ट’ चिनी बंदर होणार आहे. या बंदराच्या आजूबाजूच्या प्रदेशातील बलोचिस्तानी लोकांना चीनने हाकलून लावले. स्थानिकांना पाणी, आरोग्य यांसारख्या पायाभूत सुविधादेखील उपलब्ध न झाल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

आर्थिक ताकदीबरोबरच चीनकडे आणखी एक सामर्थ्यवान मुद्दा आहे तो म्हणजे ‘रेअर अर्थ एलिमेंट्स’. आधीही सांगितल्याप्रमाणे, चीनमध्ये रेअर अर्थ एलिमेंट्सचे सर्वाधिक साठे आहेत. चीनमधील मंगोलिया, हुवानान, फुजियान आणि यासारख्या आणखी काही प्रोव्हिन्सेसमध्ये रेअर अर्थ एलिमेंट्सचे प्रचंड साठे आहेत. या रेअर अर्थ एलिमेंट्सचा वापर चीनमध्ये २०० हून अधिक हाय-टेक प्रॉडक्ट्स आणि सुरक्षा यंत्रणांच्या निर्मितीसाठी केला जातो.

शिवाय अमेरिकन उद्योगांची रेअर अर्थ एलिमेंट्सची गरज चीनच मोठ्या प्रमाणात भागवत आहे. अमेरिकेत येणाऱ्या एकूण रेअर अर्थ एलिमेंट्सपैकी ८०% रेअर अर्थ एलिमेंट्स चीनमधून येतात. चीनचा माजी राष्ट्राध्यक्ष डेंग क्सिओपींग एका ठिकाणी म्हटला होता, “मध्य पूर्वेमध्ये इंधन असेल तर चीनमध्येही रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत.” चीनचा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगसुद्धा रेअर अर्थ एलेमेंट्स मोठ्या प्रमाणात साठवून ठेऊ इच्छितो.

चीनने रेअर अर्थ एलिमेंट्सच्या बाबतीत दक्षिण अमेरिकेत प्रचंड गुंतवणूक केली आहे. त्यांनी वेनेझुएलामध्ये सुमारे ७८० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली असून त्यापैकी १८० मिलियन डॉलर्स फक्त निकेल खाणींसाठी वापरण्यात येतील. याशिवाय चिली आणि पेरू या देशांतील तांब्याच्या एकूण साठ्यामध्ये चीनची ५५ टक्के भागीदारी आहे आणि बोलिव्हिया देशातील ‘लिथियम’ उद्योगामध्ये चीनची ४९ टक्के भागीदारी आहे. दक्षिण अमेरिकेशिवाय, आफ्रिकेतही चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असून ३६ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक सहारा वाळवंटाच्या प्रदेशात आहे. विशेष म्हणजे काँगो मधील ६०% कोबाल्टच्या खाणी या चिनी मालकीच्या आहेत.

याचाच अर्थ चीनने सर्वोत्तम ‘बॅक-अप प्लॅन’ तयार केला असून उद्या जर अमेरिकेला आणि चीनच्या अन्य ग्राहकांना रेअर अर्थ एलिमेंट्ससाठी दुसरे पर्याय मिळाले तरी चीनमधून रेअर अर्थ एलिमेंट्सची निर्यात थांबणार नाही. याशिवाय जर चीनवर विविध सँक्शन्स लागले तरीही विविध ठिकाणच्या उद्योगांमध्ये आणि खाणींमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांचे उत्पन्नही थांबणार नाही. 

अशा वेळी चीनवर नियंत्रण मिळवायचे असेल, किंबहुना आज तशी गरज निर्माण झाली आहेच. कारण चीनचं नेतृत्व वेळोवेळी अमेरिकेला धमकावत असल्याने अमेरिका त्यांच्यावर गरज असूनही सँक्शन्स लावू शकत नाही. सँक्शन्स लादल्यानंतर अमेरिकन उद्योगांना मिळणारा रेअर अर्थ एलिमेंट्सचा सप्लाय चीन बंद करेल की काय अशी चिंता असते. टोकियोने सेनकाकू बेटांचे विलीनीकरण केल्यानंतर २०१० मध्ये, चीनने जपानलारेअर अर्थ एलिमेंट्सचा पुरवठा थांबवला होता. या चिनी समस्येवर एकमेव रामबाण उपाय म्हणजे “क्वाड” आणि जगातील इतर लहान राष्ट्रे.

विकास प्रकल्पांना निधी देण्यासाठी एकमेकांना सहकार्य करून रेअर अर्थ एलिमेंट्स क्षेत्रातील चिनी मक्तेदारीवर मात करण्यासाठी क्वाड राष्ट्रे तयारी करत आहेत. यावर आंतरराष्ट्रीय नियमांचा मसुदा तयार करण्याची चर्चादेखील झाली होती. १२ मार्च २०२१ रोजी झालेल्या “क्वाड” राष्ट्रांच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली होती.

रेअर अर्थ एलिमेंट्सच्या उत्पन्नाच्या बाबतीत भारताचा जगामध्ये पाचवा क्रमांक लागतो. भारतामध्ये ईशान्येकडील सात राज्ये, केरळ, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि झारखंड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेअर अर्थ एलिमेंट्सचे साठे आहेत. भारताने १९५० साली ‘इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड’ नावाची सरकारी कंपनी मुंबईत स्थापन केली होती. तरी रेअर अर्थ एलिमेंट्सचं हवं तसं उत्पादन घेता येत नाही कारण या प्रकारच्या उद्योगांवर जवळ जवळ निर्बंध आणणारे अनेक कायदे आणि नियम आहेत.

बीच मिनरल्स प्रोड्युसर्स असोसिएशनच्या मते, भारतातील रेअर अर्थ एलिमेंट्सची सप्लाय चेन पुनरुज्जीवित झाल्यास त्यातून होणारी वार्षिक उलाढाल ९० हजार कोटी रुपयांची असू शकते. हा उद्योग अंदाजे १ लाख २१ हजार कोटींचे भांडवली रोजगार देऊ शकतो. यामध्ये सुमारे ५० हजार कोटी परकीय चलनाचा समावेश असेल.

चीनची मक्तेदारी पाहता भारत, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम यांसारख्या रेअर अर्थ एलिमेंट्सने संपन्न असलेल्या देशांनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी आपापली धोरणे ठरवून संपूर्ण जगामध्ये रेअर अर्थ एलिमेंट्सचा सप्लाय वाढवल्यास चीनची मक्तेदारी संपुष्टात येण्याची शक्यता वाढेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जॉनी लीव्हरने हृतिक रोशनच्या लिव्हरचं दुखणं जिझसचं नाव घेऊन दूर केलं होतं म्हणे..!

Next Post

सरकार स्थापन करून वर्षही झालं नाही आणि तालिबान सरकार जगभर पैसे मागत फिरत आहे

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

सरकार स्थापन करून वर्षही झालं नाही आणि तालिबान सरकार जगभर पैसे मागत फिरत आहे

एकदा चिकनच्या तुटवड्यामुळे KFC च्या ८० शाखांना टाळं लागला होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.