The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतावरचा इस्लामी राजवटीचा काळोख रोखण्यासाठी राणा सांगा शेवटपर्यंत झुंझत राहिले

by द पोस्टमन टीम
12 June 2025
in ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


भारतीय इतिहासात असे अनेक शूरवीर यो*द्धे होऊन गेले, ज्यांनी परकीय आक्र*मण रोखत देश व धर्मासाठी प्राणाची बाजी लाऊन आपले साम्राज्य अभेद्य ठेवले. त्यापैकीच एक साम्राज्य होते मेवाड.

मेवाडची ओळख करून देतांना अनेक इतिहासकार वा लेखक तिचा शूरांची जन्मभूमी असा उल्लेख करतात. मेवाडच्या मातीत राजा रावल सिंह, राजा संग्रामसिंग उपाख्य राणा सांगा, हिंदुवीर महाराणा प्रतापसिंह, राणा उदयसिंह अशा राजपूत वीरांचा जन्म झाला.

मेवाडचा अजरामर इतिहास ज्या माळेत गुंफला गेला त्यातील एक अनमोल हिरा होता, राणा सांगा.

राणा सांगा अत्यंत शूर यो*द्धे होते, मेवाडवर येणारा प्रत्येक शत्रू हा राणा सांगाच्या नावाला घाबरायचा. “आपल्याला मिळालेलं राजपूत घराण्यातील हे जीवन साम्राज्याच्या रक्षणासाठीच आहे, त्यासाठी प्राण द्यायला मागे हटलो तर मी राजपूत कसला?” हे त्याचं प्रमाण मत असायचं.

मेवाड राज्याचे राजे राणा रायमल सिंह यांच्यानंतर राणा सांगा मेवाडचे राजे बनले. आपल्या कार्यकाळात त्यांनी मेवाडसाठी जे शक्य असेल ते सर्व काही करत मेवाडला संपन्न बनवण्याचं काम करत आदर्श राजा ही ओळख निर्माण केली.



राणा सांगा जेवढे उत्तम प्रशासक होते तेवढेच वीर यो*द्धेसुद्धा होते. त्यांची तलवार तर चक्क २० किलो वजनाची होती असा उल्लेख ही इतिहासात सापडतो.

राणा सांगा यांचा एक डोळा निकामी होता अर्थात तो कुठल्या यु*द्धामुळे नाही तर तारुण्यात आपल्या भावंडासोबत खेळत असतांना इजा झाल्याने तो निकामी झाला होता, पण यु*द्ध व रणनीतीच्या बाबतीत मात्र त्यांची नजर अत्यंत तेजतर्रार होती.

राजा राणा सांगा आपल्या साम्राज्य व धर्माच्या बाबतीत अत्यंत कठोर व प्रामाणिक होते. इस्लामी राजवटी या अन्यायकारक असून त्या आपल्या साम्राज्यावर चाली करतील याची कल्पना राणा सांगा यांना होतीच.

हे देखील वाचा

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

त्यासाठी त्यांनी नियोजनपूर्ण आखणी व विभागणी करत योजना तयार केली. इस्लामी शासकांकडे मोठे सैन्य असून त्यांचा थेट सामना आपण करू पण त्यासाठी पाठबळ मिळाले तर अधिक उत्तम या आशयाचा विचार करून त्यांनी अनेक हिंदू राजांना सहकार्य करत एकत्र येण्याचेही आवाहन केले होते.

याची सुरुवात स्वतःपासून करत मांडूचा मुस्लीम सरदार मोहम्मद सुलतान १५७६ मध्ये जेव्हा गागरोनच्या राजावर चाल करून गेला त्यावेळी राणा सांगा हे आपली ५० हजाराची फौज घेऊन त्याच्या मदतीसाठी गेले होते. या यु*द्धात त्यांच्या सैन्याने पराक्रम गाजवत मोहम्मदला जबर जखमी करत पराभूत केले होते.

मोहम्मदवर ८० वार झाले अजून तो मृत्यूशय्येवर आहे. हे समजल्यावर राणा सांगा यांनी आपले सहकारी पाठवून मोहम्मदवर उपचार केले होते, असा संदर्भही काही लेखात सापडतो.

राणा सांगा यांनी यांनी अनेक मोहिमा फत्ते करत आपली वीरता व यु*द्ध कौशल्य सिद्ध केले. यु*द्धा दरम्यान जिंकलेले अनेक प्रदेश त्यांनी स्थानिक हिंदू राजांना भेट म्हणून सादर केले. यातून शेजारील राज्याबरोबर मैत्रीचे संबंध बनवून यु*द्धकाळात सहकार्याची त्यांची भावना होती.

राणा सांगाबद्दल त्यांच्या राज्याबरोबरच शेजारील राज्यातील राजे-महाराजे यांच्यातही आदर वाढत होता.

राणा आहे तोपर्यंत आपल्या सीमा सुरक्षित आहेत हा विश्वासच जणू अनेक राजांना वाटू लागला. राणाला आपल्या प्रजेप्रती अतीव प्रेम होते, तर शत्रू पक्षाचे अनेक सरदार राणाच्या तलवारीला भ्यायचे. राणा सांगा हा प्रमुख असून तो यु*द्ध कौशल्यातही निपुण आहे, त्याचा पाडाव केला तर इतर राजे भिऊन आपले राज्य घेऊन शरण येतील, असे असा एक कट मुस्लीम शासकांमार्फत रचला जात होता.

यातच बाबर हा मोठ्या शिताफीने भारतभरावर आक्र*मण करून आपली “सल्तनत” वाढवण्याचा पण करत चालून येत होता. तर इकडे राणा सांगाच्या विजयाची घोडदौड सुरूच होती.

राणा सांगा यांच्याबद्दल सांगायचे झालेच तर त्यांचे राज्य दिल्ली, गुजरात आणि माळव्याच्या मुघल सरदारांकरवी घेरले गेले होते.

दिल्लीचा सिकंदर लोदी, गुजरातचा बेगडा शाह ,आणि माळव्याचा नसिरुद्दीन एकत्र येऊन मेवाड जिंकण्याचा प्रयत्न करू लागले. पण आपल्या यु*द्ध कौशल्याने राजकीय पराक्रम गाजवून त्यांच्या सैन्याने या तीनही मुस्लीम राजांना पाणी पाजत मेवाड राखले होते.

१५७६ मध्ये दिल्लीचा सरदार इब्राहीम लोदीसह झालेल्या यु*द्धात देखील मेवाड सैन्याने मोठा विजय मिळवला होता. दुर्दैवाने या यु*द्धादरम्यान शत्रूचा वार राणाच्या हातावर झाल्याने त्यांना आपला एक हात गमवला लागला होता, आणि पायालाही जन्मभराची इजा झाली होती. पण यामुळे खचून न जाता ते पुन्हा त्याच उत्साहाने आपल्या कर्तव्यात उतरले होते.

राणा सांगा यांच्या पराक्रमाची खरी गाथा सांगितली जाते ती खानवाच्या यु*द्धात दाखवलेल्या वीरतेसाठी.

बाबरला भारताचा सम्राट व्हायचे होते तर राणा सांगा यांना भारतावरील इस्लामी आक्र*मण रोखायचे होते.यातूनच खानवाचे यु*द्ध लढले गेले. राणा व बाबरचे सैन्य यु*द्ध भूमीवर येण्यापूर्वीच राणाच्या सैन्याचे पराक्रम ऐकून बाबरच्या सेनेच मनोबल खचले होते.

त्यामुळे बाबरच्या सेनेतील लोक मोठ्या प्रमाणावर दारू पिऊ लागले, याचा परिणाम यु*द्धावर होऊ नये म्हणून बाबराने दारू पिण्यावर बंदी घालून त्यासाठी नियम केला होता असाची उल्लेख काही पुस्तकात सापडतो.

यानंतर राणा आणि बाबराचे सैन्य रणांगणात जोरदार भिडले. एखादा वाघ शिकारीवर तुटून पडावा तसा मेवाडचा प्रत्येक शिलेदार साम्राज्याच्या रक्षणासाठी बाबरच्या क्रू*र सेनेवर बेभान होऊन तुटून पडला.

राणाच्या सैन्याकडे निर्धार होता पण बाबराकडे असणारे सैन्य व राणांनी मदत केलेल्या अनेक हिंदू राजांकडून ऐनवेळी न मिळालेले सहकार्य यामुळे राणा संगांच्या सैन्याचा पाडाव झाला,मोठ्या प्रमाणावर सैनिक मारले गेले.

या यु*द्धाच्या दरम्यान एक बाण राणांच्या चेहऱ्यावर लागून ते घायाळ झाले होते, त्यांच्या काही खास शिलेदारांनी त्यांना जखमी अवस्थेत दूर नेऊन त्यांचा पोशाख परिधान करून पुढील यु*द्ध लढवले होते.

या यु*द्धात हे शिलेदारही मारले गेले. मेवाड सैन्याची मोठी हानी झाली, लढाईत मृत्यूमुखी पडलेल्या राजपूत सैन्याची शीर एकावर एक ठेवून बाबराने एक ढीग रचला व राजपूतांच्या पराक्रमाला डाग लावला. ही बाब ज्यावेळी राणा यांना समजली तेव्हा त्यांना प्रचंड राग आला.

“बाबराचा पराभव केल्याशिवाय मी चित्तोडला परतणार नाही” अशी शपथ त्यांनी घेतली.

ते होती नव्हती तेवढी सेना घेऊन पुन्हा बाबरवर चाल करण्याचा बेत आखत होते, एवढ्यातच त्यांच्या एका विश्वासूने त्यांच्यावर विष प्रयोग केला. आणि यातच राणांचा मृत्यू झाला.

अखंड भारतावर इस्लामी राजवटीचा काळोख पसरला जाऊ नये यासाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राणा सांगा झुंझत राहिले, पण नेहमीप्रमाणे घात केला तो आपल्यांनीच. भारत मातेच्या वीर सुपूत्रांपैकी एक असलेले राणा हे प्रेरणेचा एक स्रोत आहेत हे नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: rajasthanRajput History
ShareTweet
Previous Post

जसुबेन शिल्पी – भारताची ब्राँझ क्वीन

Next Post

१८ वर्षीय तरुणी तयार करते स्वत:चे सॅनिटरी नॅपकिन्स!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे आर्किमिडीजचा खरा “युरेका मोमेंट”!

6 September 2025
ब्लॉग

कोकणातील या घरांमधील गणेशोत्सवामागे वेगळीच कहाणी आहे

28 August 2025
ब्लॉग

मराठी तरुणाने एक आयडिया केली आणि देशातली सर्वात मोठी स्पोर्ट्स अकॅडेमी उभी राहिली

15 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

26 April 2025
विश्लेषण

दा विंचीचे हे चित्र मोनालिसाच्या चित्रापेक्षाही गूढ आहे!

17 April 2025
ब्लॉग

मृत्युदर ३००% असतानाही या सर्जनने शस्त्रक्रिया केल्यावर १० पैकी एखादाच रुग्ण दगावत असे

2 May 2024
Next Post
Ishana Featured

१८ वर्षीय तरुणी तयार करते स्वत:चे सॅनिटरी नॅपकिन्स!

ऑपरेशन कॅक्टस: असं केलं होतं मालदिवचं भारताने रक्षण

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.