The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या १७ वर्षाच्या मुलाने घरातच न्यूक्लिअर रिॲक्टर बनवून एफबीआयच्या फ्युजा उडवल्या होत्या

by द पोस्टमन टीम
17 July 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लहान मुलं घरात नेहमीच काही ना काही उपद्व्याप करत असतात. जराशा कुतुहलासाठी त्यांनी केलेली एखादी गोष्ट बऱ्याच वेळा पालकांसाठी डोकेदुखी ठरते. ‘यंग शेल्डन’ या मालिकेतील मुख्य पात्र असलेल्या शेल्डनने तर या सगळ्यांवर कहर करत, घरातच एक ‘न्युक्लिअर रिअ‌ॅक्टर’ (अणु ऊर्जा बनवणारं यंत्र) बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मालिकेमध्ये दाखवलेली ही घटना एका खऱ्या घटनेपासून प्रेरित होती असं जर तुम्हाला सांगितलं तर? होय!

अमेरिकेतील डेव्हिड हान या मुलानं वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी घरातच एक ‘न्युक्लिअर रिअ‌ॅक्टर’ बनवला होता. ज्यामुळं त्याच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या परिसरातील रेडिएशन एवढं वाढलं होतं, की तब्बल चार हजार लोकांवर याचा दुष्परिणाम झाला असता.

मात्र, वेळीच त्याचा हा ‘प्रयोग’ थांबवल्यामुळं पुढचा धोका टळला. या ‘कामगिरी’मुळं डेव्हिडला आज ‘रेडिओअ‌ॅक्टिव्ह बॉय स्काऊट’ म्हणूनही ओळखलं जातं.

३० ऑक्टोबर १९७६ रोजी डेव्हिडचा जन्म झाला. पुढे शाळेत त्याने ‘बॉय स्काऊट’मध्ये सहभाग घेतला. आपल्याकडे ‘स्काऊट-गाईड’ हा प्रकार असतो, तसंच काहीसं. लहानपणापासूनच डेव्हिड अगदी धडपड्या होता. त्याला केमिस्ट्री, म्हणजेच रसायनशास्त्राची आवड होती. त्याच्या या आवडीला खतपाणी घालण्याचं काम त्याच्या घरातील एका पुस्तकानं केलं होतं. ‘गोल्डन बुक ऑफ केमिस्ट्री एक्स्पेरिमेंट्स’ असं या पुस्तकाचं नाव.

या पुस्तकातील प्रत्येक प्रयोग करुन बघायचा असं डेव्हिडनं ठरवलं होतं. हे त्याच्या वडिलांचं पुस्तक होतं, यासोबतच एक ‘केमिस्ट्री सेट’ देखील त्याला मिळाला होता. ५०च्या दशकातील असल्यामुळं या केमिस्ट्री सेटमध्ये घातक अशी रसायनंही उपलब्ध होती. यांचा वापर करुन डेव्हिड त्याचे प्रयोग करायचा. कित्येक वेळा या प्रयोगांमुळे त्यानं आपल्या रुममध्ये स्फो*ट घडवून आणला होता. मात्र, त्याच्या पालकांनी त्याला प्रयोग करण्यापासून थांबवलं नाही. उलट, त्याला तळघरातील खोलीमध्ये रहायला पाठवलं. म्हणजे त्याला जे काही राडे घालायचेत तो ते तिथे घालेल.



डेव्हिडला केमिस्ट्रीची एवढी आवड होती, की ‘पिरियॉडिक टेबल’वर असणारे सर्व एलिमेंट्स जमा करण्याचा निश्चय त्याने केला होता. केमिस्ट्रीचे हे प्रयोग करत करतच पुढे त्याला ‘रेडिओअ‌ॅक्टिव्ह’ पदार्थांबद्दल कुतुहल निर्माण झालं. पुढे त्यानं ‘रेडियम’चा शोध लावणाऱ्या ‘मेरी क्युरी’ यांच्या प्रयोगांचा अभ्यास सुरू केला. या सगळ्याच्या दरम्यान तो बॉय स्काऊटचंही काम करतच होता. बॉय स्काऊट्समध्ये लेव्हल अप होण्यासाठी विविध ‘बॅज’ गोळा करावे लागतात. नागरिकांची मदत, फायर सेफ्टी अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये कामगिरी पार पाडल्यानंतर त्या-त्या विषयाचा बॅज मिळत जातो. असे मग ठराविक बॅज गोळा केले, की पुढचं सर्टिफिकेट मिळतं.

डेव्हिडला ‘इगल स्काऊट सर्टिफिकेट’ हवं होतं. त्यासाठी मग त्याला जे बॅज गोळा करायचे होते, त्यांपैकी एक होतं – ‘अ‌ॅटोमिक एनर्जी मेरिट बॅज’. यासाठी मग त्यानं ‘न्युक्लिअर रिअ‌ॅक्टर’चं एक प्लास्टिक मॉडेल तयार केलं. हे केवळ एक मॉडेल होतं, यात कोणताही घातक पदार्थ वापरण्यात आला नव्हता. मेरिट बॅज मिळवण्यासाठी हे पुरेसं होतं. मात्र, या मॉडेलचं कौतुक झाल्यानंतर डेव्हिडने आता एक खराखुरा न्युक्लिअर रिअ‌ॅक्टर बनवायचं ठरवलं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

न्युक्लिअर रिअ‌ॅक्टर म्हणजे अणु-उर्जा निर्माण करण्याचं यंत्र. अण्विक केंद्रांमध्ये मोठ्या आकारांचे न्युक्लिअर रिअ‌ॅक्टर्स असतात. सामान्यतः कोणीही हे यंत्र घरात बनवण्याची कल्पनाही करु शकणार नाही. कारण यासाठी लागणारं ‘रेडिओअ‌ॅक्टिव्ह’ साहित्य कुठे मिळेल याची आपल्याला कल्पना नसते. डेव्हिडला मात्र केमिस्ट्रीचा एवढा अभ्यास होता, की तो रॉ मटेरिअलपासून त्याला हवं ते साहित्य बनवू शकत होता. त्यासाठी त्यानं सर्वात आधी भरपूर ‘स्मोक डिटेक्टर्स’ विकत घेतले. यामधून त्यानं ‘मेरिस टिनियम’ मिळवलं. पुढे पेन्सिल सेलमधून त्यानं ‘लिथियम’ मिळवलं; आणि जुन्या कंदिलांमधून त्यानं ‘थोरियम’ मिळवलं.

आता उरलं होतं सर्वात महत्त्वाचं – ‘रेडियम’. विशेष म्हणजे, इतर पदार्थांपेक्षा रेडियम मिळवणं त्याला सोपं गेलं. कारण विसाव्या शतकात जेव्हा लोकांना रेडियमचे दुष्परिणाम माहित नव्हते, तेव्हा त्यांनी बऱ्याच गोष्टींमध्ये ते सढळ हाताने वापरलं होतं; विशेषतः घड्याळांमध्ये. नैसर्गिकरित्या रेडियम शोधण्यासाठी डेव्हिडनं ‘गायगर काऊंटर’ या यंत्राची मदत घेतली. गायगर काऊंटर हे ‘मेटल डिटेक्टर’प्रमाणं काम करतं. असाच एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना, गाडीमध्येच त्याच्या गायगर काऊंटरनं आजूबाजूला रेडियम असल्याचा संकेत दिला. त्यानं गाडी थांबवून पाहिलं, तेव्हा समजलं की शेजारीच असणाऱ्या अँटिक शॉपमधील एका घड्याळातील रेडियममुळे हे संकेत मिळाले होते. (त्या घड्याळात एवढ्या जास्त प्रमाणात रेडियम वापरलं गेलं होतं!)

यासोबतच त्यानं अमेरिकेच्या न्युक्लिअर रेग्युलेटरी कमिशनलाही फोन करण्यास सुरुवात केली. विद्यापीठातील प्राध्यापक आहे असं सांगून तो फोन करायचा. रेग्युलेटॉरी कमिशनही मग त्याला रेडिओअ‌ॅक्टिव्ह साहित्य मिळवून देण्यासाठी मदत करत होते.

रेडियम मिळाल्यानंतर मग त्यानं प्रयोगाला सुरुवात केली. न्युक्लिअर रिअ‌ॅक्टरची बेसिक प्रोसेस अशी असते, की प्लुटोनियमचा काही भाग घेऊन, त्याच्या कडेने युरेनियमचं आवरण तयार केलं जातं. यानंतर मग प्लुटोनियममधून बाहेर पडणारे न्यूट्रॉन्स हे त्या कडेच्या युरेनियमलाही प्लुटोनियममध्ये बदलतात; आणि या सर्व प्रक्रियेमध्ये उर्जा निर्माण होते. अर्थात, डेव्हिडकडे युरेनियम आणि प्लुटोनियम दोन्हीही नव्हतं. त्याने युरेनियमच्या जागी कंदिलांमधून मिळवलेला ‘थोरियम’ वापरला; आणि प्लुटोनियमच्या जागी अमेरिसियम आणि रेडियम वापरलं.

अमेरिसियम आणि रेडियममध्ये प्रक्रिया होऊन, आवरणामधील थोरियम युरेनियममध्ये बदलतो; आणि पुढे त्याचंच रुपांतर प्लुटोनियममध्ये होईल या विचाराने डेव्हिडने हा प्रयोग केला होता. हा सगळा प्रकार होण्याआधी त्याच्या आई-वडिलांनी त्याला तळघरातील खोलीमधूनही बाहेर काढलं होतं. त्याच्या वाढत चाललेल्या ‘प्रयोगांना’ कंटाळून त्यांनी त्याला घराच्या परसबागेत एक शेड बांधून दिलं होतं. याठिकाणी तो आपले सगळे प्रयोग करत होता. आपला न्यूक्लिअर रिअ‌ॅक्टरही त्यानं याच ठिकाणी बनवला होता.

हा प्रयोग होण्यासाठी सेट करुन ठेवल्यानंतर, काही दिवसांनी त्याच्या लक्षात आलं की त्याचा गायगर काऊंटर हा मोठ्या प्रमाणात रेडिएशन लेव्हलचे संकेत देतोय. त्याने हा काऊंटर आपल्या घरापासून दूर नेऊन पाहिला. मात्र, पाच-सहा घरं ओलांडल्यानंतरही त्याचा काऊंटर रेडिएशनचे संकेत देत राहिला. तेव्हा त्याला लक्षात आलं, की आपण निस्तरण्यापलीकडचा मोठा घोळ घातलाय. मग त्यानं ठरवलं, की आपण जो रिअ‌ॅक्टर बनवलाय तो दूर कुठेतरी पुरुन येऊ.

त्यानं मग तो रिअ‌ॅक्टर, इतर थोडं साहित्य आपल्या गाडीमध्ये ठेवलं, आणि दूर जायला निघाला. मात्र, त्याच्या दुर्दैवाने त्याला हे सगळं साहित्य गाडीमध्ये ठेवताना कोणीतरी पाहिलं होतं. त्या व्यक्तीला वाटलं की हा काहीतरी चोरी करुन नेतोय. त्यामुळे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मग त्याची गाडी अडवली आणि डिकीमध्ये काय आहे ते तपासण्याची परवानगी मागितली. त्यानं पोलिसांना इशारा दिला, की डिकीमध्ये ‘रेडिओअ‌ॅक्टिव्ह’ साहित्य आहे. मग तर पोलिसांना असा संशय झाला की तो बॉ*म्ब बनवतोय. त्यांनी एफबीआयला बोलावलं.

एफबीआयने तो रिअ‌ॅक्टर जप्त केला आणि त्याच्या शेडची रेडिएशन लेव्हल तपासली. एफबीआयच्या लक्षात आलं, की तिथली रेडिएशन लेव्हल एवढी जास्त होती, की परिसरातील तब्बल चार हजार लोकांवर त्याचे दुष्परिणाम जाणवले असते. त्यांनी मग ते पूर्ण शेडच ‘यूटा’मध्ये नेत इतर अण्विक कचऱ्यासोबत गाडून टाकलं.

डेव्हिडच्या या स्टोरीचा शेवट मात्र शेल्डनच्या एपिसोडप्रमाणे ‘गुडी-गुडी’ न होता, अगदीच वाईट झाला. एफबीआयने त्याला अटक केली. त्यानंतर माध्यमांमध्ये हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना भरपूर त्रास सहन करावा लागला. डेव्हिडच्या या न्युक्लिअर रिअ‌ॅक्टरबद्दल तो पकडला जाईपर्यंत कोणालाच माहिती नव्हती. ना त्याच्या पालकांना, ना मित्र-मैत्रिणींना. याच्या काही वर्षांनंतर डेव्हिडच्या आईने आत्मह*त्या केली. यानंतर मग डेव्हिडही नैराश्यात गेला. पुढे त्यानं नौदलामध्ये चार वर्षं काम केलं आणि स्वेच्छानिवृत्तीही घेतली.

२०१६ साली वयाच्या ३९व्या वर्षी त्याचा देखील मृत्यू झाला. विशेष म्हणजे त्याचा मृत्यू रेडिएशन पॉयझनिंगमुळे नाही; तर दारु आणि फेंटिनीलच्या मिश्रणाचे सेवन केल्यामुळे झाला. ‘रेडिओअ‌ॅक्टिव्ह बॉय स्काऊट’चा मृत्यू रेडिएशनने न होता इतर कारणांमुळे झाला ही तेव्हाची मोठी हेडलाईन होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आपण मजाक उडवतो पण सोनू निगमने सचिन पिळगावकरच्या महागुरू असण्यावर शिक्कामोर्तब केलंय

Next Post

…म्हणून या खटल्यात खुनाचा आरोप सिद्ध होऊनही कोर्टाने आरोपीला निर्दोष सोडलं होतं

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

...म्हणून या खटल्यात खुनाचा आरोप सिद्ध होऊनही कोर्टाने आरोपीला निर्दोष सोडलं होतं

पुनर्जन्म घेतल्याचा दावा केलेल्या या स्त्रीमुळे प्राचीन इजिप्तच्या अनेक रहस्यांचा उलगडा झालाय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.