आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
ही गोष्ट त्या काळातील आहे, जेव्हा भारत आणि पाकिस्तानचा नकाशा एकच होता. त्यावेळी पेशावर भारताचा भाग होते. त्यावेळी जिन्ना आणि गांधी दोघेही भारताचेच नेते मानले जायचे. त्यावेळी इंग्रज हा एकमेव शत्रू होता. ‘किस्सा ख्वानी बाजार’ हा आपल्या भारतीय इतिहासातील दुसरा जालियनवाला बागेप्रमाणे एक भीषण आघात होता. ज्यावेळी शेकडोच्या संख्येने इंग्रजांनी अबालवृद्ध व अबला नारीवर बंदु*कीच्या गोळ्यांचा वर्षाव केला होता. असं काय घडलं होतं तेव्हा चला जाणून घेऊया..
महात्मा गांधींनी १९३० साली ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधात मिठाचा सत्याग्रह सुरु केला. त्यांचे हे आंदोलन हळूहळू वाऱ्याच्या वेगाने भारतभरात पसरले. अनेक लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. ज्यांना ज्यांना शक्य होतं ते प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले आणि इतर लोक त्यांच्या आंदोलनापासून लांब राहून अप्रत्यक्षपणे पाठींबा देऊ लागले. महात्मा गांधींच्या एका आवाजावर लोक शांततेत अहिं*सेचा मार्ग स्वीकारून इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले होते. या आंदोलनात पेशावर येथील खान अब्दुल गफ्फार खान यांचे मोठे योगदान होते.
खान अब्दुल गफ्फार खान यांचा जन्म पेशावरमध्ये झाला. त्यांचे पणजोबा ओबेदुल्ला खान आणि आजोबा सैफुल्ला खान हे दोन्ही पठाणी जमातीचे मोठे नेते होते, त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात इंग्रजांच्या विरोधात लढा दिला होता. अब्दुल गफ्फार खान हे स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झाले होते.
ते एका स्वतंत्र आणि धर्मनिरपेक्ष भारताचे स्वप्न पाहत होते. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी त्यांनी ‘खुदाई खिदमतगार’ नामक संघटनेची सुरुवात त्यांनी केली होती.
त्यांच्या या संघटनेत बहुतांश पठाण, मुस्लिम, आणि काही हिंदूंचा समावेश होता. समान विचारसरणीमुळे ते महात्मा गांधींचे मित्र बनले होते. पेशावरमध्ये १९१९ साली मार्शल लॉ लागू करण्यात आला त्यावेळी त्यांनी शांततापूर्ण मार्गाने त्याचा निषेध केला. पण इंग्रजांनी त्यांना जेरबंद केले. तिथे त्यांना जेवढा अधिक काळ ठेवता येईल, तितका काळ ठेवायचे इंग्रजांचे नियोजन होते. पण त्यांच्या विरोधात बोलायला माणूस न मिळाल्याने त्यांना सहा महिन्यात गफार खान यांना सोडून द्यावं लागलं.
मीठाच्या सत्याग्रहात सहभाग नोंदवला म्हणून त्यांना १९३०साली अटक करण्यात आली. पण, खान अब्दुल गफ्फार खान यांना त्यांच्या खुदाई खिदमतगार या संघटनेवर पूर्ण विश्वास होता. आपल्या नेत्याला अटक करण्यात आली, हे संघटनेच्या सदस्यांना सहन झाले नाही. त्यांच्या अटकेच्या विरोधात त्यांनी शांततापूर्वक पद्धतीने आंदोलन केले. अनेक लहान मोठ्यांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
या आंदोलनाच्या विरोधात ब्रिटिशांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली. त्यांनी ज्यावेळी गफ्फार खान यांच्यासाठी लोकांना आंदोलन करताना पाहिले त्यावेळी त्यांना लगेचच अटक करण्यात आली. महिला आणि मुलांशी इंग्रजांचा व्यवहार फार क्रू*र पद्धतीचा होता. असं असलं तरी खान समर्थकांचा निश्चय पक्का होता.
खुदाई खिदमतगार संघटनेच्या नेत्यांनी प्रतिज्ञा घेतली होती की ते खुदाचे बंदे असून त्यांना मृत्यूची पर्वा नाही.
गफ्फार खान यांनी त्यांच्या अनुयायांना शांतता आणि अहिं*सेची शिकवण दिल्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात शस्त्र उचलले नव्हते. आंदोलनाची वाढती तीव्रता बघून इंग्रजांनी सैन्य दलाच्या एका तुकडीला पेशावर येथे पाठवले. आंदोलनाला चिरडून टाकण्याचा इंग्रजांचा बेत होता.
खुदाई खिदमतगारच्या सदस्यांनी २३ एप्रिल १९३० रोजी सकाळी ७ च्या सुमारास शांती मोर्चा काढला. हा मोर्चा किस्सा ख्वानी बाजाराच्या चौकात येऊन पोहचला. ब्रिटिश सैन्य यावेळी समोर उभे होते. त्यांच्या गढवाल बटालियनची तैनाती करण्यात आली होती. त्यांनी थोड्या वेळातच शांततापूर्ण आंदोलनावर गोळी*बार करण्यास सुरुवात केली. त्या मोर्चात पठाण आणि ४०० हून अधिक वृद्ध, स्त्रिया, बालकांचा समावेश होता.
गढवाल बटालियनच्या भारतीय सैनिकांमध्ये त्या निशस्त्र लोकांवर गोळी*बार करण्याची हिंमत नव्हती. मोर्चा जवळ येत होता आणि गोळी*बार करण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते. भारतीय सैनिक निष्प्रभ ठरत आहेत हे बघून इंग्रजांनी बं*दुका स्वतःच्या हातात घेतल्या. इंग्रजांनी आंदोलकांवर गोळी*बार करण्यास सुरुवात केली. अनेक लहान मुले या गोळी*बारात मृत्युमुखी पडले. महिला आणि वृद्ध नागरिकांची अशीच अवस्था झाली. गो*ळ्या चालवल्या तरी पठाणांनी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन सुरु ठेवले.
हे बघून संतप्त झालेल्या इंग्रज सैनिकांनी अजून गोळी*बार करण्यास सुरुवात केली. या आंदोलनात सहभागी झालेले चारशेपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले होते. अनेक निरपराध लोक मारण्यात आले. इंग्रजांनी या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मृतांचा आकडा कमी दाखवला. हे जालियनवाला बाग इतकेच अथवा त्याहून अधिक नृशंस ह*त्याकांड होते. या ह*त्याकांडाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. आपल्या इतिहासाच्या पुस्तकात देखील या नृशंस कृत्याचा उल्लेख नसणे हा खरंतर त्या वीर स्वातंत्र्य सेनान्यांचा अपमान आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.










