The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

झिम्बाब्वेच्या खेळाडूने फाटक्या बुटांचं एक ट्विट केलं आणि त्यांना पुमाने स्पॉन्सरशिप दिली

by द पोस्टमन टीम
20 July 2022
in मनोरंजन, क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


फुटबॉल आणि क्रिकेट या दोन खेळांमध्ये जगभरात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. प्रसिद्ध संघ आणि खेळाडूंना स्पॉन्सर करण्यासाठी जगभरातील अनेक कंपन्यांची चढाओढ सुरू असते. स्पॉन्सरशिप (प्रायोजकत्व) असणं हे खेळाडू आणि स्पॉन्सरशिप देणारी कंपनी, या दोन्हींसाठी फायद्याचं असतं. प्रसिद्ध संघ आणि खेळाडूंना स्पॉन्सरशिप असेल तर कंपनीला या प्रसिद्धीचा फायदा होतो. स्पॉन्सरशिप असेल खेळाडूंना उत्तम सुविधा मिळतात. प्रशिक्षणासाठी आणि सुविधांसाठी पैसे मिळविण्याच्या ताणापासून खेळाडू दूर राहतात. यामुळं ते जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करू शकतात.

भारतीय क्रिकेट संघासारख्या मजबूत आणि प्रसिद्ध संघाला स्पॉन्सरशिप मिळवण्यासाठी कधी जास्त झगडावं लागलं नाही. आतापर्यंत अनेक नामवंत कंपन्यांनी भारतीय खेळाडूंना स्पॉन्सरशिप दिलेली आहे.

मात्र, झिम्बाब्वेसारख्या लहान आणि सुमार कामगिरी करत असलेल्या संघाला चांगली स्पॉन्सरशिप मिळवणं कठीण झालं होतं. त्यावेळी अडचणीत असलेल्या झिम्बाब्वे क्रिकेट संघाच्या मदतीला ‘पुमा’सारखा नामवंत आणि आंतरराष्ट्रीय बँड धावला.

एकेकाळी बलाढ्य संघाच्या समोर आव्हान उभे करणारं झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू चांगल्या स्थितीत नव्हतं. २०२१च्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडलेल्या एका प्रसंगावरून हे पुन्हा सिद्ध झालं होतं. राष्ट्रीय संघाचा खेळाडू रायन बर्ल यानं प्रायोजकत्व नसल्याबाबत ट्विटरवर एक भावनिक पोस्ट केली होती. शूज दुरुस्तीच्या उपकरणांसह त्याच्या शूजचा एक फोटोही त्यानं पोस्ट केला होता. पैशांची कमतरता असल्यामुळं संघातील खेळाडूंना प्रत्येक सिरीजच्या अगोदर आपले शूज चिटकवून घ्यावे लागतात, असं त्यानं म्हटलं होतं. त्याचं हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं. त्याच्या अनेक चाहत्यांसह झिम्बाब्वेमधील अनेक नागरिकांनी ते रिट्विट केलं होतं.

Any chance we can get a sponsor so we don’t have to glue our shoes back after every series 😢 @newbalance @NewBalance_SA @NBCricket @ICAssociation pic.twitter.com/HH1hxzPC0m

— Ryan Burl (@ryanburl3) May 22, 2021



शनिवारी बर्लनं ट्विट केलं होत आणि काही तासांनंतर रविवारी बर्ल आणि त्याच्या चाहत्यांची विनंती प्रख्यात स्पोर्ट्सवेअर ब्रँड ‘पुमा’नं ऐकली. झिम्बाब्वेच्या खेळाडूंना स्पॉन्सरशिप देण्याचं पुमानं जाहीर केलं. कंपनीनं ‘पुमा क्रिकेट’ या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून बर्लच्या ट्विटला रिप्लाय देखील दिला होता.

पुमा जगभरातील अनेक दिग्गज खेळाडूंची स्पॉन्सर आहे. जेव्हा-जेव्हा एखादा खेळाडू अडचणीत असल्याचं पुमाच्या कानापर्यंत गेलं आहे तेव्हा-तेव्हा त्यांनी तत्काळ मदत दिली आहे. भारताची स्टार धावपटू हिमा दाससाठी पुमानं खास शूजची निर्मिती केली होती. याशिवाय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक भारतीय खेळाडूंना पुमा शूज पुरवते. पुमानं झिम्बाब्वे क्रिकेट खेळाडूंना मदत केल्यानंतर अनेकांनी पुमाचं कौतुक केलं आहे. भारताचा माजी क्रिकेट खेळाडू हरभजन सिंगनं देखील ट्विट करून पुमा कंपनीचं कौतुक केलं आहे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

Time to put the glue away, I got you covered @ryanburl3 💁🏽 https://t.co/FUd7U0w3U7

— PUMA Cricket (@pumacricket) May 23, 2021

 

बर्लनं शूजचं ट्विट केल्यानंतर तो रातोरात चर्चेत आला. अष्टपैलू खेळाडू असलेला रायन बर्ल झिम्बाब्वे क्रिकेट संघासाठी ४६ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला आहे. १७ वर्षीय बर्लनं ५०० पेक्षा जास्त धावा जमवल्या असून २६ बळी मिळवले आहेत. मात्र, त्याच्या या ट्विटनंतर तो संकटात सापडण्याची शक्यता होती. स्थानिक पत्रकार अ‍ॅडम थेऊ यांच्यामते क्रिकेट बोर्डातील काही लोक बर्लच्या या कृतीवर नाराज होते.

बर्लनं ट्विट करून आंतरराष्ट्रीय स्तरावर बोर्डाची प्रतिमा कमी करण्याचा प्रयत्न केला, असल्याचं बोर्डातील लोकांचं म्हणणं होतं. 

‘झिम्बाब्वे क्रिकेट’ (पूर्वी झिम्बाब्वे क्रिकेट संघ म्हणून ओळखलं जात होतं) पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचं व्यवस्थापन करतं. १९९२ पासून झिम्बाब्वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) पूर्णवेळ सदस्य आहे. ७ एप्रिल २०२१ रोजी जाहीर झालेल्या आयसीसीच्या क्रमवारीमध्ये झिम्बाब्वे कसोटीमध्ये दहाव्या, एकदिवसीय सामन्यांमध्ये १३व्या आणि ट्वेंटी-२०मध्ये १२व्या क्रमांकावर होतं. या संघाला कॅसल लीगर, वेगा स्पोर्ट्सवेअर, कोका-कोला, सॅन्चुरी इन्शुरन्स, यू-मॅक्स, शेप्पेस, झिमगोल्ड यांची स्पॉन्सरशिप आहे.

जुलै २०१९ मध्ये आयसीसीनं ‘झिम्बाब्वे क्रिकेट’वर बंदी आणली होती. क्रिकेट बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण वाढल्यानं आयसीसीनं हा निर्णय घेतला होता. त्यामुळे झिम्बाब्वेचे संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकणार नव्हते. या बंदीमुळं २०१९च्या ट्वेंटी -२० विश्वचषकाचे पात्रता सामने खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आयसीसीनं झिम्बाब्वे क्रिकेटला पत्र लिहून पुन्हा निवडणुका घेण्यास सांगितलं होतं. जर त्यांनी पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर त्यांचं सदस्यत्व कायमचं नष्ट करण्याचा इशाराही आयसीसीनं दिला होता. झिम्बाब्वे क्रिकेट आयसीसीच्या सांगण्यानुसार पुन्हा निवडणुका घेतल्या आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये, आयसीसीनं निलंबन मागे घेतलं.

झिम्बाब्वे क्रिकेटची आताची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.

९०च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २०००च्या सुरुवातीला हेथ स्ट्रेक, अ‍ॅलिस्टर कॅम्पबेल, तैबू, हेन्री ओलोन्गा, फ्लॉवर ब्रदर्स (अँडी आणि त्याचा धाकटा भाऊ ग्रांट) यासारख्या खेळाडूंच्या बळावर झिम्बाब्वे क्रिकेट आपल्या सुवर्ण काळात होतं. तोचं संघ आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय टिकवण्यासाठी धडपडत आहे. २०१० पासून झिम्बाब्वेने फक्त ६ एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. बांगलादेश व श्रीलंकेचा त्यांनी पराभव केलेला आहे. याच काळात झिम्बाब्वेची फक्त एक कसोटी मालिका खेळला आहे.

रायन बर्लच्या ट्विटमुळे झिम्बाब्वेचे खेळाडू कुठल्या परिस्थितीचा सामना करत आहेत, याची कल्पना येते. जेव्हा आयसीसीनं बंदी घातली होती, फक्त क्रिकेट वाचवण्यासाठी या खेळाडूंनी कुठल्याही मानधनाशिवाय खेळण्याची तयारी दर्शवली होती. आता त्यांच्या मदतीला पुमा धावून आली आहे. अशाच प्रकारच्या आणखी सुविधा जर खेळाडूंना मिळाल्या तर कदाचित ते झिम्बाब्वे क्रिकेटला पुन्हा मानाचं स्थान मिळवून देऊ शकतील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

रोमन साम्राज्याला धक्का देणारी पामायराची राणी झेनोबिया

Next Post

या व्यक्तीने जगभरातील लोकांच्या नाश्त्यामध्ये क्रांती घडवून आणली..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
Next Post

या व्यक्तीने जगभरातील लोकांच्या नाश्त्यामध्ये क्रांती घडवून आणली..!

८० रुपये उधार घेऊन सुरू केलेल्या ‘लिज्जत’ची आज हजारो कोटींची उलाढाल होतेय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.