The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरियाची राजकुमारी जिला जपानमध्ये अक्षरशः कैद्यासारखं आयुष्य जगावं लागलं

by Heramb
28 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


राजा-राणी, राजकुमार आणि राजघराणे हे वजनदार आणि ऐषारामाचे शब्द वाटतात. पण युरोपीय वसाहतवादाच्या आणि ‘नवीन जगाच्या’ शोधाच्या काळामध्ये या शब्दांचे तेज कित्येक पटीने कमी झाले. महत्त्व राहिले ते फक्त ‘हर मॅजेस्टी’ किंवा ‘हिज मॅजेस्टी’ या शब्दांना! भारतासारखी काही ठिकाणे सोडली तर युरोपीय वसाहतवाद्यांनी आणि एकूणच ‘वसाहतवाद’ ही वृत्ती असलेल्या संस्कृतींनी “राजा” या पदाचा आणि शब्दाचा मान ठेवला नाही आणि कित्येक आयुष्यं उ*द्ध्वस्त केली. अशीच घटना घडली शांततेने नांदणाऱ्या ‘कोरिया’बद्दल, आणि तेव्हापासून आजपर्यंत, कोरियाचा एक भाग अस्थिरच आहे. ही कहाणी आहे त्या दुर्दैवी राजकुमारीची, जी “राजकुमारी” असूनही ‘वसाहतवादी’ वृत्तीमुळे सामान्य माणसापेक्षा दुःखद जीवन जगली..

१६ जानेवारी १९६२, दक्षिण कोरियाच्या विमानतळावर एक मध्यमवयीन महिला विमानातून बाहेर आली, तिची परिचारिका तिला पायऱ्या उतरण्यास मदत करत होती. तिचे डोळे अत्यंत रिकामे होते. ती पत्रकारांशी न बोलताच पुढे निघून गेली आणि त्यादिवशीची हेडलाईन होती, “राजकुमारी देवख्ये घरी परतली, तात्काळ युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल”. पन्नास वर्षांची राजकुमारी देवख्ये अखेर अडतीस वर्षांनन्तर जपानमधून मायदेशी परतली होती.

१९१२ साली जोसोनच्या शेवटून दुसऱ्या राजाच्या, राजा गोजोंगच्या पोटी जन्मलेली ‘राजकुमारी देवख्ये’ तिच्या वडिलांसह राजघराण्यातील अनेक सदस्यांची लाडकी लेक होती. १९१० साली जपानने जोसोनवर वर्चस्व मिळवले होते, पण जपानने राजघराण्याला सुरक्षा आणि दर्जा देण्याचे वचन दिले असल्याने ती सेऊलमध्ये अतिशय आनंदात राहत होती. तिने सेऊलमध्येच प्राथमिक शिक्षण घेतले. तिने एक हुशार विद्यार्थिनी म्हणून कीर्ती कमावली होती.

१९२५ साली, वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी, तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिचे आयुष्य कायमचे बदलले. कोरियन लोकांसाठी हा राष्ट्रीय शोक होता परंतु याचा राजकुमारीच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला. राजाला मारल्यास  कोरियन लोकांकडून उठाव होईल, या भीतीने जपानने केवळ राजघराण्याला अबाधित ठेवले होते. राजघराण्याचा प्रमुख ‘राजा गोजोंग’च्या मृत्यूनंतर, कुटुंबाला संरक्षण देण्याइतपत कोणीही “सामर्थ्यवान” असे त्या कुटुंबात उरले नव्हते. तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर लगेचच, शाही कुटुंबाचे जपानीकरण करण्याच्या “वसाहतवादी” योजनेचा एक भाग म्हणून ती जपानमध्ये गेली. जपानने राजघराण्यातील अनेक सदस्यांना जपानमध्ये जाण्यास प्रवृत्त केले आणि इतर कोरियन लोकांनाही जपानी बनवले.

वयाच्या तेराव्या वर्षी, तिला महिला माध्यमिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी, तिच्या आईपासून दूर जपानला स्थलांतरित करण्यात आले. तिथे तिला कोणीतरी आपली ह*त्या करेल अशी भीती वाटत होती आणि विषबाधा होऊ नये म्हणून ती नेहमी स्वतःची पाण्याची बाटली घेऊन जात असे. तिच्या वर्गमैत्रिणींच्या मते ती एक अत्यंत शांत आणि उदास व्यक्ती होती. तिचे जपानमधील जीवन भय आणि वेगळ्याच वातावरणाने भरलेले होते. १९२९ साली जेव्हा तिच्या आईच्या निधनाची बातमी तिला मिळाली तेव्हा ती आणखीनच खचली आणि नैराश्यात गेली.



राजकुमारी देवख्ये अनेक दिवस खोली सोडत नव्हती, जेवायला किंवा कोणाशीही बोलण्यास नकार देत होती. तिच्या काकांच्या म्हणण्यानुसार, तिला निद्रानाशाचा त्रास होता, अशातच तिला झोपेत चालण्याचीही सवय लागली. तिला मानसिक अस्थिरतेची लक्षणे दिसू लागली होती, त्यामुळे तिला मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्यात आले आणि तिला अकाली स्मृतिभ्रंश झाल्याचे निदान झाले. स्मृतिभ्रंश बहुतेकदा वृद्ध लोकांमध्ये होतो, परंतु अनियंत्रित तणाव आणि भीतीमुळे तिला हा आजार अकाली झाला. तिच्या आईच्या मृत्यूमुळे तिला हा रोग झाला होता असे मानले जात होते.

पुन्हा कोरियन शाही कुटुंबाला जपानमध्ये सामावून घेण्यासाठी जपानी सरकारने राजकन्येचा विवाह ‘ताकेयुकी सो’ नावाच्या एका उच्चभ्रू आणि सरकारी जपानी माणसाशी लावून दिला. ‘ताकेयुकी सो’ एक कवीसुद्धा होता. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी, तिने ताकेयुकी सो सोबत लग्न केले. लग्नाआधी तिच्या स्मृतिभ्रंशाची लक्षणे सुधारत होती. मात्र, वर्षभरातच तिच्या स्मृतिभ्रंशाची तीव्रता वाढत गेली. या जोडप्याला १९३२ साली ‘मासे’ नावाची मुलगी झाली. यावेळी तिची प्रकृती फारशी गंभीर नव्हती. ताकेयुकीने देवख्येची काळजी घेतली आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते असे म्हटले जात होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पण खरंतर, भू-राजकीय परिस्थितींमुळे, तिच्यावर योग्य उपचार झाले नाहीत, असं म्हणता येईल. कारण १९४५ साली जेव्हा जपान पॅसिफिक यु*द्धात हरला तेव्हा या जोडप्यासाठी गोष्टी अधिकच वाईट होत गेल्या. जपानच्या अनेक उच्चपदस्थांनी त्यांचा दर्जा, विशेषाधिकार आणि संपत्ती गमावली. त्यामुळे ताकेयुकी सो ला देवख्येच्या स्मृतिभ्रंशाचा उपचार सुरू ठेवता आला नाही आणि त्याच वर्षी या जोडप्याचा घटस्फोट झाला.

त्यांच्या घटस्फोटानंतर दहा वर्षांनी, १९५५ साली, त्यांच्या एकुलत्या एक मुलीने आत्मह*त्या केली. तिला सतत कोरियन असल्याने त्रास दिला जात, यामुळे मासेने स्वतःचा जीव घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर देवख्येला तिच्या काकांच्या ताब्यात देण्यात आले आणि पंधरा वर्षांसाठी तिला ‘मानसिक’ वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते.

उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या स्वातंत्र्यानंतर कोरियाच्या मूळ राजघराण्याला जपानने कोरियात परत जाण्यास प्रवृत्त केले. पण दोन्ही राजवटींच्या सरकारने ‘देशद्रोही’ मानल्या गेलेल्या ‘राजघराण्याला’ स्वीकारण्यास नकार दिला. १९६२ साली, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ‘सिंगमन री’ यांनी राजीनामा दिल्यानंतर, देवख्ये यांना त्यांच्या मायदेशात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली.

१६ जानेवारी १९६२ रोजी ती दक्षिण कोरियाला पोहोचली पण तिची प्रकृती फारच खालावली होती. मानसिकदृष्ट्या ती लहान मुलीसारखी झाली होती. तिला बोलण्यात, वाचण्यात आणि लिहिण्यात त्रास होत असे. तिच्या स्मृतिभ्रंशासाठी तिला ताबडतोब ‘सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटी रुग्णालयात’ दाखल करण्यात आले. तिच्या परतण्यामुळे जपान आणि दक्षिण कोरियामध्ये राष्ट्रीय हितसंबंध निर्माण झाले. प्रत्येक वृत्तपत्राने जपानमध्ये अनेक दशकांनंतर तिच्या पुनरागमनाची बातमी आणि तिची मानसिक स्थिती सर्वांसमोर आणली.

१९६८ साली तिला रुग्णालयातून सोडण्यात आले आणि ‘चांगदेओकगुंग’ पॅलेसमध्ये एक खोली देण्यात आली. चांगदेओकगुंग पॅलेस राजघराण्याचे जुने निवासस्थान होते. तिच्या परिचारिकेच्या मदतीशिवाय ती काहीच करू शकत नसत. तिने चांगदेओकगुंग पॅलेसमध्ये एकवीस वर्षे घालवली आणि १९८९ साली वयाच्या बहात्तरव्या वर्षी तिचा मृत्यू झाला.

राजकुमारी देवख्येचे जीवन खरोखरच दुःखद होते. लहान वयातच आई-वडील गमावणे, ह*त्येची भीती, मानसिक आजार, घटस्फोट आणि मुलीचा मृत्यू अशा अनेक संकटांनी तिच्या बाजूने फेर धरला होता. या काळात अनेक कोरियन लोकांप्रमाणे, जपानी वसाहतवादी सरकारने राजकुमारीचे जपानीकरण करण्यास भाग पाडले.

तिचे जीवन वसाहतवाद, कोरियावरील जपानी आक्र*मण आणि कोरियाच्या फाळणीमुळे उ*द्ध्वस्त झालेल्या अनेक जीवनांपैकी एक आहे. आपण जगभरातील वसाहतवादाच्या शोकांतिकांबद्दल अनेक ठिकाणी ऐकत/वाचत आहोत, राजकुमारी देवख्ये ही वसाहतवादाची “पीडिता” आणि वसाहतवादाचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो याचा स्पष्ट पुरावा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या बाईने संगीतातला सर्वोच्च ग्रॅमी पुरस्कार जिंकला होता

Next Post

इंग्रजांशी लढण्यासाठी टिपूने नेपोलियनकडे मदत मागितली होती, नेपोलियन निघालाही होता, पण..

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

इंग्रजांशी लढण्यासाठी टिपूने नेपोलियनकडे मदत मागितली होती, नेपोलियन निघालाही होता, पण..

सयीदा अल हुरा - तब्बल तीस वर्षे या स्त्रीने समुद्री डाकूंचं नेतृत्व केलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.