The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संधी मिळत नाही म्हणून निराश होताय..? मग क्रिकेटर प्रवीण तांबेंची ही गोष्ट वाचाच..!

by द पोस्टमन टीम
26 November 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ऑगस्ट २०२० मध्ये, जपानमधील योकोहामा फुटबॉल क्लबचा काझुयोशी मिउरा नावाची व्यक्ती लीग स्पर्धेत खेळणारा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरला. त्यावेळी त्याचं वय होतं ५३ वर्षे, ५ महिने आणि १० दिवस! ‘किंग काझू’ या म्हणून ओळखल्या जाणारा काझुयोशी गेल्या ३५ वर्षांपासून व्यावसायिक स्पर्धा खेळत आहे.

जगातील सर्वांत वयस्कर व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणूनच नव्हे तर त्याच्या मैदानावरील कौशल्यांमुळंही त्याचा गौरव केला जातो. असं म्हटलं जातं की, जेव्हा तो खेळतो तेव्हा त्याला पाहण्यासाठी स्टेडियममध्ये तीन ते चार हजार अतिरिक्त चाहते येतात. त्याला त्याच्या देशामध्ये प्रचंड आदर मिळतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी अचानक काझुयोशीबाबत का बोलत आहे?

तर, यामागे देखील एक कारण आहे. आपल्यालाकडेसुद्धा असाच एक क्रिकेट खेळाडू आहे. मात्र, त्याला म्हणावी अशी प्रसिद्धी आणि आदर मिळालेला नाही. तो खेळाडू म्हणजे प्रवीण तांबे! काझुयोशी आणि प्रवीण या दोन खेळाडूंमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे ‘Age is just a Number’ ही गोष्टी सिद्ध करून दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यात काझुयोशीला मोठ्या प्रमाणात यश आणि प्रसिद्धी मिळाली. मात्र, प्रवीण या दोन्ही गोष्टींपासून वंचित राहिला.

उत्कृष्टता हा खेळ खेळण्याचा एकमेव निकष असला पाहिजे नाही का? एखादी व्यक्ती कुठून आली आहे, तिच्या त्वचेचा रंग कोणता, ती कोणती भाषा बोलते, त्याची शरीरयष्टी साधारण आहे की अवजड आहे, त्याचं वय किती या गोष्टींना खेळाच्या मैदानात प्राथमिकता द्यायला नको. मात्र, जगातील बहुतांशी देशांमध्ये याच गोष्टींना महत्त्व दिलं जातं. असे कित्येक खेळाडू आहेत ज्यांच्याकडे कौशल्य असूनसुद्धा वरील गोष्टींचा फटका बसलेला आहे.



प्रवीण तांबे नावाच्या भारतीय क्रिकेट खेळाडूनं या सर्व गोष्टींना फाटा देण्याचा प्रयत्न केला. २०१३ साली प्रवीण तांबेनं वयाच्या ४१ व्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून लीग क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीयएलच्या लिलावापासूनचं तो चर्चेत आला. वयाची चाळीशी पार केलेल्या खेळाडूला कोण खरेदी करेल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला होता.

लीगमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळलं नव्हतं. परंतु, क्लब क्रिकेट सर्किटमध्ये तो प्रसिद्ध होता. प्रदीर्घ काळ क्लब क्रिकेट खेळल्यानंतर, ज्या वयात इतर खेळाडू निवृत्त होतात, त्या वयात या पठ्ठ्यानं आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची किमया करून दाखवली.

८ ऑक्टोबर १९७१ रोजी जन्मलेल्या प्रवीणला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. प्रवीणला फास्ट बॉलर होण्याची इच्छा होती. सुरुवातीला त्यानं फास्ट बॉलिंगचाच सराव केला होता. मात्र, ओरिएंट शिपिंग क्रिकेट क्लबचा कर्णधार असलेल्या अजय कदम यांनी त्याला लेगस्पिन बॉलिंग करण्याचा सल्ला दिला. हळूहळू प्रवीणनं आपल्या लेगस्पिन बॉलिंगनं प्रभाव पाडण्यास सुरुवात केली.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

जेव्हा तो शिवाजी पार्क जिमखाना संघाचा भाग होता तेव्हा त्याच्या लेग-स्पिननं संदीप पाटीललाही प्रभावित केलं होतं. संदीप पाटीलनं प्रवीणच्या फ्लिपरचं कौतुक केलं होतं. जेव्हापासून प्रवीणनं मीडियम पेस बोलिंग सोडून लेगस्पिन बॉलिंग करण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्याच्या खेळामध्ये कमालीची सुधारणा झाल्याचं निरीक्षण, त्याचा माजी क्लब-मेट अबय कुरुविला यांनी नोंदवलं आहे.

आयपीएलमधील संधी हा प्रवीणच्या आयुष्यातील सर्वांत मनोरंजक ट्विस्ट मानला जातो. तो एक असा खेळाडू होता ज्याला कधीही आपल्या शहरासाठी खेळता आलं नव्हतं. त्याला प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी देखील मिळाली नव्हती, तो थेट इंडियन प्रीमियर लीगसाठी निवडला गेला होता. एका रात्रीत तो क्लब क्रिकेटपासून लीग क्रिकेटपर्यंत जाऊन पोहचला होता. त्यानं डॉ. एचडी कांगा मेमोरियल क्रिकेट लीगमध्ये खूप वर्षे कठोर परिश्रम घेतले होते.

अशा खेळाडूची वयाच्या ४१ व्या वर्षी आयपीएलमध्ये निवड होणं ही एक अद्भुत गोष्ट असल्याचं राजस्थान रॉयल्सचे तत्कालीन मार्गदर्शक राहुल द्रविड म्हणाले होते. आयपीएलमध्ये शानदार पदार्पण केल्यानंतर, प्रवीण तांबेनं २०१३ सालच्या उत्तरार्धात चॅम्पियन्स लीग टी-20 स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. त्याने स्पर्धेत ६.५ च्या सरासरीने १२ विकेट्स घेत ‘गोल्डन विकेट्स अवॉर्ड’ मिळवला होता. त्‍याच्‍या या आश्चर्यकारक कामगिरीमुळं २०१३-१४ रणजी करंडकसाठी त्याची मुंबई संघात निवड करण्यात आली. कदाचित तो पहिलाच खेळाडू असावा जो अगोदर आयपीएल खेळला आणि नंतर प्रथमश्रेणी क्रिकेट.

पुढच्या आयपीएल हंगामात प्रवीणनं ५ मे २०१४ रोजी अहमदाबाद येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली, ज्यामुळं त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता. तो राजस्थान रॉयल्स संघातील महत्त्वाचा भाग झाला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये, प्रवीणला सनरायझर्स हैदराबाद संघानं १० लाख रुपये बोली लावून खेरेदी केलं. तर, २०२० आयपीएल लिलावात कोलकाता नाइट रायडर्सनं त्याला विकत घेतलं.

या दरम्यान त्यानं २५ फेब्रुवारी २०१७ रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या व्यतिरिक्त टी १० लीग क्रिकेटमध्ये देखील त्यानं सहभाग घेतलेला आहे. टी १० लीगच्या दुसऱ्या सीझनमध्ये प्रवीण सिंधी संघाकडून खेळला होता. १० षटकांच्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला खेळाडू ठरलेला आहे.

जुलै २०२० मध्ये, प्रवीणला कॅरिबियन प्रीमियर लीगसाठी (CPL) त्रिनबागो नाइट रायडर्स संघात स्थान देण्यात आलं. सीपीएलमध्ये स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. २६ ऑगस्ट २०२० रोजी, तो त्रिनबागो नाइट रायडर्सकडून सीपीएलमधील आपला पहिला सामना खेळला.

त्याच्याबाबतची एक आश्चर्यकारक गोष्ट अनेकांना माहिती नाही. तो युनायटेड किंगडममधील लिव्हरपूल लीग क्रिकेटचा सदस्य आहे. त्यानं १० वर्षांत प्रेस्कॉट अँड ओडिसी क्लब, रेनफोर्ड क्रिकेट क्लब आणि सेंट हेलेन्स रिक्रिएशनसाठी पाच शतकांसह जवळपास ७ हजार ५०० धावा केल्या आहेत. शिवाय ६५० विकेट्स देखील त्याच्या नावे आहेत.

क्लब क्रिकेटमधील प्रसिद्ध चेहरा असूनही प्रवीण तांबेला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इतकी वर्षे संधी का मिळाली नाही? हा प्रश्न नक्कीच पडतो. मोठ्या स्तरावर लवकर संधी न मिळूनही त्यानं हार मानली नाही. क्लब क्रिकेट खेळत त्यानं आपलं क्रिकेटवरील प्रेम कायम ठेवलं. २०२२ साली त्याच्या कारकिर्दीवर चित्रपटही तयार झाला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

प्राचीन काळी पर्शियन लोकांनी वाळवंटात विजेशिवाय चालणारे रेफ्रिजरेटर बनवले होते

Next Post

भारतीय महिलांचं दुसऱ्या महायु*द्धातलं योगदान आपल्या पूर्णपणे विस्मरणात गेलं आहे..!

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

भारतीय महिलांचं दुसऱ्या महायु*द्धातलं योगदान आपल्या पूर्णपणे विस्मरणात गेलं आहे..!

या ब्रिटिश महिलेने ४० वर्षे सोव्हिएतसाठी हेर म्हणून काम केलं, ब्रिटनची न्यू*क्लिअर सिक्रेट्स रशियाला पुरवली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.