The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुसऱ्या महायु*द्धात एक पोस्ट ऑफिस जर्मन सैन्याचा सामना करण्यासाठी पुढे सरसावलं होतं

by Heramb
13 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इतिहासात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यावर आपला सहजासहजी विश्वास बसणे अवघड आहे. त्यात दोन वैश्विक महायु*द्धे म्हणजे यु*द्धभूमीवर अशा प्रकारच्या अनेक अविश्वसनीय घटना हमखास होत असतात. अशीच एक घटना घडली जर्मनीच्या पोलंडवरील आक्र*मणादरम्यान. डॅनझिग पोस्ट ऑफिसमध्ये सशस्त्र नागरिक, १८० सैनिक, दोन तोफखाने आणि एक लष्करी-चिलखती वाहन असलेल्या नाझी पक्षाच्या वेहरमॅचच्या आ*क्रमणाविरुद्ध उभे राहिले होते.

युरोपमधील दुसऱ्या महायु*द्धाची ही अधिकृत सुरुवात होती. जर्मनीने पोलंडवर आक्र*मण करण्यास सुरुवात केली. पोलंडच्या लोकसंख्येचे आणि एकूणच व्यवस्थेचे ध्रुवीकरण करणे हे सोपे काम आहे असा हि*टल*रचा गोड गैरसमज होऊन बसला होता. परंतु, जर्मन आक्र*मणातील पहिले लक्ष्य, डॅनझिग शहराने अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिकार केला.

शहराचे पोस्ट ऑफिस देखील प्रचंड ह*ल्ल्यानंतरही अतिशय सुरक्षितपणे उभे होते. डॅनझिगचे पोस्ट ऑफिस पोलिश लोकांसाठी प्रतिकाराचे प्रतीक बनले होते. त्यामुळे आपसूकच, शहरावर ताबा मिळवण्याचे काम अवघड आहे असा हे जर्मन सैन्याच्या लक्षात आले होते. 

पहिल्या महायु*द्धानंतर, मित्र राष्ट्रांनी जर्मनीचा मोठा भाग व्यापला होता आणि त्यानंतर अस्तित्वात आलेले राष्ट्र म्हणजे पोलंड. व्हर्साय करारामध्ये ‘डॅनझिग’ या मुक्त शहराच्या निर्मितीसाठी केलेली तरतूद समाविष्ट आहे. डॅनझिग हा एक स्वायत्त प्रदेश होता आणि त्यावर पोलंडचे नियंत्रण होते. डॅनझिगचे परराष्ट्र व्यवहार ब्रिटनने हाताळले होते.

पण, डॅनझिगमध्ये बहुतांश लोकसंख्या ‘जर्मन’ होती. तर पोलिश भाषिकांची टक्केवारी कमी होती. जर्मनीमध्ये नाझीवादाच्या उदयासह, सेमिटिक विरोधी लाट डॅनझिगमध्येही पोहोचली. सेमिटिक भाषा/संस्कृती म्हणजे विशेषत: हिब्रू आणि अरबी संस्कृती. जर्मन सरकारच्या पाठिंब्याने, डॅनझिगमधील काही जर्मन लोकांनी शहरात ना*झी पक्षाची एक शाखा स्थापन केली. परंतु त्यांना निवडणूक जिंकता आली नाही. मात्र या काळात पोलंड आणि जर्मनीमध्ये तणाव वाढला आणि यु*द्ध अपरिहार्य होते.



ह*ल्ला झाल्यानंतर पोलिश सैन्याने शहराचे रक्षण करण्यासाठी ‘कोनराड गुडेर्स्की’च्या नेतृत्वाखाली एक विशेष टीम पाठवली. डॅनझिग पोस्ट ऑफिस हे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने जर्मन आ*क्रमणापासून त्याचे संरक्षण करणे गरजेचे होते. पोलिश सैन्याने पोस्ट ऑफिसच्या संरक्षणाची जबाबदारी अल्फोन्स फ्लिसिकोव्स्कीकडे सोपवली.

विशेष म्हणजे अल्फोन्स फ्लिसिकोव्स्की यांनी पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले. कर्मचाऱ्यांनीही अत्यंत उत्साहाने काम केल्याचे दिसून येते. त्यांनी जर्मन सैन्य येण्याच्या संभाव्य मार्गात अडथळे उभे केले आणि इमारतीभोवती असलेली झाडी कापून, इमारतीभोवती, लढाई लढण्यासाठी खंदक देखील खोदला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जर्मन यु*द्धनौका ‘श्लेस्विग-होल्स्टेन’ने १ सप्टेंबर १९३९ रोजी डॅनझिग येथे असलेल्या आपल्या तोफखान्यातून मारा सुरु केला आणि अधिकृतपणे दुसरे महायु*द्ध सुरू झाले. डॅनझिग पोलिसही लवकरच शहर ताब्यात घेण्यासाठी आलेल्या जर्मन सैन्यात सामील झाले. जर्मन सैन्याने पोस्ट ऑफिसच्या प्रवेशद्वारावर स्फो*टके लावली आणि इमारतीला मोठे भगदाड पडले.

जर्मन सैनिकांनी पोस्ट ऑफिसमध्ये प्रवेश करताच, त्यांना भयंकर गोळीबाराचा सामना करावा लागल्याने, त्यांनी ताबडतोब माघार घेतली. अल्फोन्स फ्लिसिकोव्स्कीच्या आदेशानुसार, पोस्ट ऑफिसचे कर्मचारी जर्मन आक्र*मणाविरुद्ध लढत असताना आणखी काही तास इमारतीत थांबले.

यानंतर मात्र डॅनझिग पोलिसांनी वेहरमॅचची (जर्मन सैन्य) मदत घेतली. वेहरमॅचने दोन तोफांच्या साहाय्याने इमारतीवर भीषण गोलंदाजी केली. एवढा वि*ध्वंस होऊनही पोलिश नागरिकांकडून आत्मसमर्पण होण्याची चिन्हे दिसत नव्हती. मग जर्मन सैन्याने या मिशनच्या यशासाठी एक लष्करी-चिलखती वाहन आणि १८० सैनिक आणले.

डॅनझिग पोलिसांनी वाटाघाटीसाठी दोन तासांच्या यु*द्धबंदीची व्यवस्था केली आणि त्याचबरोबर त्यांनी इमारतीभोवती स्फो*टकेसुद्धा लावली. चर्चा अयशस्वी ठरल्याने डॅनझिग पोलिसांनी इमारतीभोवती भीषण स्फो*ट झाला. पोस्ट ऑफिस डिफेंड करणारे उर्वरित सैन्य इमारतीच्या तळघरात गेले आणि संरक्षणाची नवीन फेरी सुरू केली. शेवटी हताश झालेल्या डॅनझिग पोलिसांनी इमारतीवर कित्येक गॅलन पेट्रोल ओतले आणि आग लावली.

लढण्याचा दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नसल्याने उर्वरित सैनिकांनीसुद्धा शरणागती पत्करली. पण या सगळ्या गोंधळात दहा वर्षांच्या मुलीसह आठ जणांचा मृत्यू झाला. जर्मन “लष्करी न्यायालयाने” उर्वरित ४० डिफेंडर्सना फाशीची शिक्षा सुनावली. नागरिकांवर कोर्ट मार्शल होण्याची कदाचित ही जगातील पहिली आणि शेवटची वेळ असावी.

ते नागरिक होते तरी त्यांच्यावर ‘कोर्ट-मार्शल’ झाले कारण वेहरमॅचच्या कमांडर्सना अपमानाचा बदल घेण्यासाठी त्यांच्यावर कोर्ट मार्शलचा प्रसंग आणायचा होता. १९७९ साली डॅनझिग पोस्ट ऑफिस रक्षकांच्या स्मरणार्थ शहरात एक स्मारक उभारण्यात आले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

‘फ्रेंच टोस्ट’चा शोध फ्रांसमध्ये लागला असं वाटत असेल तर हा लेख वाचा..!

Next Post

कपिल देव आणि ‘झी’च्या सुभाष चंद्रांनी सुरु केलेली ‘ICL’ BCCI ने दमदाटी करून बंद पाडली

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

कपिल देव आणि 'झी'च्या सुभाष चंद्रांनी सुरु केलेली 'ICL' BCCI ने दमदाटी करून बंद पाडली

आपण युट्युबवर रात्रभर जागून घरं बांधणाऱ्या लोकांचे व्हिडीओ बघतो ते कोण आहेत..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.