The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आपण पुरुष असल्याचं भासवून या महिलेने व्हॅटिकनच्या पोपची गादी सांभाळली होती

by द पोस्टमन टीम
11 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तीन वर्षांपूर्वीच्या मेट गालामध्ये गायिका रिहाना एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली होती. तिनं जो ड्रेस घातला होता तो पोपच्या वेषासारखा होता. रिहानाच्या त्या ड्रेसला पाहून अनेकांच्या मनात एक कल्पना चमकून गेली, व्हॅटिकनच्या पोपच्या यादीमध्ये एखादी महिला असती तर? मात्र, एका दंतकथेनुसार कधीकाळी एका महिलेनं व्हॅटिकनची गादी सांभाळली होती!

असं म्हटलं जातं, आपण पुरुष असल्याचं भासवून ही महिला पोपच्या गादीवर आली होती. काहींच्या मते, ही गोष्ट एकदम खरी आहे तर, काहींच्या मते ही केवळ अफवा आहे. तसं पहायला गेलं तर कॅथोलिक चर्चचा इतिहास कायम रहस्ये दडवून ठेवण्यासाठी आणि षडयंत्र रचण्यासाठी ओळखला जातो.

व्हॅटिकननं अशा अनेक गोष्टी जगापासून दडवून ठेवलेल्या होत्या. जेव्हा त्या जगासमोर आल्या तेव्हा लोकांना आश्चर्याचे धक्के बसले. महिला पोपची गोष्ट देखील व्हॅटिकनच्या चार भिंतीआड दडलेली खरी घटना आहे की, निव्वळ एक दंतकथा हे शोधण्याचा अनेक संशोधकांनी प्रयत्न केला आहे.

इतिहासकारांच्या मते, मध्ययुगीन काळात एका महिला पोपनं व्हॅटिकनवर राज्य केलं होतं, हे सिद्ध करणारी काही कागदपत्रे आहेत. ‘पोप जोआन’ या नावानं ही स्त्री ओळखली जात असे.

त्यावेळी नन असलेल्या मेरी मालोन यांनी ‘वुमन इन क्रिश्चॅनिटी: द फर्स्ट थाउजंड इयर्स’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. आपल्या पुस्तकात मेरी यांनी पोप जोआनाचा उल्लेख केलेला आढळतो. जोआनाची माहिती देणारा एक संपूर्ण अध्यायचं लिहिलेला आहे. मेरी मालोननं, जोआनच्या अस्तित्वाचा दावा करणाऱ्या प्राचीन इतिहासकारांनी जमा केलेल्या सर्व माहितीचे संदर्भ आपल्या पुस्तकात दिले आहेत. त्यातील एक संदर्भ पोलिश इतिहासकार मार्टिन पोलोनसचा आहे.



त्यानं ‘क्रॉनिकल ऑफ द पोप्स अँण्ड एम्परर्स’ या तेराव्या शतकातील हस्तलिखितात जोआना अँग्लिकस नावाच्या एकमेव महिला पोपच्या सुरुवातीच्या जीवनाचं वर्णन केलेलं आहे. इसवी सन ८०० साली, ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी इंग्रजी मिशनरी जर्मनीत आले होते. मिशनऱ्यांनी मेंझ शहरात फुलदा नावाची एक माँटेसरी बांधली. हे ठिकाण मुलांच्या शिक्षणाचं आणि संवर्धनाचं केंद्र बनलं. त्या काळात मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं, तर मुली घरातच बंदिस्त होत्या. त्यांना रस्त्यावर फिरण्याचीही मुभा नव्हती.

अशी सामाजिक स्थिती असूनही, जोआना तिच्या काळाच्या कितीतरी पुढे होती. माँटेसरीमध्ये शिक्षण घेता यावं म्हणून लहान वयातचं तिनं मुलाचा वेश धारण केला. माँटेसरी प्रवेश केल्यानंतर तिथे ती ग्रीक आणि लॅटिन शिकली. तिथेचं तिची ओळख एका इंग्लिश बेनेडिक्टिन भिक्षूसोबत झाली आणि दोघांचे प्रेमसंबंध जुळले. नंतर ती त्याचासोबत अथेन्सला गेली.

अथेन्समध्ये, जोआनानं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक प्रगती केली. तिच्या प्रभावी बुद्धिमत्तेमुळं तिला लोक ओळखू लागले होते. जॉन अँग्लिकस नाव धारण करून ती रोमला गेली. तिथे ती विज्ञान शिकली. तिच्या ज्ञानामुळे अनेकांच्या मनात तिच्या विषयी आदर निर्माण झाला. सुरुवातीला ती क्युरियाची सचिव बनली आणि नंतर तिला कार्डिनल म्हणून पदोन्नती देण्यात आली. ८५५ साली सर्वानुमते तिची पोपपदी निवड झाली. ‘पोप जॉन आठवा’ म्हणून तिचा राज्याभिषेक करण्यात आला होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

पुरुषाचा वेष धारण केला असला तरी शेवटी होती तर ती एक महिलाचं. तिच्याही शारिरीक गरजा होत्या. भावनेच्या भरात ती तिच्या एका विश्वासू सेवकाकडून गर्भवती राहिली. पोपच्या ढगळ कपड्यांखाली तिची गर्भधारणा लोकांपासून लपून राहिली. मात्र, एक दिवस  तिची प्रसुती झाली. चार भिंतींच्या आत प्रसुती झाली असती तर एक वेळ लोकांपासून ही गोष्ट लपवून ठेवता आली असती.

मात्र, सेंट पीटरपासून लेटरनपर्यंत निघालेल्या एका मिरवणुकीत, कोलोसियम आणि सेंट क्लेमेंट चर्चच्या दरम्यान असलेल्या वाया सॅक्रा रस्त्यावरचं जोआनाची प्रसूती झाली. पोपला अशा भर मिरवणुकीत अशा प्रकारे वेदना सुरू झाल्यानं मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. जेव्हा तिनं एका मुलाला जन्म दिला तेव्हा तर लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यादिवशी रस्त्यावर, जोआना जवळजवळ मरणचं पावली असती मात्र, कशीबशी ती वाचली. या घटनेनंतर तिला बंदिस्त करून पदच्युत करण्यात आलं. काही वर्षांनंतर तिचा मुलगा ओस्टियाचा बिशप बनला.

कॅथोलिक विश्वकोशातील नोंदींच्या आधारावर, १५ व्या शतकापर्यंत महिला पोप म्हणून तिचा विविध ठिकाणी जोआनाचा उल्लेख होता. १४१५ साली कॉन्स्टन्स कौन्सिलमध्ये देखील तिचा उल्लेख झाला होता. कॅथोलिक चर्चमधील ती एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होती. सिएना कॅथेड्रलमध्ये तिचा एक पुतळा देखील होता.

पोप क्लेमेंट VIII च्या कारकिर्दीत मात्र, जोआनाच्या पुतळ्याचं रुपांतर पोप जकारियामध्ये करण्यात आलं. १६ व्या ते १७ व्या शतकाच्या काळात कॅथोलिक चर्चनं पोप जोआनचं अस्तित्व नाकारलं आणि तिच्या कथेला एक मिथ म्हणून जाहीर केलं. विसाव्या शतकातही इतिहासकारांनी असा दावा केला की, व्हॅटिकनच्या यादीमध्ये एकच ‘पोप जॉन आठवा’ होता. मात्र, तो एक पुरुष होता आणि त्यानं ८७२ ते ८८२ याकाळात राज्य केलं.

जोआनाच्या अस्तित्वाबाबत वाद असला तरी, मध्ययुगीन काळात तिच्या घटनेनंतर एक विशिष्ट परंपरा व्हॅटिकनमध्ये सुरू केल्याचं सांगितलं जातं. पोपपदासाठी दावेदार असणाऱ्या लोकांची लिंगतपासणी केली जात होती. उमेदवारांना छिद्र असलेल्या संगमरवरी खुर्चीमध्ये बसवले जाई आणि एक कार्डिनल त्यांची तपासणी करत असे.

स्वीडिश ल्युथरन, लॉरेन्स बँकनं ‘रोमा ट्रायम्फन्स’ या पुस्तकामध्ये या लिंगचाचणीबाबत लिहिलं आहे. १६४४ साली पोप इनोसेंट दहावाच्या राज्याभिषेकाला हजेरी लावली होती तेव्हा आपण स्वत: ही गोष्ट पाहिली असल्याचा दावा त्यानं केला आहे. इतर इतिहासकारांनी आणि कॅथोलिक चर्चनं मात्र, बँकचे दावे फेटाळून लावले आहेत.

पोप जोआनाच्या अस्तित्वाचा मुद्दा आजही कॅथोलिक चर्चच्या वादग्रस्त रहस्यांपैकी एक मानला जातो. तिचं अस्तित्व सातत्यानं नाकारलं गेल्यानं ती एक दंतकथा बनून राहिली आहे. तिच्या निमित्त कॅथोलिक चर्चचा स्त्री-पुरुष भेदभावाचा दृष्टिकोन अधोरेखीत होतो. चर्च महिलांना दुय्यम मानत असल्याचंही सिद्ध होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एकेकाळी कैद्यांना छळण्यासाठी बनवलेल्या ‘ट्रेडमील’ आता वजन कमी करण्यासाठी वापरल्या जातात

Next Post

डॉक्टर होता आलं नाही म्हणून सँडविच विकायला चालू केले, आणि तिथेच सबवेची सुरुवात झाली

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

डॉक्टर होता आलं नाही म्हणून सँडविच विकायला चालू केले, आणि तिथेच सबवेची सुरुवात झाली

इस्रायलमधील मुलांना १००० वर्ष जुनी, २४ कॅरेट शुद्ध सोन्याची नाणी सापडली आहेत..

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.