The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यूकेमधील हे ‘पॉयझन गार्डन’ अशा वनस्पतींचे घर आहे ज्या कोणाचाही काटा काढू शकतात

by ऋजुता कावडकर
1 April 2024
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इंग्लंडच्या नॉर्थम्बरलँड परगण्यात असलेल्या ऍल्नविक कॅसल इथे एक अनोखं उद्यान विकसित करण्यात आलं आहे. या बागेत झाडं, आहेत. फुलं, फळं आहेत. मात्र, त्यांच्याबद्दल माहिती मिळाली की त्याच्या सौंदर्याचा आनंद घेण्यापेक्षा भीतीने पोटात गोळा उठल्याशिवाय रहात नाही. कारण ही बाग आहे विषारी वनस्पतींचे उद्यान!

या विषारी उद्यानाला भेट देताना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली फिरण्याची आवश्यकता आहे. बागेच्या काळ्या लोखंडी प्रवेशद्वारावर लावलेल्या कवट्या आणि हाडे अभ्यागतांचे स्वागत करतात. ‘टूर गाइड’च्या बरोबर आत जाऊन वनस्पतींचं निरीक्षण करू शकतो. मात्र, या वनस्पतींचं निरीक्षण करताना त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवावं लागतं.

या बागेतल्या ‘जायंट हॉगवीड’ला चुकून जरी ओझरता का होईना स्पर्श झाला तर तब्बल सात वर्षांपर्यंत त्वचेची गंभीर जळजळ होऊ शकते आणि त्या ठिकाणच्या त्वचेला सूर्यप्रकाशाचा असह्य त्रास होऊ शकतो.

गर्भ पाडण्यासाठी बेलाडोना या वनस्पतीची दोन-चार फळं खाणंही पुरेसं आहे. हेन्बेनचं सेवन केल्याने भ्रम निर्माण होतो आणि त्याचा वास घेतल्याण डोकं हलकं होतं. थोडक्यात नाश चढते. या बागेत अभ्यागतांना वनस्पतींचा वास घेण्यास मनाई आहे,

ही जगातील एकमेव विषारी बाग असल्याचा दावा नॉर्थम्बरलँड परगण्याच्या डचेस आणि या उद्यानाच्या निर्मात्या जेन पर्सी करतात.या बागेच्या माध्यमातून लोकांना प्रशिक्षित करणे, वनस्पती कशी प्राणघातक ठरू शकते, मृत्यू किती भयावह आणि वेदनादायक असू शकतो याची माहिती देणे हा उद्देश आहे.



नॉर्थम्बरलँडच्या ११ व्या शतकात उभारलेल्या किल्ल्याच्या दुर्लक्षित परिसराचा पुनर्विकास करताना वनस्पतींच्या साहाय्याने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं होतं. त्यातून विषारी वनस्पतींचं उद्यान विकसित करण्याची कल्पना प्रत्यक्षात आली. मध्ययुगीन काळात उभारण्यात आलेल्या औषधी वनस्पतींच्या बागांपासून प्रेरणा घेऊन ही बाग विकसित करण्यात आली आहे. मात्र, घातक विषारी वनस्पतींवर भर दिल्याने ती एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

जीवघेण्या वनस्पतींनी भरलेल्या बागेतून वावरणं हा छाती दडपवणारा अनुभव आहे. तरीही प्रवेशद्वारावर लावलेली हाडं आणि कवट्यांचं चेतावणी चिन्ह लोकांना बागेपासून दूर ठेवायला पुरेसं ठरलेलं नाही. हे उद्यान सामान्य अभ्यागतांसाठी सन २००५ मध्ये खुले केल्यापासून जगभरातल्या अभ्यासकांनी, वैद्यक तज्ज्ञांनी, पर्यटकांनी भेट दिली आहे. निसर्ग, इतिहास आणि चक्क मृत्यूबद्दलची उत्सुकता लोकांना या बागेत ओढून आणते.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

वास्तविक ज्या वनस्पतीमध्ये रोगापासून मुक्ती देणारे औषधी गुणधर्म असतात त्याच वनस्पतींमध्ये जीवघेणे विषारी गुणधर्मही असतात. मला मात्र, वनस्पतींच्या औढाढी गुणधर्माबद्दल अजिबात रस नव्हता. जीवघेण्या विषारी गुणधर्मांबद्दलच मला उत्सुकता होती. एखादी वनस्पती माणसाचा जीव कशा आणि किती प्रकारांनी घेऊ शकतात हे मला जाणून घ्यायचं होतं, असं डचेस पर्सी सांगतात.

या विषारी वनस्पतींच्या बागेत शिकता येणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषारी वनस्पतींपैकी अनेक वनस्पती सहजपणे कुठेही आढळणाऱ्या, ज्या वनस्पती बहुतेकदा आपल्याला माहिती असतात. मात्र, त्यांच्या विषारी गुणांपासून आपण अनभिज्ञ असतो. ऍल्नविक कॅसलमध्ये लागवड केलेल्या फॉक्सग्लोव्ह, एरंडेल आणि लॉरेल अशा अनेक प्रजाती घरासमोरच्या बागांमध्येही आढळून येतात किंवा कुठेही माळरानावरही उगवतात.आपल्या आहारात असलेल्या वनस्पतींमध्येही विषारी घटक काही प्रमाणात असतात. बेलाडोनाच्या कुळातील बटाटे हिरवे असताना धोकादायक असतात. काजूच्या सालांचा मानवी त्वचेवर हानिकारक दुष्परिणाम होतो. म्हणूनच सोललेले काजूच सहसा विकले जातात.

जैविक दृष्टीकोनातून वनस्पतींमध्ये विषारी द्रव्य निर्माण होण्याची एक तार्किक संगती आहे. जीवाणू, बुरशीजन्य रोग, कीटक किंवा तृणभक्षी प्राणी यांच्यापासून दूर राहून टिकून राहण्यासाठी पळून जाण्याचा पर्याय वनस्पतींकडे उललब्ध नाही. भक्षकांशी लढण्याचा किंवा पळून जाण्याचा कोणताही मार्ग नसताना, विषारी बनणे हीच जगण्याची रणनीती बनली, हे विषारी वनस्पतींच्या संशोधक ‘प्लांट्स दॅट किल आणि प्लांट्स दॅट क्युअर’ या पुस्तकांच्या लेखिका. डॉ. एलिझाबेथ डॉन्सी सांगतात.

वनस्पतींमध्ये अनेक संरक्षण यंत्रणा विकसित झाल्या आहेत त्या मुळे वनस्पतींचं भक्षण करणं किंवा नुसतं त्यांच्या जवळ जाणं ही धोकादायक ठरतं. डॉ डॉन्सी म्हणतात. काही वनस्पतींमध्ये काही संयुगं अशी असतात की त्यामुळे रोगांचा प्रतिकार करण्याची त्यांची क्षमता वाढते. काही वनस्पती अशा आहेत त्यांना खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कीटकांच्या तोंडाचा भाग चिकटून बसतो. काही वनस्पतींची चव घाणेरडी असते म्हणून प्राणी त्यांना तोंडही लावत नाहीत. काही वनस्पती खाल्ल्याने प्राणी आजारी पडतात.

विष तयार करण्यासाठी अनेक वनस्पती अमीनो ॲसिडवर अवलंबून असतात. सर्व वनस्पती आणि प्राणी प्रथिनं तयार करण्यासाठी ‘अमीनो ॲसिड’चा वापर करतात. ही सेंद्रिय संयुगं विषारी अल्कलॉइड्स तयार करून त्या काही वनस्पतींना प्राणघातक बनवतात. खसखसच्या झाडातील मॉर्फिन आणि स्ट्रायक्नाईनच्या झाडातील स्ट्रायक्नाईन हे दोन्ही घातक विषारी अल्कलॉइड आहेत. टर्पेनेस हे संयुग पाइन आणि लॅव्हेंडरसारख्या वनस्पतींना सुगंध देतात. ॲसिटिक आम्ल वनस्पती आणि प्राणी चरबी तयार करण्यासाठी वापरतात. हे देखील वनस्पतींच्या विषारी पदार्थांसाठी प्रारंभिक बिंदू म्हणून काम करू शकतात.

वेगवेगळे विष वेगवेगळ्या प्रकारे हानी पोहोचवतात. त्यांच्यापैकी बरेच जण मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरमध्ये व्यत्यय आणतात. एक तर शरीराचे कार्य चालवणाऱ्या संदेशांना रोखतात किंवा चक्क चुकीचे संदेश पाठवून! वनस्पतींना विषारी बनवणार्‍या समान संयुगाचे आश्चर्यकारक औषधी फायदे आहेत. न्यूरोट्रांसमीटरवर प्रभाव टाकून वनस्पतींच्या विषाच्या लहान डोसमुळे रुग्णांमध्ये वेदनेची जाणीव नष्ट करता येते. ही अशी गोष्ट वैद्यक तज्ज्ञांना शतकानुशतके माहित आहे

मूळ ‘अपोथेकरी गार्डन’ ही वैद्यकीय विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींबद्दल जाणून घेण्यासाठी उभारण्यात आली. बागेतील प्रत्येक वनस्पतीचे औषधी गुणधर्म उपचारात्मक परिणाम समजून घेण्यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या घातक गुणधर्मांबद्दलही माहिती दिली जात असे. या पैकी बर्‍याच वनस्पतींमध्ये अत्यंत विषारी गुणधर्म असतात, असं डॉ. डॉन्सी सांगतात. औषधी वनस्पती कधी प्राणघातक ठरते हे जाणून घेणे वैद्यक तज्ज्ञांची आवश्यक असते. मात्र, अनेकांनी या माहितीचा दुरुपयोगच केल्याचं इतिहास दाखवून देतो.

इटलीच्या दौऱ्यावर असताना पर्सी यांना एका विषारी वनस्पतींच्या बागेला भेट देण्याचा योग आला. ही बाग माणसांना वाचवण्याच्या नाही, तर मारण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली होती. मेडिसिसने त्यांच्या शत्रूंना मारण्याचे अधिक प्रभावी मार्ग अंमलात आणण्यासाठी विषारी वनस्पतींची बाग उभारली होती.

पंधराव्या ते अठराव्या शतकादरम्यान इटलीमध्ये मेडिसिसकडे प्रचंड शक्ती होती आणि त्यांनी ती आपल्या शत्रूंना संपवण्यासाठी कोणत्याही बऱ्या वाईट मार्गांचा अवलंब केला होता. अगदी स्वतःच्या कुटुंबातीलही प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्यासाठीही त्यांनी विषप्रयोग केला होता.

इटलीमध्ये एका प्रवेशद्वारावर कवटी आणि हाडांचा क्रॉस असलेलं चिन्ह होतं. ही कल्पना मला आवडली आणि स्कॉटलंडमधील सौत्रा मध्ययुगीन रुग्णालयाच्या अवशेषांना भेट देताना ५०० वर्षे जुने स्पंज हेनबेन, अफू आणि हेमलॉकमध्ये भिजवलेले आढळून आले, असे पर्सी सांगतात. प्रत्येक स्पंजमध्ये ४८ ते ७२ तासांपर्यंत एखाद्या रुग्णाला भूल देण्यासाठी योग्य प्रमाणात असते विष असते.

जगातल्या सर्वांत प्राणघातक वनस्पतींची लागवड करणे आव्हानात्मक काम आहे. बर्‍याच झाडांना स्पर्श करणं किंवा वास घेणंही धोकादायक असल्याने, त्यांची काळजी घेण्यासाठी माळीकाम झाडांची देखभाल करणाऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागते. त्यांनी हातमोजे, फेस शील्ड आणि हॅझमॅट सूट घालणं आवश्यक आहे. काही प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी विशेष प्रकारच्या परवानग्या आवश्यक असतात. अल्नविक उद्यानाला इंग्लंडमध्ये मादक पदार्थांच्या वनस्पती पिकवण्याचा परवाना आहे आणि वर्षातून एकदा गांजासारख्या वनस्पती नष्ट करण्याची अटही आहे.

अन्य वनस्पती उद्यानं आणि औधाशी वनस्पतींच्या बागांपेक्षा वेगळी आहे. धोकादायक आणि विषारी वनस्पतींच्या मागावर असलेल्या बेकायदेशीर धंदेवाल्यांपासून तिचं रक्षण करावं लागतं. सहल मार्गदर्शक केवळ अभ्यागतांना हानीपासून दूर ठेवण्यासाठी प्रशिक्षित असणं पुरेसं नाही. त्यांच्यात उत्तम संवादकौशल्य असणं आवश्यक आहे. त्यांना वनस्पतींचे विषारी गुणधर्म, इतिहास कथन करण्याची कला त्यांना अवगत करणं गरजेचं ठरतं.

विषारी वनस्पतींचा इतिहास आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म मनोरंजक निश्चितपणे नाहीत. उलट ते अस्वस्थ करणारे असतात. तरीही विषारी वनस्पतींच्या बागेमध्ये सांगितल्या जाणाऱ्या कथा या पाहुण्यांना अल्नविक परत परत येण्यासाठी प्रोत्साहित करतात. ॲस्पिरिन हे विलोच्या झाडाच्या सालापासून बनतं अशा गोष्टी लहान मुलांच्याच काय पण मोठ्यांच्याही पचनी पडायला कठीण असतात. मात्र, जेव्हा पाहुणे व्हिक्टोरियन आणि त्यांच्या ह*त्याकांडाबद्दल जाणून घेतात तेव्हा ती अकल्पित गोष्ट ठरते. अर्थात, त्यांना बाहेर जाऊन इतरांचे जीव घेण्यासाठी प्रोत्साहित करणार नाहीत, अशी आशा करूया. उलट त्यांना वनस्पतींची शक्ती जाणून घेण्यास आणि निसर्गाच्या वैविध्याबद्दल तोंडात बोट घालायला लावणारे ठरते हे मात्र निश्चित!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ॲपलच्या एका निर्णयामुळे फेसबुकचा पार बाजार उठलाय!

Next Post

जागतिक राजकारणात टिकायचं असेल तर सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीला पर्याय नाही!

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

6 September 2023
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

जागतिक राजकारणात टिकायचं असेल तर सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीला पर्याय नाही!

Explainer: आपल्या हक्काच्या नोकऱ्या रोबॉट्स पळवतायत का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.