The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…जेव्हा धनदांडग्यांनी एकत्र येऊन सरकारच उलथवून टाकण्याचा कट रचला होता..!

by Heramb
25 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मुक्त अर्थव्यवस्थेचे काटेकोर पालन करणाऱ्या अमेरिकन्सना अर्थव्यवस्थेवर किंवा कंपन्यांवर सरकारचे थोडीसुद्धा नियंत्रण असणे सहन होत नसे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी गोल्ड स्टँडर्ड्स रद्द करून नवी कर पद्धती आणण्याचा प्रयत्न केला आणि उद्योजक वर्गामध्ये त्यांच्याविरुद्ध चांगलीच नाराजी पसरली. काही काळातच याचे रूपांतर एका मोठ्या कटात झाले. नेमकं काय होतं हे प्रकरण, जाणून घेण्यासाठी प्रस्तुत लेख..

विरोध

राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट (एफडीआर) हे अमेरिकेच्या काही सर्वोत्कृष्ट आणि यशस्वी राष्ट्राध्यक्षांपैकी एक आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आर्थिक महामंदी (ग्रेट डिप्रेशन) आणि दुसरे महायु*द्ध यांसारखे विषय समर्थपणे हाताळले. पण त्याबद्दल काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेताना त्यांना अनेक संकटांनाही सामोरे जावे लागले.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट

त्याचबरोबर काही आर्थिक धोरणांमध्ये बदल केल्याने अनेक प्रतिष्ठित आणि श्रीमंत अमेरिकन लोक त्यांच्या विरोधात गेले होते. एफडीआर यांनी त्यांच्या पहिल्याच कार्यकाळात ‘न्यू डील टॅक्सेस’ आणि ‘गोल्ड स्टँडर्ड्स सस्पेन्शन’चे विवादात्मक निर्णय घेतल्याने अनेक लोक त्यांच्या विरोधात उभे राहू लागले होते. या लोकांपैकी एक होता विल्यम रँडॉल्फ हर्स्ट. विल्यम रँडॉल्फ हर्स्टची वृत्तपत्र आणि मीडिया कंपनी होती त्यामुळे न्यू टॅक्स कोडचा निषेध करणारा कन्टेन्ट त्याने अनेक माध्यमांद्वारे प्रसारित केला.

बिजनेस प्लॉट

अशा विविध प्रकारे एफडीआर यांना विरोध होत असला तरीही त्यांच्या विरोधकांपैकी कोणीही “फॅ*सिस्ट स्टाइलच्या लष्करी बंडाद्वारे” त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून खाली खेचण्याचा विचार केला नव्हता. ‘बिजनेस प्लॉट’ने मात्र अध्यक्षांना पदच्युत करण्याचे अनेक “राष्ट्रद्रोही” प्रयत्न केले. या एफडीआर विरुद्धच्या ‘बिजनेस प्लॉट’लाच ‘व्हाईट हाऊस कूप’ म्हणतात. 

नोव्हेंबर १९३४ मध्ये प्रामुख्याने मॅककॉर्मॅक – डिकस्टीन कमिटीने ‘बिजनेस-प्लॉट’चा तपास केला. या प्लॉटचा मुख्य सूत्रधार होता एक मेजर जनरल दर्जाचा माजी लष्करी अधिकारी, स्मेडली बटलर. बटलर एक समाजमान्य आणि कार्यक्षम लष्करी नेता होता. त्याच्याकडे आपला मुद्दा लोकांना पटवून देण्याची आणि लोकांचा पाठिंबा मिळवण्याची प्रतिभा होती.



अमेरिकन लिजन्स 

बीजनेस-प्लॉटमध्ये त्याचा सहभाग १ जुलै १९३३ रोजी सुरु झाला. याचदिवशी तो ‘अमेरिकन लिजन्स’च्या दोन सदस्यांना भेटला होता. या दोन्ही सदस्यांचे वॉल स्ट्रीटवरील प्रतिष्ठित उद्योगपतींशी संबंध होते. ‘अमेरिकन लिजन्स’ ही अमेरिकेतील एक राष्ट्रवादी, सेवाभावी माजी सैनिकांची संघटना आहे.

याच काळामध्ये माजी सैनिकांना काही फायद्याचे आर्थिक सल्ले देत असल्याने बटलरची सामाजिक प्रतिष्ठा वाढत होती. अमेरिकन लिजनचे सदस्य बिल डॉयल आणि जेराल्ड मॅकग्युअर यांनी बटलरला शिकागो येथील लिजन अधिवेशनात उपस्थित राहण्यास सांगितले. खरेतर त्यांना बटलरचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचा होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

दुसऱ्या बैठकीत, फायनान्सर ग्रेसन एम.पी. मर्फीचा बॉण्ड सेल्समन, मॅकग्युअरने बटलरसमोर माजी सैनिकांची एक स्वतंत्र युती तयार करून पाठिंबा मिळवण्यासाठी काही ‘शे’ माजी सैनिकांचा पाठिंबा मिळवून देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्यांच्या जगभरातील दौऱ्यांच्या खर्चासाठी उपलब्ध असलेल्या १ लाख ६ हजार डॉलर्सचे बँक स्टेटमेंट त्याला दाखवले.

माजी सैनिकांच्या कोणत्याही संघटनेला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उभा करणे हे अशक्यच आहे असा संशय अंदाज बटलरला आलाच होता. शिवाय ज्याप्रकारचे भाषण त्याला या माजी सैनिकांसमोर द्यायचे होते त्या भाषणाच्या मुद्द्यांमुळे तर तो अजूनच गोंधळात पडला. या भाषणामध्ये लोकप्रियतावादी, माजी-सैनिकवादी वक्तृत्वाची आणि मुख्य मुद्द्यांची कमतरता होती. तसेच गोल्ड स्टँडर्ड्स रद्द करण्याच्या समर्थनार्थ काही मुद्दे होते.

सोन्याचा पिंजरा

बटलर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा बारकाईने अभ्यास करत होता. गोल्ड स्टँडर्ड्स रद्द होणे ही देशातील श्रीमंत लोकांसाठी चांगली गोष्ट नव्हती हे त्याच्या लक्षात आले. विशेषतः बॅंकर्सना सोन्यावर आधारित दिलेल्या कर्जाची परतफेड केवळ कागदी नोटांद्वारे केलेली परवडणार नव्हती. कारण त्यांच्यामते ,जॉन क्येन्सने मांडलेला, आर्थिक मंदीतून बाहेर काढणारा उपाय देशाच्या भांडवली हितसंबंधांसाठी एक शाप होता. सोन्यापासून सुटका म्हणजे राष्ट्राची संपत्ती आणि बचत नष्ट करणे अशी त्यांची धारणा होती.

मॅकग्युअर कोण्या तिसऱ्याच्या इशाऱ्यावर काम करत आहे हे बटलरला या टप्प्यावर कळले होते. त्यानंतर त्याची भेट झाली रॉबर्ट स्टर्लिंग क्लार्कशी. रॉबर्ट स्टर्लिंग क्लार्क आणि बटलरने अनेकदा एकत्र काम केले होते. तेव्हा अगदी सुरुवातीपासूनच बटलरला क्लार्क हा “मिलियनर लेफ्टनंट” आहे हे माहित होते. बटलर लिजनमध्ये आणि नंतर देशामध्ये गोल्ड स्टँडर्ड्स पुन्हा स्थापित करण्यासाठी पाठिंबा देईल, अशी क्लार्कला आणि त्याच्या सहकाऱ्यांना आशा होती. यासाठी क्लार्कने तीन करोड डॉलर्सपेक्षा जास्त खर्च करण्याचे मान्य केले. पण काही कारणाने बटलरला ही गोष्ट माजी सैनिकांच्या फायद्याची आहे हे पटत नव्हतं.

शिवाय क्लार्कने मॅकग्युअरच्या सात महिन्यांच्या परदेश दौऱ्यालाही आपला आर्थिक पाठिंबा जाहीर केला होता. या दौऱ्यामध्ये बॉण्ड सेल्समन मॅकग्युअर युरोपच्या बदलत्या राजकीय वातावरणाचे निरीक्षण करणार होता. त्याने प्रभावशाली ना*झी सत्तेचा अभ्यास केला. तसेच इटालियन फॅ*सिस्ट आणि त्यांनी जपलेल्या देशांतर्गत व्यावसायिक हितसंबंधांचे भरभरून कौतुकही केले.

डॉलर्स विरुद्ध राष्ट्र!

मॅकग्युअरने फ्रान्समध्ये क्रोक्स-डी-फ्यू नावाच्या उजव्या विचारसरणीची राष्ट्रवादी लीग स्थापन केली, या लीगला जवळ जवळ दीड लाख समर्थकांचा पाठिंबा होता.

खरंतर जेराल्ड मॅकग्युयर हा एक श्रीमंत तसेच कष्टाळू माणूस होता, पण त्याच्या युरोपमधील प्रवासानंतर त्याच्या या गुणांमध्ये मोठे बदल झाले. त्याने एक मोठा पण “राष्ट्रद्रोही” डाव बटलरसमोर मांडला. या लिजनच्या कामामध्ये वापरले जाणारे सगळे पैसे उद्योग क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित लोकांनी दिले आहेत हे मॅकग्युअरने कबूल केले.

त्या लोकांनी या प्लॅनसाठी तब्बल तीस लाख डॉलर्स दिले होते आणि गरज पडल्यास ३० करोड डॉलर्सही त्यांनी मॅकग्युयरने दिले असते.  त्यातील मोठा हिस्सा निश्चितच बटलरला मिळणार होता, पण त्याने हे काम केले तरच. ते काम होते: बटलरने सुमारे ५ लाख माजी सैनिकांचे अर्धसैनिक बल (पॅरामिलिटरी फोर्स) तयार करावे आणि त्यांचा वापर राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांना पदावरून काढून टाकण्यासाठी करावा. हे काम बटलरने करावे अशी मॅकग्युयरची इच्छा होती.

तत्कालीन अमेरिकन पत्रकारिता. स्तंभ – लोकशाहीचा की श्रीमंतीचा?

अमेरिकन प्रेस लवकरच राष्ट्रपतींच्या चुकीच्या आर्थिक धोरणांनी त्रस्त झालेल्या व्यावसायिकांच्या लीगबद्दल घोषणा करेल असे मॅकग्युअरने बटलरला सांगितले. रूझवेल्टच्या प्रकृती अस्वास्थ्याबद्दल बातम्या दाखवण्याची योजनासुद्धा प्रेसने आखली होती. यामुळे राष्ट्राध्यक्षांनी सरकारचे सर्वोच्च पद सोडून द्यावे आणि “जनतेच्या” भावनांचा आदर करावा अशा आशयाचा कन्टेन्ट दाखवला जाणार होता. बटलर आणि त्याचे साथीदार जेव्हा देशाचे नेतृत्व करतील तेव्हा त्यांना औपचारिक पद्धतीने मान्यता दिली जाईल हेसुद्धा मॅकग्युयरने सांगितले.

ही सर्व योजना ऐकून आश्चर्यचकित झालेल्या बटलरला काय निर्णय घ्यावा कळत नव्हते. काहीही झालं तरी बटलर हा एक सैनिक होता. तसेच या प्लॅनचे व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्याने ‘लिबरल’ असलेल्या फिलाडेल्फिया पेपरचा वापर करण्याचा निर्णय घेतला. या वृत्तसंस्थेने त्यांचे स्टार रिपोर्टर पॉल कॉमली फ्रेंचला मॅकग्युअरची मुलाखत घेण्यासाठी पाठवले.

पॉल कॉमली फ्रेंच मॅकग्युअरचा समविचारी तर होताच पण त्याला ‘बिजनेस प्लॉट’बद्दलही सगळी माहिती होती. ठरल्याप्रमाणे रिपोर्टरने मुलाखत  घ्यायला सुरुवात केली. मॅकग्युअर म्हणाला, “आम्ही अमेरिकेत उभे केलेले सर्व काही उ*द्ध्वस्त करू इच्छिणाऱ्या कम्युनिस्टांपासून राष्ट्राला वाचवण्यासाठी आम्हाला देशात फॅ*सिस्ट सरकारची गरज आहे. अस्सल देशभक्त असणारे फक्त सैनिक आहेत आणि स्मेडली बटलर हे त्यांचे आदर्श नेते आहेत. ते एका रात्रीत लाखो लोकांना संघटित करू शकतात.”

द एंडगेम – सैनिक निवृत्त झाला तरी, त्याच्या आतला देशभक्त तसाच असतो!

बटलरकडे कायदेशीररित्या साक्ष नोंदवण्यासाठी आता त्या पत्रकाराच्या रूपात दुसरा साक्षीदारसुद्धा होता. बटलरने ही तक्रार फेड्सकडे केली आणि मॅककॉर्मॅक – डिकस्टीन कमिटीने २० नोव्हेंबर १९३४ रोजी सुनावणी सुरू केली. कमिटीसमोर साक्ष नोंदवताना बटलर म्हणाला, “मिस्टर मॅकग्युअर यांच्याशी पूर्णपणे न्याय्य असावे. तो हिं*साचारी नाही, वॉशिंग्टनमध्ये अशा प्रकारच्या शक्तीप्रदर्शनामुळे कदाचित सरकारचा शांततेने पाडाव होईल असे त्याला वाटले”.

पत्रकार फ्रेंचनेही बटलरच्या या जबाबाला पाठिंबा दर्शवला. जेराल्ड मॅकग्युअरने मात्र हे सर्व नाकारले परंतु अमेरिकन लिजनलासुद्धा ‘गोल्ड स्टँडर्ड्स’च्या मुद्द्यावर बटलरचा पाठिंबा हवा असल्याने लिजनने मॅकग्युअरला पाठिंबा दिला नाही.

काही दिवसातच ही बातमी “फॅ*सिस्ट आर्मीसाठी ३० लाख डॉलर्सची बोली उघडकीस आली” अशा आशयांच्या मथळ्यांसह बाहेर आली. बहुतेक प्रमुख बातम्यांच्या माध्यमांनी मूळ बातमी दाखवलीच नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकीयाने या गोष्टीवर आपले मत नोंदवले, “ही मोठी लबाडी आहे आणि यावर चर्चा होऊ शकत नाही!”.

वॉ*र इज रॅकेट!!

बटलरची प्रतिमा सार्वजनिक क्षेत्रात उंचावतच राहिली. १९३५ साली त्याने ‘वॉर इज अ रॅकेट’ नावाचे पुस्तक लिहिले. तो खरे बोलत होता याच्याशी मॅककॉर्मॅक – डिकस्टीन कमिटी तसेच पत्रकार फ्रेंचसुद्धा सहमत आहेत. शेवटी देशासाठी प्राणपणाने लढलेला एक सैनिक कितीही मोठं आमिष दाखवलं तरी देशाविरुद्ध उभा राहणार नाही हे नक्की!

कोणताही देशांतर्गत प्रश्न देशांतर्गत मार्गानेच सोडवावा आणि त्यामध्ये विदेशी सत्तांची मदत घेऊ नये हाच धडा यातून आपल्याला मिळू शकेल.

अर्थस्य पुरूषो दास: ।

या प्रकरणात कोणावरही कारवाई झाली नसली तरी, “या देशविरोधी प्रयत्नांवर चर्चा करण्यात आली, योजना आखण्यात आली आणि आर्थिक पाठिंबा देणाऱ्यांना हा निर्णय योग्य वाटला असता तर तो निर्णय अंमलात आणले गेला असता यात प्रश्नच नाही.” असे कॉंग्रेस कमिटीच्या अंतिम अहवालात म्हटले आहे. इतिहासकार सॅली डेंटन सांगतात, “जनरल बटलरने उघड केलेला फॅ*सिस्ट प्लॉट फारसा पुढे गेला नाही, परंतु त्या प्लॉटमध्ये यु*द्धे किंवा क्रांती घडवून आणणारे तीन प्रमुख घटक होते: सैन्यबल, तोफा आणि पैसा.”

हे प्रकरण फारसे पुढे गेले नसले आणि बाहेर आले नसले तरीही यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे हे निश्चित..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एका भूकंपाने अवघ्या २३ सेकंदात संपन्न शहराचं मातीच्या ढिगाऱ्यात रूपांतर केलं..!

Next Post

एअर लाईन्सची जाहिरात म्हणून विमानात गाईचं दूध काढण्याचा स्टंट केला होता

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

एअर लाईन्सची जाहिरात म्हणून विमानात गाईचं दूध काढण्याचा स्टंट केला होता

चार्ली चॅप्लिनच्या 'द ग्रेट डिक्टेटर'ने दुसऱ्या महायु*द्धाचं भाकीत वर्तवलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.