The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कबुतरांनी प्रेम पत्र पोचवायचं काम करायच्या आधी दोन्ही महायु*द्धांत शौर्य गाजवलंय..!

by द पोस्टमन टीम
26 July 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


तुम्ही ‘मैंने प्यार किया’ चित्रपट पाहिलाय? नसेल पाहिला तर निदान त्यातील ‘कबुतर जा जा’ हे गाणं नक्कीच कुठेतरी ऐकलं असेल. प्रेमात पडलेली अभिनेत्री (भाग्यश्री) एका कबुतराच्या माध्यमातून आपल्या प्रियकराला (सलमान खान) निरोप पाठवत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मी लहान असताना हे गाणं पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्ही मी आजोबांना म्हटलं होतं, असं कुठं खरं होतं का? कबुतर कसं काय निरोप पोहचवू शकतो. तेव्हा आजोबा म्हणाले होते, अगं साधंसुधं समजू नको या कबुतरांना त्यांनी तर महायु*द्धंसुद्धा गाजवली आहेत आपल्या पराक्रमानं. तेव्हा मला विश्वास बसला नाही. मात्र, जेव्हा शाळेत इतिहासाच्या सरांनी पहिलं आणि दुसरं महायु*द्ध शिकवताना कबुतरांच्या वापराबद्दल माहिती दिली तेव्हा मला खरंच या कबुतरांचं कौतुक वाटलं.

१८ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८ या काळात पहिलं आणि १ सप्टेंबर १९३९ ते २ सप्टेंबर १९४५ या काळात दुसरं महायु*द्ध झालं. दोन्ही महायु*द्धांमध्ये ‘संपर्क प्रणाली’चा (कम्युनिकेशन) महत्त्वाचा वाटा होता. त्यावेळी संपर्काची नवीन-नवीन साधनं विकसित झाली. मात्र, त्यांच्या गोपनियतेबाबत सैन्यातील अधिकारी साशंक होते. म्हणून त्यांनी सर्वात जास्त विश्वसनीय संपर्क साधनाचा वापर केला. हे काही एखादं मशीन नव्हतं, हे साधन होतं ‘कबुतर’! हो कबुतर! पहिल्या आणि दुसऱ्या महायु*द्धांमध्ये सैन्यापर्यंत निरोप पोहचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कबुतरांचा वापर करण्यात आला.

‘रेसिंग होमर’ या प्रजातीच्या कबुतरांनी आपल्या जीवावर खेळून कित्येक सैनिकांचे प्राण वाचवले. त्यांच्या या शौर्यामुळं प्रभावित होऊन त्यांच्यासाठी खास पुरस्काराची निर्मिती करावी लागली.

१९१४ मध्ये ‘मार्ने’च्या पहिल्या लढाईच्या वेळी फ्रेंच सैन्यानं पॅरिसवर चाल करून येणाऱ्या जर्मन सैन्याला रोखलं. यावेळी फ्रन्ट लाईनवर फक्त फ्रेंच सैन्यचं नाही तर त्यांची कबुतरं देखील लढत होती. प्रचंड उष्णता आणि यु*द्धाच्या धुमश्चक्रीमध्ये फ्रेंच मुख्यालयात संदेश पाठविण्यासाठी कबुतर सर्वोत्तम मार्ग असल्याचं सिद्ध झालं. मार्ने येथे फ्रेंच सैन्याकडं कबुतरांचे ७२ लॉफ्ट होते. यातील अनेक कबूतरं त्यावेळी ‘ऑन ड्यूटी’ होते. आश्चर्यकारकपणे सर्व कबुतरांनी त्यांचं कर्तव्य चोखपणे बजावलं.

लहान मुलं जशी दिवसभर कुठेही खेळत फिरली तरी भूक लागल्यानंतर मात्र बरोबर घरीच येतात. कबुतरांच्या अंगी देखील हाच गुण आहे. कुठेही भटकंती केली तरी ते बरोबर त्यांच्या नियमित ठिकाणीच परत येतात. त्यांचा उडण्याचा वेगही जास्त असतो. त्यांच्या क्षमतेमुळंचं त्यांना संदेशवाहक म्हणून वापरण्यात आलं. असं म्हणतात की फक्त एक ‘घार’ (फाल्कन) कबुतराचा सामना करू शकते.



१९१७ मध्ये अमेरिका पहिल्या महायु*द्धात आली होती. त्यांनी सर्वांत प्रभावीपणे कबुतरांचा संदेशवहनासाठी वापर केला. अमेरिकेच्या नॅशनल अर्काइव्ह्जमध्ये असंख्य असे संदेश जतन करून ठेवले आहेत जे ‘पंख असलेल्या सैनिकांनी’ अमेरिकन सैनिकांसाठी दिले होते. हे संदेश वाचल्यानंतर आपल्याला जाणीव होईल की, या निर्भिड पक्ष्यांनी कितीतरी जीव वाचवले होते. ‘प्रेसिडेंट विल्सन’ आणि ‘चेर अमी’ या दोन कबुतरांच्या शौर्यगाथा आजही अमेरिकन सैन्यामध्ये सांगितल्या जातात.

‘प्रेसिडेंट विल्सन’चा जन्म फ्रान्समध्ये झाला होता. त्यानं अमेरिकन टँक ट्रूप्स आणि इन्फंट्री दोन्हींना जर्मनीविरोधात सहाय्य केलं. मेयूज-आर्गोन चकमकीच्यावेळी विल्सननं ७८ व्या इन्फंट्रीला मदत करताना आपल्या जीवाची बाजी लावली. ५ ऑक्टोबर १९१८ रोजी शत्रू सैन्याचा सामना करताना अमेरिकन सैन्यानं ‘विल्सन’ला निरोप घेऊन पाठवलं. अमेरिकन सैन्याला तोफखान्याची आवश्यकता होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

विल्सननं भरारी घेतल्यानंतर जर्मन सैन्यानं त्याच्यावर गोळी*बार सुरू केला. यात त्याला जखमाही झाल्या मात्र, त्या पठ्ठ्यानं हार न मानता निरोप पोहचवण्याचं काम चोख पार पाडलं तेही २५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत. हा एक विक्रमच होता!

‘प्रेसिडेंट विल्सन’प्रमाणं आणखीन एक कबुतर होतं ज्यानं एका संपूर्ण बटालियनचे प्राण वाचवण्याचं काम केलं होतं. ‘चेर ऍमी’, असं या फ्रेंच ‘ वॉर हिरो’चं नाव होतं. मेयूज-आर्गोन लढाई दरम्यान, जर्मन सैन्यानं अमेरिकेच्या ७७व्या बटालियनला घेराव घालून पाच दिवस त्यांची कोंडी केली होती. घेराव घातलेल्या जर्मन सैन्याचा बंदोबस्त करण्यासाठी बाहेरील अमेरिकनं तोफखान्यानं चुकून आपल्याचं अडकलेल्या सैन्यावर गोळी*बार सुरू केला. हा गोळीबार रोखण्यासाठी त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवणं अतिशय गरजेचं होतं. अडकलेल्या अमेरिकन सैन्याकडं त्यावेळी ‘चेर ॲमी’ हे एकमेव कबुतर शिल्लक होतं.

शेकडो लोकांच्या जीवाची जबाबदारी पंखांमध्ये घेऊन ‘चेर ॲमी’नं उड्डाण केलं. कितीतरी गोळ्यांचा सामना करत तो जखमी अवस्थेत इच्छित स्थळी निरोप घेऊन पोहचला. त्याच्या या पराक्रमासाठी फ्रेंच सरकारनं त्याला ‘क्रॉस दी गोर’ या पुरस्कारानं सन्मानित केलं.

पहिल्या महायु*द्धाप्रमाणं दुसऱ्या महायु*द्धात देखील हजारो कबुतरांचा वापर करण्यात आला. एकट्या युकेनं अडीच लाख कबुतरांचा वापर केल्याची माहिती आहे. २ फेब्रुवारी १९४२ रोजी रॅपीड ॲक्शन फोर्सचं एक बॉ*म्बर विमान उत्तर समुद्रात पडलं. हे विमान नॉर्वेच्या एका मोहिमेवरुन परत येतं होतं. परंतु फोर्सच्या ब्यूफोर्ट बॉ*म्बरला शत्रूच्या तोफांनी लक्ष केलं आणि ते आपल्या इच्छित स्थळी पोहचण्या अगोदरच १०० मैल अलिकडे समुद्रात कोसळलं. समुद्राच्या रक्त गोठवणाऱ्या पाण्यामध्ये चार जीव आपल्या मृत्यूची वाट पाहत थांबले होते. कारण, ते एअरबेसला त्यांचे रेडिओ कॉर्डीनेट्स पाठवण्यास सक्षम नव्हते.

मात्र, विमानातून खाली पडण्याअगोदर त्यांच्यातील एकानं ‘विंकी’ नावाच्या कबुतराला मुक्त करण्यात यश मिळवलं होतं. त्याला आशा होती की, कबुतर नक्की ‘डुन्डी’ येथील त्याच्या नियमित ठिकाणी जाईल आणि त्यातून एअरबेसला संकेत मिळेल. ‘विंकी’नं त्याचा विश्वास खरा ठरवला. तो १२० मैलांचा प्रवास करून डुन्डीला पोहचला. जेव्हा तो तिथे पोहचला तेव्हा तो प्रचंड थकलेला होता. तेथील सैन्यानं तत्काळ फिफी एअरबेसला याबाबत माहिती दिली. विंकीकडे काही निरोप नव्हता.

मात्र, विमानाशी शेवटचा झालेला संपर्क आणि विंकीला डुन्डीला पोहचण्यासाठी लागलेला वेळा यावरून अंदाज काढून समुद्रात पडलेल्या विमानाचा माग काढण्यात आला. रेस्क्यू मिशन लॉन्च केल्यानंतर पुढच्या पंधराचं मिनिटात चौघांना वाचवण्यात यश आलं.

अशा प्रकारे दोन्ही महायु*द्धांमध्ये कबुतरांनी अगदी सैन्याच्या खांद्याला खांदा देऊन काम केलं. या काळात कित्येक देशांनी कबुतरांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणाचं उभी केली होती. इतकचं काय युकेमध्ये यु*द्धात सामिल झालेल्या कबुतरांना विशेष राशन देखील देण्यात येतं होत. दुसऱ्या महायु*द्धानंतर ३२ कबुतरांना त्यांच्या असामान्य कामगिरीसाठी ‘डिकीन मेडल’ देण्यात आलं. मेडलवर असलेली ‘We Also Serve’ ही ओळ आपल्याला सर्व काही सांगून जाते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

नागार्जुनच्या प्रेमाखातर तब्बूने अजूनही लग्न केलं नाही..!

Next Post

एका गुजराती माणसाने ‘वास्को द गामा’ला भारताचा रस्ता दाखवला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

एका गुजराती माणसाने 'वास्को द गामा'ला भारताचा रस्ता दाखवला होता

नंबी नारायणन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्यामुळे देशाचं खूप मोठं नुकसान झालंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.