The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डुकराचा चेहरा असलेली एक महिला लंडनमध्ये राहत असल्याची अफवा परसली होती

by द पोस्टमन टीम
9 September 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सौंदर्य आणि स्त्री हे एकमेकांचे समानार्थी शब्द मानले जातात. रंग, रूप, शरीरयष्टी ही मापकं लावून स्त्रियांचं सौंदर्य तोललं जातं. आखीव-रेखीव चेहऱ्याची कुठलीही स्त्री पटकन आपल्या डोळ्यात भरते. मात्र, जर अचानक डुकराचा चेहरा असलेली स्त्री तुमच्यासमोर येऊन उभी राहिली तर? काहींना भीती वाटेल काहींना किळसही येईल कदाचित तर, काही लोक, असंही घडू शकतं यावर विश्वासच ठेवणार नाहीत. पण, सोळाव्या शतकात युरोपात डुकराचा चेहरा असलेल्या महिलांची गोष्ट मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होती. १६३० च्या उत्तरार्धात हॉलंड, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये एकाचवेळी डुकराचा चेहरा असलेल्या महिलांच्या गोष्टींचा उदय झाला. एका श्रीमंत महिलेची ही गोष्ट होती जिचं शरीर सामान्य माणसाप्रमाणे होतं मात्र, चेहरा डुकराचा होता. या गोष्टीचे अनेक व्हर्जन्स होते.

‘अगदी ब्युटी अँड दी बिस्ट’ या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी ही गोष्ट त्याकाळी इंग्लंडमध्ये आणि नंतर आयर्लंडमध्ये विशेष लोकप्रिय झाली होती. पुढे हळूहळू या गोष्टीमध्ये लोकांना काहीही रस उरला नाही आणि त्यांनी ही गोष्ट एक मिथक म्हणून स्विकारलं. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अशीच एक गोष्ट डब्लिनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली होती. एक परोपकारी लोक क्रांतिकारक स्त्री ग्रिसेल्डा स्टीव्हन्स ही आपला चेहरा लपवत असे.

तिचा चेहरा डुकरासारखा असल्याची चर्चा लोकांमध्ये होती. डुकराचा चेहरा असलेली एक महिला मेरीलेबोनमध्ये राहत असल्याची अफवा १८१४ आणि १८१५ या काळात लंडनमध्ये परसली होती. तिच्या अस्तित्वाची सत्यता म्हणून तिचे असंख्य कथित पोर्ट्रेट देखील प्रकाशित झाली होती. 

अनेक शोमन लोकांनी तर आपल्या सर्कसमध्ये देखील अशी कथित महिला दाखवली होती. १८६१ मध्ये प्रख्यात लेखक चार्ल्स डिकीन्सनं डुकराचा चेहरा असलेल्या महिलेबाबत भाष्य केलं होतं. “In every age, I suppose, there has been a pig-faced lady”, असं त्याने लिहिलेलं आहे.

काहींच्या मते मध्ययुगातील “लॉथली लेडी” म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रचलित मिथकांमधून ही आख्यायिका आली असावी. या कथा एका कुरूप स्त्रीच्या भोवती फिरणाऱ्या होत्या. कुरूप असूनही एका पराक्रमी पुरुषाला ती स्त्री कमालीची सुंदर भासते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. त्याच्या प्रेमामुळं पुढे खरोखरचं या कुरुप स्त्रीचं रुपांतर सौंदर्यवतीमध्ये होते.



काहींनी या गोष्टी, १६३९ मधील तन्नाकिन स्किंकरच्या बॅलेड्सशी संबंधित असल्याचं सांगितलं. तन्नाकिन एक डच तरुणी होती. कथेच्या विविध व्हर्जन्सपैकी श्रीमंत आणि डुकरासारखा चेहरा असलेल्या तन्नाकिनची गोष्ट जास्त प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की, एकदा तिच्या घरी एक भिकारीण आपल्या मुलांसह मदतीची याचना करण्यासाठी गेली होती. श्रीमंत आणि गर्भवती असलेल्या तन्नाच्या आईनं भिकारणीच्या मुलांची तुलना डुकरांशी केली. यामुळे संतप्त झालेल्या भिकारणीनं तिच्या आईला डुकराचा चेहरा असलेलं अपत्य होईल, असा शाप दिला. जेव्हा तन्नाचा जन्म झाला तेव्हा खरचं तिचा चेहरा डुकरासारखा होता. तिचं वागणं देखील डुकरासारखं होतं. ती बोलतानासुद्धा डुकराप्रमाणंच गुरगुरत असे.

जर तन्नाकिनचं लग्न झालं तर हा शाप नाहीसा होऊ शकतो, अशी भविष्यवाणी एका भविष्यकारानं केली. तिच्या कुटुंबीयांनी तिच्याशी लग्न करणाऱ्याला मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळेल असं जाहीर केलं. मात्र, तिच्या डुकराच्या चेहऱ्यामुळं कुणीही तिच्याशी लग्न करण्यासाठी समोर आलं नाही. शेवटी लंडनमधील एक तरूण तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार झाला. जेव्हा त्याचं लग्न झालं तेव्हा ती त्याला कुरूप दिसली होती. मात्र, रात्री ती अतिशय सुंदर दिसली. ही गोष्ट त्याने तन्नाकिनच्या कुटुंबियाच्या कानावर घातली. त्यांनी याबाबत भविष्यकाराचा सल्ला घेतला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

भविष्यकारानं तन्नाकिनच्या पतीसमोर दोन पर्याय ठेवले. एकतर ती फक्त त्याच्यासमोर सुंदर दिसू शकते किंवा समाजासमोर. तिचा पती हुशार होता. त्यानं हा निर्णय तन्नाकिनवर सोपवला. त्यानं कुठलाच पर्याय न निवडल्यानं आपोआप तिचा शाप नाहीसा झाला आणि ती कायमची सुंदर दिसू लागली, अशी ही कथा आहे.

१८१५च्या सुमारास फेअरबर्न मासिकानं फॅशनेबल मँचेस्टर स्क्वेअरमध्ये राहणाऱ्या एका आयरिश वंशाच्या श्रीमंत तरुणीबद्दल एक लेख प्रकाशित केला होता. लंडनच्या विविध भागात अनेकांनी तिची झलक पाहिल्याचं सांगितलं होतं. ती कायम बंदिस्त गाडीतून प्रवास करत असे कारण तिचा चेहरा डुकराचा होता, अशी अफवा होती. त्यानंतर अनेक वर्तमान पत्रांनी तिच्याविषयी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यामध्ये तिचं राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयी, तिचं बोलणं आणि दिसणं याबाबत अनेक अटकळी लावण्यात आल्या होत्या.

१८१५ मध्ये पॅरिसमधील एका व्यक्तीनं डुकराचा चेहरा असणाऱ्या स्त्रीचं नाव आणि पत्ता जाहीर केला होता. त्या स्त्रीची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. लोकांची गर्दी आणि गोंधळ पाहून त्या माणसाला कबूल करावं लागलं की, त्यानं सर्वांची फसवणूक केली. स्त्रीसोबत बदला घेण्याच्या उद्देशानं त्यानी ही गोष्ट तयार केल्याचं त्यानं सांगितलं.

१९२४ मध्ये अशा महिलांच्या अस्तित्वाबाबत अनैसर्गिक शक्तींचा अभ्यास करणाऱ्या इलियट ओ डोनेल यांनी एक साहित्य प्रकाशित केलं होतं. ओ डोनेल यांच्या मते, चेल्सामधील एका घराला डुकराचा चेहरा असलेल्या महिलेनं झपाटलं होतं. त्या घरात चर्चमधील रेव्हरन्ट मिस्टर एच आणि त्यांचं कुटुंब राहत होतं. महिलेच्या भूतानं घरातील सर्व सदस्यांना आपल्या नियंत्रणात घेतलं होतं आणि ते सर्व देखील डुकराप्रमाणं वर्तन करू लागले होते. ओ डोनेल यांची ही गोष्ट डुकराचा चेहरा असलेल्या महिलांबाबतची शेवटची गोष्ट होती.

जवळपास तीन शतके डुकराच्या चेहऱ्याच्या विविध महिलांच्या गोष्टी युरोपात चर्चिल्या गेल्या. मात्र, १९व्या शतकात या कथांची जादू ओसरली. कारण, अनेकांनी या गोष्टींच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित केले. आजच्या काळात देखील काही मागास भागांमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा गोष्टी पसरवल्या जातात. त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

‘झिमरमन टेलिग्राम’ लीक झाला आणि अमेरिका पहिल्या महायु*द्धात सहभागी झाला..!

Next Post

या महिलेला देव माशाने शार्कच्या तावडीतून वाचवलं होतं..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

या महिलेला देव माशाने शार्कच्या तावडीतून वाचवलं होतं..!

प्रेमासाठी सात खू*न करणारी शबनम स्वातंत्र्यानंतर फासावर जाणारी पहिली महिला ठरेल का?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.