The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तत्कालीन राजकाराभारावर प्रश्न उपस्थित केले म्हणून सॉक्रेटिसला विषप्राशन करावं लागलं होतं

by द पोस्टमन टीम
22 January 2026
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | युट्युब


सॉक्रेटिस हे नाव अपरिचित आहे, असे म्हणणारी व्यक्ती अपवादानेच आढळेल. अगदी लहानपणीपासूनच आपण कुठे ना कुठे हे नाव ऐकतच मोठे झालो आहोत. सॉक्रेटिस म्हणजे तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचा पाया रचणारा एक महान तत्त्वचिंतक. ज्याला ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ग्रीक-पाश्चात्य तात्विक परंपरेचा मुकुटमणी म्हटले जाते. असा हसत हसत विष पिणारा महान तत्त्ववेत्ता म्हणजे सॉक्रेटिस!

जगात असे काही लोक असतात ज्यांची दृष्टी सामान्य माणसाच्या दृष्टीपेक्षा अगदी निराळी असते, तसाच सॉक्रेटिस! अशा या महान तत्त्ववेत्त्याला मृत्युदंडाची शिक्षा का ठोठावण्यात आली हे माहित आहे का तुम्हाला?

जगाकडे आणि जगातील गोष्टींकडे पाहण्याचा सॉक्रेटिसचा दृष्टीकोन अगदीच वेगळा होता. इतरांनीही जर याच दृष्टीने जगाकडे पहिले तर अनेक गोष्टी सोप्या होतील अशी त्याची धारणा होती.

इसपूर्व ४७० मध्ये ग्रीसच्या अथेन्स शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात सॉक्रेटिसच्या जन्म झाला. त्याचे वडील सोफ्रोनीस्कस शिल्पकार होते. आई फेनारेती दाइचे काम करीत असे. सॉक्रेटिसला बालपणीच संगीत, काव्य आणि खेळ यांचे शिक्षण मिळाले होते. या तिन्ही क्षेत्रांत तो पारंगत झाला होता. तत्त्वज्ञानाकडे त्याचे लक्ष गेले नव्हते तोपर्यंत तो आपल्या वडिलांच्या कामात त्यांना मदत करत होता. घरची जबाबदारी पाहत होता.



येशू ख्रिस्ताच्या सुमारे ५०० वर्षे आधी जन्माला आलेला हा ग्रीक तत्त्वज्ञ. त्याने आपल्या कालखंडात स्वतःच्या स्वतंत्र विचारांची छाप उमटवली पण, नंतर मात्र त्याच्या विचारांचे आचरण अनेकांना अवघड वाटू लागल्याने ते अडगळीत पडून राहिले.

प्लेटो, झेनोफेन, एरिस्टॉटल या त्याच्या शिष्यांनी सॉक्रेटिसचे विचार लिहून काढले. प्लेटो तर सॉक्रेटिसचा पट्टशिष्य! त्याने सॉक्रेटिसच्या विचारांना मध्यवर्ती ठेवून तीन खंड लिहिले. सॉक्रेटिस दिसायला फारसा देखणा नसला तरी त्याच्या डोळ्यांत करुणा होती आणि चेहऱ्यावर अद्भुत तेज. म्हणूनच हा कोणी दैवी संकेत घेऊन जन्माला आलेला महापुरुष असावा अशी त्याच्या मित्रांना त्याच्याबद्दल खात्री होती.

सॉक्रेटिसच्या आधी अथेन्समध्ये सोफिस्ट तत्त्ववेत्त्यांचा प्रभाव होता. सोफिस्टांच्या मते केवळ इंद्रियाच्या सहाय्याने ज्या गोष्टींचे आकलन होते ते म्हणजे ज्ञान होय. इंद्रिये हीच केवळ ज्ञानाची साधने आहेत असे विचार त्यांनी मांडले होते. इंद्रियांमार्फत होणारे ज्ञान हे भौतिक जगाशीच संबधित असल्याने इंद्रियसुख हेच सत्य आहे, असे त्याचे तत्वज्ञान होते. बुद्धी आणि विवेकशक्तीने ज्ञान प्राप्त होत नाही, असा त्यांचा दावा होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

सॉक्रेटिसने मात्र नेमका याच्या विरुद्ध विचार मांडला. त्याच्या मते इंद्रियसुख क्षणभंगुर असते. शिवाय, माणसाच्या दु:खाचे, विषमता, अन्याय आणि शोषणाचे मूळ कारणही इंद्रियसुख हेच आहे. इंद्रियसुखाच्या मागे धावणाऱ्या समाजात नैतिक वर्तनाला तिलांजली दिली जाते. सामाजिक कल्याण आणि समाजहितासारख्या गोष्टी बाजूला फेकल्या जातात आणि आभासमय सुखाची निर्मिती केली जाते. असे सुख फार काळ टिकत नाही.

सोफिस्टांच्या तत्त्वज्ञानामुळे अथेन्समध्ये अनाचार बोकाळला होता. म्हणूनच लोकांनी सत्य जाणून घ्यावे अशी सॉक्रेटिसची तळमळ होती. म्हणूनच तो आपल्या खास शैलीने अथेन्समधील नागरिकांना विशेषत: तरुणांना विचार करण्यास प्रवृत्त करी.

सॉक्रेटिसने आपल्या खास शैलीतून लोकांना सतत याची जाणीव करून दिली की, त्यांच्या धारणा, समजुती, दृष्टीकोन तपासण्याची गरज आहे. यासाठी तो कुठेतरी चौकात उभे राहून लांबलचक भाषणे ठोकीत नसे. त्याची शैली एकदम वेगळी आणि तितकीच प्रभावी होती.

बाजाराच्या एखाद्या कोपऱ्यात, पारावर, कट्ट्यावर जिथे जिथे म्हणून लोक गप्पा मारण्यासाठी जमतात तिथे हा देखील जाऊन सामील होत असे आणि त्यांना छोटे छोटे प्रश्न विचारून लोकांच्या त्या-त्या संकल्पने विषयीची मते काय आहेत आणि त्यात बदल करण्यास किती वाव आहे याची जाणीव करून देत.

सॉक्रेटिसच्या या खास शैलीमुळे अथेन्सच्या तरुण मुलांवर नक्कीच त्याच्या विचारांचा आणि त्याच्या बोलण्याचा चिकित्सक वृत्तीचा प्रभाव पडत होता.

जिथे कुठे लोकांच्या गप्पाटप्पा चालत हा तिथे जात असे आणि त्यांना काही प्रश्न विचारत असे. असे प्रश्न विचारताना तो आपण सर्वज्ञ असल्याचा आव अजिबात आणित नसे. त्याच्या या प्रश्नोत्तरात त्याला कसलीही फुशारकी मारण्याची हौस नव्हती. तर लोकांच्या मेंदूला विचार करण्यासाठी प्रवृत्त करण्याची कला होती. आपल्याला कुठल्याही गोष्टीचे काहीही ज्ञान नाही आणि ज्यांना या गोष्टी कळतात त्याच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायचे आहे, असा आव आणून तो प्रश्न विचारी.

तो विचारी-धैर्य म्हणजे काय?, न्याय म्हणजे काय? वरकरणी पाहता तरी हे प्रश्न साधेसोपे वाटतात. पण, सॉक्रेटिसचे अशा प्रश्नांच्या ठोकळ उत्तरावर समाधान होत नसे. उत्तर देणाऱ्याच्या उत्तरात त्याला काही तरी खोच जाणवली की तो पुन्हा मग हे कसे? ते कसे? असे प्रश्न विचारीत त्या प्रश्नाच्या अगदी तळापर्यंत जाऊन विचार करण्यास भाग पाडत असे. उत्तर देणाऱ्यालाही मग आपल्या धारणा संकुचित आहेत याची जाणीव होती. कोणत्याही प्रश्नाला एकच चेहरा नसतो तर त्याला अनेक पैलू असतात आणि या प्रत्येक पैलूवर विचारमंथन करणे गरजेचे आहे, हे त्याला हळूहळू पटत असे.

सॉक्रेटिसच्या प्रश्नोत्तराच्या पद्धतीमुळे अथेन्सच्या तरुणांत चिकित्सक वृत्ती रुजत होती. जुन्या धारणा, जुने समज, प्रथा, परंपरा, नीती, न्याय, धर्म, देवता त्यांचे तत्त्वज्ञान याबद्दल तेही प्रश्न विचारू लागले. या सगळ्या गोष्टींची चिकित्सा करू लागले.

सॉक्रेटिसने या तरुणांना सत्य आणि असत्य यातील फरक ओळखण्याची अशी एक क्लुप्ती दिली होती. मात्र हीच गोष्ट नेमकी त्याकाळच्या सत्ताधाऱ्यांना अडचणीची वाटत होती. रूढ परंपरा, समज, नीती-अनीती याविषयी प्रश्न विचारणारे लोकं आणि जुन्या प्रथा-परंपरा यांच्याविरोधात बोलणारे लोकं हे कोणत्याही काळात सत्ताधाऱ्यांना अडचणीचेच वाटत असतात. अशा लोकांची संख्या वाढली तर त्यांना निर्धोकपणे सत्ता राबवणे कठीण जाईल अशी त्यांना सतत भीती वाटत असते. म्हणूनच अशा चिकित्सक लोकांना संपवण्याचे कट आखले जातात.

सॉक्रेटिसविरोधातही असाच कट आखला गेला. अथेन्सच्या संसदेत त्याच्यावर धर्ममार्तंड, देवांना न मानणारा नास्तिक आणि धर्मचिकित्सा करणारा पाखंडी असल्याचे आरोप ठेवण्यात आले. सॉक्रेटिस हा प्रचलित राज्यकारभाराविषयी शंका उपस्थित करणारा राजद्रोही असल्याचेही म्हटले गेले.

तत्कालीन न्यायव्यवस्थेनुसार या सगळ्या आरोपांना एकच शिक्षा होती, ती म्हणजे मृत्युदंड!

सॉक्रेटिसच्या मित्रांनी त्याला अथेन्समधून पळून जाण्याचे सल्ले दिले. त्यासाठी लागेल ती मदत करण्याचेही आश्वासन दिले. पण, ज्या राज्याचा मी नागरिक आहे, त्या राज्याचे कायदे आणि नीतीनियम मानणे माझे कर्तव्य असल्याचे सांगत सॉक्रेटिस न्यायप्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार झाला. त्याने आपली बाजू सत्याची असल्याचे वारंवार मांडले. पण, तरीही तो स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करू शकला नाही.

फक्त का?, कसे?, कशासाठी?, असे प्रश्न उपस्थित केले म्हणूनच सॉक्रेटिसला त्याची किंमत चुकवावी लागली.

समाजाच्या भल्यासाठीच सॉक्रेटिसने हसत हसत विषप्राशन केले. सॉक्रेटिस आज आपल्यात नसला तरी, त्याची विवेकज्योत मात्र नेहमीच आपल्याला सत्याच्या मार्गावरून मार्गक्रमण करण्याची प्रेरणा देत राहील.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

विन्सेट वॅन गॉग – कॅनव्हासवर वेदना जिवंत करणारा कलाकार

Next Post

अफगाणी सैनिकांसाठी यु*द्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह ‘नलवा’

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अफगाणी सैनिकांसाठी यु*द्धभूमीवर काळ बनलेले हरी सिंह 'नलवा'

लेडी डायनाच्या आयुष्यातील रहस्य अजूनही उलगडले नाहीत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.