The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लॉस एंजेलिसच्या डोंगरावर लावलेल्या HOLLYWOOD नावाच्या छेडखानीचे हे किस्से वाचाच

by द पोस्टमन टीम
12 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


लॉस एंजेलिसमधील माऊंट लीच्या डोंगरांवर उभ्या असलेल्या ४५ फुट उंचीच्या ‘HOLLYWOOD’ या शब्दाबाबत अनेकांच्या मनात कुतुहल आहे. हा शब्द जगभरात अमेरिकन चित्रपट सृष्टीची ओळख मानला जातो. मात्र, १ जानेवारी २०१७च्या सकाळी जेव्हा लॉस एंजेलिसचे नागरिक उठले तेव्हा अनेकांना ‘HOLLYWOOD’ हा शब्द ‘HOLLYWeeD’ असा वाचला! काहींना वाटलं, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या दारूचा ‘हँग ओव्हर’ उतरला नसल्यानं ‘वुड’चं ‘वीड’ दिसत असावं! मात्र, शहरभरातील प्रत्येक व्यक्तीला हॉलीवीडच दिसत असल्यानं कुणी तरी बोर्डसोबत छेडछाड केल्याचं उघड झालं.

१ जानेवारी २०१७ रोजी घडलेल्या प्रकाराबाबत जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा यामागे एका ३० वर्षीय कलाकाराचा हात होता. झॅक कोल फर्नांडिज असं नाव असलेल्या तरुणाला पोलिसांनी त्याला अटक केली होती. जवळपासच्या परिसरात असणाऱ्या सिक्युरिटी कॅमेऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ताब्यात घेतलं होतं. या जगप्रसिद्ध बोर्डमध्ये फेरबदल करण्याची ही काही पहिलीचं वेळ नव्हती. त्या अगोदर देखील अशा घटना घडलेल्या आहेत. याशिवाय या बोर्डबाबत अनेक रंजक गोष्टी देखील आहेत.

१ जानेवारी १९७६ रोजी देखील ‘हॉलीवुड’चा बोर्ड ‘हॉलीवीड’, असा झाला होता. कॅल स्टेट नॉर्थ्रिजचा विद्यार्थी डॅनी फाइनगुड यानं ही करामत केली होती. गांजाबाबतचे कायदे शिथिल केल्याच्या निमित्तानं त्यानं बोर्ड बदलला होता. डॅनी फाइनगूडनं १९८७ मध्ये देखील बोर्ड बदलून ‘ऑलिवूड’ असा केला होता. इराण-कॉन्ट्रा घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेला मरीन कर्नल ऑलिव्हर नॉर्थला सकारात्मक वागणूक दिल्याच्या निषेधार्थ त्यानं बोर्डमध्ये बदल केला होता. दोनदा बोर्ड बदलून त्याचं समाधान झालं नाही.

१९९०मध्ये सुद्धा त्यानं जगप्रसिद्ध बोर्डसोबत छेडछाड केली. पहिल्या गल्फ वॉरच्या निषेधार्थ त्यानं बोर्डवर चिकटपट्टी गुंडाळून ते ‘Oil war’ असा केला होता. २००७ मध्ये फाइनगुडचा मृत्यू झाला. अशा उपद्रवी लोकांच्या करामतींमुळं या साइटवर सार्वजनिक प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला. याशिवाय रेझर-वायर्सचं कुंपण, मोशन सेन्सर आणि मायक्रोफोनसह सुरक्षा कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.

प्रत्यक्षात घडलेल्या घटनांशिवाय अनेक चित्रपटांमध्ये देखील या बोर्डचा चेहरा-मोहरा बदलून दाखवण्यात आलेला आहे. गँगस्टर स्क्वॉड (२०१३), आर्गो (२०१२) आणि फ्रेंड्स विथ बेनिफिट्स (२०११) पासून तर बियॉन्ड द व्हॅली ऑफ द डॉल्स (१९७०) आणि डाउन थ्री डार्क स्ट्रीट्स (१९५४) पर्यंतच्या डझनभर चित्रपटांमध्ये हॉलीवूडचा हा बोर्ड दिसला आहे. अनेक दिग्दर्शकांनी तर बोर्डचा नाश करण्यातच आनंद मानला आहे. १९७४मध्ये आलेल्या ‘अर्थक्वेक’ चित्रपटामध्ये बोर्डची अक्षरे माउंट लीवरून एक एक करत खाली पडताना दाखवली आहेत. सुपरमॅन (१९७८) मध्ये भूकंपाच्या वेळी हा बोर्ड वाकताना दाखवला आहे. १९४१ या चित्रपटामध्ये वैमानिकांनी बोर्डवर गोळ्या चालवलेल्या आहेत. १९९८ मध्ये आलेल्या ‘मायटी जो यंग’ या चित्रपटात तर चक्क एक गोरिला बोर्डवरील ‘ओ’ खाताना दाखवला आहे.



या बोर्डच्या छत्रछायेखाली अमेरिकन चित्रपटसृष्टीची ओळख आहे. मात्र, या त्याच्या निर्मितीची गोष्ट मजेशीरच आहे. रिअल इस्टेटची जाहिरात म्हणून त्याची उभारणी करण्यात आली होती. १९२३ मध्ये लॉस एंजेलिस टाइम्सचा प्रकाशक हॅरी चँडलरनं ‘हॉलीवूडलँड’ नावाच्या उच्च दर्जाच्या रिअल-इस्टेट डेव्हलपमेंटमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला होता. प्रकल्पाला प्रसिद्धी देण्यासाठी, चँडलर आणि त्याच्या भागीदारांनी टेलिफोनच्या खांबावर ४५ फूट उंच पांढऱ्या पत्र्यापासून ‘हॉलीवूडलँड’ ही अक्षरं तयार करून घेतली. त्यावर ४ हजार बल्बदेखील लावले होते. यासाठी त्यांनी २१ हजार डॉलर्स खर्च केला होता. आता त्याचं मुल्य २ लाख ५० हजार डॉलर्स इतकं आहे. रात्रीच्या वेळी हा बिलबोर्ड चार टप्प्यात चमकत असे, अगोदर ‘हॉली’नंतर ‘वुड’ आणि ‘लँड’ व शेवटी ‘हॉलीवूडलँड’ हा संपूर्ण शब्द.

जेव्हा जगप्रसिद्ध ‘ग्रेट डिप्रेशन’मुळं हॉलिवूडलँडचा रिअल इस्टेट व्यवसाय तोट्यात गेला. त्यामुळं या बोर्डची नियमित देखभाल थांबली गेली. यातील ‘एच’ गळून खाली पडला आणि फक्त ‘ऑलिवूडलँड’ हा शब्द वरती राहिला. १९४०च्या दरम्यान या बोर्डची मालकी शहर प्रशासनाकडं गेल्यानंतर, लॉस एंजेलिस रिक्रिएशन अँड पार्क्स कमिशननं तो नष्ट करण्याची तयारी केली होती. मात्र, हॉलिवूड चेंबर ऑफ कॉमर्सनं मध्यस्थी करून बोर्ड वाचवला. पुढे १९४९ मध्ये त्यातील शेवटची ‘LAND’ ही चार अक्षरं काढून उर्वरित बोर्डचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धारानंतरही, हा बोर्ड पुन्हा एकदा खराब होऊ लागला. त्यातील तिसरा ‘ओ’ माउंट लीच्या बाजूनं खाली पडला. डोंगरांवर जाळपोळ करणाऱ्यांनी दुसऱ्या ‘एल’च्या तळाला आग लावल्यानं तो काळा पडला होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

१९७८ मध्ये, प्लेबॉय मासिकाचे संस्थापक ह्यू हेफनर यांनी स्वत:च्या घरी मैफिल आयोजित केली होती. जिथे त्याने आणि रॉक संगीतकार ऍलिस कूपरसह इतर आठ दात्यांनी नवीन बोर्ड बसवण्यासाठी प्रत्येकी २८ हजार डॉलर्स निधी देण्याची घोषणा केली. त्यानंतर तीन महिने माउंट ली ‘HOLLYWOOD’ शब्दाविना बोडका दिसत होता. वर्षाच्या अखेरीस बांधकाम पूर्ण करण्यात आलं. नवीन साइन बोर्ड जुन्या बोर्डच्या आकाराचाचं होता. त्यात टेलीफोनच्या खांबाऐवजी स्टीलच्या खांबांचा वापर करून इतर काही संरचनात्मक सुधारणा करण्यात आल्या. तेव्हापासून, बोर्डला वेळोवेळी पांढऱ्या रंगाचा एक नवीन थर दिला जातो. डिसेंबर २०१२ मध्ये त्याला शेवटचा रंग दिला गेला आहे.

हॉलीवूडचा हा बोर्ड ग्लॅमर आणि स्टारडमचे प्रतीक असला तरी एकेकाळी त्यानं तुटलेल्या स्वप्नांचं देखील प्रतिनिधित्व केलेलं आहे. असं म्हटलं जातं की, १९३२ च्या वसंत ऋतूमध्ये पेग एंटविस्टल नावाची एक नवोदित अभिनेत्री चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्यासाठी न्यूयॉर्क शहरातून लॉस एंजेलिसला आली होती.

तिला मर्डर मिस्ट्री चित्रपटात कामही मिळालं होतं मात्र, काही कारणास्तव स्टुडिओनं तिच्यासोबतचा करार मधेच तोडला. सप्टेंबर १९३२ मध्ये तिनं ‘हॉलिवूडलँड’ बोर्डमधील ‘एच’ अक्षरावर चढून खाली उडी मारत आत्महत्या केली. खालच्या दरीमध्ये मृतदेह सापडला होता.

वरकरणी साधा-सरळ दिसणाऱ्या या बोर्डमागे कितीतरी रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. त्या ऐकूण आपल्याकडे देखील ‘BOLLYWOOD’ असा बोर्ड उभारला पाहिजे, अशी इच्छा नक्कीच अनेकांच्या मनात निर्माण होईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

जगप्रसिद्ध ‘क्वॅकर’ने दिव्यांग मुलांना प्रयोग म्हणून रेडिओऍक्टिव ओटमिल खाऊ घातलं होतं

Next Post

आजही नॉन स्ट्रायकर एन्डच्या बॅट्समनला ‘मांकडिंग’ची भीती वाटत असते..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आजही नॉन स्ट्रायकर एन्डच्या बॅट्समनला 'मांकडिंग'ची भीती वाटत असते..!

एका श्रीलंकन सैनिकाने राजीव गांधींवर 'गार्ड ऑफ ऑनर' देतानाच ह*ल्ला केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.