The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिवंत गाडले जाऊनही हे लोक आपली स्टोरी सांगण्यासाठी पुन्हा परत आले होते..!

by द पोस्टमन टीम
8 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


अनारकली आणि सलीमची प्रेमकथा, आणि त्याचा करुण अंत आपण आतापर्यंत अनेक कथांमध्ये वाचला असेल. कित्येक कथाकारांनी लिहिलं आहे, की अनारकली अकबरापासून वाचून पळून गेली होती. मात्र, इतर काही कथाकारांच्या मते, अकबरानेच तिला जिवंतच भिंतीमध्ये गाडलं होतं. केवळ कथा म्हणूनही याकडे पाहिलं, तरी आपल्या अंगावर काटा येतो. अर्थातच जिवंत गाडलं जाणं हे नक्कीच भीतीदायक आहे. अनारकलीच्या बाबतीत हे खरं होतं की खोटं तिलाच माहीत. मात्र, जगातील कित्येक लोकांसोबत हा प्रकार खरोखरच घडला आहे. पाहूयात अशाच काही लोकांचे थरारक अनुभव..

एस्सी डनबर

पूर्वीच्या काळी विज्ञानाने विशेष अशी प्रगती केली नव्हती. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रही बऱ्याच प्रमाणात पिछाडीवर होतं. कित्येक आजार हे खुद्द डॉक्टरांनाही माहिती नव्हते. यांपैकीच एक होता इपिलेप्सी- म्हणजेच अपस्मार. १९१५ मध्ये एस्सी डनबर या ३० वर्षीय महिलेला एपिलप्सीचा झटका आला होता. त्यामुळे ती जागीच बेशुद्ध झाली. डॉक्टरांसाठी हा प्रकार नवीनच होता. शरीरावर कोणतीही जखम नसल्यामुळे डॉक्टरांना तिच्यावर नेमके काय उपचार करावे हे समजलं नाही. अखेर बराच वेळ तिने कसलीही प्रतिक्रिया दिली नाही, म्हणून डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.

एस्सीची बहीण ही शेजारच्या गावी राहत होती, तिलाही एस्सीच्या अंत्यविधीमध्ये सहभागी होता यावं म्हणून दुसऱ्या दिवशी अकरा वाजता दफनविधीची वेळ ठरविण्यात आली होती. तिच्या बहिणीला यायला उशीर झाला तेव्हा मात्र ३ प्रेषित धर्मगुरूंनी पुढाकार घेत दफनविधी केला.

मात्र थोड्याच वेळात एस्सीची बहीण तिथे आली आणि निदान एकदा तरी एस्सीचं शेवटचं दर्शन मला घेऊ द्या म्हणून धर्मगुरूंना विनवू लागली.



तिच्या भावनांना विचारात घेत पुन्हा एकदा शवपेटी उघडण्यात आली. पण जसं शवपेटीचं झाकण उघडण्यात आलं तशी एस्सी उठून बसली. तिच्यासोबत काय झालं होतं याची जराही कल्पना नसलेली एस्सी आपल्या बहीणकडे मात्र हसून बघत होती.

हा सर्व प्रकार पाहून मात्र बाकीच्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. ते इतके घाबरले होते की विधी करायला आलेल्या सगळ्यात छोट्या धर्मगुरुच्या तीन बरगड्या तुटल्या. कारण बाकीचे दोघेजण जीव वाचवण्याच्या नादात चक्क त्याला तुडवून पळाले होते. अगदी तिच्या बहिणीलासुद्धा एस्सी भूत आहे असं वाटलेलं. अगदी घरी येऊन अनेक वर्षं उलटून गेली तरी तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं जायचं. एस्सीबद्दल एक अफवा अशीही पसरली होती की ती मेल्यानंतर झॉम्बी बनून परत आली आहे.

अँजेलो हेस

मृत्यूच्या दारातून तुम्हाला कधी कोण बाहेर काढेल सांगता येत नाही. अँजेलो हेस या व्यक्तीला चक्क इन्शुरन्सवाल्या कंपनीने शवपेटीतून बाहेर काढलं होतं. झालं असं की, १९३७ मध्ये १९ वर्षीय अँजेलो हेस फ्रान्समध्ये राहत होता. एक दिवस मोटरसायकल चालवताना त्याचा ताबा सुटला, आणि तो भिंतीवर जाऊन आदळला. हा अपघात इतका भयानक होता की त्याच्या मदतीसाठी आलेल्या लोकांनी पाहिलं, की त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, शुद्ध हरपली होती आणि नाडीचे ठोकेही जाणवत नव्हते. त्यामुळे त्याला मृत घोषित केलं गेलं. पुढे ३ दिवसांनी त्याचा दफनविधी करण्यात आला.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

परंतु अपघाताच्या काही दिवस आधीच अँजेलोच्या वडिलांनी त्याच्या नावावर जास्त रकमेचा विमा उतरवला होता. त्यामुळे विमा कंपनीने शंका काढत अँजेलोच्या मृत्यू पश्चात त्याच्या शवविच्छेदनाची मागणी केली. त्यासाठी जेव्हा दफनपेटी पुन्हा उकरून काढण्यात आली तेव्हा अँजेलोचं शरीर गरम असल्याचं दिसून आलं. खरंतर, जेव्हा अपघात झाला तेव्हाच अँजेलो कोमामध्ये गेला होता आणि त्यामुळे त्याच्या शरीराला अगदी कमी प्रमाणात ऑक्सिजनची गरज पडत होती. त्यानंतर त्याला व्यवस्थित उपचार देण्यात आले. एखादा चमत्कार व्हावा इतक्या झपाट्याने तो पूर्ण बरा झाला.

जिवंतपणीच पुन्हा गाडले जाऊ या भीतीने की काय, पण त्यानंतर त्याने एक सुरक्षित शवपेटी बनवली आणि ती शवपेटी घेऊनच तो सगळीकडे फिरत राहिला. त्या शवपेटीमध्ये ओव्हन, एक छोटा फ्रिज आणि आधुनिक कॅसेट प्लेयर या सगळ्यांची सोय करून ठेवण्यात आली होती.

मार्गोरी मॅकोल

जर तुम्हालाही आता जिवंत गाडले जाऊ याची भीती वाटत असेल, तर मौल्यवान दागदागिने घालणं चालू करा. होय, कारण मार्गोरी मॅकोल नावाची एक महिला यामुळेच वाचली होती. आजच्या काळासारखं १७व्या शतकात जर तुम्हाला ताप आला तर साधी गोष्ट नव्हती. ती एक धोकादायक वाईट गोष्ट असे. मार्गोरीलाही ताप आला होता. त्यातच तिची तब्येत आणखी खराब झाल्यामुळे तिची शुद्धही हरपली होती. त्यामुळे लोकांनी सरळ तिला मृत म्हणून गृहीत धरलं.

लागोलाग तिचा दफनविधी पार पडला. ज्यामध्ये तिच्या मौल्यवान अंगठीसोबत पुरण्यात आलं होत. ही गोष्ट गप्पांमधून सगळीकडे पसरली, आणि ती पोहोचली काही चोरांपर्यंत. ही चांगली संधी चालून आली असं म्हणत थोड्याच वेळात चोरांनी मार्गोरीची शवपेटी उकरली, आणि तिच्या बोटातून अंगठी काढण्याचा प्रयत्न ते करू लागले. कितीही प्रयत्न केला, तरी अंगठी काही निघेना. त्यामुळे हे चोर तिचं बोट कापण्याच्या तयारीत असतानाच मार्गोरी जागी झाली, आणि जोरजोरात ओरडायला लागली. हे बघून चोर तिथून घाबरुन पळून गेले.

मग स्वतःच्याच थडग्यातून बाहेर पडून जेव्हा मार्गोरी घरी गेली, तेव्हा तिला पाहून तिचा पतीच जास्त घाबरला. पुढे ती आणखी दहा वर्षे जगली. तिच्या थडग्यावर लिहि गेलं आहे – ‘एकदा जगले मात्र दोन वेळा दफन केले.’

अँटोनी ब्रिटन

जादुगार स्वतःला बंद पेटीत कोंडून घेतो, आणि नंतर बराच वेळ झालं तरी तो बाहेर येत नाही म्हणून शोध घेतल्यावर मेलेल्या अवस्थेत सापडतो, ही गोष्ट आपण कितीतरी वेळा वेगवेगळ्या क्राईम मालिकांमध्ये पाहिली आहे. मात्र, असं खरोखरच झालं होतं. अँटोनी ब्रिटन नावाच्या एका जादुगाराने अशाच जादूच्या प्रयोगासाठी स्वतःचे हात बांधून स्वतःला एका शवपेटीमध्ये बंद करत, जमिनीखाली पुरून घेतलं होतं. त्याच्या योजनेप्रमाणे वेळेतच त्याने त्याचे हात सोडवले आणि स्वतःला बाहेर काढायला सुरुवात केली. परंतु मातीच्या वजनाने लवकरच त्याला कळून चुकलं की तो आता चांगलाच संकटात सापडला आहे. लवकरच तो बेशुद्ध झाला. केवळ त्याच्या टीममधल्या लोकांच्या सावधानतेमुळे त्याला वेळेतच वर काढण्यात आलं. त्याच्या या फसलेल्या प्रयोगामुळे त्याची बरीच खिल्ली उडवण्यात आली. मात्र मृत्यूच्या जवळ गेल्यावर काय अनुभव येतो हेही त्याला कळून चुकलं.

माईक मिने

जेव्हा एखादी व्यक्ती जिवंतपणे पुरली जाते तेव्हा एकतर खूप मोठी शोकांतिका झालेली असते, किंवा त्या व्यक्तीसोबत अत्यंत वाईट प्रकारचा गुन्हा झालेला असतो. मात्र, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी माईक मिने या व्यक्तीने असं केलं होतं हे तुम्हाला सांगितलं तर? स्वतःची मानसिक आणि शारीरिक तयारी करुन, स्वतःला एका खास बनवून घेतलेल्या शवपेटीमध्ये बंद करून जमिनीखाली पुरुन घेतलं. त्याकाळी असं करण्याचं फॅड आलं होत आणि जास्तीत जास्त ४५ दिवस जमिनीखाली राहण्याचा रेकॉर्ड झाला होता.

हाच रेकॉर्ड माईक याने ६१ दिवस जिवंत राहत मोडून काढला. स्थानिक पातळीवर याची बरीच दखल घेतली गेली. माईकच्या अपेक्षेप्रमाणे तो मोठा सेलेब्रिटी झाला. परंतु गिनीज बुकमध्ये याची नोंद झाली नाही, कारण त्यावेळेपासूनच गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी अशा जीवघेण्या प्रकारांची नोंद घेणं बंद केलं होतं.

या घटनांव्यतिरिक्त अजूनही अशा घटना आहेतच. ब्राझीलमधील एका सरकारी कर्मचाऱ्याला मारुन स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी जिवंतपणीच गाडण्यात आलं होतं. तर चीनमध्ये एका अकाली जन्माला आलेल्या मुलीला मृत समजून पुरण्यात आलं होत. निकोलस टेलर या माणसाने तर स्वतःच्या मानसिक खच्चीकरणातून वाचण्यासाठी स्वतःला पुरुन घेतलं होतं.

कधी स्वतःच्या आईनेच मुलाला पुरलं होतं, तर कधी अस्वलाने स्वतःच भक्ष्य समजून एका मुलीलाच पळवून नेवून जमिनीखाली ठेवलं होतं. तरीही हे सर्व लोक मृत्यूला हुलकावणी देऊन परत आले होते. अर्थात, या व्यक्तींच्या कथा रंजक असल्या, तरीही जिवंतपणी गाडलं जाणं हा विचारच भयानक आहे. जिवंतपणीच आपण गाडले जाऊ या भीतीला टेफेफोबिया म्हणतात. तुम्हालाही आहे का हा ‘टेफेफोबिया’?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

याला मोसादच्या इतिहासातला आजवरचा सर्वात खतरनाक हेर म्हणून ओळखलं जातं

Next Post

एवढ्या प्रसिद्ध पत्रकाराला सौदीने असं काही गायब केलं की त्याचं नखसुद्धा सापडलं नाही

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

एवढ्या प्रसिद्ध पत्रकाराला सौदीने असं काही गायब केलं की त्याचं नखसुद्धा सापडलं नाही

गावातील रस्ता दुरुस्त करायला लव्हलीनाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवावं लागलं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.