The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पे पालच्या माजी कर्मचाऱ्यांनी उभारलेल्या कंपन्या आज कोट्यवधींची उलाढाल करताहेत..!

by द पोस्टमन टीम
24 September 2024
in विश्लेषण
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


माफ़िया म्हटलं की, आपल्या डोळ्यापुढे काळ्या सूटाबुटातील, कोर्‍या क्रू*र चेहर्‍याने पिस्तुलाच्या जिवावर काळेधंदे करणारी टोळी उभी राहते. चित्रपटांनी माफ़ियांचं हे रूप आपल्या मनावर बिंबवलं आहे आणि काही प्रमाणात यात तथ्यही आहेच. सुरवातीला इटालियन माफ़ियांच्या रूपानं या जगताशी आणि संकल्पनेशी सामान्यांची ओळख झाली. कालांतरानं जपानी, रशियन माफ़ियांची भर पडत जगभरात हे माफ़ियाराज पसरलं.

मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. अमेरिकेतील उद्योगपतींच्या एका गटालाच माफ़िया म्हणून ओळखलं जातं. पे पाल माफ़िया म्हणून परिचित असणार्‍या या उद्योगपतींच्या गटाचा प्रवास थक्क करणारा आहे. आज जगावर राज्य करणार्‍या कंपन्यांत या सर्वांचा समावेश आहे.

हेच नाव का? तर हे सर्वच्या सर्व उद्योगपती कोणे एकेकाळी अमेरिकन मल्टिनॅशनल कंपनी, पे पालचे कर्मचारी होते. या कर्मचार्‍यांची नावं ऐकाल तर आश्चर्यानं थक्क व्हाल. हे प्रत्येक नाव म्हणजे एक आश्चर्यकारक यशोगाथा आहे.

पे पालनं ऑनलाईन आर्थिक व्यवहारात एक प्रकारची क्रांतीच घडवली. सारं जग ‘आर्थिक व्यवहार ऑनलाईन करावेत किंवा नाही, करावेत तर कसे करावेत?’ या संभ्रमात असताना, ऑनलाईन आर्थिक व्यवहार बाळपावलांत असताना पे पालचा उदय झाला होता. Online money transfer क्षेत्रात पेपालची ओळख एखाद्या बिनीच्या खेळाडूची आहे.



याशिवाय ही कंपनी एका विचित्रच कारणासाठी मध्यंतरी चर्चेत आली आणि एका गटाची ओळख बनली. या कंपनीतील माजी कर्मचार्‍यांनी एकाहून एक यशस्वी उद्योग उभे करत करोडो, अब्जो डॉलर्स कमावले. एका अर्थाने अर्थकारणावर राज्य गाजवायला सुरवात केली. युट्यूब, लिंक्ड-इन, ट्विटर, टेस्ला, कीवा, यैमर, पैलेंतिर टेक्नोलॉजीज़ अशा कंपन्यांचा यात समावेश आहे. आज सामान्यांच्या जगण्याचा अविभाज्य घटक असणार्‍या या कंपन्या आहेत.

यांना मुळात पे पाल माफ़िया हे नाव का पडलं असावं. काही काळापूर्वी ‘टाईम’ मासिकानं या सर्वांचं एक फ़ोटोशूट केलं होतं आणि त्यांची माफ़ियासारखी पोझ देऊन छायाचित्र घेतलं गेलं. या छायाचित्राला शिर्षकही ‘पे पाल माफ़िया’ असं दिलं होतं, वाचकांना हे शीर्षक आणि छायाचित्र इतकं भावलं की ते प्रचंड लोकप्रियही झालं आणि त्यानंतर या गटाला अधिकृतरित्या पे पाल माफ़िया असंच संबोधलं जाऊ लागलं आहे.

काही काळापूर्वी ट्विटर हे सोशल मिडिया विकत घेऊन ज्याने खळबळ उडविली तो एलन मस्क आपल्याला परिचित आहेच. याशिवाय, जावेद करीम, जेरेमी स्टॉपलमॅन, एंड्रू मॅक्कॉरमॅक, भारतीय वंशाचे प्रेमल शाह, ल्यूक नोजेक. कॅन हॉर्वी, डेव्हिड ओ सॅक्स, पीटर थाईल, कीथ रेबौस, मॅक्स लेवचिन, रूलोफ़, बोथा, रसेल सिमन्स अशा उद्योगपतींचा या माफ़िया गॅन्गन्मधे समावेश आहे. या सगळ्यांच्यात पे पालचे माजी कर्मचारी याव्यतिरिक्त आणखी एक समान धागा आहे. हे सर्वच्या सर्वजण स्टॅनफ़ोर्ड किंवा इलियॉनियस विद्यापीठातून शिकून बाहेर पडले आहेत.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

या गॅंगमधील प्रत्येक मेम्बरविषयी थोडक्यात माहिती घेऊया:

१. जावेद करीम: पे पालमधील भूमिका: व्यवसायातील इतर मुख्य घटकांसोबत पे पालच्या ‘रिअल टाईम ॲण्टी फ़्रॉड सिस्टीमचे’ डिझाईन अंमलात आणले.

पे पालनंतर : करीम चाड हर्ली (पे पालच्या पहिल्या लोगोचा डिझाईनर) आणि स्टिव्ह चेन (पे पालमधील सहकारी आणि फ़ेसबुकच्या प्रारंभीच्या काळातील कर्मचारी) यांनी २००५ साली व्हिडिओ शेअरींग संकेतस्थळाची स्थापना केली. आज युट्यूब या नावाने जगभर धुमाकूळ घालणारा हाच तो स्टार्ट अप. ही नवीन साईट विकसीत केल्यानंतर अल्पावधीतच करीमनं स्टॅनफ़ोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला.

युट्यूबच्या माध्यमातून या क्षेत्रातली चुणूक दाखविलेली असूनही त्यानं संगणकशास्त्र अभ्यासक्रमासाठीच प्रवेश घेतला. नोव्हेंबर २००६ साली गुगलने १.६५ अब्ज डॉलर्सला युट्यूब विकत घेतले. ६ कोटी ४० लाख डॉलर्स इतक्या किमतीचे शेअर्स रोख रूपांतर करण्याआधी त्यांनी युट्यूबचे सल्लागार म्हणून काम चालू ठेवले होते. त्यावेळेस वयाच्या पस्तीशीत असणार्‍या करीमनं २००८ साली युनिव्हर्सिटी व्हेंचर्स नावाचा व्यवसाय चालू केला.

२. जेरेमी स्तॉपलमन: पे पालमधील भूमिका: तंत्रज्ञान विभागाचे उपाध्यक्ष.

पे पालनंतर: २००३ साली eBay नं पे पालला खरेदी केल्यानंतर त्यांनी लगेचच राजीनामा दिला. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधे जाण्यासाठी मात्र वर्षभराचा कालावधी जावा लागला. yelp या कंपनीचे सह संस्थापक.

३ ॲण्ड्रू मॅककॉर्मिक: पे पालमधील  भूमिका: २००१ साली कंपनीत रुजू झाल्यानंतर पीटर थिएलचे सहय्यक म्हणून काम पाहिले.

पे पालनंतर: सॅन फ़्रॅन्सिस्कोमधे एका रेस्टॉरंट ग्रुपची स्थापना करण्यापूर्वी ‘हेज फ़ंड कंपनी क्लॅरियम कॅपिटल’ आणि Thiel उपक्रमाच्या उभारणीत मदत केली. सध्याच्या अमेरिकन बॅंकिंग समूह, सिटी ग्रुपचा एक भाग असणार्‍या व्हेंचर कॅपिटल फ़र्म वालार व्हेंचर्समध्ये भागीदार म्हणून कार्यरत.

४: प्रेमल शहा: पे पालमधील भूमिका: उत्पादन व्यवस्थापक म्हणून सहा वर्षे कार्यरत.

पे पालनंतर: Kiva या कंपनीचे अध्यक्ष बनले. ही कंपनी ऑनलाईन पद्धतीने सत्तरहून अधिक देशातील गरजू उद्योजकांना आणि विद्यार्थ्यांना लोन उपलब्ध करून देण्याची सुविधा देते. यावर तुम्ही लोन देऊही शकता आणि लोन घेऊही शकता.

५. ल्यूक नोसेक: पे पालमधील भूमिका: सहसंस्थापकांपैकी एक. (थिएल, एलोन मस्क, केन हॉवेरी आणि इलियॉन विद्यापीठातील मित्र, मॅक्स लेव्हचिन हे इतर) मार्केटिंग आणि स्ट्रॅटेजीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

पे पालनंतर: eBayने कंपनी अधिग्रहण केल्यानंतर ते सरळ जगप्रवासाला निघून गेले. त्यानंतर त्यांनी ‘थिएल आणि हॉवेरी’ यांच्यासह ‘सॅन फ़्रॅन्सिस्को व्हेंचर कॅपिटल फ़र्म’ची स्थापना केली.

६. केन हॉवेरी: १९९८-२००२ दरम्यान सहसंस्थापक आणि मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून पे पालमध्ये काम पाहिले.

पे पालनंतर: सॅन फ्रॅन्सिस्को येथील फाउंडर्स फंडमध्ये पार्टनर म्हणून काम पहिले.

७. एलोन मस्क: पे पालमधील भूमिका: १९९९ साली PayPal मस्कच्या वित्तीय सेवा आणि ईमेल पेमेंट फर्म X.com मध्ये विलीन झाले होते आणि eBay ला विक्री होईपर्यंत मस्क नवीन कंपनीचा सर्वात मोठा भागधारक बनला होता. या करारातून त्याने १६ कोटी ५० लाख डॉलर्स कमावले.

पे पालनंतर : जून २००२ साली मस्कने ‘स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज (स्पेसएक्स)’ या कंपनीची स्थापना केली. यात तो सीईओ आणि सीटीओ म्हणून कार्यरत आहे. त्यांचे ड्रॅगन-१ हे अंतराळयान मे २०१२ मध्ये, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर मालाची ने-आण करणारे पहिले व्यावसायिक वाहन बनले. २००८ साली टेस्लाचे (इलेक्ट्रिक कार फर्म टेस्ला मोटर्सचे) नेतृत्व त्यांनी स्विकारले.

८. रसेल सिमन्स: पे पालमधील भूमिका: फर्मचे लीड सॉफ्टवेअर आर्किटेक्ट.

पे पालनंतर: जेरेमी स्टॉपलमन सोबत Yelp ची सह-स्थापना केली आणि जून २०१० मध्ये सल्लागाराच्या भूमिकेत जाईपर्यंत मधल्या काळात CTO म्हणून काम केले. २०१२ साली Learnirvana लाँच केले, हा एक वेब ट्यूटर प्रोग्राम असून तो वापरकर्त्यांना भाषा शिकण्यास मदत करतो.

९. रोएलॉफ बोथा: पे पालमधील भूमिका: दक्षिण आफ्रिकेतील बोथा यांनी अभियंता, मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून PayPal च्या विक्रीसाठी अत्यंत कुशलतापूर्वक वाटाघाटी केल्या. स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवी मिळवण्यापूर्वी ते कंपनीत सहभागी झाले होते आणि कॉर्पोरेट विकासाचे संचालक बनले होते.

पे पालनंतर: टॉप टेक गुंतवणूकदारांच्या फोर्ब्स मिडास यादीत स्थान. जानेवारी २००३ मध्ये व्हेंचर कॅपिटल कंपनी सेक्वोया कॅपिटलमध्ये भागीदार म्हणून सहभागी झाले. जॉबोन, एव्हरनोट, टंबलर आणि झूमसह तेरा कंपन्यांच्या संचालक मंडळात असण्याचा एकप्रकारचा विक्रम आहे. गुगलने विकत घेण्यापूर्वी ते YouTube च्या संचालकपदावर देखील होते.

१०. मॅक्स लेव्हचिन: पे पालमधील भूमिका: सह-संस्थापक आणि फर्मचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी.

पे पालनंतर: PayPal विक्रीतून ३ कोटी ४० लाख डॉलर्स कमावले आणि Slide ची स्थापना केली. ऑगस्ट २०१० साली Google ला १८२०० कोटी डॉलर्सला विकले. २५ ऑगस्ट रोजी लेव्हचिन Google चे अभियांत्रिकीचे उपाध्यक्ष बनले. कंपनीला बरोबर एक वर्ष आणि एक महिना झाल्यानंतर लेव्हचिनने कंपनी सोडल्याने Google ने स्लाइड बंद केली.

स्लाईडच्या उदय आणि पतनादरम्यान, त्याने २००४ साली Yelp सुरू करण्यास मदत केली (तो कंपनीचा सर्वात मोठा भागधारक आहे), Evernote च्या संचालक मंडळावर नियुक्त होऊन वित्तीय सेवा कंपनी Affirm ची सह-स्थापना केली. अलिकडच्या वर्षांत, त्याने HVF नावाची कंपनी सुरू केली आहे. (HVF म्हणजे, ‘हार्ड, व्हॅल्युएबल आणि फन’)

११. रीड हॉफमन: पे पालमधील भूमिका: संचालक मंडळाचे सदस्य होण्यासाठी जगातील पहिल्या पण अयशस्वी ठरलेल्या सोशल नेटवर्क ‘सोशलनेट’मधून सामील झाले, नंतर PayPal चे COO बनले. २००२ साली eBay अधिग्रहणाच्यावेळी, ते कार्यकारी उपाध्यक्ष होते.

पे पालनंतर: ‘द मोस्ट कनेक्टेड मॅन इन सिलिकॉन व्हॅली’ अशी ओळख असणारा रीड डिसेंबर २००२ साली इनबॉक्स बोअरिंग बिझनेस सोशल नेटवर्क लिंक्ड-इनचा सहसंस्थापक बनला. आजवर त्याने ८० कंपन्यांत गुंतवणुका केल्या आहेत यात फेसबुक, झिंगा, फ्लिकर, डिग आणि Last.fm यांच्यासह अनेक कंपन्यांचा समावेश आहे.

१२. किथ राबोइस: पे पालमधील भूमिका: नोव्हेंबर २००० ते नोव्हेंबर २००२ दरम्यान कार्यकारी उपाध्यक्ष. बिजनेस डेव्हलपमेंट, सार्वजनिक व्यवहार आणि धोरण अशा दोन उत्कृष्ट पदव्या त्यांच्या गाठीशी होत्या.

पे पालनंतर: स्टार्ट-अप क्षेत्रातील अत्यंत उपयुक्त व्यक्ती म्हणून परिचय. Rabois LinkedIn , Max Levchin’s Slide (सोशल नेटवर्क्समधील स्लाइडशो आणि ॲनिमेशन कंपनी) कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत. इलेक्ट्रॉनिक पेमेंट फर्म स्क्वेअर, खोसला व्हेंचर्स या उपक्रम भांडवल संस्थेत भागीदार. Yelp आणि Xoom च्या संचालक मंडळात कार्यरत.

कष्ट, बुद्धीचातुर्य आणि ज्ञानाच्या बळावर या पे पाल माफियांनी उभ्या केलेल्या या कंपन्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, हे निश्चित!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

सात दशके पोलिओशी लढा देत, कोणतीही हालचाल न करता तो आज वकील झाला आहे..!

Next Post

एटीएमच्या चुकीनं अब्जाधिश बनलेला बारटेण्डर

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

एटीएमच्या चुकीनं अब्जाधिश बनलेला बारटेण्डर

धूम्र*पान विरोधी चळवळ राबवणारा हिट*लर कोणे एकेकाळी चेन स्मो*कर होता!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.