The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वतःला पुन्हा चालता यावं म्हणून पैसे जमवले, परंतु एका लहानग्याच्या उपचारासाठी दान केले

by द पोस्टमन टीम
11 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


देणाऱ्याची दानत पहावी, हे वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकलं वा वाचलं असेल. हे वाक्य सार्थ ठरवणारे मात्र अगदी थोडे लोक आपल्या आसपास असतात. असाच एक अवलिया आहे, डॅन ब्लॅक. आजकाल जिथे कोणी एक रुपयाही कोणाला फुकट देत नाही; तिथे या पठ्ठ्याने स्वतःच्या उपचारासाठी जमा केलेले तब्बल २० लाख रुपये एका पाच वर्षाच्या मुलाच्या उपचारासाठी देऊन टाकले होते. तुमचा विश्वास बसला नसला, तरी ही घटना पूर्णपणे खरी आहे.

२००९ साली डॅन ब्लॅक याचा कामावर जाताना अपघात झाला होता. या अपघातामुळे त्याला पॅरालिसिस म्हणजेच अर्धांगवायूचा झटका बसला आणि छातीपासून खाली त्याचं शरीर अधू झालं. या अपघातामुळे ऐन पंचविशीत त्याला पूर्णपणे व्हीलचेयरवर अवलंबून रहावं लागत होत. मात्र हा शेवट नव्हता. स्टेम सेल्सच्या उपचारानंतर कदाचित त्याचं आयुष्य पूर्ववत होऊ शकत होतं. याचा खर्च अगदीच आवाक्याबाहेरचा असला, तरी तेवढे पैसे गोळा करणे अशक्यही नव्हते. पण हाच एक आशेचा किरण दिसल्यामुळे, पुढील चार वर्षं डॅन आणि त्याचे कुटुंबीय या उपचारासाठी लागणारा निधी गोळा करत होते.

अशातच एक दिवस डॅनच्या आईने त्याला एक बातमी दाखवली. त्यांच्या घरापासून जवळच राहणाऱ्या एका पाच वर्षाच्या मुलाबद्दल ती बातमी होती. ब्रेकॉन वॉन या चिमुरड्याला जन्मतःच ‘स्पास्टिक डिप्लेजिया सेरेब्रल पाल्सी’ नावाचा आजार झाला होता. या आजारामध्ये पेशंटला स्नायू नियंत्रण आणि समन्वय साधताना त्रास होतो. ब्रेकॉन वॉन याच्या पायामध्ये ताठरपणा आल्यामुळे त्यालाही चालता येत नव्हतं. 

त्यामुळे त्याच्याही उपचारासाठी त्याचे कुटुंबीय निधी गोळा करत होते. ही बातमी वाचून डॅनने आपल्या निधीनमधून १००० पाउंड्सची मदत ब्रेकॉनला पाठवली. मात्र, यानंतरही त्याचं समाधान झालं नाही. त्याने ब्रेकॉन वॉनबद्दल आणखी विचार केला, तसं त्याला वाटलं की अजूनही आपल्याला त्या लहान मुलासाठी खूप काही करता येईल.

एक दिवस आपण नक्कीच पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहू, असा विचार डॅन रोज झोपताना करायचा. मात्र, ब्रेकॉन तर याआधी कधीच चालला नाहीये. म्हणजेच त्याच्या सर्जरीनंतर तो मुलगा त्याचं पाहिलं पाऊल टाकेल. ही गोष्टच डॅनला खूप जास्त महत्वाची वाटली. इतकी, की स्वतःच्या उपचारांसाठी उभा केलेला सर्वच्या सर्व निधी – म्हणजे तब्बल वीस हजार पौंड्स त्याने ब्रेकॉन वॉनला देऊन टाकले. वीस हजार पौंड्स म्हणजे जवळपास वीस लाख साठ हजार रुपये!



त्यांच्या या मदतीबद्दल सांगताना डॅन म्हणतो, ‘अपघातापूर्वी २२ वर्षांपर्यंत मी माझ्या पायावर उभा होतो, चालत होतो. परंतु ब्रेकॉन तर २२ सेकंदही आपल्या पायांवर उभारला नाहीये. त्याला पैसे देणं ही माझ्यासाठी खरंतर फार मोठी गोष्ट नाहीये. अशाच प्रकारे आणखी काही लोकांनी पुढे येत मदत केली तर हे जग आणखी सुंदर बनेल.’ दरम्यान, माझ्यासाठी परिस्थिती अजूनही बदलली नाही. मला पहिल्यापासून निधी गोळा करावा लागणार आहे, आणि त्यासाठी वेळ लागेल. परंतु मला अशा व्यक्तीला मदत करायची इच्छा होती ज्यामुळे त्या व्यक्तीचे आयुष्य अधिक चांगले होऊ शकते. जर मी एखाद्याला चालण्यास मदत करू शकलो, तर मी पुढेही तशी मदत करणारच’.

एकीकडे ब्रेकॉनच्या घरचे त्याच्या अमेरिकेला जाण्यासाठी पैसे गोळा करतच होते. अमेरिकेमध्ये त्याच्यावर ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती ज्यामुळे त्याच्या पायातील ताठरपणाचा उपचार होणार होता. शिवाय तिथे गेल्यावर राहण्यासाठी, बाकीचा गोळ्या औषधांचा खर्च आणि पुनर्वसन उपचारासाठीसुद्धा निधी गोळा केला जात होता. इतके प्रयत्न करूनही फक्त ११,००० पौंड्स जमा झाले होते. परंतु डॅनच्या मदतीमुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. पुढे अवघ्या तीन आठवड्यांमध्ये ब्रेकॉनला जगभरातून मदत पोहोचली. महिनाभरातच एकूण ६०,००० पौंड्स म्हणजे पूर्ण निधी गोळा झाला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

डॅनच्या या निर्णयावर त्याच्या आई मिशेल म्हणाल्या, की डॅनला फक्त एकच मित्र होता. डॅन व्हीलचेअरवर असताना केवळ तोच त्याला भेटायला येत होता. हे सगळं ब्रेकॉन वॉन सोबत होऊ नये इतकंच डॅनला वाटलं. मला ते कारण पुरेसं आणि योग्य वाटलं. २०१३ साली डॅन ब्लॅक यांना त्यांच्या या कामासाठी ‘प्राईड ऑफ ब्रिटन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तेव्हा तिथे प्रेक्षकांच्या रांगेतून ब्रॅकोन उस्फूर्तपणे टाळ्या वाजवत होता. त्या कार्यक्रमाच्या चार दिवसांनंतरच ब्रेकॉन वॉनच्या विमानाने अमेरिकेसाठी उड्डाण केले. ठरल्याप्रमाणे त्याच्यावर दोन यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

दोन वर्षानंतर आता ब्रेकॉन व्यवस्थित चालू शकतो. तो स्वतःच चालत शाळेतसुद्धा जातो. पूर्वी त्याला चालण्यासाठी मदत व्हावी म्हणून तो वॉकर घेऊन चालत असे. 

परंतु एक दिवस त्याने वॉकरच सोबत घेतला नाही. त्याला विचारलं असता तो म्हणाला की सगळे त्याला त्यामुळे विचित्र नजरेने पाहत असत. तेव्हापासून त्याने वॉकर शिवाय चालायला सुरुवात केली, आणि मग मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. यावर त्याची आई सांगते कि सुरुवातीला तो अडखळला, पण तरीही तो हिंमत हरला नाही, धडपडत चालायला शिकला. भलेही त्याची पाऊलं वाकडी पडत असली, तरी त्याला आधाराशिवाय चालता येतंय ते पाहणं त्याच्या आई-वडीलांसाठी किती आनंददायी आहे, हे शब्दांमध्ये नाही सांगू शकत.

दुसरीकडे डॅनने पुन्हा स्वतःसाठी फंड गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ब्लॅकच्या घरच्यांना आशा आहे, की भविष्यात स्टेम सेल्सच्या उपचारांनंतर डॅनला स्वतःच्या पायावर उभ राहता येईल, आणि पुन्हा आधीसारखं चालता येईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अरबस्तानातील टोळ्यांना एकत्र करणारा ब्रिटिश ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’

Next Post

इंटरनेट सेन्सेशन बनलेली ग्रम्पी कॅट करोडो डॉलर्सची मालकीण बनली होती

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

इंटरनेट सेन्सेशन बनलेली ग्रम्पी कॅट करोडो डॉलर्सची मालकीण बनली होती

१९७३ सालापासून म्हणजे तब्बल ५१ वर्षे साधू अमर भारती यांनी एक हात वर केला आहे

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.