The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अवघ्या 9व्या वर्षी मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड प्रोफेशनल बनून हिने बिल गेट्सचं लक्ष वेधून घेतलं होतं, पण..

by Heramb
26 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आज आयटी (माहिती तंत्रज्ञानाच्या) क्षेत्रात मोठी चढाओढ आहे. प्रत्येकालाच आयटीमध्ये ‘ऐटीत जॉब’ करायचा आहे. अगदी अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या शाखांमधील तसेच विज्ञानेतर शाखांमधील विद्यार्थीसुद्धा ‘आयटी’कडे आकर्षित होऊ लागले आहेत. कोविड-१९ जागतिक महामारी आणि सर्वत्र लागू झालेला लॉकडाऊन यांच्यामुळे आयटी क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

क्षेत्र कोणतेही असो, त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावण्याचे काम करतो. काम कोणतेही असो, त्यामध्ये इंटरनेट आणि फायलिंगची सिस्टीम आवश्यक असतेच. कोणत्याही उद्योगाला अँड्रॉइड ॲप्लिकेशन, वेबसाईट आणि सॉफ्टवेअर यांची गरज नाही लागली तर तो उद्योग तोट्यात जाण्याची शक्यता कित्येक पटीने वाढली आहे. म्हणूनच हे युग माहिती तंत्रज्ञानाचं असल्याने प्रत्येकालाच या क्षेत्रात प्रवेश करायचा आहे.

पण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही उच्चशिक्षणाप्रमाणेच संबंधित विषयाचं कौशल्य असणं नितांत गरजेचं आहे, याचबरोबर उत्तम संभाषण कौशल्य असण्यानेही आयटी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मान मिळू शकेल. याव्यतिरिक्त भर म्हणून तुमच्याकडे एखादे प्रमाणपत्र असल्यास तुम्हाला प्राधान्य देण्यात येते.

फक्त अशी प्रमाणपत्रे सर्वोत्तम कंपन्यांद्वारे मिळालेली असायला हवी. उदाहरणार्थ, मायक्रोसॉफ्ट, गुगल, इत्यादी. इंटरनेटवर ट्रेनिंग आणि प्रमाणपत्रे आपल्याला आरामात मिळू शकतात. काही वेळा अशी प्रमाणपत्रे पैसे घेऊन दिली जातात तर काही वेळा विनामूल्यही दिली जातात. फक्त त्यांची सत्यासत्यता पडताळण्याचं काम आपलं आहे.

काही लोक अगदी लहान वयातच प्रतिभाशाली असतात. अगदी लहान वयातच त्यांना जगातील अनेक गोष्टी समजायला सुरुवात झालेली असते. पाकिस्तान तसा सर्वच क्षेत्रात पिछाडीवर असलेला आणि मागासलेला देश. पण या मागासलेल्या आणि पिछाडलेल्या देशातही अनेक प्रतिभावान व्यक्तिमत्वं होती हे अमान्य करता येणार नाही.



असंच एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व म्हणजे अर्फ़ा अब्दुल करीम रंधवा. वर सांगितलेली प्रमाणपत्र मिळवायला जगभरातील इंजिनिअर्स अनेक वर्ष मेहनत करतात, अभ्यास करतात, रोज लागणाऱ्या शोधांचा अभ्यास आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन करतात. पण हे सगळं करून अर्फा नावाची अवघी नऊ वर्षांची मुलगी ‘मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड प्रोफेशनल’ बनली होती.

आयटी क्षेत्रातील तिच्या या कामगिरीने खुद्द बिल गेट्सचे लक्ष वेधून घेतले होते. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. २०१२ साली, हृदयविकाराच्या झटक्याने अरफाला हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. ती एक महिन्याहून अधिक काळ रुग्णालयात दाखल होती. पण अखेरीस तिचे निधन झाले.

अरफा करीमचा जन्म १९९५ साली पाकिस्तानच्या फैसलाबाद येथे झाला होता आणि तिचे कुटुंब पंजाबी जाटांचे होते. तिच्या जन्मानंतर तिचे कुटुंब बहावलपूरला स्थलांतरित झाले होते. तिचे वडील पाकिस्तानी सैन्यात होते, तर आई गृहिणी होती. अगदी लहानपणापासूनच ती एक जिज्ञासू, उत्साही आणि शिस्तबद्ध होती. ती तिसऱ्या इयत्तेत असताना, तिने आयटी क्षेत्रात काम करण्यास रस दाखवला. पाकिस्तानी शाळेच्या विचित्र धोरणांनुसार, तिला संगणक प्रयोगशाळेत प्रवेशच दिला जात नव्हता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

पण तिचे पालक आणि कुटुंब मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. तिचा पहिला डेस्कटॉप संगणक विकत घेऊन आणि तिला जवळच्या आयटी तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. तिला आयटी क्षेत्रात आणखी प्रोत्साहित करण्यात तिच्या वडिलांनी मोठी भूमिका बजावली. या प्रशिक्षण केंद्रात तिने अत्यंत भरीव कामगिरी केली. अरफा वेगाने शिकणारी आणि संस्थेत उत्कृष्ट कामगिरी करणारी विद्यार्थिनी असल्याचे सिद्ध झाले. 

तिच्या शिक्षकांनी ती मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तयार असल्याचा निष्कर्ष काढला. आणि यासाठी तिच्या वडिलांना तिने मायक्रोसॉफ्टच्या सर्टिफिकेशनसाठी तयारी सुरू करावी शिफारस केली. २००४ साली अरफाने यशस्वीरित्या मायक्रोसॉफ्टची परीक्षा उत्तीर्ण केली आणि वयाच्या नवव्या वर्षी इतिहासातील सर्वांत तरुण मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड प्रोफेशनल बनली. ही बातमी लवकरच पाकिस्तानच्या बाहेरही पसरली. आपसूकच बिल गेट्सच्या कानावर पडली. गेट्स यांनी अरफा आणि तिच्या कुटुंबाला वॉशिंग्टनच्या रेडमंड येथील मायक्रोसॉफ्ट मुख्यालयाला भेट देण्याचे निमंत्रण दिले, याठिकाणी ते स्वतः भेटणार असल्याचे वचनही त्यांनी दिले.

तिने गेट्स यांना तिच्यासारख्या तरुण आणि कमी वयाच्या व्यक्ती त्याच्या कंपनीसाठी काम का करू शकत नाहीत?, मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची कमतरता का असते? आणि या क्षेत्रातील स्त्री-पुरुष असमानता आणि असेच अनेक प्रश्न विचारले. तिची बुद्धी, ज्ञान, अतूट आत्मविश्वास आणि जिज्ञासा पाहून गेट्स खूप प्रभावित झाले होते.

पाकिस्तानात परतल्यावर, आरफा आयकॉन बनली होती आणि दूरदर्शन तसेच वृत्तपत्रांच्या मुलाखतींसाठी तिच्यासोबत अनेक माध्यमांनी संपर्क साधला. मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विभागाचे उपाध्यक्ष शिवरामकृष्णन सोमसेगर यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये तिच्याबद्दल लिहिले. त्यानंतर २००५ साली पाकिस्तानच्या तत्कालीन प्रधानमंत्री शौकत अझीझने अरफाला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ‘फातिमा जिन्हा’ सुवर्ण पदक देऊन सन्मानित केले.

त्याच वर्षी तिला ‘सलाम पाकिस्तान युथ अवॉर्ड’ आणि ‘प्रेसिडन्ट्स अवॉर्ड फॉर प्राईड अँड परफॉर्मन्स’ प्रदान करण्यात आला. दोन्ही पुरस्कार प्राप्त करणारी पाकिस्तानच्या इतिहासातील ती सर्वात तरुण व्यक्ती होती. २००६ साली, तिला तिच्या कामगिरीबद्दल बोलण्यासाठी बार्सिलोना येथे ‘टेक-एड डेव्हलपर्स कॉन्फरन्स’मध्ये बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेत, जगभरातील ५००० डेव्हलपर्सपैकी ती एकमेव पाकिस्तानी नागरिक होती. २०१० साली ती पीटीसीएलच्या  (पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन कंपनी लिमिटेड) ३-जी वायरलेस ब्रॉडबँड सर्व्हिसची ब्रँड ॲम्बेसेडर बनली.

तिला वेगवान आणि अभूतपूर्व प्रसिद्धी मिळाली असूनही, तिचे प्राथमिक काम तिच्या ज्ञान आणि तज्ञतेचा वापर ग्रामीण पाकिस्तानातील आयटी क्षेत्रामध्ये ऍक्सेस नसलेल्या तरुणांना मदत करण्यासाठी आहे असे अरफाच्या वडिलांनी सांगितले. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत अरफाचे वडील अमजद करीम म्हणाले, “संगणक अत्यंत हायफाय लोकांसाठी किंवा श्रीमंत शाळांसाठी आहेत असे सामान्यत: पाकिस्तानात समजले जाते, परंतु आजच्या काळात सर्वात गरीब व्यक्तीलासुद्धा काही हजार रुपयांना संगणक खरेदी करता येतो. अरफाचा मुख्य उद्देश शिक्षणावर लक्ष केंद्रित करून मानव संसाधन विकासात सुधारणा करणे हा होता.”

२२ डिसेंबर २०११ रोजी अरफाला गंभीर अपस्माराच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला. तिला लाहोर येथील कम्बाइन्ड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अरफाच्या खालावत चाललेल्या आरोग्याची माहिती मिळताच बिल गेट्सने अरफाच्या पालकांशी संपर्क साधला आणि तिच्या उपचार आणि आरोग्यसेवेच्या खर्चाची जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिले.

बिल गेट्स इतकेच करून थांबले नाहीत तर त्यांनी प्रख्यात आंतरराष्ट्रीय डॉक्टरांच्या गटाला तिच्या उपचाराची जबाबदारी असलेल्या स्थानिक डॉक्टरांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी दिली. अरफाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली, पण थोड्याच वेळात ती कोमात गेली. अखेरीस १४ जानेवारी २०१२ रोजी वयाच्या सोळाव्या वर्षी तिचे निधन झाले.

तिचा मृतदेह फैसलाबादला आणण्यात आला. त्याठिकाणी तिच्या वडिलोपार्जित रामदेवळी गावात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अंत्यविधीला लोकांचा एक मोठा गट उपस्थित होता. हे लोक तिला वैयक्तिकरित्या ओळखत नसले तरी तिच्या कथेने आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणांतील संघर्षाने ते प्रेरित झाले होते.

तिच्या मृत्यूनंतर, कराचीमधील आयटी मीडिया सिटीचे नाव बदलून अरफाच्या सन्मानार्थ त्याचे नामांतर करण्यात आले. याव्यतिरिक्त, पाकिस्तानचे लाहोरमधील सर्वात मोठे आयटी पार्क (लाहोर टेक्नॉलॉजी पार्क), तिच्या जीवन आणि कामगिरीच्या स्मरणार्थ “अरफा सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क” असे नाव देण्यात आले.

तिने तिच्या लहान आयुष्यात दिलेल्या अनेक मुलाखतींपैकी एकामध्ये तिने सांगितले, “..मी माझ्या देशासाठी गौरव मिळवावा ही तेव्हापासून माझी इच्छा होती. लोक माझ्या कृतीचे अनुसरण करत आहेत आणि मला मागे टाकण्यातही  यशस्वी झाले आहेत हे पाहून मला खूप आनंद झाला. इतर तरुणांनी त्याचे अनुसरण केले पाहिजे असे मी म्हणेन. आमची पिढी खूप प्रतिभावान आहे आणि म्हणून आजच्या तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे.”

अरफा आणि तिच्या कर्तृत्वामुळे निश्चितच आयटी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुण पाकिस्तानींसाठी मार्ग मोकळा झाला आहे, परंतु तिचा प्रभाव त्यापेक्षा कित्येक पटीने मोठा आहे. ती शेकडो तरुण मुलींसाठी आदर्श बनली. पाकिस्तानातील तरुण मुलींनी तिला “अरफा आप” (बहीण) म्हणून संबोधण्यास सुरुवात केली होती.

पाकिस्तानमध्ये भयानक आर्थिक परिस्थिती आहे. तिथल्या सरकार, गुप्तहेर संस्था आणि सैन्याच्या आंतरराष्ट्रीय हट्टांपायी पाकिस्तानी सामान्य नागरिकांना दारिद्र्यासह अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, तसेच अनियंत्रित धर्मांधतेमुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणही नीट मिळत नाही, तेव्हा अशा अनेक प्रतिभा व्यर्थ जात असतील हे निश्चित!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सोन्यावर आधारित अर्थव्यवस्था संपुष्टात आली असली तरीही सोन्याची झळाळी कायमच आहे

Next Post

स्पॉट फिक्सिंग – मोहम्मद आमिरचा तो नो बॉल आजही पाकिस्तान क्रिकेटवरचा कलंक आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

स्पॉट फिक्सिंग - मोहम्मद आमिरचा तो नो बॉल आजही पाकिस्तान क्रिकेटवरचा कलंक आहे

तब्बल साठ वर्षे रस्त्यांवर राज्य करणारी फोक्सवॅगनची बीटल खऱ्या अर्थाने पीपल्स कार होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.