The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा पाकिस्तानी क्रिकेटर भारतात दीड वर्षे यु*द्धकैदी होता..!

by द पोस्टमन टीम
18 August 2025
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


‘जीत निश्चित हो तो कायर भी लड़ सकते हैं, बहादुर वे कहलाते हैं, जो हार निश्चित हो, फिर भी मैदान नहीं छोड़ते…’या ओळींतील ‘बहादुरी’ आणि ‘मैदान’ हे दोन शब्द पाहिले की, एकतर सैन्यातील जवान आठवतात किंवा मैदानातील खेळाडू. मात्र, एक अशीही व्यक्ती होती, जी या दोन्ही आघाड्यांवरती आपल्या देशासाठी लढली आहे! खेळाचं मैदान आणि सीमावाद या दोन्ही ठिकाणी आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानमध्ये ही व्यक्ती हयात होती.

असं म्हणतात, प्रतिस्पर्धी खेळाडू असो किंवा सैनिक त्यांची कामगिरी जर उल्लेखनीय असेल तर त्याचं मोठ्या मनानं कौतुक करावं! ‘शुजाउद्दीन बट’ असं नाव असलेल्या या व्यक्तीनं क्रिकेटचं मैदान आणि यु*द्धभूमी या दोन्ही आघाड्यांवरती आपल्या देशासाठी सेवा दिली. इतकचं नाही तर शुजाउद्दीन काही दिवस यु*द्धकैदी म्हणून भारताच्या ताब्यात होते!

पाकिस्तानच्या अग्रगण्य कसोटीपटूंमध्ये शुजाउद्दीन यांचा समावेश होतो. त्यांनी इतरांच्या तुलनेत कमी सामने खेळले असले तरी आजही अतिशय आदरानं त्यांचं नाव घेतलं जातं. उजव्या हातानं फलंदाजी करणारे शुजा कधी मिडल ऑर्डर, कधी लोअर ऑर्डर किंवा कधी सलामीला देखील खेळण्यासाठी येत. याशिवाय ते डाव्या हातानं ऑर्थोडॉक्स गोलंदाजी देखील करत. एकूणच एक अष्टपैलू खेळाडू असलेल्या शुजाउद्दीन यांचा जन्म ब्रिटिशकालीन भारतात १९ एप्रिल १९३० रोजी झाला होता. १९४६-४७ मध्ये त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. गंमत म्हणजे फाळणीपूर्वी ते उत्तर भारतासाठी रणजी ट्रॉफी खेळले होते.

आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीमध्ये ते पंजाब विद्यापीठ, बहावलपूर, रावळपिंडीच्या स्थानिक संघासाठी देखील खेळले. शुजाउद्दीन यांनी १०१ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. त्यात त्यांनी २५.२८ च्या सरासरीनं ३ हजार ४९० धावा केल्या. यामध्ये ६ शतकांचा समावेश होता. १४७ ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. ५३ धावा देऊन ८ विकेट्स या सर्वोत्तम आकडेवारीसह त्यांनी ३१९ विकेट्स देखील मिळवलेल्या आहेत. याशिवाय शुजाउद्दीन चपळ क्षेत्ररक्षक होते त्यांनी ६९ झेल देखील पकडलेले आहेत.



भारत-पाक फाळणीनंतर पाकिस्तानचा जो संघ तयार झाला त्याला जागतिक क्रिकेटच्या नकाशावर ओळख मिळवून देण्यात शुजाउद्दीन यांचा मोलाचा वाटा आहे. १९४८ मध्ये लाहोर येथे वेस्ट इंडीजविरुद्ध खेळलेल्या पाकिस्तानच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ते पाकिस्तानी संघाचा भाग होते.

डावखुरी ऑर्थोडॉक्स फिरकी आणि चायनामनचा अनोखा मेळ त्यांच्या गोलंदाजीमधून दिसला होता. नंतर त्यांनी १९५४ मध्ये ‘ओव्हल’ येथे इंग्लंडविरुद्ध पाकिस्ताननं मिळवलेल्या प्रसिद्ध विजयांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली होती. १९५५-५६ मध्ये कराची येथे न्यूझीलंडविरुद्ध आणि वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती.

लाहोर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी तब्बल ३१८ मैदानावर काढली होती. ४५ धावांची ती एक वैशिष्ट्यपूर्ण इनिंग होती. पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळला होता. कर्णधार इम्तियाज अहमदनं मोठ्या विश्वासानं शुजाला बॅटिंगसाठी पाठवलं. जास्तीत जास्त वेळ विकेटवर थांबण्याचं आव्हान त्यांच्या समोर होतं. ऑस्ट्रेलियन गोलंदांजांचा सामना करत अतिशय जिद्दीनं ते पाच तास क्रीजवर उभे होते.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

सईद अहमदसह त्यांनी १६९ धावांची भागीदारी केली होती. शुजाचा संयम इतका उच्च पातळीचा होता की, पहिली धाव घेण्यासाठी त्यांनी तब्बल ६५ मिनिट घेतली होती! कसोटी क्रिकेटमधील ही सर्वात संथ खेळी ठरली. एक अष्टपैलू म्हणून शुजाउद्दीननं १९५४ ते ६२च्या दरम्यान १९ कसोटी सामने खेळले. त्यात ४७ च्या सर्वोच्च धावसंख्येसह १५.१९च्या सरासरीनं ३९५ धावा केल्या. याशिवाय त्यांनी २० विकेट्स घेतल्या असून आठ झेल देखील पकडले. राष्ट्रीय संघासाठी साधारण कामगिरी करूनही शुजा पाकिस्तानच्या लोकप्रिय कसोटी क्रिकेटपटूंपैकी एक होते.

क्रिकेटच्या मैदानाव्यतिरिक्त शुजा पाकिस्तानी सैन्यासाठी देखील महत्त्वाची ‘इनिंग’ खेळले. १९५० च्या सुरुवातीलाच ते पाकिस्तानी सैन्याच्या जनसंपर्क विभागात रुजू झाले होते. त्याचवेळी ते क्रिकेटसुद्धा खेळत होते.

१९६९-७० मध्ये जेव्हा त्यांची क्रिकेट कारकीर्द संपली तेव्हा त्यांनी सैन्यात पूर्ण वेळ सेवा देण्यास सुरुवात केली. सैन्यात त्यांनी लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत बढती मिळवली होती. १९७१ च्या भारत-पाकिस्तान यु*द्धाचा शुजा भाग होते. या दरम्यान भारतीय लष्करानं त्यांना युद्धकैदी बनवलं. सुमारे १८ महिने त्यांना भारतीय तुरुंगात रहाव लागलं होतं. नंतर त्यांची भारतानं सुटका केली.

१९७८ मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले. देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणारा आणि युद्धकैदी म्हणून राहणारा कदाजित शुजा एकमेव खेळाडू असतील.

१९७८ मध्ये ते सैन्यातून निवृत्त झाले. त्यापूर्वी १९७६-७७ च्या हंगामात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. त्यानंतर ते लंडनमध्ये स्थायीक झाले. शुजाउद्दीननं निवृत्तीनंतर बऱ्याच दिवसांनी १९९४ मध्ये ‘बेब्स टू वर्ल्ड चॅम्पियन्स’ आणि २००३ मध्ये ‘चेकर्ड हिस्ट्री ऑफ पाकिस्तान क्रिकेट’ अशा दोन पुस्तकांचं लिखाणही केलेलं आहे. २०००-२००१ मध्ये, पीसीबीनं(पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) त्यांना थोड्या काळासाठी क्रिकेट विश्लेषक म्हणून नियुक्त केलं होतं. त्याच काळात ते पीसीबीच्या लायब्ररी आणि संग्रहालयाचे प्रभारी देखील होते. ७ फेब्रुवारी २००६ रोजी वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला.

एक खेळाडू आणि एक सैनिक म्हणून शुजाउद्दीन बट यांची कारकिर्द अनेक चढ-उतारांनी भरलेली होती. मात्र, त्यांनी दोन्ही पातळ्यांवर शक्य तितक्या चांगल्या प्रकारे आपल्या देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या गुणवैशिष्ट्यांमुळं जागतिक क्रिकेटमध्ये त्यांना आजही आदराचं स्थान आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अमेरिकेच्या दीड कोटी नागरिकांना बेरोजगार आणि ८ हजार बँकांना टाळं लावणारं ग्रेट डिप्रेशन काय होतं?

Next Post

तुर्की लोकांच्या आहारातील कबाब भारतात आले कसे?

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

तुर्की लोकांच्या आहारातील कबाब भारतात आले कसे?

हा माणूस अशक्य वाटणाऱ्या पद्धतीने दगडांना बॅलन्स करून कलाकृती बनवतो..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.