The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसाने हि*टल*रच्या तावडीतून ११०० ज्यू लोकांची सुटका केली होती

by द पोस्टमन टीम
30 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इतिहासात तुम्ही हि*टल*रच्या क्रू*रतेचे किस्से वाचले असतील. त्याने आपल्या शासनकाळात साठ लाखांपेक्षा जास्त ज्यू लोकांची क*त्तल केली होती. त्याने प्रत्येक ज्यू व्यक्तीच्या ह*त्येचे आदेश दिले होते. त्याच्या या आदेशाचे पालन करण्यासाठी त्याचे सैनिक ज्यू लोकांच्या अख्ख्या वस्तीला जाळून टाकायचे अथवा त्यांना विषारी क्लोरीन गॅसच्या चेंबरमध्ये कोंबून अत्यंत अमानुषपणे मारून टाकायचे.

त्याकाळी ज्यू लोकांवर भयाचे सावट पसरले होते, हि*टल*रचे नाव जरी ऐकले तरी त्यांच्या अंगावर काटा यायचा. त्यांना मदत करायला कोणी उरले नव्हते.

पण एक माणूस होता, जो स्वतः ना*झी पार्टीचा सदस्य होता असूनही त्याने ११००पेक्षा जास्त ज्यू लोकांचा जीव वाचवला होता. त्या माणसाचे नाव होते ऑस्कर शिंडलर.

हा ऑस्कर शिंडलर हा कोण होता आणि त्याने हि*टल*रच्या नाकाखाली सामान्य ज्यू लोकांचे रक्षण कसे केले ? हे जाणून घेऊ…

ऑस्कर शिंडलर हा एक ना*झी सैनिक होता, ज्याचा जन्म ८ एप्रिल १९०८ रोजी झाला. बालपणापासून त्याच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या होत्या, यामुळे त्याने हि*टल*रशी चांगले संबंध प्रस्थापित केले. १९३० साली जेव्हा हि*टल*र सत्तेत आला, त्यावेळी जर्मनीची सर्वच आर्थिक व राजकीय गणिते बदलली, ज्याचा शिंडलरने फायदा उचलला. त्याने ना*झी पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. त्याला राजकारणात पुढे जायचे असल्यामुळे त्याने मोठमोठ्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली.



सप्टेंबर १९३९ मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्र*मण केले आणि दुसऱ्या महायु*द्धाला सुरुवात झाली. यानंतर ऑस्करचे आयुष्य बदलले. तो पैसे कमावण्यासाठी आपल्या पत्नीला घेऊन क्रॅकोव्ह शहरात वास्तव्यास आला. जर्मन सैन्यासाठी भांडे तयार करण्याच्या उद्देशाने त्याने एका ज्यू व्यक्तीच्या उद्योगावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे काम करायला मजुरांची कमतरता होती, त्याला अधिक मजुरांची आवश्यकता होती. याच दरम्यान त्याला आयझॅक स्टर्न नावाचा ज्यू अकाउंटंट भेटला. स्टर्नने शिंडलरला स्थानिक ज्यू लोकांच्या वस्तीची कल्पना दिली आणि त्याठिकाणी स्वस्त मजूर उपलब्ध होईल, असे सुचवले. शिंडलरला हे ऐकून आनंद झाला आणि त्याने ज्यू मजूर कामावर ठेवले. या मजुरांसोबत रोज काम करतांना शिंडलरच्या मनातील ज्यू लोकांचा द्वेष संपुष्टात आला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

पण हि*टल*र या काळात अधिकच उग्र बनला होता, त्याने व जर्मन ना*झींनी ज्यू लोकांचे नृशंस ह*त्याकांड करण्यास सुरवात केली होती. ज्यू महिला व मुलींवर बला*त्कार करण्यात येत होते. हे सर्व बघून शिंडलरच्या मनात ज्यू लोकांबाबत सहानुभूती निर्माण झाली आणि त्याचा हि*टल*रवरून विश्वास उडाला. असं असलं तरी शिंडलरमध्ये हि*टल*रच्या विरोधात जाण्याची ताकद नव्हती, त्यामुळे त्याने आपल्या फॅक्टरीमध्ये अधिकाधिक संख्येने ज्यू लोकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.

त्याने हि*टल*रपासून ज्यू लोकांचे रक्षण करण्यासाठी त्यांची पात्रता न तपासता त्यांना आपल्या कारखान्यात नोकरी बहाल केली. त्याचा फक्त एकच उद्देश होता, जास्तीत जास्त मजुरांचा जीव वाचवणे.

दरम्यान हि*टल*रने क्रॅकोव्ह शहरातील ज्यू लोकांना यातनागृहात रवाना करण्याचे आदेश दिले, मग शिंडलरच्या कारखान्यातील सर्व मजुरांना रेल्वे स्टेशनवर एका ट्रेनमध्ये कोंबून तिकडे रवाना करण्याची तयारी करण्यात आली, पण जेव्हा शिंडलरला याची माहिती मिळाली, तो पळत स्टेशनवर गेला आणि त्याने उपस्थित जर्मन अधिकाऱ्याला लाच खाऊ घातली आणि त्या मजुरांना सोडण्याची विनंती केली. हे मजूर जर्मन सैन्याचा उपयोगाचे सामान बनवत असल्याची बतावणी करून त्याने त्या मजुरांची सुटका केली.

१९४३ साली ना*झींची क्रू*रता अजूनच वाढली, हि*टल*रने ज्यू लोकांना प्लासजोव्ह लेबर कॅम्पमध्ये रवाना करण्याची तयारी सुरु केली. त्याने एमन गोथ नावाच्या ना*झी अधिकाऱ्याची यासाठी नेमणूक केली. पण शिंडलरने यावेळी देखील वेळ मारून नेली व गोथला लाच दिली. पण काही दिवसात हि*टल*रने लेबर कॅम्पचे मृत्यूगृहात रूपांतर करण्याचे आदेश दिले.

ऑस्करच्या कारखान्यात काम करणाऱ्या ज्यू मजुरांची अवस्था अधिकच बिकट झाली. पण ऑस्करने गोथला आपल्या जर्मन सैन्यासाठी ह*त्यारे बनवण्याच्या योजनेची माहिती दिली. त्याने गोथला ज्यु मजुर या कामासाठी किती महत्त्वाचे आहेत ते समजावून सांगितले. अखेरीस त्याला मजूर ठेवण्याची परवानगी मिळाली.

यानंतर त्याने आपल्या कारखान्यातील ११०० ज्यू मजुरांची यादी तयार केली आणि त्या मजुरांना घेऊन तो ब्रेनेक शहरातील आपल्या कारखान्यात गेला. या ११०० मजुरांच्या यादीला शिंडलर्स लिस्ट म्हणून ओळखले जाते. 

शिंडलरने कारखान्यातील ज्यू मजुरांना जर्मन सैन्यासाठी निकृष्ट दर्जाचे ह*त्यार बनवण्याची सूचना केली, यामागे यु*द्धात जर्मन सैन्याचा पराभव व्हावा असा त्याचा उद्देश होता. १९४४ सालापर्यंत दुसऱ्या महायु*द्धाचा शेवट दृष्टीपथात आला होता. हि*टल*रने आत्मह*त्या केली होती आणि जर्मनीचा पूर्व भागाला रशियन फौजांनी हि*टल*रच्या जाचातून मुक्त केलं होतं.

शिंडलरने हि*टल*रच्या क्रू*रतेपासून तब्बल ११०० ज्यू लोकांचे प्राण वाचवले होते. ऑस्कर शिंडलरच्या या कामगिरीसाठी त्याला ज्यू लोकांनी डोक्यावर घेतले आणि त्याला आपला रक्षक मानले. शिंडलरने तब्बल ११०० माणसांचा जीव वाचवून मानवजातीवर मोठे उपकार केले होते. एक नफेखोर व्यापारी म्हणून शिंडलरचा सुरु झालेला प्रवास एक संवेदनशील मानवतावादी गृहस्थाच्या रूपात संपुष्टात आला.

आजच्या इस्त्राईलमध्ये देखील ऑस्कर शिंडलरचे स्मारक असून त्या ११०० ज्यू लोकांचे वंशज आजदेखील आपल्या रक्षकाला मानवंदना देण्यासाठी तिथे एकत्र येत असतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

त्या दिवशी हि*टल*रच्या हवाई दलाने ब्रिटनच्या आकाशात अक्षरशः तांडव केलं होतं

Next Post

आई-वडिलांनी पाकिस्तान निवडला पण निदा फाजली शेवटपर्यंत भारतातच राहिले !

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आई-वडिलांनी पाकिस्तान निवडला पण निदा फाजली शेवटपर्यंत भारतातच राहिले !

सालाझार - गोव्यावर राज्य करणारा विस्मृतीत गेलेला हुकूमशहा

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.