The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शीतयु*द्धात अमेरिकेने रशियाला मात दिली त्याचं बरंच श्रेय ना*झी शास्त्रज्ञांना जातं

by द पोस्टमन टीम
31 January 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अ*णुबॉ*म्बमुळे दुसरे महायु*द्ध संपुष्टात आले खरे, परंतु यु*द्धादरम्यान विकसित केली गेलेली ती काही एकमेव विनाशकारी शस्त्रे नव्हती. यापेक्षा अनेक महाभयानक, संहारक शस्त्रास्त्रे आणि रॉकेट्स विकसित करण्यात जर्मन ना*झी शास्त्रज्ञांनी प्रभावी कामगिरी बजावली होती.

१९४५ साली यु*द्ध समाप्त झाल्यावर अमेरिका आणि रशिया अशा दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी ते तंत्रज्ञान स्वतःसाठी मिळवण्याचा डाव आखला. पण त्यात बाजी मारली ती अमेरिकेने. त्यासाठी अमेरिकेने १६ नोव्हेंबर १९४५ रोजी ८८ ना*झी शास्त्रज्ञ या कामगिरीवर युनायटेड स्टेट्समध्ये आणले आणि त्यांना लगोलग कामालाही लावले.

दुसऱ्या महायु*द्धाच्या दरम्यान जर्मनीने शरणागती पत्करली, त्यानंतरच्या काही दिवसांत आणि आठवड्यांत अमेरिकन सैन्याने शस्त्रास्त्रांचे छुपे साठे शोधण्यासाठी आणि शस्त्रे गोळा करण्यासाठी युरोपाचा ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढला. त्यादरम्यान त्यांना ना*झी यु*द्धतंत्राचे असे काही पैलू आढळून आले, की त्यामुळे त्यांचे डोळे पांढरे व्हायची पाळी आली.

त्याआधी खरे म्हणजे त्यांना हि*टल*रच्या पोतडीत एवढी भयानक अस्त्रे असतील याची कल्पना नव्हती. हि*टल*रने माणसाचे मज्जातंतू निकामी करतील, त्याचा मेंदू आणि चेतासंस्था निष्प्रभ ठरवतील अशा प्रकारची रसायने तयार करण्याची खटपट चालवली होती. त्यासाठी त्याने एक खास शस्त्रागारच तयार करून घेतले होते. शिवाय तो त्या वेळी ब्युबोनिक प्लेग या महाविनाशी रोगाचे जंतू तयार करून त्यांचा शस्त्र म्हणून वापर करण्याच्या दिशेनेही काम करत होता. अशा प्रकारची जैविक अस्त्रे पारंपरिक शस्त्रास्त्रांपेक्षा जास्त परिणामकारक होती. खरे म्हणजे तिथूनच ऑपरेशन पेपरक्लिपची सुरुवात झाली. अमेरिकेने अशाच प्रकारची शस्त्रे स्वतःसाठी हवी आहेत असे सांगितले.



परंतु त्यामागे अमेरिकेचा केवळ शस्त्रांचा अभ्यास करणे एवढाच हेतू नव्हता. तेवढे पुरेसेही नव्हते. ना*झी शास्त्रज्ञांवर डोळे ठेवून असणारा यूएस हा एकमेव देश नव्हता. सोव्हिएत युनियनमधील त्यांचे एकेकाळचे सहयोगीही तेच करत होते.

जर सोव्हिएत करत असेल, तर अमेरिका मागे कशी राहील? अमेरिकन लष्करी अधिकारी याबाबतीत मागे राहू इच्छित नव्हते. म्हणून अमेरिकन सरकारने ना*झी जर्मनीच्या पाडावादरम्यान पकडलेल्या ना*झी शास्त्रज्ञांना अमेरिकेत आणण्याची आणि त्यांना नोकरीवर रुजू करून घ्यायची योजना आखली. यावेळी, ते अमेरिकेसाठी ज्या प्रकल्पाअंतर्गत काम करत होते त्याला नाव देण्यात आले – ‘ऑपरेशन पेपरक्लिप’.

फेब्रुवारी १९४५ मध्ये, सुप्रीम हेडक्वार्टर्स अलाईड एक्सपिडिशनरी फोर्स (SHAEF) ने टी-फोर्स या विशेष विभागाची स्थापना केली, आणि जूनपर्यंत त्यात २००० पेक्षा जास्त कर्मचारी नेमले. या टी-फोर्सने सिंथेटिक रबर आणि तेल उत्प्रेरक, चिलखती उपकरणांची नवीन डिझाइन्स, व्ही-2 (रॉकेट) शस्त्रे, जेट आणि रॉकेट चालविणारी विमाने, नौदल उपकरणे, फील्ड रेडिओ, गुप्त लिखाणासाठी वापरायची रसायने, एरो मेडिसिन रीसर्च यांच्या आधारावर ५००० जर्मन टार्गेट्स तपासली. तर दुसरीकडे अशाच एका ऑपरेशनमध्ये, रशियाने २२ ऑक्टोबर १९४६ च्या एका रात्रीत २२०० पेक्षा जास्त जर्मन तज्ञांना (त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह मिळून एकूण ६००० पेक्षा जास्त लोक) आपल्या देशात आणले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

ऑपरेशन पेपरक्लिप हा कार्यक्रम नव्याने स्थापन झालेल्या जॉइंट इंटेलिजेंस ऑब्जेक्टिव्ह एजन्सी (JIOA) द्वारे चालवला जात होता. अमेरिकन क्षेपणास्त्रे आणि इतर जैविक आणि रासायनिक शस्त्रास्त्रे विकसित करण्यास मदत करण्यासाठी जर्मन बौद्धिक संसाधनांचा वापर करणे आणि यासंदर्भातील मौल्यवान माहिती सोव्हिएत युनियनच्या हातात पडू नये याची खात्री करणे हे त्यामागील मुख्य उद्दिष्ट होते.

जरी तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी या ऑपरेशनला अधिकृतपणे मंजुरी दिली होती तरी त्यांनी या एजन्सीला कोणतेही ना*झी सदस्य किंवा सक्रिय ना*झी समर्थक भरती करण्यास मनाई केली. तरीसुद्धा, JIOA मधील अधिकाऱ्यांनी या निर्देशाला केराची टोपली दाखवली. त्यांची बुद्धिमत्ता युद्धानंतरच्या देशासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकत होती. निदान या अधिकाऱ्यांचा तसा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी संबंधित लोकांचे यु*द्धात सहभागी असल्याचे किंवा यु*द्ध गुन्हेगार असल्याचे सर्व संभाव्य पुरावे नष्ट करून टाकून त्यांच्या नेमणुका केल्या.

त्यांचा हा विश्वास सार्थ ठरायला एक नाव कारणीभूत ठरले. ते म्हणजे जर्मनीतील पीनेमुंडे आर्मी रिसर्च सेंटरचे तांत्रिक संचालक वेर्नर फॉन ब्राऊन. या शास्त्रज्ञाने यु*द्धादरम्यान इंग्लंडला उ*द्ध्वस्त करणारे घातक V-2 रॉकेट विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

अमेरिकन सैन्याला रॉकेट संशोधनात मदत करण्यासाठी फॉन ब्राऊन आणि इतर रॉकेट शास्त्रज्ञांना यु*द्ध विभागाचे विशेष कर्मचारी म्हणून फोर्ट ब्लिस, टेक्सास आणि व्हाईट सॅन्ड्स प्रोव्हिंग ग्राउंड्स, न्यू मेक्सिको येथे आणण्यात आले. पुढे वेर्नर फॉन ब्राऊन नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरचे संचालक आणि सॅटर्न व्ही प्रक्षेपण वाहनाचे मुख्य आर्किटेक्ट बनले. दोन डझन अमेरिकन अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याचे श्रेयही त्यांचेच. म्हणजे त्याने तयार केलेल्या रॉकेटच्या मदतीनेच अमेरिकेला चंद्रावर मानवी पाऊल ठेवणे शक्य झाले. थोडक्यात रशियाबरोबरच्या अवकाशयु*द्धात जिंकण्यासाठीही या ऑपरेशनची मदत झाली.

या ना*झी शास्त्रज्ञांना अमेरिकेने त्यावेळी आपल्या देशात आणले नसते तर शीतयु*द्धाच्या काळात सत्तेचा काटा सहज सोव्हिएत युनियनकडे झुकू शकला असता असा युक्तिवाद या गुप्त ऑपरेशनच्या समर्थकांनी सतत केलेला आहे. मात्र असे असले तरी याच्या नैतिक बाजूकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही. आज या ना त्या मार्गाने जैविक द*हश*तवादाचा मुकाबला जगाला करावा लागत आहे, याचेही मूळ अशा घटनांमध्ये आहे हे यातील कटू वास्तव.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कॅलिफोर्नियातल्या हिंदूंनी एकत्र येऊन त्यांच्या धर्माविषयीच्या आक्षेपार्ह गोष्टी पाठ्यपुस्तकातून काढायला लावल्या

Next Post

पायलटने फ्लाईट ऑटोपायलटवर टाकून आपल्या लहान मुलाच्या हातात दिली, आणि ७५ प्रवाशांचा बळी गेला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

पायलटने फ्लाईट ऑटोपायलटवर टाकून आपल्या लहान मुलाच्या हातात दिली, आणि ७५ प्रवाशांचा बळी गेला

ब्रिटनची सर्वात प्रसिद्ध 'द ब्ल्यू बॉय' पेंटिंग शंभर वर्षांनी अमेरिकेहून परत लंडनला येतेय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.