The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑपरेशन मिन्समीट – जेव्हा ब्रिटनने एका मृत*देहाचा वापर करून हिट*लरला मात दिली होती

by द पोस्टमन टीम
19 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१९४३ च्या हिवाळ्यात बेरोजगार आणि बेघर असलेल्या ग्लेन्डवर मायकलनं उंदीर मारण्याचं औषध पिऊन आपलं जीवन संपवलं. लंडनच्या किंग्स क्रॉसमधील एका निर्जन गोदामात त्याचा मृतदेह सापडला. वास्तविक पाहता त्याचं शवविच्छेदन करून नंतर मृत्यू अहवाल व प्रमाणपत्र देणं अपेक्षित होतं. मात्र, मायकलच्या बाबतीत असं झालं नाही.

त्याचं शवविच्छेदन न करताच ‘फॉस्फरस विषबाधे’चं कारण देऊन मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं गेलं. विशेष म्हणजे त्याला लंडनमध्ये किंवा त्याचं मूळ गाव असलेल्या साउथ वेल्समध्ये दफनविधीसाठी देखील पाठवण्यात आलं नाही. त्याऐवजी, तपासअधिकाऱ्यानं त्याचा मृतदेह घेऊन इंग्लंड सोडलं आणि जगासाठी ग्लेन्डवर मायकल मृत झाला.

मात्र, आता तर त्याचं काम खऱ्याअर्थानं सुरू झालं होतं! त्याच्या मृतदेहानं दुसऱ्या महायु*द्धाची दिशा बदलण्याचं काम केलं! आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एका मृतदेहानं अशी नेमकी काय कामगिरी केली की, दुसऱ्या महायु*द्धाची दिशा बदलली? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ‘ऑपरेशन मिन्समीट’मध्ये सापडेल.

ऑपरेशन मिन्समीट हे ब्रिटनचं दुसऱ्या महायु*द्धातील सर्वांत यशस्वी ऑपरेशन होतं. अक्ष राष्ट्रांची दिशाभूल करण्यासाठी कुशाग्र बुद्धिमत्तेच्या तीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ही मिन्समीटची कल्पना तयार केली होती. त्यांनी आत्मह*त्या केलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचं रुपांतर एका रॉयल नेव्ही अधिकाऱ्यामध्ये केलं. त्याला नेव्हीचे कपडे घातले आणि कॅप्टन विल्यम मार्टिन असं नाव दिलं. जर कुणी तपास केला तर मृतदेहाची ओळख ब्रिटिश नौदल अधिकारी अशीच व्हावी यासाठी बारीक-सारीक गोष्टींवर काम करण्यात आलं.

ब्रिटिश गुप्तचर अधिकारी इयान फ्लेमिंग, चार्ल्स कोमॉन्डले आणि इवेन मोंटेग्यू यांनी मोठ्या कष्टानं ग्लेन्डवर मायकलच्या मृतदेहाचं रुपांतर एका सैनिकात केलं होतं. त्यासाठी त्यांनी अनेक महिने एक उत्तम पार्श्वभूमी तयार केली होती. सर्व तयारी झाल्यानंतर बनावट कॅप्टन विल्यम मार्टिनचा मृतदेह गुप्तपणे स्पेनच्या किनाऱ्यावर सोडून दिला.



मात्र, त्यापूर्वी त्याच्या खिशात प्रेयसीचा एक फोटो आणि रिंग ठेवण्यास ते विसरले नाहीत. त्याच्या मनगटाला साखळीनं एक ब्रीफकेस देखील बांधण्यात आली होती. त्यावर ‘पर्सनल ॲण्ड सिक्रेट’ अशी अक्षरं कोरण्यात आलेली होती. ब्रीफकेसच्या आतमध्ये मित्र राष्ट्र ग्रीसवर आक्र*मण करणार अशी माहिती असलेली कागदपत्रे होती!

मायकल उर्फ मार्टीनचा मृतदेह स्पॅनिश किनाऱ्यावर सोडून ऑपरेशन मिन्समीटचा पहिला टप्पा तर पूर्ण झाला होता. मात्र, ही योजना यशस्वी होते की नाही याबाबत साशंकता होती. कारण, योजनेचं यश स्पेनच्या प्रतिक्रियेवर अवलंबून होतं. जेव्हा ह्युएल्वा बंदराजवळ मार्टीनचा मृतदेह स्थानिक मच्छिमारांना तरंगताना आढळला. तेव्हा त्यांनी सैन्याला पाचारण केलं. कारण सैनिकाचे कपडे घातलेला हा मृतदेह विमान अपघातात मरण पावलेल्या नौदल अधिकाऱ्याचा दिसत होता.  

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

मृतदेहाची माहिती मिळताच स्पॅनिश सैन्य अधिकाऱ्यांनी त्वरीत कार्यवाही करून उष्णता आणि पाण्यामुळं खराब झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून टाकले आणि त्याच्या सोबत आलेलं सामान लॉकरमध्ये ठेवलं. अशा प्रकारे बेघर आणि दारूड्या मायकलला लष्करी इतमामात अंत्यसंस्कार मिळाले अन् ते ही स्पॅनिश भूमीत!

ब्रिटिशांनी अतिशय काळजीपूर्वक विचार करून अक्ष राष्ट्रांना फसवण्यासाठी स्पॅनिश भूमीचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. ऑपरेशन मिन्समीट सुरू करण्यात आलं तेव्हा स्पेन महायु*द्धात तटस्थ होता. त्याठिकाणी मुक्तपणे अनेक ना*झी हेर काम करत होते. ॲडॉल्फ क्लॉस हा असाच एक घातक जर्मन हे*र स्पेनमध्ये वावरत होता. मार्टीनचा मृतदेह आणि त्यासोबत काही कागदपत्रे स्पॅनिश भूमीवर आल्याची माहिती त्याच्यापर्यंत नक्कीच पोहचेल याची ब्रिटिश गुप्तचर यंत्रणेला खात्री होती. या आमिषाला जर क्लॉस बळी पडला तर मार्टीनसोबत गेलेल्या कागदपत्रांतील माहिती हि*टलरपर्यंत पोहचणार यात कुठलीही शंका नव्हती.

ऑपरेशन मिन्समीट सुरू होतं त्यावेळी युरोप आणि रशियाच्या अनेक भागांमध्ये महायु*द्धाचा प्रभाव पडला होता. जर्मनीनं अनेक ठिकाणी आपलं नियंत्रण प्रस्थापित केलं होतं. गुप्तचर यंत्रणांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झालेली होती कारण अनेकजण डबल एजंट म्हणून काम करत होते. अशा परिस्थितीमध्ये मायकल उर्फ मार्टीनचा मृतदेह एकदम हुकुमी एक्का ठरला होता.

ब्रिटनच्या अपेक्षेप्रमाणं ना*झी हेरांनी ही ‘गुप्त’ माहिती हि*टलरपर्यंत पोहचवली. मित्र राष्ट्र ग्रीसवर ह*ल्ला करणार असल्याचा फसवा संदेश देखील हि*टलरपर्यंत गेला होता. त्यानंतर ब्रिटनच्या ब्लेचली पार्कमध्ये स्थित वॉर ऑफिसमध्ये बसलेल्या कोड-ब्रेकर्सनी महत्त्वाची भूमिका बजावली. हिट*लर आणि त्याच्या अधिकाऱ्यांमध्ये होणाऱ्या गुप्त संभाषणांची उकल करण्याचं काम कोड-ब्रेकर्सनं केलं.

डिकोड झालेल्या इंटरसेप्ट्समुळं ब्रिटनला त्यांच्या योजनेच्या प्रगतीचा मागोवा घेता आला. ऑपरेशन मिन्समीट सुरू झाल्यानंतर १० आठवड्यांनी हिट*लरनं संपूर्ण ९० हजार सैनिकांची पॅ*न्झर डिव्हिजन ग्रीसमध्ये हलविल्याचा संदेश ब्रिटनच्या वॉ*र ऑफिसमध्ये धडकला आणि अधिकाऱ्यांनी जल्लोष केला. कारण, एक अतिशय अद्भूत योजना आखून हि*टलरला मूर्ख बनवण्यात त्यांना यश आलं होतं.

त्यानंतर दोस्त राष्ट्रांनी तत्काळ सिसिलीवर ह*ल्ला केला. इटलीमध्ये या गोष्टीमुळं मोठा गोंधळ उडाला. २५ जुलै १९४३ रोजी सिसिलीची लढाई अक्ष राष्ट्रांवर उलटली गेली म्हणून, इटालियन ग्रँड कौन्सिल ऑफ फॅसिझमनं मुसोलिनीचे अधिकार मर्यादित करण्यासाठी मतदान केलं. इटालियन सशस्त्र दलांचं नियंत्रण राजा व्हिक्टर इमॅन्युएल तिसऱ्याकडं सोपवलं.

दुसऱ्या दिवशी मुसोलिनी राजाला भेटला मात्र, राजानं माजी हुकूमशहाला तुरुंगात डांबण्याचे आदेश दिले. नवीन इटालियन सरकारनं मित्र राष्ट्रांशी गुप्त वाटाघाटी सुरू केल्या आणि परिणामी दुसऱ्या महायु*द्धाची दिशा बदलण्यास सुरुवात झाली. ऑपरेशन मिन्समीटमुळं काय-काय परिणाम झाले याची परिपूर्ण माहित समोर आली नाही. परंतु, सिसिली अपेक्षेपेक्षा जास्त लवकर मुक्त करण्यात यश आलं होतं आणि नुकसान देखील अपेक्षेपेक्षा कमी झालं होतं. १९५० साली, माजी कॅबिनेट मंत्री डफ कूपर यांनी लिहिलेल्या ‘ऑपरेशन हार्टब्रेक’या पुस्तकामध्ये मिन्समीटमधील घडामोडींचं देखील वर्णन केलेलं आहे.

ब्रिटिश लोक अतिशय हुशार आणि धूर्त होते, असं वारंवार म्हटलं जातं. मात्र, ऑपरेशन मिन्समीट रचना करून त्यांनी ही गोष्ट सत्यात उतरवून दाखवली. एका मृतदेहाचा वापर करून त्यांनी हि*टलरच्या बुद्धीमत्तेला मात दिली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

रस्त्यावरील एक वेश्येने ब्रिटनच्या राजपरिवारालाच ब्लॅकमेल केलं होतं…!

Next Post

आपल्या हव्यासापोटी आपण एका समुद्राचं मागच्या चाळीस वर्षात वाळवंट करून टाकलंय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

आपल्या हव्यासापोटी आपण एका समुद्राचं मागच्या चाळीस वर्षात वाळवंट करून टाकलंय

स्कॉटलंडच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाची जर्सी या १२ वर्षाच्या मुलीने डिझाईन केली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.