The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका उदात्त कारणासाठी जर्मनीनेच ‘दोस्त राष्ट्रांच्या’ या मोहिमेला समर्थन दिलं होतं

by द पोस्टमन टीम
24 October 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


एप्रिल १९४५ मध्ये, नेदरलँडच्या पश्चिम भागातील ३.५ कोटी पेक्षा अधिक डच नागरिक भुकेनं व्याकुळ होते. काउंटीचा हा भाग जर्मन सैन्यापासून मुक्त झालेला नव्हता. त्याठिकाणी १९४० पासून नेदरलँड्सवर कब्जा केलेल्या जर्मन लोकांनी या भागात अन्नधान्याच्या शिपमेंट बंद केल्या होत्या आणि तीव्र हिवाळ्यामुळे दुष्काळ देखील पडलेला होता.

अशातच मित्र राष्ट्रांच्या ऑपरेशन मार्केट गार्डन दरम्यान सुरू झालेल्या राष्ट्रीय रेल्वे संपामुळं परिस्थिती आणखीनच बिघडली होती. ॲमस्टरडॅम, उट्रेक्ट, रॉटरडॅम आणि हेग येथील रहिवाशांना तातडीनं मदतीची आवश्यकता होती. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली होती. हा काळ `हंगर विंटर` म्हणूनच ओळखला जातो.  

डच प्रिन्स बर्नहार्डनं जनरल ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांच्याशी संपर्क साधला. आयसेनहॉवर अलाइड फोर्सेसचा कमांडर होता. आपल्याला याबाबत काहीही उपाययोजना करण्याचा अधिकार नसल्याचं सांगितलं. त्यानं प्रिन्सला वरिष्ठांकडं म्हणजेचं ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्याकडे पाठवलं आणि सुरू झालं ‘ऑपरेशन मॅन्ना आणि चोहाउंड’.

जर्मनव्याप्त नेदरलँडमधील भुकेल्या लोकांसाठी हवाईमार्गानं तत्काळ अन्नधान्याची मदत पाठवण्यासाठी ‘ऑपरेशन मॅन्ना आणि चोहाउंड’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही मोहिम यशस्वी होईल की नाही याबाबत ब्रिटन आणि अमेरिकेला शंका होती. मोहिमेच्या मार्गात अनेक अडचणी उभ्या होत्या.

ज्या भागात मदत पाठवायची होती तो भाग जर्मनीच्या ताब्यात होता. जर त्या हवाईहद्दीमध्ये दोस्त राष्ट्रांची विमानं गेली तर साहजिकचं ना*झी या विमानांचा वेध घेणार होते. त्यामुळं सर्वप्रथम कमांडर जनरल डी. आयसेनहॉवर यांना नेदरलँडमधील जर्मन अधिकाऱ्यांशी बोलणी करावी लागली. या कामात त्यांना स्विस आणि स्वीडिश दूतांनी मदत केली.



जर्मन सैन्याने अँटी एअरक्राफ्ट आर्टिलरीने (विमानविरोधी तोफखाना) येणाऱ्या विमानांना लक्ष्य करू नये, अशी विनंती करण्यात आली होती. अनेक आढेवेढे घेतल्यानंतर जर्मनी यासाठी तयारी झाली. मात्र, सर्वात मोठी चिंता जोसेफ स्टॅलिनची होती. ब्रिटन आणि अमेरिकेनं जर्मनव्याप्त प्रदेशात मदत पाठवल्याचं पाहून त्याला आपला विश्वासघात झाला, असं वाटण्याची शक्यता होती.

कडक हिवाळा आणि उष्णता निर्माण करण्यासाठी असलेल्या इंधनाच्या कमतरतेमुळं साधारण २० हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय या लोकांना जर्मन सैन्यचा सततचा त्रास सहन करावा लागत होता. भुकेल्या लोकांना अन्न देणं हा त्यावेळेचा मुख्य हेतू होता. त्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेनं पुढाकार घेऊन कसंतरी जर्मनीच्या गळी आपली मोहिम उतरवली होती. एअर कमोडोर अँड्र्यू गेडेस आणि त्याच्या सहकारी अधिकाऱ्यांच्या टीमवर मोहिमेची जबाबदारी देण्यात आली. या टीमनं जनरल जोहान्स ब्लास्कोविट्झ यांच्या नेतृत्वाखालील जर्मन अधिकाऱ्यांची भेट घेऊन मदत घेऊन येणाऱ्या विमानांची सुरक्षा सुनिश्चित केली.

एका टेस्ट फ्लाईटच्या उड्डाणानं ऑपरेशन मॅन्ना सुरू करण्यात आलं. रॉयल एअरफोर्सच्या ॲव्हरो लँकेस्टर या विमानानं पाहिलं उड्डाण घेतलं होतं. या विमानाला ‘बॅड पेनी’ असं टोपणनाव देण्यात आलं होतं. त्यावेळी जर्मन लोकांनी तात्पुरती यु*द्धबंदी करण्यास अधिकृतपणे सहमती दर्शवलेली नव्हती तरी देखील सात लोकांचा क्रू असलेलं हे विमान जर्मनव्याप्त भागात गेलं होतं. या विमानाला अतिशय वाईट हवामानाचा सामना करावा लागला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पहिल्याच दिवशी हॉलंडमध्ये पाचशे टनांपेक्षा जास्त अन्न टाकण्यात आलं. या अन्नामध्ये जेवणाचे टिन, काही सुके अन्न आणि चॉकलेट्सचा समावेश होता. ऑपरेशन मॅन्नामध्ये एकून ६ हजार ६८० टन धान्य विमानांच्या मदतीनं लोकांपर्यंत पोहचवण्यात आलं. पहिल्यांदा उड्डाण घेतलेल्या विमानात नेव्हिगेटर असलेल्या जॉन फनेल यांनी, अन्न मिळाल्यानंतर तेथील लोकांच्या प्रतिक्रियांचं वर्णन आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे.

डच सीमा ओलांडून आणि नंतर ९० नॉट्स इतक्या स्पीडवर ५०० फूट खाली उतरून अन्नधान्याची पाकिटे खाली टाकण्याची कल्पना होती. अन्नधान्याची मदत घेऊन विमानं येणार असल्याची लोकांना अगोदरच कल्पना मिळालेली होती. आकाशात विमानं दिसताच ठिकठिकाणी जमलेल्या लोकांनी विमानांना झेंडे दाखवले. विमानांना लोकांच्या अस्तित्त्वाची चिन्हं दिसावीत म्हणून त्यांनी शक्य ते प्रयत्न केले होते. आमच्यासाठी ते दृश्य पाहणं खूप समाधानाचं होतं, अशी प्रतिक्रिया जॉन फनेल यांनी एका मुलाखतीमध्ये दिली होती.

विमानांतून खाली अन्नधान्य फेकताना, अन्नाची गरज असलेल्या नागरिकांना क्रेट्सचा मार लागून ते जखमी होण्याची शक्यता होती. म्हणून डच वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्टँड बायवर ठेवण्यात आलं होत. जर गरज पडली तर त्यांना नागरिकांवर प्रथमोपचार करण्यासाठी पाठवलं जाणार होतं.

याउलट जर्मन देखील चिंतेत होते. अन्नधान्याच्या नावाखाली दोस्त राष्ट्रांनी दगाफटका केला तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं, अशी भीती जर्मनीला होती. म्हणून त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी अन्नधान्य टाकलं जाणार होतं त्याठिकाणी विमानविरोधी तोफा तयार ठेवल्या होत्या. जेणेकरून जर दगाफटका झाला तर तात्काळ कार्यवाही करता येईल. इतकचं काय जर्मन पोलिसांनी खाली पडलेल्या धान्याची पोती आणि क्रेटची तपासणीसुद्धा केली होती. ‘ऑपरेशन मॅन्ना’ यशस्वी झाल्यानंतर ‘चोहाउंड’ हाती घेण्यात आलं.

पुढे जर्मन लोकांनी आत्मसमर्पण केल्यानंतरही मॅन्ना आणि चौहाउंड ऑपरेशन ८ मे १९४५ पर्यंत चालू राहिलं. या ऑपरेशनमध्ये एकूण तीन विमानांचं नुकसान झालं. दोन विमानांची हवेत आपसात टक्कर झाली होती तर एका विमानाच्या इंजिनला आग लागल्यानं ते कोसळलं होतं. याशिवाय अनेक विमानांवर गोळ्यांचे निशाण देखील आढळले होते.

हा अतिउत्साही जर्मन सैनिकांचा कारनामा असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. अनेक बॉ*म्बर क्रूसाठी दुसरं महायु*द्ध हेचं अंतिम ध्येय होतं. त्यांनी यु*द्धाच्या काळात अगणित ठिकाणी बॉ*म्बह*ल्ले करून लोकांचे जीव घेतले होते. मात्र, यु*द्धाच्या शेवटच्या काळात उपाशीपोटी असलेल्या लोकांसाठी अन्न आणून त्यांनी मोठं उदात्त काम केलं होतं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जगातल्या विविध देशात असलेल्या या ‘विचित्र टॅक्सेस’बद्दल वाचून तुम्हीही हैराण व्हाल

Next Post

अजित आगरकर भारताचा आजवरचा सर्वात ‘अंडररेटेड’ अष्टपैलू खेळाडू आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अजित आगरकर भारताचा आजवरचा सर्वात 'अंडररेटेड' अष्टपैलू खेळाडू आहे

पोर्तुगीजांच्या समुद्र सफारीच्या कौशल्यामुळे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण जागतिक पातळीवर झाली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.