The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चीनी हॅकर्सनी गुगलसह ३४ अमेरिकी कंपन्यांचा टप्प्यात कार्यक्रम केला होता

by द पोस्टमन टीम
29 March 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच गोष्टी पूर्णतः बदलून गेल्या आहेत. माहिती तंत्रज्ञानाने तर आपले जीवन खूपच प्रभावित केले आहे. आज बऱ्याच गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत. सोशल मिडीयाने तर सामान्य लोकांचे जीवन खूपच प्रभावित केले आहे. काही दिवसांपूर्वी गुगल, त्यानंतर युत्यूब आणि त्यानंतर व्हाट्सॲप हे तिन्ही ॲप फक्त काही मिनिटांसाठी डाऊन झाले होते. तर सर्वत्र किती गोंधळ उडाला होता.

आजकाल यु*द्ध लढण्यासाठी ह*त्यारांचाच वापर केला पाहिजे असे नाही. तंत्रज्ञान हाताशी धरूनही आज एक देश दुसऱ्या देशावर ह*ल्ला करू शकतो. काही वर्षांपूर्वी घडलेला असाच हल्ला तुम्हाला आठवत असेल. ज्याचे नाव होते, ‘ऑपरेशन ऑरोरा.’

या पहिल्यावहिल्या सायबर ह*ल्ल्यात अमेरिकेच्या ३४ कंपन्यांवर ह*ल्ला करण्यात आला होला. गुगलचे कॉपीराईट आणि पेटंट या ह*ल्ल्यात चोरीला गेले होते. गुगुलच जिथे सुरक्षित राहिले नव्हते तिथे अन्य कंपन्याबाबत काही बोलायलाच नको.

चीन आणि अमेरिकेदरम्यान वर्चस्वासाठी कायमच चढाओढ सुरू असते, शीतयु*द्ध, व्यापारी स्पर्धा सुरू असतात. अमेरिकेच्या कंपन्यांचे एकहाती वर्चस्व संपवण्यासाठीच चीनने हा सायबर ह*ल्ला घडवून आणला होता. शेवटी गुगलला चीनमधून काढता पाय घ्यावा लागला.

चीनने ऑपरेशन ऑरोराच्या माध्यमातून सायबर ह*ल्ला करून, आपण किती व्यापक स्तरावर परिणाम घडवू शकतो आणि किती हाहाकार माजवू शकतो हे दाखवून दिले होते. या सायबर ह*ल्ल्याने संपूर्ण जगाला जोराचा हादरा बसला होता. जीवितहानी न करताही शत्रू राष्ट्राच्या नाड्या कशा आवळायच्या ते या ह*ल्ल्याने दाखवून दिले होते.



गुगलने १२ जानेवारी २०१० रोजी आपल्या अधिकृत ब्लॉगवर पोस्ट टाकली होती. या पोस्टच्या माध्यमातून गुगलने खुलासा केला होता की, हॅकर्सने त्यांच्यावर ह*ल्ला केला आहे.

पुढे त्यांनी हेही सांगितले की, हॅकर्सनी त्यांचे पेटंट्स आणि कॉपीराईटही चोरले होते. गुगलसोबत हे होऊ शकते हे ऐकून अनेकांना धक्का बसला. केवळ गुगलवरच नाही तर अमेरिकेच्या आणखी ३४ कंपन्यांसोबतही हेच घडले होते. या कंपन्याही हॅकर्सच्या जाळ्यात अडकल्या होत्या. एवढ्या मोठ्या टेक कंपन्यांच्या बाबतीत एवढी मोठी आणि गंभीर घटना घडते आणि त्याची कुणाला भनकही लागत नाही? हाच प्रश्न सर्वांना सतावत होता.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

याचा तपास सुरू केल्यानंतर तर ज्या बाबी उघड झाल्या त्या आणखीनच बुचकळ्यात टाकणाऱ्या होत्या.

ज्या व्हायरस आणि मालवेअरच्या मदतीने हा ह*ल्ला करण्यात आला तो अमेरिकेत दीड महिन्यापूर्वीच दाखल झाला होता. फक्त त्याच्या कामाचा वेग खूप सावकाश होता.

या कंपन्यांना दीड महिन्यात याचा जराही थांगपत्ता लागला नाही. कारण हा ह*ल्ला अतिशय नियोजनपूर्वक आणि योग्य ती खबरदारी घेऊन मगच केला गेला होता. नोव्हेंबर २००९च्या मध्यापासून डिसेंबरपर्यंत सगळ्या कंपन्या या व्हायरसला बळी पडल्या होत्या. त्यांची अत्यंत गोपनीय आणि महत्वपूर्ण माहिती चोरीला गेली होती. जेव्हा असा ह*ल्ला झाल्याचे स्पष्ट झाले तेव्हा या कंपन्यांच्या पायाखालची जमीन सरकली.

सगळ्यात गंभीर बाब म्हणजे गुगलसुद्धा असा काही ह*ल्ला आपल्यावर होईल याबाबत पूर्णतः अनभिज्ञ होते.
जगातील सगळ्यात मोठे सर्च इंजिनच जर असे गाफील राहत असेल, सुरक्षित नसेल, तर या इंटरनेट जगतातील इतर गोष्टीही अशाच तकलादू असतील. एकूणच इंटरनेट, त्यावरील आभासी जग आणि त्यावर असणारा लोकांचा विश्वास या सगळ्याच गोष्टीना सुरुंग लागला होता. लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या सगळ्या आभासी जगात आपण सुरक्षित आहोत का? हाच एकमेव प्रश्न त्यांना छळत होता.

हा ह*ल्ला चीनकडून झाला असल्याचे नंतर तपासात उघड झाले. पण, त्याबाबतचा कोणताही स्पष्ट पुरावा नसताना काही विधान करणे चुकीचे दिसले असते.

अमेरिकेतील सायबर सुरक्षा कंपन्या या ह*ल्ल्याची माहिती जमवण्यासाठी कामाला लागल्या. मॅकफी या अँटीव्हायरस कंपनीला यामध्ये लवकर यश मिळाले.

या कंपनीला एक ऑरोरा नावाची मालवेअर फाईल सापडली. याच फाईलने सगळा गोंधळ घातला होता. इंटरनेट एक्सप्लोररच्या माध्यमातून हॅकर्सनी ही फाईल सगळ्या सिस्टीममध्ये पाठवली आणि याच्याच मदतीने त्यांनी सगळ्याच कंपन्यांच्या सिस्टीममध्ये व्हायरस सोडला होता.

सायबर कंपन्यांनी सगळे आयपी ॲड्रेस, डोमेन नेम्स, मालवेअर सिग्नेचर आणि अशाच काही इतर घटकांचा कसून तपास केला. तेव्हा त्यांना कळले की, एल्डरवूड नावाचा हॅकर्सचा एक ग्रुप आहे. या ग्रुपने पीएलए युनिट ६१३८९ सोबत मिळवून हा ह*ल्ला घडवून आणला आहे.

युनिट ६१३८९ ही चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा सायबर विभाग आहे. हा विभाग आणि हॅकर्सनी मिळून हा ह*ल्ला केला होता. युनिट ३१३८९ ला ‘कमेंट क्रू’ म्हणूनही ओळखले जात होते.

चीन सरकार नेहमीच युनिट ६१३८९शी आपला संबंध नाकारत असते. पण सायबर कंपन्यांनी सोर्स कोडच्या मदतीने हे शोधून काढले आहे की, युनिट ६१३८९ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचाच एक घटक आहे. हा संबंध स्पष्ट झाल्यानंतर तर चीनवरील संशय आणखी दृढ झाला.

या मोठमोठ्या कंपन्यांच्या बौद्धिक संपदा (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज) चोरून या कंपन्यांना हानी पोहोचवणे हाच हॅकर्सचा एकमेव उद्देश होता. इंटरनेटवरील मायावी जग किती असुरक्षित असू शकते, याची प्रचीती या ह*ल्ल्याच्या निमित्ताने आली. भविष्यातील लढाया या हातात ह*त्यार घेऊन कराव्या लागणार नाहीत. त्यासाठी एक मालवेअर फाईल आणि त्यासोबत एक व्हायरस पुरेसा आहे. हा ह*ल्ला याचाच पुरावा होता.

या हॅकर्सनी चायनीज आणि व्हिएतनामी मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांचे अकाउंट्सही हॅक केले होते त्यांच्या आवश्यक आणि गोपनीय माहितीची चोरी केली होती. या ह*ल्ल्यानंतर अमेरिकेच्या अनेक कंपन्यांनी चीनमधून काढता पाय घेतला. 

चीनमध्ये गुगलची मुस्कटदाबी होत होती आणि यावर गुगलने अनेकदा भाष्य केले होते. शेवटी चीनच्या सततच्या निगराणीला आणि दडपशाहीला कंटाळून गुगलने चीन मधून माघार घेतली. हिलरी क्लिंटन त्यावेळी अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटरी होत्या. त्यांनी या ह*ल्ल्याचा तीव्र निषेध केला होता. गुगलच्या ऑफिस बाहेर असलेल्या गुगलच्या लोगोला त्यांनी श्रद्धांजली वाहिली होती.

येणाऱ्या काळात कोणत्याही दोन राष्ट्रांनी अशा पद्धतीने जर एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तर याचे किती भयानक परिणाम होऊ शकतील याची कल्पनाही न केलेली बरी.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भेटा जगातील सर्वात अलिप्त आणि खुंखार जमातीशी संपर्क साधणाऱ्या पहिल्या महिलेला

Next Post

IPLमध्ये ६३ चेंडूत १२० धावा करणारा पॉल वाल्थटी सध्या काय करतोय..?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

IPLमध्ये ६३ चेंडूत १२० धावा करणारा पॉल वाल्थटी सध्या काय करतोय..?

बाबराच्या क्रौर्याने घागरा नदीचा प्रवाह रक्ताने लाल केला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.