The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनेकांना माहिती नाही, पण रशिया आणि अमेरिका यांच्यातही एक समोरासमोर लढाई झाली होती

by Heramb
28 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जागतिक पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या रशियन आणि अमेरिकन सेना संपूर्ण इतिहासात फक्त एकदाच प्रत्यक्ष यु*द्धात एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. पहिल्या महायु*द्धानंतर रशियामधील गृहयु*द्धात अमेरिकन्स आणि सोव्हिएटस् एकमेकांविरुद्ध लढले. यावेळी अमेरिकेने अन्य पाश्चिमात्त्य राष्ट्रांबरोबर ‘गोऱ्यां’च्या रक्षणार्थ बोल्शेविकांच्या विरोधात रणांगणात उडी घेतली. युरोपच्या मध्यवर्ती सत्तांसोबत शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर हा संघर्ष उद्भवला.

मार्च १९१८च्या सुरुवातीस जेव्हा बोल्शेविक सरकारने ब्रेस्ट-लिटोव्हस्क शांतता करारावर स्वाक्षरी केली तेव्हा हे सर्व घडले. हा रशियासाठी अत्यंत अपमानास्पद करार होता. १९१७ ते १९२२ दरम्यान रशियामध्ये सोव्हिएत क्रांती झाली. यामध्ये ‘व्लादिमीर लेनिन’ यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट आघाडीने राजेशाही उलथून टाकली. कम्युनिस्ट बाजूच्या सैन्याला त्या वेळी “बोल्शेविक” म्हणून संबोधले जात असे, हा शब्द मार्क्सवादी विचारसरणीचे अनुसरण करणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो.

रशियन साम्राज्याचा शेवटचा शासक दुसरा निकोलस तथाकथित “गोर्‍यां”च्या सेनेचे नेतृत्व करीत होता. रशियामध्ये त्या वर्षी सुरू झालेले गृहयु*द्ध खूपच विस्मयकारक आहे कारण या गृहयु*द्धात इतर अनेक राष्ट्रांनी रशियन साम्राज्य साम्यवादाला बळी पडू नये यासाठी एकत्र येऊन प्रयत्न केले होते. रशियन साम्राज्याच्या मदतीला आलेले एक मोठे पाश्चिमात्य सैन्य म्हणजे युनायटेड स्टेट्स आर्मी. लहान लहान लढाया असल्या तरी ही सेना इतिहासात पहिल्यांदाच थेट कम्युनिस्टांच्या विरोधात लढली.

राजेशाही वर्चस्व असलेल्या जर्मनीविरुद्धच्या पाश्चात्य कारवायांवर विपरीत परिणाम होईल या भीतीने मित्र राष्ट्रांनी रशियन सैन्याला वाचवण्यासाठी आणि बोल्शेविक क्रांतीला रोखण्यासाठी मोहीम आखली होती. मोहिमेतील योजनांनुसार, २ ऑगस्ट १९१८ रोजी एक ब्रिटीश रेजिमेंट रशियाच्या उत्तरेकडील अर्खंगेल्स्क येथे उतरली.



ब्रिटिशांनी अर्खंगेल्स्क शहराचा ताबा घेतला आणि त्यांनी भविष्यातील ऑपरेशन्ससाठी त्याठिकाणी बेसकॅम्प तयार केला. एका महिन्यानंतर, अमेरिकन सैनिकांची एक तुकडी सायबेरियात पाठवण्यात आली. ही अमेरिकन सैन्य तुकडी ब्रिटिश सैन्याबरोबर लढाईच्या मैदानात उतरणार होती. फ्रेंच, बेल्जियन, रोमानियन, ग्रीक, पॉलिश, कॅनेडियन, इटालियन, जपानी, चेकोस्लोव्हाक, युगोस्लाव्ह आणि ऑस्ट्रेलियन सैनिकही रशियात लढले.

त्यांपैकी काही सैनिक आधीच मार्च १९१८च्या अखेरीस रशियन आघाडीवर होते तर इतरांना ‘रेड आर्मी’ या बोल्शेविकांच्या सैन्यदलाविरुद्ध शाही सैन्याला पाठिंबा देण्यासाठी पाठवले गेले होते. १५ हजारहून अधिक अमेरिकन सैनिकांनी पूर्व रशियामध्ये बोल्शेविकांच्या विरोधात लढा दिला. दुसऱ्या महायु*द्धानंतर घडलेल्या शीतयु*द्धाची ही लहानशी प्रस्तावनाच होती असंही आपण म्हणू शकतो.

महायु*द्धाच्या सुरुवातीपासून रशियामध्ये लढलेल्या परदेशी सैन्य विभागांची सर्वात जास्त संख्या चेक आणि स्लोव्हाक सैनिकांची होती. त्यांनी ऑस्ट्रो-हंगेरियन सैन्यात भरती होण्यास नकार दिला होता. मित्र राष्ट्रांच्या मोहिमेतील मुख्य उद्दिष्टांपैकी एक म्हणजे चेकोस्लोव्हाक सैन्याच्या सुमारे ४० हजार सदस्यांची सुटका करणे हे होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

त्यांनी गृहयु*द्ध सुरू झाल्यावर ट्रान्स-सायबेरियन रेल्वेचा ताबा घेतला होता आणि याचबरोबर नागरी संघर्षसुद्धा तीव्र होतच होता. सुरुवातीला, बोल्शेविक आणि चेकोस्लोव्हाक सैनिकांमध्ये शांततेचा करार झाला होता. परंतु १९१८ नंतर, सगळेच परदेशी सैनिक गृहयु*द्धात सक्रियपणे सहभागी झाले.

ब्रिटिशांना मदत करण्यासाठी अर्खांगेल्स्कमध्ये तैनात असलेल्या अमेरिकन तुकडीला “पोलर बिअर एक्सपेडिशन” असे नाव देण्यात आले. आर्क्टिक सर्कलजवळील स्थानामुळे त्यांना हे नाव देण्यात आले होते. चेकोस्लोव्हाकच्या सैनिकांना वेढा घालण्यासाठी त्यांच्या आसपास जाता यावे हा अँग्लो-अमेरिकनांचा उद्देश होता. दुसरे आणि जवळजवळ अशक्य उद्दिष्ट होते ते म्हणजे चेकोस्लोव्हाकियन आणि रशियन साम्राज्याशी एकनिष्ठ सैनिकांच्या मदतीने पूर्व आघाडीची पुनर्बांधणी करणे.

अँग्लो-अमेरिकन सैन्याची रेड आर्मीच्या सैनिकांशी दोन ठिकाणी चकमक झाली. एक ड्विना नदीकाठी आणि दुसरी वोलोग्डा रेल्वेच्या बाजूने. सहा आठवड्यांत, मित्र राष्ट्रांनी शत्रूंचा सामना करून एके ठिकाणी यशस्वीरीत्या तळ मिळवला. पण रसद पुरवठ्याच्या दृष्टीने सैनिकांचे हे मोर्चे फारच लांब होते. या परिस्थितीत, अमेरिकन लोकांना आघाडीच्या सैन्याचे रक्षण करणे कठीण झाले. रेड आर्मीच्या ह*ल्ल्यांनी त्यांच्या रसद मार्गांमध्ये अडथळा आणण्यास सुरुवात केली.

मित्र राष्ट्रांनी बचावात्मक डावपेच स्वीकारण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक लोकसंख्येला बोल्शेविकांच्या विरोधात एकत्रित करण्यात ते अयशस्वी ठरले. दरम्यान, बोल्शेव्हिकांनी ड्विना नदीवर आक्र*मण सुरू केले आणि मित्र राष्ट्रांसमोर जागा मिळवली. यामुळे मित्र राष्ट्रांना माघार घ्यावी लागली.

काही काळानंतर, हजारो मैल दूर असलेल्या जर्मनीने शरणागती पत्करली. महायु*द्ध संपले होते, परंतु गोऱ्या लोकांच्या बाजूने लढणारे परदेशी सैनिक अजूनही संघर्षातच अडकले होते, तसाही हा संघर्ष त्यांचा नव्हताच. परिणामी, अमेरिकन सैनिकांनी घरी परतण्याची मागणी करण्यास सुरुवात केली आणि हवामानामुळे अर्खंगेल्स्क बंदर अक्षरशः गोठले. यामुळे त्यांच्या निघण्याची वेळ पुढे ढकलण्यात आली आणि त्यांच्यातील तणाव आणखीनच वाढला.

अमेरिकन सैन्याला मायदेशी परत जाण्यासाठी वसंत ऋतु येण्याची वाट पहावी लागली. अखेर मे १९१९ मध्ये त्यांच्या मदतीसाठी ४० हजार ब्रिटिश स्वयंसेवक पाठवण्यात आले. उत्तर रशियामध्ये तैनात असलेल्या मित्र राष्ट्रांच्या उर्वरित सैनिकांसह अमेरिकन तुकडी बाहेर काढण्यात आली, त्यामुळे त्यांचा गृहयु*द्धातील हस्तक्षेप संपुष्टात आला.

ऑक्टोबर १९१९ च्या एका अहवालानुसार, रशियामध्ये सुमारे २१० अमेरिकन सैनिक मरण पावले, यांतील किमान ११० यु*द्धात मरण पावले, ३० बेपत्ता घोषित केले गेले आणि ७० स्पॅनिश फ्लूमुळे मरण पावले. पोलर बिअर एक्सपेडिशनमधील सैनिकांपैकी ३०५ जखमी झाले. युनायटेड स्टेट्स आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील गुंतागुंतीच्या राजकीय संबंधांमुळे रशियामध्ये मारल्या गेलेल्या अमेरिकन सैनिकांचे अवशेष परत आणणे ही एक अवघड प्रक्रिया होऊन बसली.

शीतयु*द्धाच्या काळात जगावर आपला प्रभाव पडणाऱ्या या दोन महाशक्तींमध्ये कधीही सशस्त्र संघर्ष झालाच नाही, असे बर्‍याच लोकांना वाटते, परंतु शीतयु*द्ध सुरू होण्याच्या ३० वर्षांपूर्वीच सशस्त्र संघर्ष घडला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

विश्वास बसणार नाही पण आजच्या वापरातले हे शोध ‘लिओनार्दो-द-विंची’ने लावलेत..!

Next Post

१९९६ वर्ल्डकप – रणतुंगा म्हणाला, ‘आत्ताच फोटो काढू नका, उद्या ती ट्रॉफी आपल्याकडेच येणार आहे

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

१९९६ वर्ल्डकप - रणतुंगा म्हणाला, 'आत्ताच फोटो काढू नका, उद्या ती ट्रॉफी आपल्याकडेच येणार आहे

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवृत्त झाल्यानंतर नेमकं कसं आयुष्य जगतात माहिती आहे का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.