The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षी मॅनहॅटन प्रोजेक्टच्या पडद्यामागील कृष्णवर्णीय ‘नायक’

by Heramb
29 October 2024
in इतिहास, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


अमेरिकेचा मॅनहॅटन प्रोजेक्ट कदाचित अमेरिकन इतिहासातील सर्वांत मोठा प्रोजेक्ट असेल. दुसऱ्या महायु*द्धादरम्यान सुरु झालेल्या प्रोजेक्टचं एकमेव उद्दिष्ट होतं ते म्हणजे ‘अ*णुबॉ*म्ब निर्मिती’. या अविश्वसनीय निर्मितीनन्तर मानवी यु*द्धतंत्र कायमचेच बदलणार होते. तसेच या प्रोजेक्टमध्ये साक्षात फिजिक्सचा देव अल्बर्ट आईन्स्टाईनसह अनेक दिग्गज शास्त्रज्ञ सहभागी होते.

किंबहुना आईन्स्टाईननेच अमेरिकन शासनाला अ*णुबॉ*म्बनिर्मितीची कल्पना दिली होती, पण जपानच्या विध्वंसानंतर मात्र त्याला मोठा पश्चात्ताप झाला. मॅनहॅटन प्रोजेक्ट हा मानवी इतिहासातीलसुद्धा सर्वांत मोठा प्रोजेक्ट होता असं म्हटलं तर अतिशयोक्त वाटायला नको. मॅनहॅटन प्रोजेक्टमुळे यु*द्ध आणि सत्तांकडे पाहण्याचा जागतिक दृष्टिकोन बदलला आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेक मोठे बदल झाले.

मॅनहॅटन प्रोजेक्ट मानवी इतिहासातील सर्वांत मोठा प्रोजेक्ट असण्याचे आणखी एक कारण म्हणजे या प्रोजेक्टमध्ये ६ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत होते. अगदी सायंटिस्ट्स, इंजिनिअर्सपासून ते कूक आणि रखवालदारांपर्यंत अमेरिकेतील अनेक नागरिक या प्रोजेक्टचा एक भाग होते. याशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझवेल्ट यांच्या ‘एक्झेक्युटिव्ह ऑर्डर 8802’नुसार, यापुढे डिफेन्स प्रोजेक्ट्समध्ये आफ्रिकन-अमेरिकन लोकांशी भेदभाव होणार नाही. यामुळेच या प्रोजेक्टमध्ये अनेक कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक देखील सहभागी झाले होते. वर्णभेदाचा पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेत खऱ्या अर्थाने ही एक प्रगतीशील वाटचाल होती.

न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठ आणि शिकागो मेटलर्जिकल लॅबोरेटरीसारख्या मॅनहॅटन प्रकल्पाशी संबंधित अनेक संशोधन संस्थांनी कृष्णवर्णीय सायंटिस्ट्स आणि इंजिनिअर्स नियुक्त केले. तरी श्वेतवर्णीय सायंटिस्ट्सच्या तुलनेत कृष्णवर्णीय सायंटिस्ट्स आणि इंजिनिअर्स अतिशय कमी प्रमाणात होते. उदाहरणार्थ, शिकागो मेटॅलर्जिकल लॅबोरेटरी येथे एकूण ४०० सायंटिस्ट्सपैकी केवळ १२ सायंटिस्ट्स कृष्णवर्णीय होते. 



असा प्रकार ग्रामीण भागातील प्रोजेक्ट साईट्सवर प्रामुख्याने दिसत होता. उदाहरणार्थ हॅनफोर्ड, वॉशिंग्टन, ओक रिज आणि टेनेसीमध्ये कृष्णवर्णीय लोकांना फक्त एंट्री-लेव्हल आणि अतिशय कनिष्ठ दर्जाच्या नोकऱ्या देण्यात येत होत्या. यामध्ये साफसफाई, स्वयंपाक इत्यादी केवळ शारीरिक श्रमाचा वापर होणाऱ्या कामांचा समावेश होता.

प्रोजेक्टदरम्यान टेनेसीमधील ग्रामीण भागात असलेली ओक रिज फॅसिलिटी कर्मचाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे आधीपेक्षा बऱ्याच प्रमाणात मोठी झाली. पण ही साईट दक्षिण अमेरिकेत होती. दक्षिण अमेरिकन राज्यांत असल्यामुळे त्याठिकाणी ‘जिम क्रो’ कायदे लागू होते आणि वर्णभेदसुद्धा वाढत होता. तरीही अनेक कृष्णवर्णीय कामगारांना योग्य पगार आणि राहण्याची सोय देण्याचे आश्वासन देऊन साइटवर नेण्यात आले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

पण साईटवर मात्र वेगळेच चित्र होते. एकाच खोलीत ५ ते ६ कामगारांना लहान लाकडी शॅकमध्ये ठेवले जात असे. प्लंबिंग सिस्टीम किंवा किचन यासारख्या मूलभूत जीवनावश्यक गोष्टीसुद्धा कृष्णवर्णीय कामगारांना पुरविल्या गेल्या नाहीत. शिवाय, प्रोजेक्ट साइटवर विवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची परवानगी नव्हती.

दक्षिण अमेरिकेव्यतिरिक्त अमेरिकेतील अन्य ठिकाणीही परिस्थिती चांगली नव्हती. हॅनफोर्ड आणि वॉशिंग्टन येथील प्रोजेक्ट साईट्सवर कृष्णवर्णीय कामगारांना वाईट राहणीमान आणि तुलनेने कमी सुविधा देण्यात आल्या. राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्या ‘एक्झेक्युटिव्ह’ ऑर्डरनन्तरही कृष्णवर्णीय नागरिकांना मॅनहॅटन प्रोजेक्टमध्ये समान संधी उपलब्ध करून देण्यात अमेरिकन प्रशासन आणि नागरिक पूर्णतः अपयशी ठरले होते.

आफ्रिकन-अमेरिकन लोकांना मोठ्या प्रमाणात भेदभावाचा सामना करावा लागला तरी त्यांच्यापैकी अनेक सायंटिस्ट्स आणि इंजिनिअर्सनी प्रोजेक्टच्या यशामध्ये आपले बहुमूल्य योगदान दिले. यातील एक प्रमुख वैज्ञानिक म्हणजे जे. अर्नेस्ट विल्किन्स ज्युनियर. विल्किन्स लहानपणापासूनच गणितामध्ये अतिशय हुशार होते. शिकागो विद्यापीठाने त्यांना वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी गणिताचा विद्यार्थी म्हणून विद्यापीठात प्रवेश दिला.

मॅनहॅटन प्रोजेक्टच्या सुरुवातीच्या भागात विल्किन्स यांनी शिकागो मेटॅलर्जिकल लॅबमध्ये काम केले. त्याठिकाणी त्यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील टीमने अणूंपेक्षा लहान कणांच्या हालचालीवर संशोधन करण्यास मदत केली. परंतु त्यांच्या वर्णामुळे किंवा वंशामुळे त्यांना या प्रोजेक्टमध्ये आघाडीचे स्थान घेण्याची संधी दिली गेली नाही. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमला ग्रॅफाइट अणुभट्टीच्या कामासाठी ओक रिज साईटवर पाठवण्यात आले होते, पण त्यांना मात्र यापासून वेगळे ठेवण्यात आले.

विल्किन्स आणि त्यांच्यासारख्या अनेक आफ्रिकन अमेरिकन शास्त्रज्ञांना भेदभावाचा सामना करावा लागला तरीही त्यांनी मॅनहॅटन प्रोजेक्ट संपल्यानंतर शांततेचा संदेश दिला. १९४५ साली दुसरे महायु*द्ध अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलेले असताना राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रुमन यांना हिरोशिमा आणि नागासाकीवर अ*णुबॉ*म्ब टाकायचे की नाही याचा निर्णय करायचा होता. शास्त्रज्ञांना अ*णुबॉ*म्बच्या भीषण परिणामांचे चांगले ज्ञान होते. त्यामुळे विल्किन्स आणि जेस्पर जेफरीज सह त्यांच्या काही कृष्णवर्णीय सहकाऱ्यांनी या निर्णायक प्रसंगी राष्ट्राध्यक्षांकडे एक याचिका दाखल केली. 

त्यांच्या याचिकेत, दोन्ही शास्त्रज्ञांनी कमांडर इन चीफला जपानवर अ*ण्वस्त्रांचा वापर करू नये आणि त्याऐवजी जपानसमोर अ*ण्वस्त्रांची चाचणी करून त्यांना आत्मसमर्पण करायला सांगावे असा आशय होता. परंतु काही कारणांनी ही याचिका राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोहोचलीच नाही आणि व्हायचा तो वि*ध्वंस घडलाच. खरं तर, शीतयु*द्धाच्या मध्यापर्यंत या याचिकेबद्दल क्वचितच लोकांना माहिती होती. सन १९६१ साली युनायटेड स्टेट्स सरकारने ही याचिका सर्वांसमोर आणली.

यानंतर १९४५ साली, विल्किन्स ‘अटोमिक सायंटिस्ट्स ऑफ शिकागो’ या संस्थेत सामील झाले. अ*ण्वस्त्रांच्या नैतिक आणि सामाजिक नीतिमत्तेबद्दल कल्पनांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी या व्यासपीठाचा वापर केला. शिवाय, विल्किन्सने आ*ण्विक तंत्रज्ञानाचा शांततापूर्ण वापर आणि अशा शस्त्रांचा वापर टळावा या विचारांचा प्रचार केला. मॅनहॅटन प्रोजेक्टनंतर, विल्किन्स यांनी शंभराहून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले.

विल्किन्स हे गेल्या शतकातील सर्वांत प्रभावशाली आणि यशस्वी कृष्णवर्णीय शास्त्रज्ञांपैकी एक होते. २०११ साली, वयाच्या ८७व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अमेरिकेतील लोकांनी वर्णभेदाचा कळस गाठलेला असताना त्यांनी शांतता आणि मानवी प्रतिष्ठेला प्राधान्य दिले. आज अशा शास्त्रज्ञांचीच जगाला गरज आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एडविन एच. आर्मस्ट्राँग – एफएम रेडियो तंत्रज्ञानाचा ‘अनसंग हिरो’

Next Post

त्यादिवशी दुबईत सचिन नावाचं डेझर्ट स्टॉर्म आलं आणि कांगारुंची धूळधाण उडाली

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

त्यादिवशी दुबईत सचिन नावाचं डेझर्ट स्टॉर्म आलं आणि कांगारुंची धूळधाण उडाली

आजही कित्येक लोक ॲझटेकच्या शापित खजिन्याच्या शोधात आपलं आयुष्य पणाला लावतायत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.