The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१३ जणांना वाचवण्यासाठी १० हजार लोकांच्या टीमने जगातलं सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन केलं होतं

by द पोस्टमन टीम
5 October 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१०० हून अधिक डायव्हर्स, शेकडो कार्यकर्ते, जगभरातील सुमारे १०० सरकारी संस्थांचे प्रतिनिधी, ९०० पोलीस अधिकारी, २ हजार सैनिक, दहा पोलीस हेलिकॉप्टर, सात रुग्णवाहिका, ७००हून अधिक डायव्हिंग सिलिंडर आणि एक अब्ज लिटरपेक्षा जास्त पाणी उपसण्याची क्षमता असणारे पंप, असा हा भव्य लवाजमा २०१८ साली एक मोहिम पूर्ण करण्यासाठी झटत होता.

१० हजारपेक्षा जास्त जणांचा समावेश असलेल्या या बचाव पथकातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील कदाचित ती सर्वात धोकादायक आणि अविस्मरणीय मोहिम असावी. एका गुहेत अडकलेल्या १३ जीवांना सुखरूप बाहेर काढण्याच्या प्रयत्नांत हे लोक होते. अनेक संकटांचा सामना केल्यानंतर बचाव पथकाच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि जणू संपूर्ण जगानं सुटकेचा नि:श्वास सोडला! हे वर्णन वाचताना जर तुम्ही ते व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न केला तर, तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.

या थरारक घटनाक्रमाची सुरुवात एका वाढदिवसामुळं झाली होती, असं सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र, ही गोष्ट एक खरी आहे. शनिवारी २३ जून २०१८ रोजी, ‘नाईट सोमपिआंगजाई’ या मुलाचा १७वा वाढदिवस होता. पण, त्याला त्या दिवशी रात्री घरी जाण्याची मुळीच घाई नव्हती. कारण त्याला तर आपल्या स्थानिक फुटबॉल संघातील (वाईल्ड बोअर) मित्रांसह बाहेर फिरस्ती करायची होती. सोबत त्यांचे सहाय्यक प्रशिक्षकसुद्धा होते. फुटबॉलचा नियमित सराव संपवून या टोळक्यानं आपल्या सायकलींना टांग दिली अन् भर पावसाळी वातावरणात जंगलानं आच्छादलेल्या टेकड्या गाठल्या.

माय साय जिल्ह्यातील पर्वत रांगेत वसलेली आणि परिसरातील बहुतेक मुलांचा आवडता अड्डा असलेली ‘थॅम लुआंग गुहा’, हे त्यांचं इच्छित ठिकाण होतं. तिथे गेल्यानंतर त्यांनी गुहेत प्रवेश केला. फिरता-फिरता ते ८ किलोमीटरपर्यंत आत शिरले. त्यावेळी त्यांच्याकडे फक्त टॉर्च होत्या. कारण, मौजमजा करून नाईट सोमपिआंगजाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या घरी जाण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, निसर्गाला त्यांचं हे नियोजन मान्य नव्हतं! अचानक सुरू झालेल्या पावसामुळं व पुराच्या पाण्यामुळं १२ मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक गुहेत अडकले.



बेपत्ता मुलांच्या पालकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यांना गुहेच्या बाहेर मुलांच्या सायकल्स आढळल्या. आपली मुलं गुहेतच बेपत्ता झाल्याची पालकांना खात्री झाल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून मदतीसाठी याचना केली. अल्पावधीतच शोध मोहिम सुरू करण्यात आली.

थाई नेव्ही सील, राष्ट्रीय पोलीस दल आणि इतर बचाव पथकांना पाचारण करण्यात आलं. काही स्थानिक स्वयंसेवकांनी शोध मोहिमेत प्रवेश केला. मात्र, निसर्गाचं रौद्र रूप पाहता, आपण खरंच जीवांचा शोध घेत आहोत की मृतदेहांचा, याची शाश्वती त्यावेळी कुणालाही नव्हती.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

गुहेमध्ये मुलांचा शोध घेणं हे मोठं आव्हान होतं. मुलांचा ठिकाणा शोधण्यासाठी ड्रोन, थर्मल सेंसर्सची मदत घेण्यात आली. अगदी गुहेच्या माथ्यावर श्वान देखील फिरवण्यात आले मात्र, त्यांना शोधण्यात यश येत नव्हतं.

नौदलाच्या डायव्हर्सना गुहांमध्ये काम करण्याचा फारसा अनुभव नव्हता. सुरू असलेल्या पावसामुळं गुहेतील पाण्याची पातळी सातत्यानं वाढत होती. पाण्याचा उपसा करण्यासाठी इंजिनियर्स जीवाचं रान करत होते. अशातच वाईल्ड बोअर संघाचा सदस्य असलेला एक मुलगा थाई नेव्ही सीलसाठी आशेचा किरण बनला.

त्यादिवशी काही कारणामुळं तो इतर मुलांसोबत गेला नव्हता. त्या मुलानं त्यांच्या ग्रुपचं गुहेमधील आवडतं ठिकाण सांगितलं. या माहितीच्या आधारे गुहेतील मुलांचं ठिकाण काय असावं, याचा अंदाज बांधण्यात आला.

माध्यमांनी ही बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवली आणि त्यानंतर सुरू झाली जगातील सर्वांत थरारक रेस्क्यू ऑपरेशनची मोर्चेबांधणी. घटनेचं स्वरूप आणि गांभीर्य पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीचा ओघ सुरू झाला. २८ जूनला आंतरराष्ट्रीय बचावकर्त्यांचं पहिलं पथक घटनास्थळी दाखल झालं.

या पथकामध्ये अमेरिकन हवाई दलातील बचाव तज्ज्ञ, यूके, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, स्कॅन्डिनेव्हिया आणि इतर अनेक देशांतील डायव्हर्सचा समावेश होता. हे सर्व डायव्हर्स समुद्री गुहा पालथ्या घालण्यात निष्णात होते. त्यांनी आपला जीव आणि सर्व कौशल्य पणाला लावून मुलांचा शोध सुरू केला. 

२ जुलै रोजी दोन ब्रिटिश डायव्हर्सच्या प्रयत्नांना यश आलं. जॉन वोलेन्थन आणि रिक स्टॅन्टन या दोघांनी मुलांचा यशस्वीपणे माग काढला. सर्व १२ मुलांसह त्यांचे प्रशिक्षक जिवंत होते! जॉन आणि रिकनं त्या मुलांसोबत आणखी टॉर्च सोडले. त्यांना वाचवण्यासाठी मदत घेऊन येण्याचं आश्वासन देऊन ते डायव्हर्सच्या तळावर परतले. मुलांच्या शोधादरम्यानचा एक व्हिडिओ जॉनच्या डोक्यावरील कॅमेऱ्यात कैद झाला होता. तो पाहून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

मुलांचा शोध लागला असला तरी खरं आव्हान तर पुढे होतं. या सर्वांना बाहेर काढायचं कसं? हा गहन प्रश्न होता. तोपर्यंत लष्करातील एक डॉक्टर आणि नेव्ही सील डायव्हर्सचं एक पथक मुलांना सोबत म्हणून पाठवण्यात आलं. 

दरम्यान, एक अशी घटना घडली की, ज्यामुळं बचाव मोहिमेत चिंतेची लहर पसरली. स्वयंसेवक म्हणून मोहिमेत दाखल झालेले माजी नेव्ही सील डायव्हर सॅमन कुनन यांचा ६ जुलै रोजी मृत्यू झाला. अडकलेल्या मुलांसाठी एअर टँक देण्याचं महत्त्वाचं काम करत असताना अचानक सॅमनचा स्वतःकडील ऑक्सिजन संपला व बेशुद्ध झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, तोपर्यंत सॅमनचा मृत्यू झाला होता.

सॅमन कुनन

आपल्या देशाचं भविष्य वाचवताना एका ३८ वर्षीय ‘हिरो’ने जीव गमावला. सॅमन अतिशय तंदुरुस्त आणि निरोगी डायव्हर होते आणि ट्रायथलॉनमध्ये थायलंडचं प्रतिनिधित्व देखील केलं होतं.

सॅमनच्या मृत्यूनं चिंता तर वाढली होती. मात्र, बचाव पथकातील प्रत्येक व्यक्तीनं स्वत:ला मानसिकरित्या खंबीर केलं होतं. हाती घेतलेलं काम अधुरं सोडायचं नाही, असा प्रणच त्यांनी घेतला होता. पडणारा पाऊस आणि पुराचं पाणी पाहता साधारण १० जुलैपर्यंत गुहा पूर्णपणे पाण्यात जाण्याची शक्यता होती. याठिकाणी आता इंजिनियर्सचा कस लागणार होता. 

गुहेतील पाणी उपसण्यासाठी किर्लोस्कर ब्रदर्सचं तंत्रज्ञान प्रभावी ठरेल, अशी सुचना भारतीय दूतावासानं थायलंडच्या अधिकाऱ्यांना केली. त्यानंतर थायलंडनं किर्लोस्कर कंपनीकडे मदत मागितली. कंपनीनं तत्काळ भारत, थायलंड आणि युनायटेड किंगडममधील कार्यालयांमधून इंजिनियर्स आणि यंत्रसामुग्री घटनास्थळी पाठवली. किर्लोस्करनं भारतातून सात तज्ज्ञांची टीम थायलंडला पाठवली होती. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील प्रसाद कुलकर्णी आणि पुण्यातील श्याम शुक्ला यांचा समावेश होता. कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी उपसण्याचं काम सुरळीत ठेवण्याचं आव्हान इंजिनियर्सला पार पाडावं लागणार होतं.

पाणी उपसा सुरू असताना, सील्स आणि डायव्हर्स मुलांना बाहेर काढण्याचं काम करणार होते. टप्प्या-टप्प्यानं मुलांना बाहेर काढण्याची योजना तयार करण्यात आली. पहिला टप्पा, मुलांच्या गुहेतील खडकाळ भागातून चेंबर तीनपर्यंत आणण्याचा होता. हे सर्वांत कठीण काम होतं.

डायव्हर्सनी हाडं गोठवणाऱ्या थंड पाण्यातून मार्ग काढत मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. प्रत्येक मुलाला पूर्ण चेहरा झाकेल असा एअर मास्क देण्यात आला होता. दोन डायव्हर्सच्यामध्ये एक मुलगा क्लिप्सनं जोडला गेला होता. १२ मुले आणि प्रशिक्षकाला चेंबर तीनपर्यंत सुखरूपपणे आणलं गेलं.

गुहेमध्ये अडकलेली फुटबॉल टीम

त्यानंतर दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. प्रत्येक मुलाला स्ट्रेचरवर सुरक्षित ठेवण्यात आलं एका स्ट्रेचरसोबत किमान पाच जणांची टीम होती. जास्त पाण्याच्या ठिकाणी तराफ्यांवर स्ट्रेचर ठेवून पाण्यातून मार्ग काढण्यात आला. अशा प्रकारे एक-एक करून मुलांना गुहेच्या बाहेर आणलं गेलं. तब्बल १८ दिवसांनंतर या मुलांनी नैसर्गिक उजेड पाहिला होता. हजारो लोकांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं होतं.

ही चित्तथरारक घटना २३ जून ते १० जुलै या १८ दिवसांच्या कालावधीत थायलंडमधील नागरिकांसह संपूर्ण जगानं अनुभवली. याच १८ दिवसांच्या कालावधीत जगातील प्रत्येक राष्ट्रानं एकमेकांची माणुसकी अनुभवली. जिद्द, मैत्री, अथक प्रयत्न, तंत्रज्ञान, विश्वास, सहकार्य यांना एकत्रितपणे यश आलं होतं.

माजी नेव्ही सील डायव्हर सॅमन कुनन यांना मात्र थायलंडचे लोक आणि सरकार कधीही विसरू शकत नाहीत. त्यांच्या सन्मानार्थ थायलंडमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.

सॅमन कुनन स्मारक

 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

‘एमआयटी’मधील संगणकाने ‘विश्वाच्या अंताची’ भविष्यवाणी केली आहे.

Next Post

एक्सप्लेनर: सचिन तेंडुलकरचं नाव आलेलं पँडोरा पेपर्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

एक्सप्लेनर: सचिन तेंडुलकरचं नाव आलेलं पँडोरा पेपर्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

महासत्ता असलेल्या ब्रिटनला अफगाणिस्तानातून पळता भुई थोडी झाली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.