The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मेल्यानंतर हॉर्स रेस जिंकणारा हा जगातला एकमेव जॉकी आहे..!

by द पोस्टमन टीम
26 January 2026
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


इतिहासामध्ये अशा काही यो*द्ध्यांबद्दल आपण ऐकलं असेल, ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या हातातील शस्त्र खाली टाकलं नाही. मात्र, असं कधी ऐकलं आहे का? घोडेस्वाराचा मृत्यू होऊनही तो शर्यंत जिंकला! १९२३ साली अमेरिकेत अशी गोष्ट घडली होती. अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकांमध्ये हॉर्स रेसिंग खूप लोकप्रिय होती. इंग्लंडमध्ये तर अजूनही या खेळाची लोकप्रियता कमी झालेली नाही.

स्पोर्ट्स बेटिंगमुळं इंग्लंडबरोबरच अमेरिकेतदेखील हॉर्स रेसिंग खूप लोकप्रिय झाली होती. घोड्यांवर सट्टा लावणे ही त्याकाळात जुगाराची सर्वात आकर्षक पद्धत होती. हॉर्स रेसिंगच्या इतिहासात क्रीडा जगताला आश्चर्यचकित करतील अशा अनेक कथा आहेत. परंतु फ्रँक हेस या जॉकीच्या कथेला टक्कर देईल, अशी एकही रंजक गोष्ट शोधून सापडणार नाही. या गोष्टी मागची गोष्ट काय होती? आणि मृत्यूनंतर रेस जिंकणारी व्यक्ती कोण होती? हे आपण जाणून घेऊया.

प्रोफेशनल हॉर्स रेसिंगमध्ये जी व्यक्ती घोडा चालवत असते तिला जॉकी म्हटलं जातं. हॉर्स रेसिंगचे व्हिडिओ किंवा इव्हेंट् पाहून जॉकी होणं अतिशय सोपं वाटू शकतं. आता त्याबाबत प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक ठिकाणी सुविधा देखील आहेत. मात्र, १९व्या शतकाच्या सुरुवातीला जॉकी बनणं खरोखर कठीण होतं. 

रेसच्या रँकमध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला घोड्यांच्या सानिध्यात राहणं, त्यांना समजून घेणं आणि त्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. १९०१मध्ये जन्मलेल्या फ्रँक हेसनं आपल्या लहानपणापासून एक यशस्वी जॉकी होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्याला घोड्यांचं प्रचंड आकर्षण होतं. त्यादृष्टीनं त्यानं काम करण्यास सुरुवात केली होती. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत जॉकींसाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करण्यात तो यशस्वी झाला होता. घोड्यांची काळजी घेणं आणि आगामी शर्यतींसाठी त्यांना प्रशिक्षण देणे अशी काम तो करत असे.



जेव्हा फ्रँकनं वयाच्या २२ व्या वर्षात पदार्पण केलं तेव्हा त्या आयुष्यात एका ‘लेडी लक’नं प्रवेश केला. ती कुणी मुलगी नव्हती तर ती एक सात वर्षांची घोडी होती. तिचं नाव ‘स्वीट किस’ होतं. तिनं आतापर्यंत एकही रेसं जिंकलेली नव्हती. त्यानं कित्येक महिने मेहनत करून स्वीट किसला प्रशिक्षण दिलं. त्यानं घोडीला आणि तिच्या क्षमतेला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. इतकं करूनही फ्रँकचा बॉस घोडीच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता. शिवाय, कोणताही चांगला जॉकी आतापर्यंत एकही रेस न जिंकलेल्या घोडीवर स्वार होण्यास तयार नव्हता.

मात्र, स्वीट किसची शारीरीक क्षमता किती आहे, हे फ्रँकला चांगलंच माहिती होतं. म्हणून फ्रँकनं स्वत: स्वीट किससोबत पुढील रेसमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यानं आपल्या बॉसची देखील मनधरणी केली. तरी देखील फ्रँकसमोर आणखी एक समस्या होती. हॉर्स रेसमध्ये सहभागी होण्याऱ्या जॉकीचं वजन जास्तीत जास्त १३० पौंड असावे लागतं. नाहीतर जॉकीच्या वजनाचा भार घोड्यावर पडतो आणि जिंकण्याची शक्यता कमी होते.

फ्रँकचं वजन १४२ पाउंड होतं. रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला १२ पाउंड वजन कमी करण्याची गरज होती. त्यानं दोन आठवड्यात १२ पाउंड वजन कमी केलं. जेव्हा केव्हा मोकळा वेळ मिळत असे तेव्हा तो रनिंग करत असे.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

४ जून १९२३ रोजी न्यूयॉर्कमधील एल्मोंट येथील बेल्मोंट पार्कमध्ये रेस होणार होती. बेल्मोंट पार्कमधील रेस ट्रॅक १९०५ मध्ये बांधला गेलेला आहे. तेव्हापासून अगदी आजपर्यंत या ठिकाणी घोड्यांच्या शर्यती होतात. ज्यादिवशी फ्रँक हेस रेसमध्ये उतरणार होता त्या दिवसापर्यंत तो आपलं वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा जाणवत होता तरी देखील तो रेसमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयावर ठाम होता.

शर्यत सुरू होताच स्वीट किस चांगल्या पोझिशनवर गेली. शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी घेऊन स्वीट किसनं आपला विजय मिळवला. मात्र, या विजयाच्या काही मिनिटांपूर्वी एक अविश्वसनीय घटना घडली होती. ज्याबाबत कुणालाही कल्पना नव्हती. शर्यतं संपण्याअगोदरच फ्रँक हेसचा मृत्यू झाला होता. मात्र, तरी देखील त्याचं शरीर खोगीरावर टिकून राहण्यात यशस्वी झालं होतं.

शर्यतीदरम्यान हेसचा मृत्यू झाल्याचं कोणाच्याही लक्षात आलं नाही. काहींना वाटलं त्यानं गंमत म्हणून एका हातानं खोगीर पकडलं आहे. स्वीट किसनं विनिंग लाईन क्रॉस केल्यानंतर फ्रँक हेस खाली पडला. तेव्हा देखील अनेकांना वाटलं तो थकल्यामुळं तोल जाऊन खाली पडला. मात्र, त्यानंतर बराच काळ उलटूनही हेस उठत नसल्यानं काहीतरी गडबड असल्याची जाणीव उपस्थितींना झाली.

त्या दिवशी ट्रॅकवर उपस्थित असलेल्या डॉक्टर जॉन ए. वुरहेस यांनी फ्रँकला तपासण्यासाठी धाव घेतली पण तो त्यापूर्वीच मृत झाला होता. हृदयविकाराचा झटका आल्यामुळं त्याचा मृत्यू झाला असावा, असं प्राथमिक तपासणीत सांगण्यात आलं. मात्र, तत्काळ वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या व्यापक प्रशिक्षणामुळंच तो हृदयविकाराचा झटका आला याची नंतर पुष्टी झाली. अशा प्रकारे वजन कमी करण्याची पद्धत जॉकींसाठी असामान्य नव्हती पण, त्यामुळं त्या दिवसापर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नव्हता.

आपला विजय पाहण्यासाठी फ्रँक हेस जिवंत नव्हता. मात्र, त्याचं लोकप्रिय जॉकी बनण्याचं स्वप्न आणि स्वीट किस शर्यत जिंकू शकते या गोष्टी सत्यात उतरवण्यात तो यशस्वी झाला होता. ज्यांनी स्वीट किसवर पैसा लावला होता त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ झाला होता. इतकंच नाही तर फ्रँक हेसच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.

मृत्यूनंतर रेस जिंकण्याचा विक्रम करणारा तो पहिला व्यक्ती ठरला. रेस करताना फ्रँकचा मृत्यू झाल्यानं स्विट किसला ‘स्वीट किस ऑफ डेथ’ असं नाव पडलं. म्हणून त्या दिवसापासून इतर कुठल्याही जॉकीनं तिच्यावर स्वार होण्याचं धाडस दाखवलं नाही. परिणामी तिला जबरदस्ती निवृत्ती देण्यात आली. मृत्यू झाल्यानंतर एका आठवड्यानं फ्रँक हेसला त्याच रायडिंग सिल्कमध्ये दफन करण्यात आले जे त्यानं त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या रेससाठी घातले होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चुकीच्या तपासामुळे एका निर्दोष माणसाला ‘फाशी’ देण्यात दिली होती..!

Next Post

वाचा दर सहा महिन्यांनी आपला देश बदलणाऱ्या फिझंट आयलंडबद्दल..!

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

वाचा दर सहा महिन्यांनी आपला देश बदलणाऱ्या फिझंट आयलंडबद्दल..!

वाचा आपण खातो त्या अन्नातील कॅलरीज कशा मोजल्या जातात..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.