The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माल्ल्या-मोदींचे आदर्श – ही आहेत जगातील सर्वात जुनी बुडीत कर्ज खाती

by द पोस्टमन टीम
19 December 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कर्ज म्हणजे जड ओझं वाटत असलं तरीही, कर्जामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते. पैशांचा योग्य कारणांसाठी वापर होतो. व्यवहार साचून राहत नाहीत आणि भरभराटीचा मार्ग मोकळा होतो. आजही बाजारात मंदीसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास बँका व्याजदर कमी करतात आणि त्यामुळे साचलेल्या पैशाला गती मिळते. कर्जाचा वापर आपण आज करीत असलो तरीही ही काही आधुनिक संकल्पना नाही. अगदी प्राचीन काळापासून वेगवेगळ्या स्वरुपात कर्ज दिली आणि घेतली जात होती.

मोठ्या मोठ्या यु*द्धाच्या वेळी अमाप पैशाची गरज पडत असे. तेव्हासुद्धा वेगवेगळे देश एकमेकांकडून कर्ज घेत. पण यु*द्धामुळे एवढा वि*ध्वंस झाल्यानंतर ती कर्ज फेडणं कसं शक्य होत असेल?

माणसाचं आयुष्य जरी साधारण शंभर वर्षाचं असलं तरीही, आज जगात पाच हजार वर्षे जुनी कर्जसुद्धा अस्तित्वात आहेत. या अशा व्यवहारांची हाताळणी कोण करीत असेल याबद्दल जाणून घेऊयात.

यु*द्धाच्या काळात होणाऱ्या खर्चासाठी कर्ज घ्यावे लागत असे. पण यु*द्धानंतर मात्र दोन्ही सहभागीदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता. कारण जो देश यु*द्ध हरला त्याचे तर आधीच प्रचंड नुकसान झालेले असे, त्यातून पुन्हा उभं राहण्यासाठी त्या देशाला कर्ज उभारणी करावी लागत होती आणि जिंकलेल्या देशालासुद्धा पराभूताला नुकसानभरपाई द्यावी लागे, त्यामुळे तोसुद्धा कर्जबाजारी होत असे. त्यानंतर या कर्जाऊ रकमेची परतफेड काही दशकं, कधीकधी तर चक्क काही शतकं सुरू राहत होती.



जगभरातील अशा सहा देशांची उदाहरणे येथे सांगता येतील, जे गेल्या कित्येक वर्षापासून कर्जाचे हप्ते भरत आहेत. त्यातील काही प्रकरणं तर काळाच्या ओघात लुप्तसुद्धा झाली, पण बऱ्याच प्रकरणांच्या बाबतीत अजूनही कोर्टात खटले सुरू आहेत.

इतिहासातील काही तज्ज्ञांच्या मतानुसार ही प्राचीन कर्ज देणारे लोक तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीची आहेत. आतापर्यंत माहित असलेल्या कर्जापैकी हे कर्ज सर्वांत जुनं असल्याचं मानण्यात येतं. हम्मुराबीतील एका सांकेतिक भाषेतील मजकूरातून या कर्जाचा संदर्भ मिळतो.

हा मजकूरसुद्धा जवळपास चार हजार वर्षांपूर्वीचा असावा. त्यात असं लिहिलंय की,  ‘The creditor may not take barely from the debtors house without his consent.’ यावरून आपल्याला अंदाज येतो की कर्ज व्यवहारातील काही मूलभूत नियम किती पुरातन काळापासून ठरवले गेले आहेत.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

आज जरी कर्ज सहज उपलब्ध होत असली तरीही प्राचीन काळी त्याचे महत्त्व आणि अर्थसुद्धा वेगळे होते. कर्ज हा प्रकार बऱ्याच संक्रमणांमधून गेलेला दिसतो. कृषिप्रधान समाजात कर्ज म्हणजे गुलामगिरीच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल मानण्यात येत होते. मुळात कर्ज हा विषय खूपच गांभीर्याने घेतला जात असे, कारण एकदा का कर्जापायी एखाद्याने त्याची सगळी मालमत्ता गमावली की त्याला वेठबिगारी करण्यावाचून पर्यायच उरत नव्हता. त्याला त्याचे संपूर्ण कर्ज फिटेपर्यंत सक्तीने काम करावे लागत असे, शिवाय ज्याने त्याला कर्ज दिले आहे तो कर्जदाराचे सगळे अधिकार हिरावून घेऊन त्याला आपला गुलाम करीत असे.

जगाच्या इतिहासात कर्जाने नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. पण इतिहासाकडे कर्जाच्या दृष्टिकोनातून फारसं कोणी पाहिलेलं आढळत नाही. इतिहासाची ही बाजू कायम काळोखात राहिली, कारण जे लोक या कर्जाचे साक्षीदार होते ते स्वतः कर्जापायी बेघर झाले. हे कर्ज एखाद्या व्यक्तीने घेतलेलं असू देत किंवा देशाने घेतलेलं असू देत कर्जात बुडाल्यामुळे संपूर्ण विनाश  झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात बघायला मिळतात.

अशाच काही उदाहरणांपैकी एक म्हणजे, सतराव्या शतकातील  एका डच नाविक दलाने घेतलेले कर्ज. या दलाचे नाव फारच लांबलचक आहे, Hoogheemradschap van de Lekdijk Bavendams !!! 

या नाविक दलावर धरणातील पाण्याची पातळी सांभाळण्याची जबाबदारी होती. त्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. त्याने धरणाची दुरुस्ती करण्यासाठी निधी उभा करायला कर्जाचे पहिले बिल पास केले. त्यानंतर लेक नदीवर खांब उभारण्यासाठी त्यांनी १६४८ साली दुसरे बिल काढले. या बिलाची किंमत या काळात ५०० डॉलर्सपेक्षा जास्त होती. या कर्जाचे पुढे काय झाले हे जरा आश्चर्यकारकच आहे! येल युनिव्हर्सिटीने तब्बल पंचवीस हजार डॉलर मोजून ही जुनी कर्जाची बिले खरेदी केली आहेत.

ही ३६८ वर्षापूर्वीची बिले ऐतिहासिकदृष्ट्या त्यांच्यासाठी महत्त्वाचा ऐवज होती. विशेष म्हणजे कर्जाचे हे प्रकरण अजूनही निकालात काढले गेलेले नाही. हे कर्ज आजही थकीत आहे!

ब्रिटनमधील आणखी एक असेच जुने कर्ज प्रकरण आहे. २०१४ साली ब्रिटीश सरकारने या जुन्या कर्जाची काही रक्कम भरणा करण्याचे ठरवले. हे कर्ज अठराव्या शतकातील आहे. १९२७ साली ब्रिटनचे पंतप्रधान स्टॅनले यांनी या कर्जाची चार टक्के रक्कम भरायचे ठरवले, पण आश्चर्य म्हणजे ही रक्कम ब्रिटनने पहिल्या महायु*द्धाच्या वेळी घेतलेल्या एकूण कर्जापेक्षाही जास्त होती. नेपोलियनच्या काळातील आणि क्रिमियन यु*द्धाच्या काळातील कर्ज वरच्या बिलात मिसळली होती म्हणून तरी बरे!

१८४७ साली घेतलेल्या कर्जामुळेच आयर्लंडला दुष्काळाचा सामना करावा लागला.

त्याचप्रमाणे १७२० सालात साउथ सी बबल म्हणून ओळखलं जाणारं मोठं आर्थिक संकट ब्रिटनमध्ये आलं होतं, त्यावेळी घेतलेलं कर्जसुद्धा ब्रिटनमधील एक प्राचीन कर्ज आहे.

१९१९च्या व्हर्सायचा तहाबद्दल आपण ऐकलं असेलच. पण या तहाने जर्मनीवर कर्जाचा डोंगर लोटून दिला हे फार कमी लोकांना माहीत आहे.

यातील गिल्ट कलमानुसार जर्मनीला महायु*द्धासाठी जबाबदार धरलं गेलं, आणि त्याची नुकसानभरपाई म्हणून चारशे बिलियन डॉलर किमतीच्या सोन्याची मागणी करण्यात आली, आणि एवढ्या कर्जाची फेड करण्यासाठी जर्मनीला नव्या नोटा छापायला लागल्या. त्याची परतफेड जर्मनीने २०१० साली पूर्ण केली. म्हणजे हे कर्ज घेतल्यानंतर तब्बल ९१ वर्षानंतर फेडलं गेलं!

१७९१ साली कॅरिबियन बेटावर, आफ्रिकेतील गुलामांनी त्यांच्या मालकांविरुद्ध बंड केलं. १८०४ साली या बंडखोरांनी हैती प्रजासत्ताक स्थापन केले. पण अमेरिका आणि युरोपातील देशांनी हैतिला स्वतंत्र राष्ट्राची ओळख देण्यास नकार दिला. या परिस्थितीचा फायदा घेत फ्रान्सने आपल्या यु*द्धनौका हैतिच्या किनाऱ्यावर पाठवल्या.

 यु*द्धांचं संकट आल्यामुळे हैती सरकारने फ्रान्सबरोबर एक करार केला. त्यानुसार हैतिने फ्रान्सला मोठ्या प्रमाणात सोनं पाठवलं. ही रक्कम हैतीच्या वार्षिक उत्पन्नाच्या पाच पट जास्त होती. आणि १९४७ पर्यंत हैती फ्रान्सला ही रक्कम पूर्णपणे देऊ शकला नव्हता. म्हणजे तब्बल १२० वर्षानंतरसुद्धा हे कर्ज फेडलं गेलं नाही. फ्रान्सने कपटाने वसूल केलेली रक्कम परत करावी यासाठी तिथे आजही मोर्चे निघत असतात.

वर्षानुवर्षे लोक या यु*द्धांचे कर्ज फेडतायत! कमाल आहे ना!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

एकेकाळी बाजारात ज्यांची विक्री केली जायची त्या गुलामांनीच भारतावर राज्य केलं होतं!

Next Post

या कारणामुळे खजुराहोच्या मंदिरावर ‘तशी’ शिल्पे कोरली आहेत

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या कारणामुळे खजुराहोच्या मंदिरावर 'तशी' शिल्पे कोरली आहेत

ऑनलाईन 'मनी ॲप'मधून कधीच कर्ज काढू नका, आयुष्यभर पश्चात्ताप होईल

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.