The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

१८५७ च्या आधी ब्रिटीशांच्या विरुद्ध केलेला उठाव आपल्या विस्मरणात गेलाय

by द पोस्टमन टीम
1 April 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारतात स्वातंत्र्यासाठीचे पहिले यु*द्ध हे १८५७ साली लढण्यात आले, असं आपण वाचलं असेलच. पण याअगोदर देखील एक असे यु*द्ध झाले होते, ज्या यु*द्धाने इंग्रजांना भारतावर राज्य करणे इतके देखील सोपे नाही, हे दाखवून दिले होते. १८१७ साली ओडिशामधे हे यु*द्ध लढण्यात आले होते. याला भारताच्या इतिहासातील पहिला विद्रोह मानले जाते.

आज याच ‘पाईका’ विद्रोहाविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

पाईकाचे स्वातंत्र्ययु*द्ध बक्शी जगबंधू विद्याधर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश राजसत्तेच्या विरोधात ओडिशामध्ये लढण्यात आले. पाईकाच्या या यु*द्धात सामान्य जनतेने ब्रिटीशांना चांगलीच अद्दल घडवली होती.

ब्रिटीशांनी ओडिसाच्या उत्तरेला असलेल्या बंगाल आणि दक्षिणेला असलेल्या मद्रास प्रांतावर आपले वर्चस्व निर्माण केल्यानंतर १८०३ साली ओडिसावर अधिपत्य प्रस्थापित केले. या काळात इंग्रजांनी कररचनेत बदल करत सामान्य जनतेची पिळवणूक करण्यास सुरुवात केली. यामुळे सामान्य जनतेच्या मनात ब्रिटीशांच्या विरोधात असंतोष निर्माण होऊ लागला.



त्यावेळी गजपती घराण्याचा राजा मुकुंददेव द्वितीय हा अल्पवयीन शासक ओडिसावर राज्य करत होता. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी ज्या जय राजगुरूवर होती, त्याने ब्रिटिशांना विरोध केल्यावर अत्यंत अमानुषपणे त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले.

यानंतर काही काळाने गजपती राजघराण्याच्या सैन्यदलाच्या तुकड्यांचा प्रमुख असलेल्या बक्शी जगबंधूने आदिवासी यो*द्ध्यांना व इतर वर्गातील सैन्याला एकत्र करत ब्रिटीशांच्या विरोधात बंड पुकारले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

ब्रिटिश सत्तेच्या विरोधात पाईका विद्रोहाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

पाईका हे कुठल्या स्थळाचे नाव नसून भुवनेश्वर जवळील शेतकऱ्यांच्या असंघटीत सैन्य दलाला पाईका म्हटले जात होते. हे लोक यु*द्धाच्या वेळी राजाला सेवा पुरवण्याचे काम करायचे. उरलेल्या वेळात शेती करायचे.

सैन्य दलातील योगदानासाठी या शेतकऱ्यांना गजपती राजे करातून सवलत देखील द्यायचे. त्यांना राज्यात विशेष सन्मान मिळायचा.

पण, १८०३ साली ब्रिटिशांनी सत्ता हस्तगत केल्यावर त्यांनी त्या शेतकऱ्यांची जमीन काढून घेतली आणि त्यांनी राज्याच्या कर प्रणालीत मोठे बदल केले. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर होत चालली होती. पाईका समुदाय आणि अन्य छोटे वर्ग देखील त्रस्त होते. ब्रिटीशांच्या विरोधात या वर्गात  मोठा असंतोष खदखदत होता. या असंतोषाच्या भावनेतून या समुदायाने ब्रिटीशांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला.

१८१७ साली वणवा पेट घेत होता. असंतोष भडकण्यामागे फक्त आर्थिक कारणे नव्हती, काही धार्मिक कारणे देखील होती. ओडिशाच्या गजपती शासकांना पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे संरक्षक मानले जात होते. गजपती शासक हे ओडिशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वाचे रक्षक होते. यामुळे पाईका समुदायाच्या मनात या राजांविषयी श्रद्धा होती. ज्यावेळी ब्रिटीशांनी जय राजगुरू या गजपती घराण्याच्या संरक्षकाची ह*त्या केली, त्यावेळी हे लोक पेटून उठले.

खोंड नावाचा एक आदिवासी समुदाय यामुळे नाराज झाला व तो समुदाय देखील पाईकांसोबत ब्रिटीशांच्या विरोधात बंड पुकारण्याची तयारी करू लागला. हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी बक्शी जगबंधू विद्याधर यांना आपला सेनापती म्हणून निवडले.

मार्च १८१७ मध्ये पाईक व खोंडांनी ब्रिटीशांच्या बनापूर येथील कॅम्पवर ह*ल्ला केला, इथे त्यांनी ब्रिटीश राजवटीच्या खुणा नष्ट करण्यास सुरुवात केली. पोलीस स्टेशन, सरकारी इमारती आणि सरकारी कोष या बंडखोर यो*द्ध्यांनी त्याब्यात घेतला. या विद्रोहाला शेतकरी वर्गाचे समर्थन मिळाले होते.

हा विद्रोह काही काळात पुर्ल, पिपली आणि कटक या भागात देखील पसरला. यात झालेल्या चकमकीत विद्रोही गटाने ब्रिटीशांच्या एका लेफ्टनंटला मारले. पुढे त्यांनी १२ एप्रिल १८१७ रोजी पुरीवर ह*ल्ला केला. तिथे असलेल्या अनेक ब्रिटीश अधिकारी व सैनिकांना मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त केले.

आता हा विद्रोह कुठल्याही प्रकारे दाबायचा एवढंच ब्रिटीशांच्या डोक्यात होतं. त्यांनी या सर्व विद्रोही गटांवर प्रतिकारात्मक ह*ल्ला चढवत, अनेकांना जेलमधे घालण्यास सुरुवात केली. कित्येकांनी ब्रिटीशांच्या गोळीबारात आपला जीव गमावला.

क्रांति पेटली तेव्हा विद्रोही सैन्याने लढाईत विजय मिळवण्यास सुरुवात केली होती, पण नंतर पारडे फिरले आणि इंग्रजांची बाजू अधिक मजबूत होऊ लागली. ऑक्टोबर १८१७ मध्ये क्रांति यशस्वी झाली नाही म्हणून अनेक सेनानींनी पळ काढला आणि १८१९ साली ब्रिटीशांच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने यु*द्ध करण्यास सुरुवात केली. पण ब्रिटीशांनी या सगळ्यांना पकडले आणि हाल हाल करून संपवले.

बक्शी जगबंधू हे १८२५ साली ब्रिटीशांच्या तावडीत सापडले. पाईका आणि खोंड समुदायाच्या या एल्गाराने ब्रिटिशांना धक्का बसला होता. भारतातील लोक देखील त्यांच्या सत्तेला आव्हान देऊ शकतात हे त्यांच्या लक्षात आले होते.

पाईकांचे हे स्वातंत्र्ययु*द्ध अनेक वर्ष दुर्लक्षित राहिले. भारताच्या इतिहासात देखील या अपरिचित क्रांतीला स्थान मिळू शकले नाही. पण गेल्या काही वर्षांत हा अपरिचित इतिहास आणि ब्रिटीशांविरुद्ध लढलेल्या या अपरिचित वीरांचे नाव जगासमोर आले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अमेरिकेने त्यादिवशी ओमाहा बेट तर जिंकले, पण…

Next Post

राजा मार्तंड वर्मांनी डचांना पराभूत करून हिंदुस्थानातून हाकलून लावलं होतं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

राजा मार्तंड वर्मांनी डचांना पराभूत करून हिंदुस्थानातून हाकलून लावलं होतं

हा माणूस नसता तर आपल्याला गणित अजून अवघड गेलं असतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.