The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अनेकांना माहिती नाही पण अमेरिकेलासुद्धा एक सम्राट होता

by द पोस्टमन टीम
26 May 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


काही लोकांभोवती त्यांच्या कामामुळे, व्यक्तिमत्वामुळे, वागण्याच्या तऱ्हेवाइक पद्धतीमुळे एक गुढतेचे वलय निर्माण होते. कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या भोवतीचे हे वलय पूर्णतः निवळत नाही. मग पिढ्यानपिढ्या त्या व्यक्तीच्या कामाची, व्यक्तिमत्वाची, चर्चा होत राहते. अमेरिकेचा पहिला स्वयंघोषित सम्राट नॉर्टन I हेही असेच एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व ज्याच्याबद्दल आजही लोकांना प्रचंड कुतूहल आहे.

नॉर्टनचे काम आणि त्याने जी ख्याती मिळवली ते पाहून नक्कीच हे कुतूहल वाढते आणि शेवटी एक प्रश्नही पडतो की नॉर्टनला भामटा म्हणावे की अक्कलवंत? आता नॉर्टनची ही गोष्ट वाचल्यानंतर तुम्हाला देखील हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही.

८ जानेवारी १८८० रोजी नॉर्टन I एका लेक्चरसाठी निघाला होता. नेहमीप्रमाणेच निळा युनिफॉर्म, डोक्यावर टोपी ज्याला मोराची पिसे जोडलेली असत, कमरेला तलवार लटकवलेली, असा त्याचा वेश होता. चालता चालतच अचानक या सम्राटाचा तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला. बघणाऱ्यांना वाटले की बहुतेक त्याचा तोल गेला असावा, पण त्याक्षणी नॉर्टन जो पडला तो उठलाच नाही. अगदी सहज चालता-चालता त्याला मृत्यूने गाठला.

सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकलने दुसऱ्या दिवशी दिलेल्या वृत्तानुसार त्याच्या अंत्यविधीसाठी दहा हजार लोक जमले होते. या शोकाकुल लोकांमध्ये समाजातील सर्व थरातील लोक होते अगदी अमीर-उमरावापासून सामान्य लोकांपर्यंत.



सिनसिनाटी एन्क्वायररने, “एक सम्राट ज्याला शत्रू नव्हता, एक राजा ज्याला राज्य नव्हते, अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला,” असे त्याचे वर्णन केले होते.

नॉर्टन I अमेरिकेचा सम्राट होता पण, तो कुठल्याही राजघराण्याचा वंशज नव्हता. १८१८ साली इंग्लंडमध्ये एका सामान्य ज्यू कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील एक व्यापारी होते. त्याच्या जन्मतारखेविषयी फारशी ठोस माहिती मिळत नाही. मात्र, काही अभ्यासकांच्या मते ४ फेब्रुवारी १८१८ रोजी त्याचा जन्म झाला.

नॉर्टनचे पूर्ण नाव होते जोशुआ अब्राहम नॉर्टन. जॉशुआ दोन वर्षाचा झाल्यावर त्याच्या वडिलांनी व्यापाराच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत स्थलांतर केले. दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी अनेक प्रकारचे व्यापार केले. काही ठिकाणी यश मिळाले तर काही ठिकाणी अपयश.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१८४९ साली जॉशुआच्या वडिलांचे निधन झाले. वडील गेल्यानंतर जॉशुआ दक्षिण आफ्रिकेतून सॅन फ्रान्सिस्कोला परत आला. तिथे त्याने स्वतः वेगवेगळ्या प्रकारचा व्यापार सुरु केला. जमिनी खरेदी विक्री, सिगरेट फॅक्टरी, राईस मिल आणि गृहोपयोगी वस्तूंचा व्यापार असे अनेक उद्योगधंदे केले. १८५२ पर्यंत तो सॅनफ्रान्सिस्कोमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनला. तो मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या वर्तुळात वावरू लागला. राजकीय मते व्यक्त करू लागला.

अमेरिकेने लोकशाही पद्धतीचा त्याग करून राजेशाही स्वीकारावी, असेही सल्ले देऊ लागला. “मी जर अमेरिकेचा सम्राट झालो तर अमेरिकेत मोठा बदल घडून येईल,” असे तो नेहमी म्हणत असे.

सॅनफ्रान्सिस्कोमधे चीनकडून तांदळाची आयात केली जात होती. १८५२ साली दुष्काळामुळे चीनला तांदूळ पाठवणे शक्य झाले नाही. याचा फायदा उचलत त्याने तांदूळ सम्राट होण्याचा प्रयत्न केला. त्याने बाहेरील व्यापाऱ्यांकडून तांदूळ विकत घेतला आणि तो चढ्या भावाने बाजारात विकण्याचे ठरवले. यासाठी त्याने आपल्याकडील सगळी जमीन गहाण ठेवून सगळा पैसा तांदळात गुंतवला, पण सरकारने तांदळाची आयात केल्याने तांदळाचे भाव घसरले. यामुळे जॉशुआला खूप मोठा आर्थिक फटका बसला. कदाचित याचा परिणाम त्याच्या मानसिक स्वास्थ्यावरही झाला असावा. १८५५ मध्ये त्यांनी दिवाळखोरी जाहीर केली. यानंतर तब्बल दोन वर्षे तो गायब होता.

अचानक १७ सप्टेंबर १८५९ रोजी नॉर्टन सॅनफ्रान्सिस्कोमध्ये परत आला. तो थेट ‘इव्हनिंग बुलेटीन’ या वर्तमान पत्राच्या कार्यालयात गेला आणि तिथे त्याने एक निवेदन जाहीर करण्यास दिले.

या निवेदनात त्याने लिहिले होते की, “सॅन फ्रान्सिकोमधील बहुसंख्य नागरिकांच्या आग्रहामुळे तो स्वत:ला अमेरिकेचा सम्राट जाहीर करत आहे.” त्या संपादकानेही कसलेही आढेवेढे न घेता, “आपल्यात एक सम्राट देखील आहे तुम्हाला माहित आहे का?” अशा खोडसाळ मथळ्याखाली त्याने ते निवेदन प्रकाशित केले.

सॅन फ्रान्सिस्कोमधील नागरिकांना आपल्या शहराचा व्यक्ती सम्राट झाल्याचा आनंद झाला होता. त्यांना ही बातमी खूपच रंजक वाटली. इव्हनिंग बुलेटीनने जॉशुआने दिलेली अशी अनेक आज्ञापत्रे आपल्या पेपर मधून छापली. नॉर्टनचे हे आदेश लवकरच लोकप्रिय होऊ लागले. कधी कधी जर त्याने स्वतः कुठलेच आदेश काढले नाहीत, तर वर्तमान पत्राचे संपादक स्वतःच त्याच्या नावाने आदेश जाहीर करून तो वर्तमान पत्रातून छापत असत. सॅन फ्रान्सिस्कोमधे तर नॉर्टनला खूप प्रसिद्धी मिळाली. लोक त्याला पाहून नमस्कार करू लागले. त्याला यॉर मॅजेस्टी म्हणून संबोधू लागले.

थिएटरमधे त्याला फुकटात सीट दिली जाऊ लागली. अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमधे त्याला फुकटात जेवण दिले जाऊ लागले. उलट त्याने आपल्या रेस्टॉरंटमधे जेवण करणे म्हणजे खूप मोठा सन्मान समाजाला जाऊ लागला. याबदल्यात ते त्याच्याकडून आपल्याला हवे ते आदेश बनवून घेऊ लागले.

नॉर्टनने तर एका स्थानिक छपाई वाल्याकडून स्वतःच्या सहीचे चलन देखील छापून घेतले होते. त्याच्या नावाचे पोस्टकार्ड्स, बाहुल्या, सिगारेट अशा अनेक गोष्टीची तुफान विक्री होऊ लागली. लोक त्याच्या प्रसिद्धीचा स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा घेऊ लागले. अर्थात, याचा जॉशुआला काहीच त्रास नव्हता कारण या बदल्यात त्याची राहण्याची जेवणाची, इतर खर्चाची बडदास्त ठेवली जात होती.

तो स्वतःला सम्राटच समजत असे. त्यामुळे त्याने अनेक राजकीय फतवेही काढले. प्रत्येकवेळी त्याच्या फाताव्यांची अंमलबजावणी झाली नाही तरी कधीकधी ते अमंलात आणले जाऊ लागले.

एकदा सॅन फ्रान्सिस्कोच्या पोलिसांनी जॉशुआला अटक केली. तर त्याच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. शेवटी पोलिसांनी त्याच्याकडेच माफी मागितली. जोशुआने एखाद्या उदार मनाच्या थोर राजाप्रमाणेच त्याला माफ केले आणि पोलीस स्टेशनमधून त्याची सुटका करण्यात आली. या घटनेनंतर पोलीसही त्याला पाहून सलाम करू लागले.

१८६० साली सॅन फ्रान्सिस्कोमध्ये वंशभेदामुळे हिं*साचार उसळला होता. आशियातून आलेल्या कुठल्याही व्यक्तीला मारहाण केली जात असे, त्यांचे दुकान, घरे पेटवून दिले जायचे. एकेदिवशी नॉर्टनला असाच एक समूह दिसला जो जाळपोळ आणि हिं*सा करण्यासाठी निघाला होता. तो सरळ त्या समूहाच्या मध्यात घुसला आणि त्याने लॉर्ड्स प्रेयर म्हणायला सुरुवात केली. तो मोठमोठ्याने ही प्रार्थना म्हणत होता. त्यामुळे त्या हि*संक जमावातील सगळेच लोक शरमेने मान खाली घालून निघून गेले. नॉर्टनने आपल्या एका छोट्या कृतीने सर्वांचे मन जिंकले होते.

१८८० पर्यंत म्हणजे त्याच्या मृत्युपर्यंत त्याचे हे राज्य निर्धोकपणे सुरु होते. त्याला कुणी आव्हान दिले नाही की कुणी लढाईचे आमंत्रण दिले नाही. तो खरच खराखुरा सम्राट होता का की कोणी भामटा? याचे उत्तर आता तुम्हीच शोधा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मीर कमरुद्दीन – मुघलांसोबत बंड करणारा पहिला निझाम

Next Post

एक हात फ्रॅक्चर झाला तरी एका हाताने बॅटिंग करून आपल्या देशाला विजयी केलं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

एक हात फ्रॅक्चर झाला तरी एका हाताने बॅटिंग करून आपल्या देशाला विजयी केलं

या खटल्यातील आरोपीला माफी द्यावी म्हणून लोकांनी रस्त्यावर मोर्चे काढले होते

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.