The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एक पुस्तक वाचून फक्त ७२ दिवसांमध्ये या महिलेने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली होती

by द पोस्टमन टीम
26 May 2025
in मनोरंजन, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगभर फिरण्याची इच्छा नसणारी व्यक्ती क्वचितच. पण, सगळ्यांचीच ही इच्छा पुर्ण होतात असे नाही. जगाला वळसा घालून येणे हे काही सोपे काम नाही.

१८८८ साली एका महिलेने संपूर्ण जगाला वळसा घातला होता असे आम्ही सांगितले तर तुमचा विश्वास बसेल का.? नाही ना..!

फक्त ७२ दिवसांत जगाला वळसा घालून परतणारी ही महिला होती- नेली ब्लाय.

नेली ब्लायचे खरे नाव होते ‘एलिझाबेथ कोचरेन सीमन’. ती एक प्रसिद्ध पत्रकार होती. नेली ब्लाय हे तिचे एक पत्रकार म्हणून टोपणनाव होते.

जगभर फिरुन येण्याचे हे स्वप्न पुर्ण करण्याआधी नेली ब्लाय अमेरीकेतील मनोरुग्णांच्या इस्पितळात वेष बदलून, खोटे नाटक करुन राहत होती. कमी पगाराने त्रस्त असलेल्या एका मोलकरीणीचे रूप घेऊन ती त्या इस्पितळात दाखल झाली. तिथे तिने भरपुर शारिरीक आणि मानसिक त्रास सहन केला. ती तिचा वेडेपणाचा अभिनय इतक्या सहजतेने करत होती की तिच्या बरोबर दुसरा कोणी व्यक्ती राहण्यासही तयार होत नव्हता असे म्हटले जाते.



नंतर तिने स्वत: आपल्या बरोबरच्या रुग्णांशी आपले खरे रूप बोलून दाखवले. तिच्या मते तिथे असणारे कित्येक जण वेडे नसून फक्त इंग्रजी बोलता न येणारे विदेशी नागरिक होते. हळूहळू तिचा अमेरिकेतील डॉक्टर्स आणि कायद्यावरील विश्वास उठत गेला.

पुढे तिने ‘टेन डेज इन मॅडहाऊस’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला भरपूर ख्याती आणि स्तुती मिळाली. या पुस्तकात तिने इस्पितळातील आपला अनुभव मांडला होता. अर्थात ब्लाय एवढ्यावरच थांबणारी नव्हती. न्याय आणि आधुनिकतेकडे झुकलेली ब्लाय काळापेक्षा खुप पुढे होती. काहीतरी जगावेगळं करून प्रसिद्धी मिळवण्याची तिची अफाट इच्छा होती.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

१८८८ मध्ये पहिल्यांदा आपल्या जगप्रवासाची इच्छा तिने तिच्या न्युयॉर्क वर्ल्डच्या संपादक जोसेफ पुलित्झर याला बोलुन दाखवली.

‘अराउंड द वर्ल्ड इन एटी डेज’ हे वर्नेचं पुस्तक वाचुन ती प्रेरीत झाली. या पुस्तकाला सत्यात उतरवण्यासाठी तिने जगभर प्रवास करण्याचे ठरवले. 

त्यावेळी पुलित्झरला मात्र तिची ही कल्पना फारशी रुजली नाही, कारण त्याच्या मते, “फक्त एखादा पुरुषच हे करू शकत होता.”

प्रवास पुर्ण करुन ब्लायने स्वत:चे ‘अराउंड द वर्ल्ड इन सेवन्टी डेज’ हे पुस्तक लिहिले.

फिरत असताना तिने स्वत:ला मोलकरीण म्हणुनच दाखवण्याचे ठरवले. वर्तमानपत्रांना एक प्रामाणिक गोष्ट हवी होती हे ती चांगलेच जाणुन होती. प्रवासाची सुरुवात तिने ऑगस्टा विक्टोरिया इथुन ट्रेन पकडुन केली. २५,००० मैल प्रवास करण्याचे तिचे ध्येय ती ७५ दिवसात पुर्ण करणार होती. प्रवासाला निघताना तिने तिच्याबरोबर फक्त एक ड्रेस, एक कोट, असे जुजबी कपडे आणि एक छोटी प्रवासी पिशवी एवढेच साहित्य सोबत घेतले होते.

प्रवासाची सुरुवात नक्कीच चांगली झाली नाही. समुद्राची असलेली भिती आणि वेगवेगळ्या खाद्यपदार्थांना बघुन तिला मळमळ होत असे.

एका दिवशी तर ती २२ तास झोपली होती. त्याचवेळी तिला एलिझाबेथ बिसलँड नावाच्या एका महिलेबद्दल कळाले. ही महिला विरुद्ध दिशेने जगभर प्रवास करुन विक्रम करण्याच्या बेतात होती. त्यावेळी ब्लायने कसलेही लक्ष न देता,

“माझ्यापेक्षाही वेगवान कोणी जग प्रवास करणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.” असे उत्तर दिले.

प्रवासात आलेला अनुभव माणसाला अजुन समृध्द बनवतो. ब्लायला आलेला अनुभव मात्र वेगळा वाटतो. ती जिथेही गेली तिथल्या व्यक्तींची तिने केलेली वर्णने बहुदा नकारात्मकच होती. “चायनीज भिकाऱ्यांना बघुन दया नाही तर राग येत असे.” यावरुन तिचा प्रवास अनुभव नेमका कसा असेल याचा अंदाज आपल्याला येतो.

जेव्हा ब्लाय साउथहॅम्पटनला पोहचली तेव्हा ती प्रेरीत झाली त्या पुस्तकाचे लेखक जुल्स वर्नने तिला त्याच्या घरी, एमियन्स, फ्रांस इथे भेटण्याचे निमंत्रण दिले. तिला लंडनलाही जायचे असल्याने २ दिवस न झोपता ती वर्न आणि त्याच्या बायकोला भेटली. ट्रांसलेटरद्वारे ते पुढेही संपर्कात राहिले. वर्नच्या पुस्तकाची गोष्ट ही एका वर्तमानपत्रातल्या लेखावरुन प्रेरीत होती हे तिला जेव्हा कळाले तेव्हा ती अजुनच उत्साहित झाली. स्वत: एक पत्रकार असल्याने तिला आता आपल्या प्रवासाचे महत्त्व अजुन जास्त वाटू लागले.

जेव्हा नेली ब्लाय जर्सी शहरात पोहचली ती १८९०मधे. ७२ दिवसांत तिने जगप्रदक्षिणा पुर्ण केली होती. तिच्या स्वागताच्या वेळी तिला २० तोफांची सलामी देण्यात आली होती. वर्नच्या कथेला तिने ८ दिवसांनी हरवले होते. तर स्वत:लाच तिने ३ दिवसांनी हरवले होते. तिची प्रतिस्पर्धी असलेली एलिझाबेथ बिसलँडला पोहचण्यासाठी अजुन साडेचार दिवस जास्त लागले.

परत आल्यावर नेली ब्लाय म्हणाली होती, “मी माझी टोपी काढली त्यावेळी मला मोठ्याने ओरडण्याची इच्छा झाली होती, यामुळे नाही की मी ७२ दिवसात जगप्रदक्षिणा पुर्ण केली होती, तर यामुळे की मी पुन्हा घरी परतले होते.”

नेली ब्लायला तिच्या या साहसी कृत्यासाठी हवी तेवढी प्रसिद्धी आणि ओळख मिळाली नाही. स्त्री असल्याने तिचे नाव पुरुषप्रधान इतिहासात गुडूप झाले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता आलेल्या आधुनिक स्त्रीत्वाच्या चळवळीत तरी तिला योग्य तो सन्मान भेटेल अशी अपेक्षा..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

करोडो रुपये खर्चून प्लेअर्स विकत घेणाऱ्या आयपीएल टीम कमाई कशी करतात..?

Next Post

ज्या राजाला मुघल व सुलतानी सैन्य हरवू शकले नाही त्याचा पोटच्या मुलानेच घात केला

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

ज्या राजाला मुघल व सुलतानी सैन्य हरवू शकले नाही त्याचा पोटच्या मुलानेच घात केला

ऑक्सिजनचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाला त्याच्या शोधाचं श्रेय कधी मिळालंच नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.