The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जोसेफ मेडिसिन क्रो – अमेरिकेच्या मूलनिवासी रेड इंडियन्सचा ‘लास्ट वॉर चीफ’

by Heramb
26 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगाच्या प्रत्येक भागातील लोकसंस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असते. कुठल्याही दोन देशांच्या संस्कृती एकसारख्या नसतात. असंच अमेरिकेचंही आहे. युरोपीय वर्चस्व स्थापन होण्याआधी अमेरिकेच्या वन्य भागांमध्ये तेथील आदिवासी राहत असत. या आदिवासींच्या अनेक टोळ्या होत्या. १४९२ साली ख्रिस्तोफर कोलंबस भारत शोधाच्या प्रयत्नांमध्ये अमेरिकेच्या कॅरेबियन बेटांवर येऊन पोहोचला. तेथील मूळ लोकांना त्याने ‘आपण भारतात उतरलो आहोत’ या गैरसमजामुळे ‘रेड इंडियन्स’ असे नाव दिले.

वॉर चीफची जुनी पद्धत:

अमेरिकेच्या मुख्य भूमीवर राहणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्यांची वेगवेगळी संस्कृती होती. पण यात मुख्य गोष्ट होती ती म्हणजे ‘वॉर चीफ’ किंवा यु*द्धप्रमुख हे पद. मूळ अमेरिकन्स करू शकणारे सर्वांत प्रतिष्ठित काम म्हणजे वॉर चीफ बनणे. पण वॉर चीफ किंवा यु*द्धप्रमुख बनणे हे इतके सोपे नव्हते, त्यासाठी तीन कठोर परीक्षा द्याव्या लागत असत.

या तीन कठोर परीक्षा म्हणजे यु*द्धभूमीवरील सर्वांत कठीण कामे. वेगवेगळ्या मूळ अमेरिकन जमातींचे यु*द्धप्रमुख होण्यासाठी वेगवेगळे निकष असले तरी ते निकष सहसा धैर्याने लढणे आणि पराक्रम गाजवणे यावरच अवलंबून असत. वॉर चीफबद्दल आणि अमेरिकेच्या शेवटच्या वॉर चीफबद्दल जाणून घेण्यासाठी आजचा हा प्रयत्न..

ज्याकाळामध्ये अमेरिकेच्या संपूर्ण जमिनीवर जंगलांचे साम्राज्य होते आणि ज्यावेळी आदिवासी लोक मोकळ्या हिरव्यागार मैदानांमध्ये आपले प्राणी चरायला नेत असत अगदी तेव्हापासून ‘यु*द्धप्रमुखा’चे पद अस्तित्वात आहे. अशा पशुपालक आदिवासींच्या प्रजाती लुप्त झाल्यानंतरही किंवा आदिवासींमधील पशुपालन व्यवसाय संपल्यानंतरही वॉर चीफ किंवा यु*द्धप्रमुखाचे पद अबाधित राहिले.

द लास्ट वॉर चीफ – जोसेफ मेडिसिन क्रो:

शेवटच्या यु*द्धप्रमुखाला त्याची ‘वॉर चीफ’ ही पदवी दुसऱ्या महायु*द्धानंतर मिळाली. ‘जोसेफ मेडिसिन क्रो’ हा ‘क्रो’ या जमातीचा शेवटचा यु*द्धप्रमुख होता. त्याला ही पदवी दुसऱ्या महायु*द्धात जर्मनांच्या विरुद्ध लढल्यामुळे मिळाली होती. जोसेफ मेडिसिन क्रो यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९१३ रोजी मोंटाना येथील ‘क्रो इंडियन रिझर्व्हेशन’वर झाला.



क्रो समुदायातील एक अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असलेल्या चीफ मेडिसिन क्रोचा थेट वंशज असल्याने तो चांगले नशीब घेऊनच जन्मला आहे असे अनेकांना त्याच्या जन्मापासूनच वाटत होते. बालपणीच, त्याला खोगीरशिवाय घोड सवारी करणे, शिकार करणे यांसारख्या जमातीच्या परंपरा शिकवण्यात आल्या.

पुढे जोसेफने १९३६ साली ‘असोसिएट ऑफ आर्ट्स’ पदवी पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. असोसिएट पदवीनंतर त्याने समाजशास्त्र आणि मानसशास्त्रामध्ये पदवी पूर्ण केली. तर दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात मानववंशशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. क्रो लोकांपैकी मास्टर्स डिप्लोमा मिळवणारा तो पहिला सदस्य होता. इतकेच नाही तर दुसरे महायु*द्ध सुरु होण्यापूर्वी जोसेफ आपल्या पी.एचडीवरसुद्धा काम करत होता.

पण दुर्दैवाने, पी.एचडीसाठी आवश्यक असलेले बहुतांश काम पूर्ण केल्यानंतर, अमेरिकेने ना*झी जर्मनीविरुद्ध यु*द्ध पुकारले. पदवी पूर्ण करण्याऐवजी त्याने वॉशिंग्टनमधील शिपयार्डमध्ये काम करण्यास सुरुवात केली. यु*द्ध अधिक तीव्र झाल्याने १९४३ साली त्याने सैन्यदलात सामील होण्याचा निर्णय घेतला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

वॉर चीफ होण्यासाठीचे ४ पराक्रम:

क्रो वॉर चीफ होण्यासाठी शौर्य आणि निर्भयपणाचे ४ विक्रम करणे आवश्यक असते. पहिला पराक्रम म्हणजे शत्रूला जीवे न मारता त्याला स्पर्श करणे, दुसरा पराक्रम म्हणजे शत्रूचे शस्त्र हिसकावून घेणे आणि तिसरा पराक्रम म्हणजे यशस्वी यु*द्ध पक्षाचे नेतृत्व करणे आणि शत्रूचा घोडा चोरणे.

जोसेफने पहिले दोन पराक्रम अतिशय सहजतेने केले. तो एका कॉर्नरला उभा राहिला आणि दोन्हीकडून येणारे जर्मन सैनिक एकमेकांवर आदळतील अशी योजना त्याने आखली. जोसेफच्या अपेक्षेप्रमाणेच झाले आणि दोन जर्मन सैनिक त्या कॉर्नरवर एकमेकांना धडकून खाली पडले. जोसेफने त्या दोघांच्या बंदुका हिसकावून घेतल्या.

दोन्ही ‘वेल-ट्रेनड्’ जर्मन सैनिकांना त्याने बघता बघता चितपट् केले आणि त्या दोघांनीही माफी मागितल्यानंतर त्याने दोघांना सोडून दिले. ते दोघे गेल्यानंतर त्याने त्यांच्या बंदूकाही हस्तगत केल्या. यामुळे त्याचे पहिले दोन पराक्रम येथेच पूर्ण झाले. त्याने आपल्या बलाचा आणि बुद्धीचा पुरेपूर वापर केला. 

तिसरा पराक्रम करण्यासाठी त्याने जर्मन छावणीवर एका महत्त्वाकांक्षी ह*ल्ल्याची योजना आखली. त्याने सैनिकांच्या एका गटाचे यशस्वी नेतृत्व केले आणि जर्मन कॅम्पमध्ये अचानक झालेल्या या ह*ल्ल्याने धुमश्चक्री उडाली. याच धुमश्चक्रीमध्ये त्याने तब्बल ५० जर्मन घोडे आपल्याबरोबर घेतले. मग ‘क्रो’ जमातीचे सन्मान गीत गात गात त्याने आपली छावणी जवळ केली.

यामुळे अधिकृतपणे ‘जोसेफ मेडिसिन क्रो’ हे क्रो लोकांचे वॉर चीफ बनले. इतर कोणत्याही मूळ अमेरिकन माणसाने वॉर चीफ या पदवीचा दावा करण्यासाठी आयुष्यभरात चारही पराक्रम केले नसल्यामुळे जोसेफ हा शेवटचा वॉर चीफ बनला.

या महान मूळ अमेरिकन संस्कृतीचा वारसा:

यु*द्धानंतरच्या काळात जोसेफने मूळ अमेरिकन लोकांच्या कथांचा जगभर प्रसार प्रचार केला, त्यांच्या संघर्ष आणि इतिहासाबद्दल जागरुकता वाढवली. जोसेफने २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचीही भेट घेतली होती. त्यांनी या ‘वॉर चीफ’ला ‘प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम’ने सन्मानित केले होते. यामुळे दुसऱ्या महायु*द्धात ना*झींविरुद्ध लढलेल्या या ‘वॉर चीफ’ला अधिकृतपणे ओळख मिळाली.

जोसेफचा मास्टर्स प्रबंध “द इफेक्ट्स ऑफ युरोपियन कल्चर कॉन्टॅक्ट ऑन द इकॉनॉमिक, सोशल आणि रिलिजियस लाइफ ऑफ द क्रो इंडियन्स” हा आजही क्रो लोकांबद्दलच्या सर्वात सखोल संशोधनांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या शूर ‘वॉर ऑफ चीफ’चे २०१६ साली वयाच्या १०२व्या वर्षी निधन झाले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

विमानांच्या खिडक्या गोलाकार असतात त्यामागे हा किस्सा आहे..!

Next Post

अमेरिकेच्या CIA ने क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोला मारायचे ६३८ असफल प्रयत्न केले होते

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

अमेरिकेच्या CIA ने क्युबाच्या फिडेल कॅस्ट्रोला मारायचे ६३८ असफल प्रयत्न केले होते

प्लासीच्या लढाईत सिराज उद दौलाला मारून ब्रिटिशांनी कलकत्त्याच्या ब्लॅक होलचा बदला घेतला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.