The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एलोन मस्कच्या स्पेसX च्या अंतराळवीरांची पहिली तुकडी अवकाशात पोहोचलीसुद्धा

by Heramb
13 November 2021
in विश्लेषण, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आज प्रत्येक विकसित आणि विकसनशील देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे. महासत्ता असण्याच्या महत्वाच्या परिमाणांपैकी एक म्हणजे अवकाश तंत्रज्ञानामधील प्रगती. ६० च्या दशकापासून देशादेशांमध्ये अवकाशस्पर्धा सुरु झाल्या, पण त्यावेळी अवकाश तंत्रज्ञान आणि त्याविषयीचे सर्व ज्ञान, आवश्यक सामग्री हे संबंधित देशाच्या सरकारकडेच असत.

आज मात्र परिस्थिती वेगळी आहे. आज सरकार बरोबरच खाजगी क्षेत्रातसुद्धा अवकाश तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने स्पेस-एक्स सारख्या कंपन्यांचा उदय जगभरात होऊ लागला आहे. अगदी भारतातही ‘अग्निकुल कॉसमॉस’, ‘स्कायरूट एरोस्पेस’ आणि ‘पिक्सेल’ अशा कंपन्यांनी अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आपला पाय रोवला आहे.

स्पेस-एक्स आणि अंतराळ संशोधन:

स्पेस-एक्स ही कंपनी अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल अशी खाजगी कंपनी आहे. ही एक अमेरिकन एरोस्पेस उत्पादक, अंतराळ वाहतूक सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. स्पेस-एक्सची स्थापना २००२ साली एलोन मस्क यांनी मंगळावरील वसाहतीकरण सक्षम करण्यासाठी आणि अंतराळ वाहतूक खर्च कमी करण्यासाठी केली होती. ही कंपनी फाल्कन-९ आणि फाल्कन हेवी अशा लाँच वेहिकल्स, रॉकेट इंजिन्स, ड्रॅगन कार्गो, क्रू स्पेसक्राफ्ट आणि स्टारलिंक कम्युनिकेशन सॅटेलाईट्स तयार करते.



‘मेकिंग लाईफ मल्टिप्लानेटरी’ या घोषवाक्याखाली स्पेस-एक्सने विविध ग्रहांवर विशेषतः मंगळावर मानव पाठवण्याची व्यवस्था केली आहे. अशाच प्रकारच्या एका मोहिमेचा भाग म्हणून चार अंतराळवीरांना घेऊन जाणारे ‘स्पेस-एक्स क्रू-ड्रॅगन स्पेसक्राफ्ट’ किंवा ‘एन्डेव्हर’ नुकतेच ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’वर पोहोचले आहे. हे चौघंही अंतराळवीर पुढचे काही महिने याच स्पेस स्टेशनमध्ये वास्तव्यास असतील.

नासा आणि स्पेस-एक्सचे संयुक्त क्रू-३ मिशन:

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

क्रू-३ नावाचे हे मिशन नासा आणि स्पेस-एक्सच्या कोट्यवधी किंमतीच्या पार्टनरशिपमधून  पूर्ण होत आहे. नासाने ही पार्टनरशिप २०११ साली नासाचा ‘स्पेस शटल प्रोग्रॅम’ बंद झाल्यानंतर केली होती.

या क्रूमध्ये ३ अमेरिकन नागरिक आणि १ जर्मन नागरिक आहे. फ्लाईट कमांडर राजा चारी, मिशन पायलट टॉम मार्शबर्न आणि मिशन स्पेशालिस्ट कायला बेरोन हे अमेरिकन्स तर मॅथियस मौरर हा जर्मन अंतराळवीर आहे. जर्मन अंतराळवीर मॅथियस मौरर म्हणतो, “अंतराळात तरंगताना आम्ही हिऱ्यासारखे दिसतो, आम्ही मिशनसाठी फार एक्ससायटेड आहोत.” शिवाय येत्या काही महिन्यातच हा क्रू अंतराळात भेट देणार्‍या पर्यटकांच्या दोन गटांचे संपूर्ण नियोजन करणार आहे. पर्यटकांचा पहिला गट डिसेंबरमध्ये रशियामधून तर पर्यटकांचा दुसरा गट फेब्रुवारीमध्ये स्पेसएक्सच्या वतीने अंतराळात जाणार आहे.

कमर्शियल क्रू प्रोग्राममधील स्पेसएक्सचे हे ऑपरेशनल मिशन  ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी लॉन्च होणार होते. पण अटलांटिक महासागरातील प्रतिकूल हवामानामुळे ३ नोव्हेंबर २०२१ हा दिवस निश्चित करण्यात आला आणि त्यानंतर अंतराळवीरांपैकी एकाच्या किरकोळ वैद्यकीय समस्येमुळे पुन्हा हे मिशन पुढे ढकलण्यात आले. मिशनची तारीख ७ नोव्हेंबर २०२१ निश्चित करण्यात आली. परंतु, खराब हवामानाच्या अंदाजामुळे अखेर ९ नोव्हेंबर २०२१ ही तारीख निश्चित झाली.

मिशन लाँन्चमध्ये होणाऱ्या विलंबामुळे, नासाने क्रू-३ लाँच करण्यापूर्वी क्रू-२ मधून अंतराळवीर परत बोलावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, काही महिन्यांपासून अंतराळात असणाऱ्या स्पेसएक्स क्रू-२ ने ८ नोव्हेंबर २०२१ रोजी स्पेस-स्टेशन सोडले आणि ९ नोव्हेंबर २०२१ रोजी क्रू-२ पुन्हा पृथ्वीवर आले. अंतिमतः स्पेस-एक्स क्रू-३ मिशन ‘केप कॅनवेरल’ येथून ११ नोव्हेंबर २०२१ रोजी लाँच करण्यात आले. मिशनच्या युरोपियन भागाला “कॉस्मिक किस” असे म्हणतात.

पण हे प्रयत्न नेमके कशासाठी?

या मिशननंतर अशाच प्रकारचे अनेक मिशन्स स्पेस-एक्स आणि नासा संयुक्तपणे पार पडणार आहेत. ‘स्पेस-एक्स क्रू-४’ ही क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या साहाय्याने होणारी नासाची चौथी कमर्शियल क्रू-फ्लाईट असेल. हे मिशन १५ एप्रिल २०२२ रोजी लाँच करण्याची योजना आहे. पण अशा मिशन्सचं नेमकं महत्त्व काय, मानवाला अंतराळात जाण्यात आधीच यश मिळूनही हे क्रू मिशन्स (नियोजनाप्रमाणे ५ मिशन्स) कशासाठी होत असावेत?

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये क्रू पोहोचवण्याच्या दृष्टीने स्पेस-क्राफ्ट्स तयार करण्यासाठी सप्टेंबर २०१४ मध्ये नासाने बोईंग आणि स्पेस-एक्सची निवड केली होती. मे २०२० मध्ये, रॉबर्ट बेहनकेन आणि डग्लस हर्ले या अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे घेऊन जाणारी स्पेस-एक्सची ‘डेमो-२’ फ्लाईट लाँच करण्यात आली. या फ्लाईट मिशनचे उद्दिष्ट स्पेसएक्सचे स्पेस-क्राफ्ट्स अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत सुरक्षितपणे घेऊन जाऊन परत आणू शकतात की नाही याची तपासणी करणे हे होते.

सध्या सुरु असलेल्या क्रू-मिशन्सचा मुख्य उद्देश अंतराळप्रवास किंमतीच्या दृष्टीने सुलभ करणे हा आहे. यामुळे कार्गो (अंतराळात आवश्यक साधन सामग्री) आणि क्रू यांची इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून ने-आण करणे सोपे होईल. जर क्रू आणि कार्गोची ने-आण सोपी झाली तर अधिक खोल अंतराळ संशोधन वेगाने करता येईल. या योजनेद्वारे, नासाला आपल्या ‘लाँच मिशन्स’मध्ये आर्थिक आणि वेळेची बचत करायची आहे, यासाठी ते बोईंग आणि स्पेस-एक्ससारख्या व्यावसायिक कंपन्यांचा वापर करू इच्छितात.

बोईंग आणि स्पेस-एक्स सारख्या खाजगी कंपन्यांना ‘लोवर अर्थ ऑर्बिट’मध्ये क्रूची ने-आण करण्याची जबाबदारी देऊन नासाला अंतराळात आणखी खोल संशोधन करणाऱ्या रॉकेट आणि क्रू-स्पेसक्राफ्टची निर्मिती करणे शक्य होणार आहे, जेणेकरून स्पेस रिसर्च क्षेत्रात प्रगती वाढवणे आणि संभवतः अन्य ग्रह रिसर्चच्या निमित्ताने पादाक्रांत करणे हे नासाला शक्य होईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चिंग शिह – एक वेश्या जी इतिहासातील सर्वात खतरनाक पायरेट बनली होती

Next Post

वयाच्या पन्नाशीत महिलांचा एक ब्रँड उभा केला, संपत्तीत झुनझुनवालांनाही मागे टाकलं होतं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

वयाच्या पन्नाशीत महिलांचा एक ब्रँड उभा केला, संपत्तीत झुनझुनवालांनाही मागे टाकलं होतं

सुकुमारा कुरूप - तीन दशकांपासून पोलिसांना चकवा देणारा कुख्यात कि*लर

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.