The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंतराळात जाणारा पहिला कृष्णवर्णीय ठरणार होता पण नासाने अचानक त्याला मोहिमेतून वगळलं

by द पोस्टमन टीम
12 June 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


रशिया आणि अमेरिका या दोन राष्ट्रांतील इर्षा, स्पर्धा तर जगजाहीर आहे. १९५७ साली रशियाने स्फुटनिक यान अवकाशात पाठवले. रशियाने फक्त अवकाश संशोधनाच्या उद्देशाने हे यान पाठवले असले तरी अमेरिकेला मात्र रशियाचा या अवकाश संशोधन प्रकल्पावर अजिबात विश्वास नव्हता. त्यांच्या मते रशिया अवकाशातून अमेरिकेवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करणार. अमेरिकेच्या या असुरक्षिततेच्या भावनेतूनच अवकाश संशोधन क्षेत्रात पाय रोवण्याची तीव्र निकड जाणवू लागली.

अवकाश संशोधनासाठी अमेरिकेच्या नासाने अपोलो मिशनची तयारी सुरू केली. अमेरिका “अपोलो मिशन”ची तयारी करत असतानाच अमेरिकेत नागरी हक्क चळवळीनेही जोर धरला होता. या आंदोलनकर्त्यांच्या मते अमेरिकन-आफ्रिकन वंशाच्या अनेक लोकांना मुलभूत नागरी हक्कापासून वंचित राहावे लागत आहे.

अमेरिका आपल्या जनतेला जिथे अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या मुलभूत सोयीसुविधा पुरवू शकत नाही तिथे अवकाश संशोधन मोहिमेची गरजच काय?

वरवर पाहता नागरी हक्क चळवळ आणि अपोलो मिशन यांचा काहीही संबंध नव्हता असे वाटत असले तरी आंदोलनकर्त्यांचा हा प्रश्नही दुर्लक्षित करण्यासारखा नव्हता. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष होते, जॉन एफ. केनेडी. केनेडी सरकारच्या प्रशासनाने चांद्रयान मोहिमेत देशाच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करणारे चेहरे निवडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयानुसार काही निग्रो लोकांनाही आधी एअर फोर्समध्ये भरती होण्याचे प्रशिक्षण दिले आणि त्यातून नंतर अंतराळवीर प्रशिक्षणासाठी काही उमेदवार निवडले जातील असे ठरले.



यानुसार कान्सास शहरातील इ. डी. ड्वार्ट याची या अंतराळ मोहिमेसाठी निवड करण्याचे जाहीर करण्यात आले पण त्याला प्रत्यक्ष मोहिमेवर जाण्याची संधी मिळाली नाही. 

ड्वार्टची नासाच्या अंतराळ मोहिमेसाठी निवड झाल्याचे कळताच अमेरिकेच्या कानाकोपऱ्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करणारी पत्रे आली होती. ड्वार्ट अंतराळात जाणारच याबद्दल अनेकांना खात्री वाटत होती तरीही त्याची अंतराळ मोहीम रद्द करण्यात आली. यामागचे कारण देखील त्याला शेवटपर्यंत कळाले नाही.

नासाच्या अंतराळवीरांच्या ताफ्यात सामील होण्यासही कॅलिफोर्निया राज्यातील एडवर्ड्स येथे अमेरिकेच्या हवाई दलाने एक प्रायोगिक विमानतळ तयार केला होता. इथेच नासाच्या अंतराळ मोहिमेसाठी निवडल्या जाणाऱ्या अंतराळवीरांना हवेतील उंच उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाणार होते. कॅलिफोर्नियाच्या मोजेव्ह डेझर्ट येथे हा प्रायोगिक विमानतळ उभारण्यात आला होता. या प्रशिक्षणादरम्यान ड्वार्टने लॉकहिड एफ-104 सारखे सुपरसॉनिक विमान देखील उडवले होते. हे विमान आकाशात इतक्या उंचावर जाते की, वरून पृथ्वीची निळाई आणि तिचा गोलाकार स्पष्ट दिसतो. ड्वार्टसाठी तर हा अनुभव एकदम खास आणि आकर्षक होता. आजही या हवाई उड्डाणाबद्दल बोलताना तो भारावून जातो.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

ड्वार्ट अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांचा हिरो बनला होता. संपूर्ण अमेरिकेचे लक्ष नासाच्या चांद्रयानाकडे होते तर अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे लक्ष ड्वार्टकडे होते. त्याला या अंतराळ मोहिमेत निवडले जावे यासाठी नासावरील जनतेचा काहीसा दबावही वाढत होता. अमेरिकन कृष्णवर्णीयांना ड्वार्टच्या रुपात एक आशेचा किरण दिसत होता. केनेडी प्रशासानाला देखील ड्वार्टच्या या निवडीमध्ये विशेष रस होता कारण त्यांना पुढ्यात उभ्या थकलेल्या नागरी हक्क आंदोलकांनाही उत्तर द्यायचे होते. ड्वार्टची निवड होणे ही त्यांच्यासाठीही एक सकारात्मक बातमी ठरली असती.

१९६१च्या सप्टेंबरमध्ये नासाने आपला पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवल्यानंतर अमेरिकेच्या इन्फॉर्मेशन एजन्सीचे सल्लागार मुरो यांनी त्यांना पुढल्या अंतराळ मोहिमेत एखाद्या निग्रो पायलटची निवड करण्याचे सुचवले होते. केनेडी यांनी आपल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना यासाठी योग्य व्यक्ती शोधण्याचे आदेश दिले आणि त्यासाठी सैन्यातील कृष्णवर्णीयांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यास सुरुवात करावी असे आदेशही देण्यात आले.

मुरो यांच्या मतानुसार ड्वार्ट हे या मोहिमेसाठी एकदम योग्य व्यक्ती होते. कारण, ज्यावेळी अंतराळ मोहिमेसाठी कृष्णवर्णीय पायलटचा शोध घेतला जात होता तेव्हा ड्वार्ट हवाई दलातील पहिला कृष्णवर्णीय पायलट होता ज्याला लवकरच कॅप्टन पदावर बढती मिळणार होती. त्याने ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतून एअरोनॉटिक्स इंजीयारिंगची पदवी घेतली होती आणि अंतराळवीर बनण्यासाठी एका ठराविक कालावधीसाठी हवाई उड्डाण केल्याची पात्रता असावी लागते तीदेखील त्याच्याकडे होती.

ड्वार्टसारख्या अतिसामान्य निग्रो कुटुंबातील व्यक्तीसाठी तर ही खूप मोठी संधी होती. कारण अंतराळात जाणारा पहिला अमेरिकन-आफ्रिकन ठरण्याचा सन्मान त्याला मिळणार होता. 

कान्सास शहरातील एका गरीब कुटुंबात ९ सप्टेंबर १९३३ रोजी त्याचा जन्म झाला होता. लहानपणापासून त्याला कलेची खूप आवड होती. दोन वर्षाचे असल्यापासून ते वर्तमानपत्रातील कार्टून्सवरून पेन्सिल फिरवून ते गिरवण्याचा प्रयत्न करायचा. चार वर्षांचा असताना त्याच्याकडे गावातील ग्रंथालयाचे कार्ड होते. तेव्हापासूनच त्याने लिओनार्डो दा विन्ची आणि मायकेल अँजेलो सारख्या दिग्गज कलाकारांचा अभ्यासही सुरू केला होता. वयाच्या आठव्या वर्षी त्याने स्वतःचे पहिले ऑईल पेंटिंग काढले.

चित्रकलेव्यक्तिरिक्त त्याचे दुसरे प्रेम होते विमान. पाच-सहा वर्षांचा असल्यापासूनच तो त्याच्या आजूबाजूच्या परिसरात फिरून तिथल्या विमानांची साफसफाई करत असत.

त्याच्या आईने त्याला गावातील खाजगी कॅथोलिक शाळेत प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केला. पण तिथल्या बिशपनी ही शाळा फक्त गोऱ्या मुलांसाठी असल्याचे कारण देत त्याचा प्रवेश नाकारला. त्या परिसरात कृष्णवर्णीय मुलांसाठी एकही शाळा नव्हती. त्यामुळे त्याच्या आईने सिनसिनाटी चर्चला पत्र लिहून तिच्या मुलाला ड्वार्ट शाळेत प्रवेश मिळत नसल्याचे कळवले. पण त्यांनीही या पत्राची दखल घेतली नाही. तेव्हा शेवटचा प्रयत्न म्हणून तिने सरळ व्हॅटिकनला पत्र लिहिले आणि त्यांनी ड्वार्टला शाळेत प्रवेश देण्याचे आदेश दिले.

स्थानिक बिशपनी एकाच अटीवर ड्वार्टला शाळेत घेतले. ते म्हणजे, तो गोऱ्या मुलांपासून दूर राहील आणि गोऱ्या मुलींकडे नजर वर करून पाहणारही नाही. ड्वार्टला शाळेत प्रवेश मिळाला असला तरी, तिथल्या भेदाभेदाच्या वागणुकीने त्याच्या बालमनावर परिणाम झालेच.

पुढे त्याने आपल्या हुशारीच्या जोरावर शालेय जीवनाचे एकेक टप्पे सर केले. १९५७ साली ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतून एअरोनॉटिक्स इंजिनियरिंग पूर्ण करत असतानाच त्याने हवाई दलातील आधुनिक विमानांचे यशस्वी उड्डाण करण्याचा अनुभवही घेतला होता.

त्याने तब्बल ९००० तासांचा हवाई प्रवास पूर्ण केला होता. त्याच्या याच कौशल्याकडे पाहून त्याची अंतराळवीर मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती.

या प्रशिक्षणातील एकेक टप्पे ड्वार्टने पार केले होते. अंतिम निवड जवळ आलेली असतानाच अचानक त्याला कळवण्यात आले की तो चांद्रयान मोहिमेचा भाग बनू शकत नाहीत. ड्वार्टला हा धक्का पचवणे खूपच कठीण गेले. त्याने व्हाईट हाउसला याबाबत जाब विचारणारे पत्र देखील लिहिले पण त्याला काहीच उत्तर मिळाले नाही.

नासाने कळवले की आम्हाला हवा तसा आफ्रिकन-अमेरिकन अंतराळवीर न मिळाल्याने आम्ही या मोहिमेत आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीला संधी देऊ शकलो नाही.

नंतर १९६६ साली ड्वार्टने अमेरिकन हवाई दलाचाही राजीनामा दिला. मात्र त्याला या मोहिमेतून असे अचानक का डावलण्यात आले याचे कारण शेवटपर्यंत कळू शकले नाही. त्याच्या मते एका आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीने एवढा मोठा पल्ला गाठणे काही लोकांना नको होते म्हणूनच त्यांनी या मोहिमेसाठी अचानक नकार दिला. अपोलो 15 मोहिमेच्या दरम्यानच केनेडी यांची ह*त्या झाली.

असे म्हटले जाते या मोहिमेत कृष्णवर्णीय व्यक्तींना सहभागी करून घेण्यावरून श्वेतवर्णीय लोकांचा नासावर दबाव होता आणि केनेडी यांची हत्याही याच कारणाने झाली. म्हणून नासाला या मोहिमेतून ड्वार्टला बगल द्यावी लागली असेही एक कारण दिले जाते.

पण अजूनही याबाबतीत कुणीच कधी अधिकृत खुलासा केलेला नाही. हवाई दलातून निवृत्ती घेतल्यानंतर ड्वार्ट आपल्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजेच चित्रकलेकडे वळला. या कलेतही त्याने डेन्व्हर युनिव्हर्सिटीची मास्टर ऑफ फाईन आर्ट्सही पदवी मिळवली. यानंतर त्याने अनेक सुंदर सुदंर शिल्पाकृती तयार केल्या. त्याच्या अनेक शिल्पाकृती शाळा, ग्रंथालये आणि संग्रहालयातील प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.

ड्वार्टचे हे कामही अजरामर असले तरी अंतराळ मोहिमेसाठी निवडला गेलेला पहिला कृष्णवर्णीय उमेदवार हीच ओळख जास्त ठळक आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

चेटकीण असल्याच्या संशयावरून इंग्लंडमध्ये १५० स्त्रियांना फासावर लटकवलं होतं

Next Post

ज्यावेळी पुरुष पत्रकार वॉ*र फ्रंटवर जायला घाबरत होते तेव्हा तिने तिथे जाऊन बातम्या दिल्या होत्या

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

ज्यावेळी पुरुष पत्रकार वॉ*र फ्रंटवर जायला घाबरत होते तेव्हा तिने तिथे जाऊन बातम्या दिल्या होत्या

मॅकीयावेलीचे विचार ऐकून हि*टल*र, मुसोलिनीचे पण फ्युज उडाले असते..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.