आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात जपानी साम्राज्य आणि चीनमधील यु*द्धाने परिसीमा गाठली होती. मे १९३२ मध्ये यु*द्धबंदीचा करार झाल्यानंतरही दोन्ही साम्राज्यांमध्ये ठिणग्या उडतच होत्या आणि लवकरच त्याचं वणव्यामध्ये रूपांतर होण्याची चिन्ह दिसत होती. पण या सगळ्यामध्ये भरडला जाणार होता तो चीनचा सामान्य माणूस. यु*द्धाच्या झळा राष्ट्राची राख करून टाकतात हे आपल्याला दुसऱ्या महायु*द्धादरम्यान झालेल्या लढायांवरून दिसून येईल.
या दोन्ही देशांत, विशेषतः चीनमध्ये बौद्ध विचाराचा इतका प्रसार होऊनही तिथं एवढा मोठा “हिं*साचार” घडतो, म्हणजे मोठा विरोधाभास आपल्याला दिसून येईल. जर काही जणांच्या मते धर्म हे समाजाला लागलेलं “अफूचं व्यसन” आहे, तर निधर्मी राष्ट्रविचार जपणाऱ्या चिनी प्रजासत्ताकात तर शांतता नांदायला हवी होती.
दुसऱ्या महायु*द्धाच्या दरम्यान चीन आणि जपानमध्ये दुसऱ्यांदा यु*द्धाची ठिणगी पडली ती ९ ऑगस्ट १९३७ या दिवशी. ज्यावेळी जॅपनीज स्पेशल नेव्हल लँडिंग फोर्सचा लेफ्टनन्ट इसियो ओयामा आपल्या वेगवान मोटारीतून शांघायमधील हॉन्गकयो या लष्करी विमानतळाच्या प्रवेशद्वारावर आला, आणि त्याला चीनच्या सैन्यातील पहारेकऱ्याने अडवले. पहारेकऱ्याने अडवल्यानंतरही ओयामाने गाडी प्रवेशद्वारातून आत नेण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्या चिनी पहारेकऱ्याने आडवल्यानंतर मात्र ओयामाने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. घडला प्रकार पाहून अन्य चिनी सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल ओयामावर गो*ळीबार करून त्याला ठा*र केले, आणि हेच दुसऱ्या चीन-जपान यु*द्धाचं कारण ठरलं.
पण जॅपनीज स्पेशल नेव्हल लँडिंग फोर्सच्या लेफ्टनन्ट दर्जाच्या सैन्याधिकाऱ्याने चीनच्या शांघाय येथील लष्करी विमानतळावर या प्रकारे अवैधरित्या येणं हे १९३२ साली चीन-जपान दरम्यान झालेल्या यु*द्धबंदीच्या कराराचं उल्लंघन होतं.
पुढच्याच दिवशी १० ऑगस्ट रोजी जपानी परराष्ट्र सल्लागारांनी चीनच्या शांतता प्रस्थापित करणाऱ्या सैन्याला (पीस किपींग फोर्सेस) मागे घेण्याचं आणि शांघाय शहराभोवतीच्या आपल्या सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्याचं आवाहन केलं. पण ११ ऑगस्टला दोन्ही देशांनी शांघाय शहरात आपापलं सैन्य मोठ्या प्रमाणात वाढवलं. पुढच्या दोन दिवसात दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चा विफल ठरल्या, आणि १३ ऑगस्ट १९३७ रोजी रिपब्लिक ऑफ चायना आणि एम्पायर ऑफ जपान यांच्यामध्ये दुसरं यु*द्ध सुरु झालं.
या यु*द्धात प्रामुख्याने चीनच्या शहरी भागात हातघाईच्या लढाईमुळे जपानी सैन्य मोठ्या प्रमाणात मा*रलं गेलं किंवा जखमी झालं. फक्त जपानलाच नाही तर चीनलासुद्धा या यु*द्धात मोठी हानी झाली. ऑगस्टमध्ये सुरु झालेलं यु*द्ध नोव्हेंबर महिना उजाडला तरी थांबण्याचं नाव घेत नव्हतं.
मग मात्र जपानी सैन्याने जपानच्या नाविक आणि हवाई दलाची मदत मागवली. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याच्या मध्याला जपानचं नाविक दल आणि हवाई दलाने संयुक्तरित्या कारवाई करून शांघाय शहरावर ताबा मिळवला. यु*द्धाच्या शिष्टाचारांनुसार आता यु*द्ध थाम्बायला हवं होतं, पण तसं न होता जाणीवपूर्वक आगीत तेल ओतण्याचं काम झालं.
याआधी सैन्याला झालेल्या प्रचंड नुकसानामुळे आणि सैन्याचं मनोबल खचल्यामुळे टोकियोतील स्टाफ हेडक्वार्टर्सने यु*द्ध सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे १ डिसेंबर १९३७ रोजी सेंट्रल चायना एरिया आर्मी आणि टेंथ आर्मीला रिपब्लिक ऑफ चायनाची तत्कालीन राजधानी नानजियांग शहरावर ताबा मिळवण्याचे आदेश मिळाले.
शांघायचा पाडाव झाल्यानंतर नानजियांगला गमावणं हा फक्त काही वेळाचा प्रश्न आहे असं तत्कालीन रिपब्लिक ऑफ चायनाचा नेता असलेल्या चियांग-काय-शेकला माहिती होतं. पराभवामुळे खचून गेलेल्या चियांग आणि त्याच्या अन्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्तम सैनिकांना गमावण्याची जोखीम घ्यायची नव्हती. भविष्यातील अनेक यु*ध्दांसाठी सैन्य जतन करण्याचा दृष्टीने बहुतांशी सैन्य नानजियांग या राजधानीच्या शहरातून मागे घेण्यात आले.
चियांगच्या जॉन रेब या जर्मन सहकाऱ्याच्या सल्ल्यानुसार जपानी सैन्याला चीनच्या विस्तीर्ण भूभागावर आणखी आत खेचून घेराव घालण्याच्या दृष्टीने चियांगने हे सैन्य मागे घेतल्याचे सांगितले जाते.
टँग शेगझी या चिनी सैन्याधिकाऱ्याने परराष्ट्र पत्रकारांची पत्रकार परिषद घेऊन “नानजियांग शहर शत्रूसमोर शरणागती पत्करणार नाही हे जाहीर केले” आणि त्याने सुमारे लाखभराचं चिनी सैन्य जमा केलं, ज्यामध्ये मुख्यत्वाने अप्रशिक्षित लोक आणि शांघायमध्ये लढलेलं चिनी सैन्य होतं.
१ डिसेम्बर १९३७ रोजी रिपब्लिक ऑफ चायनाच्या सरकारनं स्थलांतरासाठी नानजियांग शहर सोडलं, तर नानजियांग शहरातील निष्पाप नागरिकांना जॉन रेब या जर्मन नागरिकाच्या नेतृत्वाखालील एका आंतरराष्ट्रीय समितीच्या सुरक्षा क्षेत्राच्या जीवावर सोडून राष्ट्र्पतीने ७ डिसेम्बर रोजी पलायन केलं.
नानजियांग शहरात असलेल्या पाश्चिमात्य नागरिकांनी एकत्र येऊन नानजियांगच्या उत्तरेला ‘नानकिंग इंटरनॅशनल सेफ्टी झोन’ तयार केला होता. या क्षेत्रात बहुतांशी जर्मन नागरिकांसह सामान्य चिनी नागरिक होते, आणि हे क्षेत्र “रेड क्रॉस”चा झेंडा लावून दर्शवण्यात आले होते, जेणेकरून जपानी सैन्याने येथे हिं*साचार टाळावा. जपान आणि जर्मनीमध्ये १९३६ साली झालेल्या कम्युनिस्ट-विरोधी करारामुळे या जर्मन नागरिकांचे प्राण वाचले होते. या नानकिंग इंटरनॅशनल सेफ्टी झोनचं अध्यक्षपद जर्मन नागरिक ‘जॉन रेब’कडे होतं.
यु*द्धबंदीची परवानगी मिळवण्यासाठी जॉन रेब ९ डिसेम्बर १९३७ रोजी यु.एस.एस. पनाय या यु*द्धनौकेवर गेला. या यु*द्धनौकेवरून त्याने दोन टेलिग्राम केले. पहिला टेलिग्राम अमेरिकी राजदूताच्या माध्यमातून रिपब्लिक ऑफ चायनाचा अध्यक्ष चियांग-काय-शेक याला केला ज्यात त्याने चिनी सैन्याने नानजियांगमधील लष्करी कारवाया तात्काळ बंद कराव्या असं आवाहन केलं. तर दुसरा टेलिग्राम त्याने जपानी सैन्याधिकाऱ्यांना केला, त्यात त्याने जपानी सैन्याने तीन दिवसांची यु*द्धबंदी करावी, जेणेकरून चिनी सैन्याला नानजियांगमधून माघार घेण्यासाठी वेळ मिळेल.
पण पुढच्या दिवशी १० डिसेम्बरला जॉन रेबला त्याच्या टेलिग्रामच उत्तर मिळालं, अप्रत्यक्षरित्या!
‘हॅन्कॉ’मध्ये असलेल्या अमेरिकेच्या राजदूताने “जरी यु*द्धबंदीच्या प्रस्तावाला मी पाठिंबा दिला असला तरी चियांगने ते मान्य केलं नाही.” असं टेलिग्रामद्वारे सांगितलं. त्यानंतर रेब म्हणतो, “राजदूताने आम्हाला एक वेगळा आणि गुप्त टेलिग्राम पाठवला, जनरल टँगने तीन दिवसांची शस्त्रसंधी करून सैन्य मागे घेतले हा आपला गैरसमज आहे, शिवाय चियांग आपला प्रस्ताव मान्य करण्याच्या मनःस्थितीत नाही” असंही त्याने नमूद केलं आहे,
रेबचा हा प्रस्ताव अमान्य झाल्याने नानजियांग शहरावर त्याचे भीषण पडसाद उमटले, जपानी सैन्याने बॉ*म्बह*ल्ले करून नानजियांग शहर उध्व*स्त केलं, तिथले चिनी सैनिक घडल्या प्रकाराने निराश आणि हतबल होते.
काही चिनी सैनिक आपले प्राण वाचवण्यासाठी ‘नानकिंग इंटरनॅशनल सेफ्टी झोन’मध्ये शिरल्याचे ११ डिसेम्बरला रेबला कळाले. त्यामुळे निश्चितच निर्वासित आणि परदेशी लोकांची ही सुरक्षा क्षेत्रेसुद्धा जपानी सैन्याच्या भक्षस्थानी पडणार हे सिद्ध झालं होतं. काही चिनी सैनिकांमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जाणार होते.
सामान्य नागरिक त्या सेफ्टी झोनमध्ये असूनही जपानी सैनिकांनी त्या झोन्सवर ग्रेने*डचे ह*ल्ले केले.
५ डिसेंबर या दिवशी असाका नावाच्या राजपुत्राला या मोहिमेचं नेतृत्व सोपवण्यात आलं. तीन दिवसात तो हवाई मार्गाने चीनमध्ये आला, आणि तिथल्या सैन्याधिकाऱ्यांना भेटला. सैन्याधिकाऱ्यांनी आपल्या विजयाबद्दल त्याला सांगितलं आणि जपानी सैन्याने नानजियांग शहरात तब्ब्ल ३ लाख चिनी सैन्याला घेरण्याची बातमी दिली. यावेळी असाकाने सर्व यु*द्धकैद्यांना ठार मारण्याचा आदेश आपल्या सैन्याला दिला. तरी असाकाने आदेश दिला की नाही यावर अनेकांचे मतभेद आहेत.
पण यावेळी जो नर*संहा*र चीनमध्ये सुरु झाला तो तब्ब्ल २ महिने सुरूच होता, अनेक यु*द्धकैद्यांचा शिर*च्छेद करण्यात आला. लुटपाट आणि बला*त्काराच्या अगणित घटना या वेळी घडल्या. शत्रूचा एकही माणूस शिल्लक राहू नये म्हणून जपानी सैन्याने ‘स्कॉर्चड् अर्थ’ पॉलिसीच्या आधारे अनेक घरं आणि शेतं जाळून टाकली.
चीनचे सर्वात प्रगत आणि समृद्ध शहर नानजियांगला या जखमेतून बाहेर यायला अनेक वर्षं लागली. जरी राजधानीचा दर्जा या शहराने गमावला असला, तरी चीनच्या आधुनिक इतिहासात या शहराने “औद्योगिक शहराचा” दर्जा घेऊन प्रचंड प्रगती केली आहे. चीनच्या बहुतांशी सरकारच्या मालकीच्या कंपन्या याच शहरात असल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेत या शहराचा मोठा वाटा आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब