The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लग्नाच्या आधी वाईट स्वप्न पडले तर ‘नागा’ जमातीच्या मुली लग्न मोडतात!

by द पोस्टमन टीम
4 March 2025
in मनोरंजन, भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


ईशान्य भारताचा प्रदेश हा विविधतेने नटलेला आहे. इथे भिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेले, विविध जमातींचे लोक राहतात. भारताच्या या भागात वास्तव्य करणाऱ्या आदिम जमाती गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पूर्वजांच्या प्रथा परंपरांचे पालन करत आहेत. यातीलच एक जमात म्हणजे नागा!

नागा जमातीचे लोक ईशान्येकडील पर्वतीय प्रदेशात राहतात. शाळेत असताना आपण नागा जमातीविषयी आपल्या पाठ्यपुस्तकात नक्कीच वाचले असेल. पण नागा जमातीबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल अजूनही आपल्याला कल्पना नाही. त्यावरच आपण आज प्रकाश टाकणार आहोत.

नागा जमातीला ‘नागा’ हे नाव कसे मिळाले याचा किस्सा मोठा रंजक आहे. नागा लोक भारताच्या सुदूर ईशान्येकडील पर्वतीय प्रदेशात अत्यंत दुर्गम भागात राहतात. नागा लोक ज्या परिसरात राहतात, त्याचा एक मोठा भाग म्यानमारमध्ये आहे. पूर्वीच्या काळी म्यानमारच्या जंगलात राहणाऱ्या लोकांना ‘नाका’ असे म्हटले जात होते. ‘नाका’ हा शब्द म्यानमारच्या भाषेतील आहे.

प्राचीन काळी कानात खडे परिधान करणाऱ्या लोकांना “नाका” म्हणून संबोधित करण्यात येत होते. म्यानमारच्या जंगलात राहणाऱ्या या जमातीचा कालानुरूप विस्तार झाल्यामुळे भारताच्या नागालँडच्या प्रदेशात हे लोक बहुसंख्येने वास्तव्य करू लागले. ‘नागालँड’वरून या लोकांना नागा म्हणून ओळखले जाऊ लागले.

प्रकृतीच्या अगदी जवळ राहत असल्यामुळे नागा लोकांमध्ये निसर्ग पूजेला मोठे महत्त्व आहे. नागालँडच्या घनदाट अरण्यात १०० प्रकारच्या जमातींचा वास आहे. यापैकी १६ नागा जाती असून त्यांच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. या लोकांच्या वेगळ्या प्रथा परंपरा असून भिन्न भाषा आहे. प्रत्येक नागा आदिवासी हा ख्रिस्ती झाला नसून काही लोक अजूनही प्राचीन परंपरांचे पालन करत आहेत. हे लोक वृक्ष, सूर्य आणि चंद्राची पूजा करता.



नागा लोकांनी अजूनही आपली मातृभाषा जपली आहे. एवढेच नाही, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण नागा लोक हे इंग्रजीचे उत्तम जाणकार आहेत. आपल्याला वाटते पण या जमातीतील लोक भरपूर शिकलेले असतात. या जमातीच्या लोकांनी जंगलांमध्ये शाळा उघडल्या असून त्यांच्या मदतीने हे लोक या भागात शिक्षणाचा प्रचार-प्रसार करतात.

नागालँडमध्ये राहणारे लोकांची वेशभूषा वेगळीच असते. ते स्वतःच्या शरीराभोवती रंगीबेरंगी कपडे गुंडाळतात आणि गळ्यात-कानात हाडांची माळ घालतात. गेली अनेक शतके हे लोक अशीच वेशभूषा करत आहेत. ज्यावेळी भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते त्यावेळी त्यांनी या जमातीचा लोकांचा छळ करण्यास सुरुवात केली होती.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

नागा लोकांवर इंग्रजांनी आक्र*मण केले होते, त्यावेळी त्या आधुनिक ह*त्यार बाळगणाऱ्या इंग्रजांशी नागा लोकांच्या पूर्वजांनी हाडांचे ह*त्यार तयार करून यु*द्ध केले होते. त्या पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागा लोक हाडांची आभूषणे परिधान करतात.

या लोकांचा बऱ्याच गोष्टींवर अंधविश्वास असतो. निसर्ग पुजेमुळे हे लोक अंधविश्वासु बनले आहेत, असे म्हणतात. नागा लोकांमध्ये लग्नाच्या वेळी मुलींना मुलांना नाकारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

नागालँडमध्ये विवाहाची फार विचित्र परंपरा आहे. नागालँडमध्ये विवाहाच्या वेळी मुलीने एखादं वाईट स्वप्न पाहिले तर ती विवाहाला नकार देऊ शकते.

निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्य करत असल्यामुळे त्यांच्यातील रचनात्मक व कलात्मक गुणांना वाव मिळाला आहे. हस्तशिल्पांच्या निर्मितीची कला या लोकांना अवगत आहे. हे लोक उत्तम कारागीर असून हस्तकलेच्या माध्यमातून अनेक चांगल्या कलाकृती घडवतात. घरात वापरण्यात येणाऱ्या गरम शाली तयार करण्यासाठी हे लोक प्रसिद्ध आहेत. बांबूपासून ते अनेक वस्तूंचे उत्पादन करतात. हे लोक जंगलात राहून निसर्गाचे पूजन करतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हि*टल*रला शांततेचा नोबेल पुरस्कार द्यायला निघाले होते स्वीडिश सरकार !

Next Post

दुर्बिणीचा शोध गॅलिलिओने नाहीतर एका चष्मा बनवणाऱ्या डच माणसाने लावला होता

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

दुर्बिणीचा शोध गॅलिलिओने नाहीतर एका चष्मा बनवणाऱ्या डच माणसाने लावला होता

जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक असलेल्या लेहमन ब्रदर्सचे एकाएकी दिवाळे कसे निघाले ?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.