The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय संस्कृतीत पवित्र असणारी स्वस्तिक हि*टल*रने ना*झी बोधचिन्ह म्हणून का वापरली.?

by द पोस्टमन टीम
11 June 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


स्वस्तिक हे चिन्ह भारतीय आहे. शिवाय अत्यंत पावित्र्याचे, मांगल्याचे शुभांकित चिन्ह म्हणून ते वापरले जाते. भारतात कुठलेही नवीन काम मग ते नवीन घराची वास्तुशांती असेल, नवीन दुकानाची वास्तुशांती असेल, घरात धार्मिक कार्यक्रम आणि पूजा असतील, यज्ञ अथवा होम केला जात असेल अशा प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक या चिन्हाचा उपयोग होतो.

कुठल्याही शुभ कार्यामध्ये तांब्याचा एक कलश आणि कलशात पाणी ओतून त्या  कलशावर पाच विड्याची पाने आणि नारळ ठेवून त्या कलशाची पूजा केले जाते. हा कलश पूजेच्या ठिकाणी ज्या जागी ठेवला जातो त्या जागेच्या खाली तांदुळाने स्वस्तिक रेखण्याची प्रथा असते. हे स्वस्तिक भारतीय संस्कृतीत सूर्याचे प्रतिक मानले जाते. बौद्ध संस्कृती, जैन संस्कृती, इराणी पर्शियन संस्कृती या संस्कृतींमध्ये देखील या चिन्हाला शुभ मानतात.

मात्र १९३० नंतर स्वस्तिक जगभरामध्ये बदनाम झाले. याचं कारण होत जगाला दुसऱ्या महायु*द्धाच्या खाईत लोटणाऱ्या हि*टल*रच्या ना*झी पार्टीचे चिन्ह हे स्वस्तिक होते. जसा हिटलर आज जगात क्रू*र हुकुमशहा म्हणून बदनाम आहे त्याचप्रमाणे ना*झी पार्टीचे ऑफिशियल सिम्बॉल म्हणून स्वस्तिक चिन्हसुद्धा आज जगाच्या अनेक भागात बदनाम झाले आहे.

हि*टल*रला आपल्या राजकीय पक्षासाठी स्वस्तिक चिन्ह का निवडावेसे वाटले किंवा हे स्वस्तिक चिन्ह पक्षाचे चिन्ह म्हणून कुणी निर्माण केले याचा इतिहास काही वर्षे मागे जाऊन बघवा लागेल.

जर्मन पुरातत्त्वशास्त्रज्ञ हाईनरिख श्लीमान १८६८ साली ग्रीस देशात ट्रॉयचे जे इतिहासप्रसिद्ध यु*द्ध झाले त्या भूमीवर संशोधन करण्यासाठी गेलेला होता. त्या काळापर्यंत ग्रीक कवी होमरचे महाकाव्य इलियड आणि त्या महाकाव्यात वर्णन केल्या गेलेल्या ट्रॉयच्या भूमीवर झालेले यु*द्ध ही युरोपियन देशात एक कविकल्पना मानली जात होती. हाईनरिख श्लीमानला मात्र हे यु*द्ध खरेच घडले आहे यावर विश्वास होता आणि त्यासंदर्भात संशोधन करायला तो ग्रीस देशात आला.



ग्रीक कवी होमरने लिहिलेल्या या  महाकाव्यात वर्णन केलेली ठिकाणे, औषधे, ठिकाणांची माहिती खरी आहे असे मानून श्लीमान मेडिटेरेनियन कल्चर, जे कधी काळी सिंधू संस्कृतीसारखं भरभराटीला येऊन उ*ध्वस्त झालं, याबाबत शोध घेत राहिला. १८७१ साली श्लीमानला होमरच्या महाकाव्यात लिहिलेलं ट्रॉय हे शहर सापडलं.

त्याच बरोबर त्याला तेथील उत्खननामध्ये सापडलेल्या अनेक वस्तूंवर एक चिन्ह आढळले. ते चिन्ह म्हणजे स्वस्तिक.

या शोधाने श्लीमानला पैसा, प्रसिद्धी, मानसन्मान अशा अनेक गोष्टी मिळाल्या पण श्लीमान जर्मनीला परत आला ते फक्त स्वस्तिक चिन्ह आणि त्याला जोडलेला इतिहास घेऊन. हे चिन्ह ग्रीसच्या समुद्रकिनाऱ्यापासून तिबेटच्या सीमेपर्यंत प्रत्येक संस्कृतीमध्ये आढळते याचा श्लीमानने अभ्यास केला.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जर्मनीत सोळाव्या शतकातील काही कलाकुसरींच्या वस्तूंवर देखील श्लीमानला स्वस्तिक चिन्ह आढळले. त्यामुळे ग्रीसमध्ये नांदून गेलेली संस्कृती आणि जर्मनी यांचा संबंध होता तिथपासून पुरातन काळी जगभरात जो शुद्ध आर्यन वंश पसरला होता त्याचा आणि या चिन्हाचा संबंध आहे अशी थिअरी श्लीमानच्या मांडणीमधून दिसू लागली.

खरे पाहता शुद्ध वंश ही संकल्पना जगात कधीच नव्हती मात्र युरोपात पसरलेल्या लोकप्रिय सिद्धांतानुसार कॉकेशस पर्वतामधून खाली उतरलेले आर्य भारत, इराण आणि जर्मनी या तीन देशात गेले ही संकल्पना श्लीमानच्या लिखाणातून देखील आली होती. ग्रीस देशात जेव्हा ट्रॉय शहर त्याने हुडकून काढले तेव्हा तिथे आढळलेले स्वस्तिक चिन्ह हे तिथे एके काळी नांदून गेलेल्या शुद्ध आर्यन वंशाची निशाणी आहे. तोच वंश जर्मनीमध्येसुद्धा होता, कारण स्वस्तिक चिन्ह जसे ग्रीसमधल्या उत्खननामध्ये आढळले तसे ते आपल्या जर्मन संस्कृतीमध्ये देखील आढळते. अशा स्वरूपाचे लिखाण श्लीमानच्या साहित्यात नंतर आढळत गेले.

श्लीमानसारखेच त्याच्यानंतर तीन जर्मन विचारवंत होऊन गेले, ज्यांनी स्वस्तिक हे चिन्ह जर्मन वंशश्रेष्ठत्वाच्या संकल्पनेबरोबर जोडले. गुईडो व्हॉन लिस्ट, लांझ व्हॉन लिबेनफेल्स आणि रुडॉल्फ व्हॉन सेबोटेन्ड्रॉफ या तिघांनी स्वस्तिक चिन्ह आणि जर्मन वंशवादाचा त्यांच्या लिखाणातून पुरस्कार केला. हे तिघेही जर्मनीमध्ये प्रचलित असलेल्या इसोटेरिक संप्रदायाचे अनुयायी होते.

युरोपातील इसोटेरिक पंथ हा गुप्त आणि गूढ विद्या मनाणारा एक पंथ होता त्याचे मूळ सदस्य फार कमी होते आणि युरोपमधील काही देशात हा पंथ पसरला होता.

स्वतिक चिन्ह आणि इंडो-युरोपियन वंशवाद यांची सांगड घालून जेव्हा असा सिद्धांत श्लीमानकडून मांडण्यात आला तेव्हा त्यानंतर तो खरा की खोटा, त्याबाबत काय पुरावे याचा पीअर स्टडी त्या काळात कुणी केला नाही. जर्मन राष्ट्रवाद आणि वंश शुद्धत्वाची कल्पना मात्र त्यानंतर जर्मनीमध्ये मूळ धरत गेली. स्वस्तिक हे चिन्ह त्या अर्थाने वंश श्रेष्ठत्वाचे प्रतीक म्हणून श्लीमानच्या लिखाणातून आयडेंटीफाय करण्यात आले.

नंतर जर्मनी मध्ये ॲडॉल्फ हि*टल*रने आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. स्वत:चा राजकीय पक्ष काढला, तेव्हा त्या पक्षाचे चिन्ह म्हणून हुक क्रॉसच्या आकारात असलेला स्वस्तिक निवडला. तोपर्यंत हे स्वस्तिक चिन्ह जर्मनीमधल्या स्वत:च्या जर्मन वंशाबद्द्ल अभिमानी असलेले पक्ष, इतर समूह, वंशवादी संप्रदाय यांच्या वापरात देखील असायचे.

१९३३ नंतर हि*टल*र जेव्हा सत्तेत आला तेव्हा त्याचा प्रचार प्रमुख गोबेल्स याने मे १९३३ मध्ये एक सार्वजनिक जाहीरनामा काढून ना*झी पक्षाव्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाला, समूहाला, संप्रदायाला स्वस्तिक चिन्ह वापरण्याचा अधिकार नसेल, या चिन्हाचा कुठल्याही प्रकारे खाजगी, सार्वजनिक किंवा व्यावसायिक वापर करण्यात येणार नाही अशा आशयाचा हुकुमनामा काढला. वर सांगितलेला लांझ व्हॉन लिबेनफेल्स याचे ओस्तारा नावाचे मासिक होते, या मासिकाचे अधिकृत चिन्ह म्हणूनसुद्धा स्वस्तिक वापरले जात असे, मात्र हि*टल*रने या ओस्तारा मासिकावरसुद्धा बंदी घातली.

१९३५ साली लेनी रेफेनस्ताहल नावाच्या एका दिग्दर्शकाने Triumph of the will नावाचा एक ना*झी पार्टी आणि हि*टल*रचा प्रचार करणारा चित्रपट काढला होता. त्या चित्रपटात स्वस्तिक चिन्ह म्हणजे हि*टल*र आणि हि*टल*र म्हणजे स्वस्तिक चिन्ह हा आशय लोकांच्या मनवर ठसवण्यासाठी ज्यावेळी चित्रपटात हि*टल*र नसेल त्यावेळी हि*टल*रची प्रतीकात्मक इमेज म्हणजे स्वस्तिक अशा पद्धतीने चित्रण केले गेले होते.

आज जर्मनीच्या गुन्हेगारी कायद्यानुसार स्वस्तिक चिन्ह सार्वजनिक ठिकाणी वापरणे अथवा ना*झी पद्धतीचा सलाम करणे यावर बंदी आहे. मात्र श्लीमानपासून सुरु झालेली ही वंश शुद्धत्वाची कल्पना दुसऱ्या महायु*द्धात इतका मोठा सं*हार झाला तरीही आज जर्मनी आणि युरोपच्या काही भागात टिकून आहे. आशिया खंडात जे स्वस्तिक चिन्ह पवित्र आणि मंगलदायी म्हणून वापरले जाते आज त्याचा अर्थ युरोपमध्ये मात्र ऐतिहासिक घडामोडींनी बदलून टाकलेला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: Hitlerswastik
ShareTweet
Previous Post

म्हणून इंदिरा गांधींनी मनेका गांधींना घरातून बाहेर काढलं!

Next Post

एकेकाळी मोबाईल जगताचा राजा असलेली मोटोरोला आज नामशेष का झाली?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

एकेकाळी मोबाईल जगताचा राजा असलेली मोटोरोला आज नामशेष का झाली?

जाणून घ्या, भारताच्या खऱ्याखुऱ्या 'टायगर मॅन'बद्दल

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.