The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सौदीच्या वाळवंटातला हा दगड एलिअन्सनी मधोमध ‘लेझरकट’ केल्याच्या अफवा आहेत..!

by द पोस्टमन टीम
1 July 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आपल्यापैकी बहुतेकांनी लहान असताना ‘अरेबियन नाईट्स’ ऐकल्या, वाचल्या किंवा पाहिल्या असतील. वाळवंट, उंट, उच्च प्रतीच्या वस्तूंनी सुसज्ज महाल, सुंदर स्त्रिया आणि राज्य करणारे अरब त्या कथांमधून आपल्याला समजले. सौदी अरेबिया हा देश अरब वाळवंटाचा सर्वात मोठा भाग आहे. आधुनिक काळात सौदीला खनिज तेलाचा देश म्हणून ओळखलं जातं. असे असले तरी याची दुसरीही एक बाजू आहे. या वाळवंटात हजारो वर्षांपूर्वीच्या शेकडो प्राचीन वास्तू आणि संस्कृतीची पदचिन्ह आपल्याला दिसतात. प्रागैतिहासिक काळातील मानवाच्या विकासाचे पुरावे सौदी अरेबियात सापडतात. काही वर्षांपूर्वी सौदी अरेबियानं जगासाठी पर्यटन खुलं केलं आणि त्याठिकाणची अनेक आश्चर्यकारक स्थळं लोकांच्या कुतुहलाची केंद्र ठरली.

मानवानं नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करून आपली प्रगती केली. या तंत्रज्ञानाच्या बळावर अनेक आश्चर्यकारक गोष्टींची निर्मिती देखील केली. मात्र, तरीही निसर्गानं निर्माण केलेल्या अशा काही गोष्टी आहेत, ज्यांचं रहस्य उलगडण्यात मानवाला यश आलेलं नाही.

सौदी अरेबियातील ‘अल नस्ला’ हा खडक अशाच नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे. या खडकाची निर्मिती कशी झाली? लेझर बीमनं कापल्यासारखे त्याचे दोन भाग कसे झाले याबाबत अनेक प्रश्न अभ्यासकांना पडलेले आहेत. कित्येक वर्षांपासून त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अद्याप तरी या अरेबियन खडकाचं रहस्य काही हाती आलं नाही.

‘अल नस्ला’ हा इतिहासातील सर्वांत आश्चर्यकारक अशा भूगर्भीय रचनांपैकी एक आहे. सौदी अरेबियातील तायमा ओएसिस भागात ही अगदी मनमोहक रचना आहे. 

हा वालुकामय खडकांचा विशाल तुकडा असून दोन्ही बाजूंनी त्याचा आकार देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे. वरचं अवाढव्य धूड नैसर्गिक व निमुळत्या पायथ्यावर आपला तोल सांभाळत गेल्या हजारो वर्षांपासून उभे आहे. विशेष म्हणजे या खडकाचे अगदी लेझर बीमने कापल्यासारखे दोन भागात विभाजन झालेले आहे. या रचनेनं इतिहासकार आणि भूगर्भशास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून गोंधळात टाकलेलं आहे.



या प्रख्यात रचनेची निर्मिती कशी झाली आणि त्याचं स्वरूप कसं आहे हे पाहण्यासाठी त्याचा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. 

हा खडक अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. अभ्यासकांच्या मते, त्याला आकार घेण्यासाठी शतकानुशतके लागली आहेत. तैम ओएसिसमधील अनेक खडकांपैकी अल नस्ला हा एकमेव खडक आहे जो चुनखडक, शेल आणि वाळूपासून तयार झाला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

बाबिलोनियन राजे आणि दररोजचे व्यापारी, तायमा ओएसिसचा एक व्यापारी मार्ग म्हणून वापर करत होते. त्याठिकाणच्या खडकांवर याचे पुरावे सापडतात. काही खडकांवर प्राचीन लीपीमध्ये काही मजकूर कोरलेला आहे तर, अल नस्लाच्या पृष्ठभागावर देखील एका घोड्याची आकृती आहे. याचाच अर्थ असा होतो की तेव्हा अल नस्ला अस्तित्त्वात होता. यासाठी आपण त्याकाळच्या लोकांचे आभारच मानले पाहिजेत. त्यांनी केलेल्या रेखाटनांमुळे आपल्याला अल नस्लाचा इतिहास समजून घेण्यात मदत झाली आहे. वाळूच्या खडकांचं स्वरूप लक्षात घेता, पुढच्या बाजूला सपाट आणि गुळगुळीत आकार येणं आश्चर्याची गोष्ट नाही.

खडकावर ऊन, वारा आणि पाऊस यांचा परिणाम होऊन तो गुळगळीतपणा येणं साहजिक आहे. मात्र, याच घटकांचा परिणाम म्हणून या भव्य खडकाला एकदम मधोमद तडा जाणं शक्य नाही. त्यामुळे या खडकाला इतका आखीव-रेखीव तडा कसा गेला? हा प्रश्न कायमच आहे.

भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, टेक्टॉनिक मोशन (भूगर्भीय हालचाली) हे अल नस्लाच्या विभाजनाचं संभाव्य कारण आहे. खडकाखालील जमिनीचा काही भाग अतिशय सावकाश सरकला असावा आणि त्यामुळे खडकाचे दोन भाग झाले असावेत. जगभरातील वैज्ञानिकांनी याच कारणाला जास्त पाठिंबा दिलला आहे. तर, काही शास्त्रज्ञांच्या मते, ही केवळ एक फॉल्ट लाईन आहे. जसं घराच्या बांधकांमामध्ये काही कसर राहिल्यास कालांतराने भितींना तडे जातात. अगदी त्याचप्रमाणे या खडकाचे झाले असावे. ज्या ठिकाणी खडकाला तडा गेला त्या ठिकाणी कमकुवत घटक एकवटलेले असावेत, असा अंदाज आहे.

जरी अल नस्ला मानवनिर्मित नसल्याच्या कल्पनेला वैज्ञानिक पुरावा मिळाला असला तरी, त्याच्या निर्मितीविषयी विरोधाभासी मतं आहेत. अनेक अभ्यासक आहेत, ज्यांचा असा विश्वास आहे की ही निर्मिती एक नैसर्गिक घटना नाहीच.

अल नस्लाबाबत असलेल्या अफवा

अल नस्लाच्या निर्मितीबाबत आणि विभाजनाबाबत काही कॉन्स्पिरसी थिअरिज देखील आहेत. ‘परग्रहवासी’, ही अशीच एक थिअरी आहे. अल नस्लाच्या मधोमध असलेली सरळ रेष पाहता ती एखाद्या अत्याधुनिक लेझरने पाडल्यासारखी दिसते. काहींचा असा विश्वास आहे की, तायम ओएसिसमध्ये युएफओने येऊन पृथ्वीवर अस्तित्वात नसलेल्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अल नस्लाचे दोन भाग केले.

काहींचं असं म्हणणं आहे की, स्थानिक प्राचीन लोकांनीच या खडकाला ही भेग पाडण्यात यश मिळवलं होतं. त्या लोकांनी मनुष्यबळ, भव्य दोरखंडांच्या मदतीनं हे काम केले असावे.

काहींना तर असंही वाटतं, त्यावेळच्या नागरिकांकडे सध्या असेलल्या तंत्रज्ञापेक्षा प्रगत तंत्रज्ञान होते. त्याच्या सहाय्यानं त्यांनी अल नस्लाचे दोन भाग केले. मात्र, या दोन्ही थिअरिजवर विश्वास ठेवणं कठिण आहे.

सध्या अल नस्ला हा केवळ वैज्ञानिकांनाच नाही तर पर्यटकांना देखील आकर्षित करतो. ही मोहक व रहस्यमयी गोष्ट पाहण्यासाठी याठिकाणी जगभरातून पर्यटक येतात. हा ऐतिहासिक खडक पाहण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी आणि छायाचित्रणासाठी सर्वांना परवानगी आहे. बहुतांशी लोक याठिकाणी कारने जातात. परंतु, काही लोक वाळवंटातून पायी देखील चालत जातात.

हजारो वर्षांपूर्वी तयार झालेल्या या खडकाच्या निर्मितीचा वाद सुटेल की नाही, याबाबत शाश्वती नाही. मात्र, काळाच्या ओघात आणि नैसर्गिक घटकांच्या परिणामामुळे त्याचा आताचा आकारही बदलेल, हे मात्र नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सर रतन टाटांमुळे पाटलीपुत्रचा वैभवशाली इतिहास जगासमोर येऊ शकला

Next Post

नुस्ली वाडियांनी थेट धीरुभाई अंबानीसोबत पंगा घेतला होता..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

नुस्ली वाडियांनी थेट धीरुभाई अंबानीसोबत पंगा घेतला होता..!

BCCI चा लोगो आजही गुलामगिरीच्या काळ्या इतिहासाची आठवण करून देतोय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.