The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माणसाने आयुष्यात एकदा तरी ही अद्भुत नैसर्गिक दृश्ये पाहायलाच हवीत..!

by द पोस्टमन टीम
4 January 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


निसर्ग एक जादुगार आहे आणि या जादुगाराच्या पोतडीतून कधी काय बाहेर येईल हे सांगता येत नाही. विज्ञानाने निसर्गात घडणाऱ्या बहुतांश घटनांमागील वैज्ञानिक कारणे शोधली असली आणि ती आपल्याला माहिती असली तरी निसर्गातील काही घटना मात्र आपल्याला थक्क करतात. निसर्गातील काही अशाच घटना आहेत ज्या पाहताना डोळ्याचे पारणे फिटते आणि निसर्ग हा किती अवली कलाकार आहे याचीही जाणीव होते.

निसर्गाची अशा काही जादुई कलाकारी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच हा लेखनप्रपंच!

नॉर्दर्न लाईट्स

आपल्या पृथ्वीभोवती हवेचे आवरण आहे. हे आवरण अनेक प्रकारच्या वायूंच्या मिश्रणातून बनले आहे. यातील कुठलाच वायू आपल्याला दिसत नाही. पण, पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर निर्माण होणाऱ्या काही रासायनिक प्रक्रियांमुळे तिथे वर्षातून काही काळ हे वायू आपल्याला उघड्या डोळ्यांनीही दिसतात.

सूर्याचे काही विद्युतभरीत कण जेंव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात तेंव्हा इथल्या हवेसोबत त्यांची रासायनिक प्रक्रिया घडते. त्यामुळे इतर वेळी पारदर्शक असणारे हे कण आपल्याला रंगीत दिसू लागतात.

निसर्गाचा हा अप्रतिम सोहळा पाहण्यासाठी याठिकाणी याकाळात पर्यटक नेहमीच गर्दी करतात. फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी तर ही एक अद्भुत मेजवानी असते.



 

वेगवेगळ्या आकारांतील या रंगीत प्रकाशाने संपूर्ण आकाश आच्छादून गेलेले असते. जणू काही आकाशात दिवाळीची रोषणाईच केलेली असावी. याठिकाणी या वायूंचे प्रमाण जास्त असल्याने असा रंगीत प्रकाश सोहळा अनुभवण्यास मिळतो असा शास्त्रज्ञांचे मत आहे. काहीही असले तरी निसर्गाची ही कलाकारी मनाला भुरळ घालते हे नक्की.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

बायोल्युमीनेसेंस

समुद्र किनारी कधी रात्रीच्या वेळी फिरायला गेलात तर अचानकच एखाद्या ठिकाणी समुद्रातील पाणी प्रकाशमान होते. जणू काही पाण्याखाली कुणीतरी दिवे लावले असावे असे.

समुद्री पाण्यात बायोल्यूमिनीसेंस नावाचे छोटे जीव असतात. जे मोठ्या प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळी चमकतात. जसे हवेत लाईट किडे असतात तसेच हे पाण्यातील जीव. सुरक्षेच्या दृष्टीने हे जीव झुंडीने फिरतात त्यामुळे खूप प्रखर प्रकाश निर्माण होतो आणि मोठ्या माशांना हा प्रकाश सहन न झाल्याने ते आपला मार्ग बदलतात.

The brilliance of bioluminescence - Cosmos Magazine

पण रात्रीच्या वेळी हे दृश्य पाहण्यात खरोखरच मजा येते.!

मॅमॅटस क्लाऊड

आकाशातील ढग तर तुम्ही नेहमीच पाहता. पण, एकाच वेळी पिशवीच्या आकाराचे असंख्य ढग एकाच ठिकाणी जमा होतात जणू आकाशाच्या छताला कुणी तरी छोट्या पिशव्या टांगल्या असाव्यात असे दृश्य कधी पहिले आहे का? अनेकदा पाऊस पडून गेल्यानंतर हे ढग आकाशात पाहण्यात येतात.

या ढगांमध्ये पाणी आणि बर्फाचे प्रमाण जास्त असते. ढगात निर्माण होणाऱ्या दाबामुळे याला एखाद्या पोटलीसारखा आकार येतो. हळूहळू उष्णता वाढेल तसा यातील बर्फ वितळतो.

 

हळूहळू हे ढग विरळ होत जातात आणि मग दिसेनासे होतात. पण हे ढग आकाशात जमतात तेव्हा आजूबाजूचे दृश्य, वातावरण आणि त्यात दाटणारे हे ढग पाहून, नजरच हटत नाही यावरून.

रेनबो माउंटन

पेरूमधे मोन्टाना डी सिएट कोलर्स नावाची ही रंगीत डोंगरांची रांग पाहायला मिळते, ज्याला रेनबो माउंटन म्हटले जाते. समुद्र सपाटीपासून सुमारे ५२०० मीटर उंचीचा हा डोंगर आहे. या डोंगररांगा पाहून असे वाटते की कुणीतरी या डोंगरांना हातांनी रंग दिला असावा. पण, यांचा नैसर्गिक रंगच तसा आहे.

Will The Rainbow Mountain In Peru Soon Fade Away?

युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात याचा समावेश करण्यात आला आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांना याचे विशेष आकर्षण आहे. दरवर्षी लाखो लोक या डोंगर रंगांना भेट देतात.

आकाशात दिसणारा इंद्रधनुष्य जणू उतरून पायाखाली आल्याचा भास होतो.

हजारो वर्षापासून हे डोंगर याच रंगात पाहायला मिळतात. त्या अधिमात्र इथल्या डोंगरांचा रंग सामान्यच होता. पण हळूहळू इथल्या मातीतील खनिजे उघडी पडू लागली. ही खनिजे या मातीत मिसळून गेल्याने त्यांचा वेगवेगळा रंग तयार झाला आहे. वेगवेगळ्या खनिजांमुळे इथे सात रंग तयार होतात. दूरवर पसरलेल्या या डोंगर रांगा पाहून डोळ्याचे पारणे फिटते.

मॉर्निंग ग्लोरी क्लाऊड

हे ढग विशेष करून ऑस्ट्रेलियामध्येच पाहायला मिळतात. या ढगांची लांबीच सुमारे १००० किमी किंवा त्यापेक्षाही जास्त असते. सकाळी सकाळी ऑस्ट्रेलियाच्या आकाशात हे ढग जमा होतात. म्हणूनच यांना मॉर्निंग ग्लोरी म्हटले जाते.

Morning Glory - Cloud Phenomenon - YouTube

पहिल्यांदा हे ढग पाहणाऱ्या कुणालाही आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याशिवाय राहत नाही. असं वाटतं जणू आकाशात एक मोठी सोनेरी पाईप जोडली गेली आहे. सकाळच्या सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे याला आणखी आकर्षकता येते.

हे चमत्कार पाहिल्यानंतर निसर्गासारखा कलाकार दुसरा कोणी नाहीच याची खात्री नक्कीच पटते. असे चमत्कार या ठिकाणाशिवाय इतरही अनेक ठिकाणीही पाहायला मिळतात. तुम्हालाही ज्यातून निसर्गाची कलाकारी आणि सुंदर देखावा व्यक्त होतो अशा काही चमत्कारिक ठिकाणांची माहिती असेल, तर कमेंटमधून माहिती द्यायला विसरू नका!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेतील या बिल्डिंगची सुरक्षा ‘व्हाईट हाऊस’पेक्षा तगडी आहे..!

Next Post

या क्रिकेट मॅचमध्ये एका बॉलमध्ये ६,७ नाही तर तब्बल २८६ रन काढले होते..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

या क्रिकेट मॅचमध्ये एका बॉलमध्ये ६,७ नाही तर तब्बल २८६ रन काढले होते..!

एकदा लंडनमध्ये चक्क 'बिअर'चा महापूर आला होता..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.