The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युगांडाच्या विमानतळावर घुसून मोसादने आतं*कवाद्यांचा खा*त्मा केला होता!

by द पोस्टमन टीम
15 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब


 भारत-चीन संबंधांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढतो आहे. उद्या जर हा तणाव जास्त वाढला तर कोणता देश कोणाच्या बाजूने जाईल अशा चर्चा कायमच होत असतात. काही देशांचा भारताला उघड पाठिंबा आहे. पण पाकिस्तान आणि नॉर्थ कोरिया हे चीनच्या बाजूने उभे राहतील असे दिसते. जे देश  भारत व चीन दोघांचेही मित्र आहेत त्यांच्याबद्दलचा अंदाज लावणे कठीण आहे. अशा देशांमध्ये इस्राईलचा समावेश होतो. इस्राईलचा भारताशी फक्त व्यापाराच नाही तर, इतरही अनेक बाबींमध्ये चांगले संबंध आहेत. इस्राईलच्या मोसादने भारताच्या ‘रॉ’ला प्रशिक्षणात मदत देखील केलेली आहे.

‘मोसाद’ ही इस्राईल या देशाची गुप्तहेर संस्था आहे हे तर आपण जाणतोच. मोसाद जगातील “द बेस्ट” गुप्तहेर संघटना मानली जाते. मोसादचे एजंट त्यांच्या शत्रूला जगाच्या कोणत्याही कोपर्‍यातून शोधून काढतात. आणि शोधल्यावर ते त्याला फारच क्वचित जिवंत सोडतात. सगळे नियम पार करून मोसादचे एजंट्स शत्रूला शोधून काढतात.

इस्राईलला चारी बाजूंनी मुस्लीम राष्ट्रांनी घेरले आहे. त्यांच्यात सतत तणावपूर्ण संबंध असतात. त्यामुळे इस्राईलला कायमच सतर्क राहावे लागते. इस्राईलची गुप्तहेर संघटना, मोसादला इस्राईलचे किलिंग मशीन असे म्हटले जाते. मोसादचे मुख्यालय तेल अवीव या शहरात आहे.

मोसादची स्थापना १९४९ मध्ये करण्यात आली. भारतात जे काम ‘R&AW’  करते ते काम इस्राईलमध्ये  मोसाद करते.

मोसादच्या एजंट्सला खास प्रशिक्षण घेतले जाते. त्या प्रशिक्षणापूर्वी त्यांना एका अतिशय अवघड परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. मोसादचे काम करण्यासाठी शारीरिक चाचणीबरोबर बौद्धिक आणि मानसिक क्षमता देखील पडताळल्या जातात.

मोसादच्या सैनिकांना सर्व प्रकारच्या ह*त्यारांचे प्रशिक्षण दिले जाते. जगभरातील पारंपारिक तसेच अधुनिक ह*त्यारांची ओळख आणि प्रशिक्षण त्यांना दिले जाते.

एजंट्सला पूर्वकल्पना दिलेली असते की जर ते पकडले गेले तर इस्राईल त्यांना ओळख दाखवणार नाही आणि स्वीकारणार देखील नाही. त्यांना वर्षानुवर्षे कुटुंबापासून दूर राहावे लागू शकते. असे असले तरी जर एखादा एजंट मोहिमेदरम्यान मृत्यू पावला तर इस्राईलकडून त्याचा योग्य तो सन्मान केला जातो.

मोसाद आतापर्यंत अनेक मोहिमांसाठी चर्चेत आहे. यातील ‘ऑपरेशन एंटेबे’ असेच एक.

१९७६ मध्ये युगांडाच्या विमानतळावर घुसून मोसादने आतं*कवाद्यांच्या खात्मा केला होता. त्या आतं*कवाद्यांनी ५४ नागरिकांना कैदेत ठेवले होते. मोसादने त्यांची सुटका केली.

या मोहिमेसाठी मोसादने अनेक नियम देखील मोडले होते. आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी केलेला हा एक अत्यंत कौतुकास्पद प्रयत्न म्हणून या ऑपरेशनकडे पाहिले जाते.

अशाच प्रकारे १९७२ साली  देखील मोसादने गौरवपूर्ण कामगिरी केली होती. मोसादने आपल्या खेळाडूंच्या ह*त्येचा बदला घेतला होता. दोन द*हश*तवादी संघटनांनी मिळून इस्राईलच्या बारा खेळाडूंची ह*त्या केली होती. या घटनेनंतर लगेचच मोसादने आपली मोहीम सुरू केली. आणि त्या द*हश*तवाद्यांना अक्षरशः जगाच्या कानाकोपऱ्यातून शोधून ठार मारले.

मोसादच्या एजंटमध्ये मनोवैज्ञानिक यांचादेखील समावेश आहे. तेथे सायकॉलॉजिकल वॉ*रफेअरचा  एक स्वतंत्र विभाग आहे. हा विभाग जगातील कोणत्या नेत्याची कोणती खाजगी गोष्ट फोडली जावी आणि त्याचा राजकीय फायदा कसा करून घ्यायचा यावर काम करतो. उदाहरणार्थ- अमेरिकेचे पूर्वीचे अध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेविंस्की यांचे भांडे मोसादनेच फोडले होते. या गोष्टीनंतर अमेरिकेतील राजकीय चित्र पालटले होते.

असेही म्हटले जाते की मोसादकडे जगभरातल्या सगळ्या शक्तिशाली नेत्यांचे गुप्त रेकॉर्ड आहेत. कुठल्या नेत्याची कमजोरी काय याचे देखील नोंद त्यांच्याकडे ठेवली जाते. या खाजगी बाबींच्या आधारेच मोसाद वेळप्रसंगी या नेत्यांना ब्लॅकमेल करत असते.

भारताने ‘रॉ’साठी मोसाद ची मदत मागितली होती. १९६२च्या भारत-चीन यु*द्धानंतर भारताला एका बाह्य गुप्तहेर संघटनेचे गरज वाटू लागली. तोपर्यंत भारताची आयबी ही संघटना सक्रिय होती. पण काही बाबतीत आयबीच्या कामाला मर्यादा होत्या. त्यामुळे १९८८ साली, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ‘रॉ’चे गठन केले. ‘रामेश्वर नाथ काऊ’ हे ‘रॉ’चे पहिले डायरेक्टर होते.

इंदिरा गांधींनी मोसादकडून प्रशिक्षण घेण्याचे सुचविले होते. त्यावेळी इस्राईल हा यहुदी बहुल देश होता आणि त्यामुळे मुस्लिम देशांच्या निशाण्यावर होता. भारताला पाकिस्तानच्या द*हश*तवादाला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे इस्राईलने भारताची मदत करणे स्वभाविकच होते.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

बॉलिवूडच्या चित्रपटांना वैतागला असाल तर हे ‘पैसावसुल’ दक्षिणात्य चित्रपट तुम्ही नक्की पहा !

Next Post

बालपणी अनौरस आपत्य म्हणून हिणवला गेलेला विल्यम इंग्लंडचा सम्राट बनला होता

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

बालपणी अनौरस आपत्य म्हणून हिणवला गेलेला विल्यम इंग्लंडचा सम्राट बनला होता

एका जहाजावर स्थापन करण्यात आला आहे जगातील सर्वात छोटा देश !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.