The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आठ वर्षांच्या मुलाने सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करत पराक्रम गाजवला होता !

by द पोस्टमन टीम
3 May 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


पहिला महायु*द्धाची कारणे, त्याचे परिणाम सगळ्यांनाच माहिती आहेत. चार वर्षे चाललेल्या या यु*द्धात प्रत्यक्ष यु*द्धभूमीवर तर अनेकांचा बळी गेलाच पण, निष्पाप नागरिकांचाही बळी गेला. याच महायु*द्धात अवघ्या आठ वर्षांच्या सैनिकानेही यु*द्धभूमीवर आपले शौर्य गाजवले होते, याची माहिती मात्र अनेकांना नसेल.

आठ वर्षांच्या या सैनिकाचे नाव होते, मॉम्सिलो गॅव्रिक. 

सर्बियाच्या गुसेव्हो डोंगरात १९०६ साली त्याचा जन्म झाला. त्याच्या आई-वडिलांना एकूण अकरा अपत्ये होती. मॉम्सिलो त्यातील आठवे मुल. ऑस्ट्रो-हंगेरियन सैनिकांनी पहिल्या महायु*द्धाला तोंड फुटल्यानंतर सर्बियाच्या निरपराध नागरिकांनाही सोडले नाही. गॅव्रिक कुटुंबातील सर्व सदस्यांना त्यांनी यमसदनी धाडले. एकटा मॉम्सिलो तेवढा वाचला. कारण, सैनिक त्यांच्या घरात घुसले तेव्हा तो त्याच्या काकाकडे गेला होता. पण, आठ वर्षांचा मॉम्सिलो परत आला तेव्हा त्याने आपल्या कुटुंबियांचे छिन्नविछिन्न झालेले देह पाहिले.

 त्याची आजी, आई-वडील, तीन बहिणी आणि चार भाऊ यांपैकी कुणीही जिवंत राहिले नव्हते. ते दृश्य पाहून छोट्या मॉम्सिलोची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी!

या सैनिकांच्या हाती सापडलो तर आपणही असेच मारले जाऊ या भीतीने मॉम्सिलो कुठून तरी मदत आणि आसरा मिळते का ते शोधत फिरत होता. गुसेव्होच्या डोंगरातून पळताना तो ड्रीना डिव्हिजनच्या लष्करी छावणीत पोहोचला. मेजर स्टीव्हन यांनी या मुलाची परिस्थिती ऐकल्यानंतर त्याला लष्करी छावणीत ठेवून घेतले. त्यांनी मॉम्सिलोला विचारले की तुला बॉ*म्ब फेकता येतील का? तेव्हा मॉम्सिलोने त्यांना दगड फेकून दाखवले. मग त्याला सैनिक म्हणूनच रुजू करून घेण्यात आले आणि मिलॉस मिज्वॉईक याच्याकडे त्याच्या देखभालीची जबाबदारी सोपवण्यात आली. मिलॉस आणि मॉम्सिलो यांची एकमेकांशी चांगलीच गट्टी जमली.



त्याच रात्री मॉम्सिलोच्या धैर्याची परीक्षा घेण्याचे ठरले. त्याला ऑस्ट्रो-हंगेरियन सैनिकाच्या छावणीची माहिती देण्यात आली. आठ वर्षांच्या मॉम्सिलोने या छावणीवर तीन बॉ*म्ब टाकले आणि आपला सूड उगवला. आपल्या आई-वडीलांना आणि भावंडांना मारणाऱ्या त्या सैनिकांवर बॉ*म्ब टाकल्यानंतर त्याला थोडी शांतता मिळाली. त्यानंतर मॉम्सिलोने सेरच्या लढाईत भाग घेतला.

ही लढाई ऑगस्ट १९१४ मध्ये झाली. या यु*द्धात सर्बियाला विजय मिळाला होता. या यु*द्धात मॉम्सिलोने आपल्या चांगलाच पराक्रम गाजवला होता.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

मॉम्सिलोला या यु*द्धात कॉर्पोरलचा दर्जा देण्यात आला आणि त्याला लष्करी गणवेशही मिळाला. वयाच्या ८व्या वर्षी कॉर्पोरल बनणारा तो पहिलाच सैनिक होता.

सेरच्या लढाईत पराभव पत्करावा लागल्याने जर्मनीच्या मनात सुडाग्नी धुमसत होता. जर्मनी आणि बल्गेरियाने मिळून सर्बियावर १९१५ साली ह*ल्ला केला. त्यांनी सर्बियन सैनिकांना अक्षरश: चिरडून टाकले. सुमारे चार लाख सर्बियन सैनिकांना त्यांनी कैद केले. त्यात मॉम्सिलोचाही समावेश होता.

रशियाने दिलेल्या धमकीनंतर जर्मनीने एक वेगळा शांतता करार संमत केला आणि या सर्बेयन सैनिकांना त्यांनी ग्रीसच्या कोर्फू येथे ठेवले. या सगळ्या प्रवासात सर्बेयन सैनिकांना योग्य ती वागणूक न मिळाल्याने अनेक सैनिकांचा मृत्यू झाला होता.

अल्बियन पर्वत पार करताना अनेक सैनिक खाण्यापिण्यावाचून जीव सोडत होते. मॉम्सिलोची देखभाल करणारा मिलॉसही असाच रस्त्यात कोसळला. तेव्हा मॉम्सिलो तिथेच बसून राहिला. मिलॉसने त्याला विनवणी केली की त्याने पुढच्या प्रवासाला लागावे, पण, मॉम्सिलो म्हणाला, “तुला सोडून मी कुठेही जाणार नाही, मेलो तरी तुझ्यासोबत जगलो तरी तुझ्यासोबत.” मॉम्सिलो आणि मिलॉसचा असा एकमेकांवर फार जीव होता.

मॉम्सिलोने मिलॉसला एकटे टाकले नाही. एवढ्याशा पोराचा तो धीरोदात्तपणा पाहून सर्बियन सैनिकांना उत्साह वाढला. मॉम्सिलो या सैनिकांसाठी एक स्फूर्तीचे स्त्रोत होता. एवढ्याशा पोरावर शत्रूच्या सैनिकांमुळे आलेली वेळ पाहून प्रत्येकाच्या धमण्यातील रक्त सळसळत असे.

पुढे मॉम्सिलोला थेसालोनिकी येथे पाठवण्यात आले. इथे त्याने चौथ्या इयत्तेपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. १९१६ साली वयाच्या दहाव्या वर्षी तो कजमाकलनच्या यु*द्धात सहभागी झाला. इथेही त्याने आपल्या पराक्रमाची शर्थ केली. या यु*द्धात विजय मिळाल्यानंतर मॉम्सिलोचा पराक्रम पाहून कमांडर चीफ झिवोजीन मिजिक यांनी त्याला लान्स सार्जंटपदी बढती दिली. एका छोट्या मुलाला हा बहुमान देताना सर्वांनाच स्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा होती.

पहिले महायु*द्ध संपल्यानंतर स्टीव्हन तुकोव्हिक यांनी मॉम्सिलोच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची काळजी घेतली. यु*द्धातील अनाथ मुलांना ब्रिटीश स्कॉलरशिप मिळत होती. मॉम्सिलोला देखील याच स्कॉलरशिपमधून शिक्षणासाठी मदत मिळाली. १९२१ साली मॉम्सिलोने पदवी मिळवली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो आपल्या मूळ गावी परत आला. तिथे आपल्या गावकऱ्यांसोबत तो सर्वसामान्य जीवन जगू लागला.

एवढ्या छोट्या वयात मॉम्सिलोने दाखवलेले धैर्य, त्याच्या मनाचा संयम, त्याचे विचार हे सगळे पाहून थक्क व्हायला होते. एवढ्या छोट्या मुलाने एवढ्या मोठ्या यु*द्धात संपूर्ण सैन्याचे नेतृत्व कसे केले असेल? अवघ्या आठव्या वर्षी त्याला खेळणी हाताळण्याऐवजी बॉ*म्ब हाताळावा लागला. पण, त्याच्या मनाची कोमलता तरीही हरवली नाही, हे एक आश्चर्यच नव्हे काय..?!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या मॅचनंतर जगाला कळलं आता भारताला हलक्यात घेऊन चालणार नाही

Next Post

‘ब्रूस ली’बद्दलच्या अफवा सगळ्यांना माहित आहेत, आता फॅक्टस् वाचा!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

'ब्रूस ली'बद्दलच्या अफवा सगळ्यांना माहित आहेत, आता फॅक्टस् वाचा!

यातला तुमचा फेव्हरेट क्रिकेट अंपायर कुठला..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.